आयपीएल-११ (२०१८)

Submitted by स्वरुप on 6 April, 2018 - 02:23

उद्यापासून आयपीएलचा ११ वा सीझन सुरु होतोय
या सीझनच्या आधी मेगा ऑक्शन झाल्याने बहुतेक संघांचा मेकओव्हर झालाय..... कोण नक्की कोणाकडून खेळतय हे अजुनही बऱ्याच जणांचे कंफ्युजन आहे!
RR आणि CSK परत आलेत.... पुणे आणि गुजरात बाहेर गेलेत.... रहाणे, कार्तिक, अश्विन यांचे पूर्णवेळ कॅप्ट्न म्हणून पदार्पण असेल..... SRH सोडले तर बाकी सर्व संघांचे कॅप्ट्न भारतीय आहेत.... स्पर्धा सुरु होण्याआधीच काही स्टार खेळाडू स्पर्धेबाहेर गेलेत.... सोनी ऐवजी स्टारस्पोर्ट्स आलेय.... आयपीएलमध्ये पहील्यांदाच DRS येतेय

सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-११ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

कृणाल, मनदीप विषयी माहीत नाही. डोमेस्टीक सीझन मधे काही फारसं केलेलं नाहीये. सहसा आयपीएल मधे गाजलेल्या लोकांची डोमेस्टीक रेकॉर्ड्स बघणं ईंटरेस्टींग असतं.

राणा डोमेस्टिक पण चांगला खेळलेला आहे

सुनिल नरेन, निर्विकार शब्दाचा अक्षरशः मुर्तिमंत अर्थ आहे. 14 चेंडूत 50 मारले काय अन् 5-6 विकेट घेतले काय चेहर्यावर अजिबात आनंद नाही. विकेट घेतल्यावर फलंदाजाला शिव्या देत नाही, मैदानभर पळत नाही, आरडाओरडा नाही, काहीच नाही.. इतका शांत जसा काही विशेष घडल नाही. मैदानात 13 खेळाडू पैकी 12 जण रिअॅक्शन देतात व नरेन पुढचा चेंडू टाकायला जात असतो...
पठ्याने सुपरओव्हर "मेडन" टाकली आहे, तेव्हापण इतकाच शांत होता

कोहली, नरेन कडून 1 % जरी शांत राहायला शिकला तर आॅलटाईम ग्रेट कॅप्टन होईल

राणा, पंत, संजू - तिघही डोमेस्टीक मधे चांगले खेळले आहेत ह्या वर्षी. मयंक आगरवाल पण छान खेळलाय.

कृणाल, मनदीप विषयी माहीत नाही. डोमेस्टीक सीझन मधे काही फारसं केलेलं नाहीये. सहसा आयपीएल मधे गाजलेल्या लोकांची डोमेस्टीक रेकॉर्ड्स बघणं ईंटरेस्टींग असतं. >> मान्य पण कृणाल ज्या consistency मधे टेंपरामेंट दाखवतोय ते बघून त्याला उचलायला हवा असे वाटते. नुसत्या डोमेस्टीक मधे इशान किशन ने पण धुमाकूळ घातला होता. राणा चा काही तरी ego clash आहे दिल्लीच्या डोमेस्टीक दादाबरोबर त्यामूळे त्याला उडवला जाते वगैरे वाचलेले.

गंभीर आणि कार्तिकने तुमच्या कॉमेंटस वाचल्या बहुतेक इकडे येउन>>>

Lol

रसेल पण अक्षरशः तुडवतो गोलंदाजाला! कोणत्याही चेंडूवर षटकार मारतोय पठ्ठ्या!

काही लोकं डोमेस्टीकसाठीच बनलेले असतात. त्यामुळे ते रेकॉर्ड फसवे असू शकतात. तुलनेत आयपीएलचा दर्जा बरा वाटतो पारख करायला. अर्थात हा 20-20 चा फॉर्मेट आहे ..

