आयपीएल-११ (२०१८)

Submitted by स्वरुप on 6 April, 2018 - 02:23

उद्यापासून आयपीएलचा ११ वा सीझन सुरु होतोय
या सीझनच्या आधी मेगा ऑक्शन झाल्याने बहुतेक संघांचा मेकओव्हर झालाय..... कोण नक्की कोणाकडून खेळतय हे अजुनही बऱ्याच जणांचे कंफ्युजन आहे!
RR आणि CSK परत आलेत.... पुणे आणि गुजरात बाहेर गेलेत.... रहाणे, कार्तिक, अश्विन यांचे पूर्णवेळ कॅप्ट्न म्हणून पदार्पण असेल..... SRH सोडले तर बाकी सर्व संघांचे कॅप्ट्न भारतीय आहेत.... स्पर्धा सुरु होण्याआधीच काही स्टार खेळाडू स्पर्धेबाहेर गेलेत.... सोनी ऐवजी स्टारस्पोर्ट्स आलेय.... आयपीएलमध्ये पहील्यांदाच DRS येतेय

सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-११ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

उनाडकट ला दुसरी ओव्हर द्यायची गरज नव्हती असं मला वाटलं. त्याचे सगळे बॉल्स एकाच प्रकारचे वाटले. आज प्रेशर खाली चालून गेला, पण नेहमी असं घडेलच असं नाही. त्याच्यापेक्षा धवल कुलकर्णी (डीएसके) कडे व्हरायटी जास्त वाटली. लँग्लिन कसला सीझन्ड वाटतो.

सतत सहा सात ओव्हर्स दहाच्या सरासरीने धावा काढणे - अगदी दहाच्या दहा विकेट्स हाती असल्या तरी अतिशय अवघड आहे असे मला वाटते. कमी ओव्हर्स च्या मॅचेस करायची वेळ आली कि डकवर्थ एकदम खंग्री होऊन जाते हे उघड आहे.

उनाडकट ला दुसरी ओव्हर द्यायची गरज नव्हती असं मला वाटलं. >> Happy

अरे, 'वर्थलेस उगीच' उगाच का बदनाम आहे! पण उपलब्ध परिस्थितीत तोच एक बरा पर्याय आहे. नाहीतर १ बॉल २२ सारखी परिस्थिती निर्माण करणारी अल्गोरिदम्स होतीच की.

दरवर्षी किमान एकतरी IPL match लाइव्ह बघायची या उपक्रमात यंदा बहुदा खंड पडेल असे वाटत असतानाच चेन्नईच्या मॅचेस पुण्यात शिफ्ट झाल्याची बातमी ऐकली..... Feeling happy haapy!

पण दोन वर्षे दुरावा सहन करावा लागलेल्या चेन्नईच्या आयपीएलप्रेमींसाठी मात्र वाईट वाटतेय!

>> १ बॉल २२ सारखी परिस्थिती निर्माण करणारी अल्गोरिदम्स होतीच की.

त्या सामन्यात समस्त सा. आफ्रिकन खेळाडूंची मिळून जेव्हढी चिडचिड झाली नसेल त्यापेक्षा जास्त चिडचिड काल गंभीरची दिसली!

मुंबई अडखळतीय!
हैद्राबादची कमाल बॉलींग..... विल्यमसनचे अचूक बॉलींग चॅंजेस!

मॅच बघताय का कुणी?

अजुन एक लास्ट ओव्हर फिनिश!.... पंजाब वि. बंगळूरु
उमेश यादव seems to be proving something to kohli
ABD... as usual rocks!

मस्त चुरशीच्या होतायत सगळ्या मॅचेस यंदा!

आज रहाणे वि. धोनी नाहीये>>>
हो हो..

रोहित आघाडीला आला नाही तर चांगला स्कोर झाला 6 ओव्हर मध्ये!!

>>रोहित आघाडीला आला नाही तर चांगला स्कोर झाला 6 ओव्हर मध्ये!!

हज़ारों ख़्वाहिशें ऐसी कि हर ख़्वाहिश पे दम निकले
बहुत निकले 'तेरे रन्स' लेकिन फिर भी कम निकले

most of the match they lost; they played a good cricket.... They just lost some crucial moments and that cost them matches!

शेवटी जेव्हा मुंबईला 2 गुण कमी पडणार तेव्हा त्यांना हे 3 सामने आठवणार.. आणि यातला एक तरी जिंकायला हवे होतो असे वाटणार..
तुर्तास नेट रनरेट खराब नाही हेच ते काय त्यांना समाधान..

