आयपीएल-११ (२०१८)

Submitted by स्वरुप on 6 April, 2018 - 02:23

उद्यापासून आयपीएलचा ११ वा सीझन सुरु होतोय
या सीझनच्या आधी मेगा ऑक्शन झाल्याने बहुतेक संघांचा मेकओव्हर झालाय..... कोण नक्की कोणाकडून खेळतय हे अजुनही बऱ्याच जणांचे कंफ्युजन आहे!
RR आणि CSK परत आलेत.... पुणे आणि गुजरात बाहेर गेलेत.... रहाणे, कार्तिक, अश्विन यांचे पूर्णवेळ कॅप्ट्न म्हणून पदार्पण असेल..... SRH सोडले तर बाकी सर्व संघांचे कॅप्ट्न भारतीय आहेत.... स्पर्धा सुरु होण्याआधीच काही स्टार खेळाडू स्पर्धेबाहेर गेलेत.... सोनी ऐवजी स्टारस्पोर्ट्स आलेय.... आयपीएलमध्ये पहील्यांदाच DRS येतेय

सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-११ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

थोडक्यात काय तर ज्या संघात कर्ण शर्मा असतो ती जिंकते. Wink

वॅटसन ला काय आवडते हे बर्‍यापैकी उघड असूनही काल SRH ला तशी बॉलिंग्न करणे जमले नाही तिथे सामना फिरला.

चहर नि नगीडी ह्यआंचा किती वाटा होता ट्रॉफी जिंकण्यामधे असे तुम्हाला वाटते ? फक्त धोनी , रायडू नि वॅटसन (नि सुरूवातीच्या मॅचेसमधे ब्राव्हो) ह्यांच्या बळावर जिंकले असते का ?

<< फिंगर स्पिनरला गुगली टाकायला कष्ट पडतात फार... जे रिस्ट स्पिनरला बर्‍यापैकी सोपे असते..>> म्हणजे कुंबळे 'फिंगर स्पीनर ' होता का ?

हो

Pages