काल पंत आणि मॅक्सवेल दोघे फालतू बॉलला फालतूमध्ये आऊट झाले. अन्यथा 10 ची सरासरी राखलेलीच. थोडे टिकले असते तर सामना सहज आवाक्यात होता. जेवढा मोठा पराभव वाटतोय ते चित्र वेगळेच असते.

काल शेवटी रोहित शर्माचा दिवस उगवला! कोहलीचे शर्थीचे प्रयत्न अपुरे पडले समोरून एकही फलांदाज उभा राहू न शकल्यामुळे!

कोहलीने फार काही शर्थीचे प्रयत्न केले नाहीत. सामना त्याने सोडलेलाच. फक्त अंतर कमी करायला खेळत होता असे वाटले. कृणाल आणि मार्कण्डेयच्या त्या मधल्या सहा सात ओवरच्या स्पेलने सामना दूर नेला आणि कोहलीनेही मुकाट जाऊ दिला. शेवटी त्याने मारले आणि वैयक्तिक स्ट्राईकरेक सुधारला. पण तो आकडा फसवा आहे.

"तुलनेत आयपीएलचा दर्जा बरा वाटतो पारख करायला. " - आयपीएल च्या फॉर्म वरून टीम निवडायचा वेडेपणा बीसीसीआय ने एकदा केला होता, पण तो अंगाशी आला. बरेच आयपीएल स्टार्स आहेत, जे डोमेस्टिक स्पर्धांमधे / संधी मिळाल्यास, इंटरनॅशनल मॅचेस मधे फारशी चमक दाखवू शकले नाहीयेत.

आज रॉयल्स ची बॅटींग स्टार्ट-स्टॉप अशी होती. मोमेंटम कुठेच मिळाला नाही. रॉयल्स ची बॉलिंग तशीही वीक आहे. बॅटींग मधे त्यांनी शॉर्ट च्या जागी क्लासेन ला - मधल्या फळीत खेळवून बघायला हरकत नाही.

राजस्थानचा कोलकात्याविरुद्धचा खेळ बघता त्यांची सालाबादप्रमाणे मिडटेबल टीम होण्याकडे वाटचाल चालू आहे!

एक मॅच अप्रतिम खेळ करुन जिंकायची आणि पुढच्यात पार ढेपाळायचे!

High time to bring in Klassen and Jofra archer!

बाकी काल गेल झक्कास खेळला.... खेळायलाच हवा होता..... जसे तो म्हणाला तसे he was not trying to prove anything to anybody but to earn some respect!
He was surely not a player to go unslod even at his base price.... KXIP nailed it!

आज धोनी आणि रहाणे या पुण्याच्या दोन माजी खेळाडूंच्यात मॅच.... दोघांनाही पुण्याच्या कंडीशन्स चांगल्याच माहिती आहेत!

"राजस्थानचा कोलकात्याविरुद्धचा खेळ बघता त्यांची सालाबादप्रमाणे मिडटेबल टीम होण्याकडे वाटचाल चालू आहे!

एक मॅच अप्रतिम खेळ करुन जिंकायची आणि पुढच्यात पार ढेपाळायचे!" - सहमत. आगरकर च्या मुलाखतीत म्हटल्याप्रमाणे they miss that 'X-factor'. आर्चर - क्लासेन जोडी (अपेक्षेप्रमाणे) खेळली आणी स्टोक्स फॉर्म मधे आला, तर खूप फरक पडेल. इश सोधी चा सुद्धा ऑप्शन आहे.

गेल जबरदस्त खेळला. पंजाब ची टीम जख्मी वाघांची आहे. सगळ्यांनाच काही ना काही प्रूव्ह करायचय.

रॉयल्स नी अजुन एक बकवास सुरूवात केलीये. वॉटसन चे २ कॅचेस सोडले. भरपूर बाऊंड्री बॉल्स टाकताहेत. उनाडकट साठी इतका पैसा का खर्च केला हा मला ऑक्शन पासून पडलेला प्रश्न प्रत्येक मॅचगणिक मोठा होत जातो.