कलकत्ताने नारायणला ओपनिंगला न पाठवायचा निर्णय आज का घेतला? कुठून येते हि बुद्धी.. बरं मग नंतर मध्येच पाठवून काय साधणार होते.. पॉवरप्लेमध्येच तर खरी धमाल करतो तो.. आजही त्याने सुरुवातीला हैदराबादी बॉलर्सची लेंथ बिघडवली असती तर मॅच वेगळी असती..

रैना धोनी यांनी अजून काही न करता चेन्नईला स्पर्धेत चांगली सुरुवात मिळालीय हे विशेष.. म्हटलं तर उद्या.. सॉरी आज.. राजस्थानचा तुलनेत सोपा पेपर आहे त्यांना...

10 पैकी 9 सामने चेस करणारे जिंकलेत..
उरलेला एक डकवर्थ लुईसने ...

कार्तिक एक महामुर्ख कर्णधार आहे, सलामीला उथ्थपाला पाठवून चुक केली त्यानंतर 3र्याक्रमी गिल ला पाठवायचे सोडून राणाला पाठवले, त्यानंतर एकाला ही सांभाळून खेळ म्हणून सांगितले नाही, जो तो येऊन बाॅल उडवत होता, उथप्पाला 4 थ्या क्रमांकावरच पाठवावे आणि शेवटपर्यंत टिकून खेळायला सांगायला हवे. बाकिच्यांनी हाणामारी केली तरी चालून जाईल,
कार्तिक व राॅबिन या दोघांपैकी एकाने तरी 20 ओव्हर खेळून काढायची जवाबदारी घ्यावी

नरीनला ओपनिंगला न पाठवण्याचा निर्णय (हैद्राबादची बॉलींग बघता) एकवेळ समजण्यासारखा आहे पण मग त्याला एकदम शेवटीच पाठवायला हवे होते.... त्याने आणि रसेलने विकेट्स अक्षरशः फेकल्या
मावीला एकच ओव्हर आणि ती ही मॅच almost हातातुन गेल्यावर?
गिलच्या बाबतीतही तेच..... त्याला जरातरी वरती पाठवायला पाहिजे होते बॅटींगला
असो! कार्तिकचा कॅप्टन म्हणून पहीलाच सीझन आहे.... शिकेल हळूहळू!

हैद्राबाद मात्र चांगलेच फॉर्मात आहे...... पण अजूनही मोठा स्कोअर चेस करायची वेळ आलेली नाहीये त्यांच्यावर!

पहील्या 6ओव्हर मध्ये नरेन मिचेल स्टार्क ला पण मारतो मग भुवी रशिद काय आहे? मुख्य 6 ओव्हर मध्ये मारामारी करून 50-60 रन्स काढले तर उर्वरित 14-15 ओव्हर मध्ये टुकू टुकू खेळून पण 160-170। रन्स लागतात

ईतके सामने लास्ट ओवर लास्ट बॉल फिनिश होत आहेत, स्पेशली चेन्नै मुंबैचे सारेच.... शंका येतेय.. कुछ तो गडबड हैय दया Happy

कालचे दोन्ही सामने छान झाले!

तरी धोनी ने चेंडू जास्त तटवले जेंव्हा फटक्यांची गरज होती जरी त्याचा स्ट्राईक रेट १७९ असला तरी सुरुवातीला फटके मारून दडपण आणणे जमले नाही! ब्राव्होला उशिरा का पाठविले असावे?

>>तरी धोनी ने चेंडू जास्त तटवले
That's typical dhoni

गेल मात्र काल कमाल खेळला.... माझ्या fantasy league team चा power player होता तो!

काल राजस्थान सही खेळले!
संजू इज इन सुपर फॉर्म.... रहाणे पण काल एकदम Hitting mode मध्ये उतरला होता

पुढच्या मॅचला शॉर्टऐवजी क्लासेन किंवा जोफ्रा आर्चर संघात येतील असे वाटतय!

क्लासेन आहे का त्यांच्यात.. स्पिनर्सना चांगले मारतो तो..
मग त्याला मागे खेळवून त्रिपाठीला ओपनिंगला टाकू शकतात.. मागच्या सीजनला पुण्यातर्फे त्यानेच पुढे येत मारलेले ना?

हो.... मला वाटलेले की RCB च्या मॅचलाच घेतील क्लासेनला चहल आणि सुंदरसमोर.... पण त्यांनी शॉर्टला अजुन एक चान्स दिला!
आता बहुतेक KKR समोर काढतील त्याला!