उनाडकट गेल्या वर्षी पुण्यासाठी चांगला खेळला होता रे.

एक मॅच अप्रतिम खेळ करुन जिंकायची आणि पुढच्यात पार ढेपाळायचे!" >> हेच गेल लाही लागू होते ना ? Happy

आर्चर ला न खेळवण्याचे कारण कळत नाही.

"आर्चर ला न खेळवण्याचे कारण कळत नाही." - अजुनही इंज्युअर्ड आहे.

"उनाडकट गेल्या वर्षी पुण्यासाठी चांगला खेळला होता रे." - त्याला वर्ष होऊन गेलं. नंतर डोमेस्टीक (टी-२०, वनडे, चार दिवसीय), ईंटरनॅशनल कुठेच काही विशेष चमक नाही दाखवली त्याने.

त्याला वर्ष होऊन गेलं >> अरे IPL to TIPL बघत असणार. असे बरेच्जण आहेत कि.

आज राहणे पहिल्या ओव्हर मधे मारलेला straight drive वरचा सिक्स कसला खल्लास होता.

"असे बरेच्जण आहेत कि." - तेच मला कळत नाही. असच एक क्लासिक उदाहरण म्हणजे, राहूल त्रिपाठी. तो महाराष्ट्राकडून लिमिटेड ओव्हर्स साठी नेहमीच मिडल ऑर्डर मधे खेळतो. मागच्या वर्षी आयपीएल मधे ओपनिंग ला आला होता. आता त्याला आयपीएल चे कॉमेंटेटर्स आणी प्रेक्षक, ओपनिंग ला पाठवावं ह्या विषयी हिरिरीनं मतं मांडतात.

आणखी एक विचार डोक्यात आला: गेल, वॉटसन, ब्राव्हो ई. मंडळी, जगभर च्या टी-२० लीग्ज खेळतात, म्हणून ह्या फॉर्मॅट शी जास्त कनेक्टेड रहातात आणी खूप relevant रहातात. बीसीसीआय ने अशी संधी दिल्यास, बर्याचश्या, त्रिपाठींचं, पठाणांचं, कर्ण शर्मांचं आणी अशा अनेक खेळाडूंचं कल्याण होऊ शकेल.

मागच्या वर्षी आयपीएल मधे ओपनिंग ला आला होता. >> तो शेवटी शेवटी चांगल्या इनिंग्स खेळला होता ओपन करून म्हणून त्याला ओपन का करयाला देत नाहि असा प्रश्न असावा. तसेही राहाणे चा पार्टनर बदलता आहे. राहणे नि संजू सॅमसन मधल्या ओव्हरस मधे कधी थंड खेळू लागतील हे सांगता येत नसल्यामूळे त्या दोघांनी एकदम ओपन करणे रिस्की आहे. बटलर ,स्टोक्स नि गोवाथम असे तिघे पिंच हिटीम्ग करू शकणारे असल्यामूळे त्रिपाठीला वर पाठवून बघायला हरकत नाही.

वॅटसन ची एक मोठी खेळी झाल्यामूळे बाकिच्या टिम्स नी सुटकेचा नि:श्वास टाकला असेल आता Happy

बीसीसीआय ने अशी संधी दिल्यास, बर्याचश्या, त्रिपाठींचं, पठाणांचं, कर्ण शर्मांचं आणी अशा अनेक खेळाडूंचं कल्याण होऊ शकेल. >>point मधे दम आहे. करतील तसेही कधीतरी. गेल्या आठवड्यामधे u-19 players ना IPL मधे नेट मधे अतिरिक्त बॉलिंग करायला लावून त्यांच्यावर अतिरिक्त workload टाकला जाणार नाही हे BCCI बघणार अशी बातमी वाचून डोळ्यात पाणी आले. BCCI ला Cricket Aus वगैरे ने takeover केले कि काय ? Wink