आता पर्यन्तचे बहुतेक सर्वच सामने शेवटच्या षटकापर्यन्त नेले!
प्रेक्षकांची पुरेपुर वसुली करुन देणारे!

काल २-३ चौकार असे बघितले पॉईंट आणि गली मधून मारलेले की चेंडू सलग २-३ वेळा ऑफच्या बाहेर स्वैर 'हीट मी इफ यु कॅन' असे आणि सीमारेषेवर थेट थर्डमॅन आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये मोठी पोकळी.. फलंदाजा जवळ बराच वेळ गली आणि पॉईंट मधुन चौकार मारायला. असे २-३ गोलंदाजांनी केलेले!

संजू अप्रतिम खेळला काल. त्याचे शॉट्स क्लासी होते. रहाणे ची सुरूवात पण मस्त होती. शॉर्ट च्या जागी क्लासेन ला घ्यावं आणी त्रिपाठी ला ओपनिंग ला पाठवावं - सहमत!

रहाणे मला गांगुली कॅटेगरीतला कॅप्टन वाटतो. लेट मी एक्स्प्लेनः गांगुली खेळाडू म्हणून लिमिटेड होता, पण त्यानं टीम घडवताना, मोठे खेळाडू घेतले, किंवा जे आधी होते, त्यांचे पंख नाही कापले. टीम घडवली - ज्यात प्रत्येकाचा स्पेसिफिक रोल होता. डावपेचात तो श्रूड होता. मला हे सगळे गुण रहाणे मधे दिसतात. एका टेस्ट मधे जेव्हा त्याला कॅप्टन केला होता, तेव्हा त्याने, कोहली ला लाईक रिप्लेसमेंट म्हणून अय्यर चा सेफ पर्याय न निवडता, कुलदीप ला टीम मधे आणलं होतं. कुलदीप च्या करियर ची सुरूवात झाली. रॉयल्स चं नेतृत्व करताना सुद्धा त्याचं डावपेचातलं कौशल्य दिसतं.

केकेआर चा टोटल डॉमिनन्स!! डीडी च्या बॉलिंग मधल्या पहिल्या २ आणी शेवटची १ ओव्हर आणी पंत-मॅक्सवेल ची पार्टनरशिप वगळता, इट्स ऑल केकेआर!

पंत मुंबई आणी कोलकता, दोन्ही टीम्स च्या विरुद्ध खेळताना स्पिन बॉलिंग ला चांगला खेळला. हल्ली स्पिन बॉलर च्या हातातुन बॉल न ओळखणं किंवा फूटवर्क नसणं, हे दोन्ही अवगुण त्याच्या बॅटींग मधे दिसले नाहीत.

>>रहाणे मला गांगुली कॅटेगरीतला कॅप्टन वाटतो.

हम्म्म ....... पण गांगुली रहाणेपेक्षा खुप खुप खुप व्होकल आणि आक्रमक होता! Wink
रहाणेचा श्ऱुडनेस अजुनतरी दिसलेला नाहीये.... उलट मला तो गुडीगुडी कप्तान वाटतो..... पण रहाणे आणि वॉर्न एकमेकाला पूरक वाटतायत (जसे गांगुली आणि जॉन राईट होते)
आणि त्या धर्मशालाच्या मॅचमध्ये कुलदीपला खेळवण्यात रहाणेपेक्षा कुम्बळेचा रोल अधिक असावा!
पण एक प्लेयर म्हणून रहाणे आपल्याला नेहमीच आवडतो! (कदाचित कप्तान म्हणूनही आवडायला लागेल)

>>पंत मुंबई आणी कोलकता, दोन्ही टीम्स च्या विरुद्ध खेळताना स्पिन बॉलिंग ला चांगला खेळला

पंत, सॅमसन, नितिश राणा, मनदीप, कृणाल वगैरे मंडळी Indian batting ची next gen असेल मोस्टली! ..... ते टेंपरामेंट दिसतय या लोकांकडे!

>>आता पर्यन्तचे बहुतेक सर्वच सामने शेवटच्या षटकापर्यन्त नेले!
>>ईतके सामने लास्ट ओवर लास्ट बॉल फिनिश होत आहेत, स्पेशली चेन्नै मुंबैचे सारेच.... शंका येतेय.. कुछ तो गडबड हैय दया Happy

गंभीर आणि कार्तिकने तुमच्या कॉमेंटस वाचल्या बहुतेक इकडे येउन
Wink

Pages