आज मुंबई आणि चेन्नईचे दोन्ही सामने पुन्हा एकदा गडबड गच्ची वाले झाले..
बुमराहने जशी चेन्नई सामन्यात बॉलिंग टाकली तशीच आज टाकली. लेंथ बॉल, शॉर्ट एन वाईड, आणि फारसे वेरीएशन नाही. सहाच्या सहा यॉर्कर मारायची क्षमता असून सिण्गल देत जो मारतोय त्याचा स्ट्राईक बदलायचा प्रयत्न नाही. दोघांनी नो बॉल सुद्धा टाकले. फिल्ड वेगळी आणि बॉलिंग वेगळी. ऑफचे प्लेअर आत आणि ऑफ स्टंपबाहेर फुल आणि वाईड बॉलला फोर देताहेत.. फलंदाजीतही स्कोअर थांबवला.. सातत्याने संशयास्पद सामने होताहेत

काल मुंबईने आणी आज दिल्ली ने जिंकता येणारी मॅच हारून कशी दाखवावी, ह्याचं उत्तम प्रात्यक्षिक दाखवलं. दिल्ली ची सुरूवातीची एनर्जी पहाता, आज ते 'शेंडी तुटो वा पारंबी' अशा आवेशात वाटत होते, शेवटी शेंडी तुटली. (आवेश खान चांगली बॉलिंग करत होता)

दिल्ली कडे चिल्ली पील्ली भरपुर आहेत. पन्त, अय्यर, पृथ्वी इ. त्यामुळे अनुभव कमी पडतो. काल तर गौतम पण ढेपाळला होता.

>>सातत्याने संशयास्पद सामने होताहेत

अरे इतके संशय मनात ठेउन बघू नका रे!...... उलट मस्त मॅचेस होतायत..... Enjoy करा!

>>काल मुंबईने आणी आज दिल्ली ने जिंकता येणारी मॅच हारून कशी दाखवावी, ह्याचं उत्तम प्रात्यक्षिक दाखवलं
मुंबईच्या हातात ती मॅच फक्त एक दोन ओव्हरसाठी (बुमराहची ती ओव्हर आणि त्यानंतरची ओव्हर) होती.... बाकी almost सगळी मॅच राजस्थानच्याच हातात होती!
गौथमकडून (जरी तो डोमेस्टिकमध्ये वन डाउन खेळत असला तरी) कुणाला फारश्या अपेक्षा नव्हत्या..... पण त्याने तो दोन फील्डरच्या वरुन थर्डमॅनला मारलेला फोर, नंतर उनाडकट ला नाकारलेला स्ट्राइक आणि मग तो मॅच विनिंग शॉट सगळेच impressive होते.... very confident!

त्रिपाठी ओपनिंगला गेल्यामुळे आणि गौथम चांगला खेळल्यामुळे आता राजस्थानची बॅटींग सखोल वाटायला लागलीय
जोफ्रा आर्चरच्या रुपाने त्यांना आता तो एक मिस्सिंग एक्स फॅक्टर मिळालाय!

उलट मस्त मॅचेस होतायत..... Enjoy करा!
>>>

मुंबई चेन्नईच्या संशयास्पद वाटताहेत... असो

बाकी कालची छान झाली. पृथ्वी शॉ ला बघून बरं वाटलं. दोन चांगले शॉट मारले, दोन एज लागल्या, जवानीच्या जोशमध्ये बादही झाला. पण जे काही दहा चेंडू खेळला त्यावरून मी आलोय हे सांगून गेला. मुळात लहान वयात शारीरीक ताकदीला अनुसरून या लेव्हलला फार आक्रमक खेळणे सोपे नसते. तरी तो लो स्कोअरींग सामन्यात तसा खेळला. क्लास आणि कॉन्फिडन्स, दोन्ही दिसले यात..

दिल्ली काल घरच्या मैदानावर जिंकेल अस वाटल होत... पण हरलेच शेवटी!
चांगले खेळाडू असूनही दिल्लीमध्ये ते टीमस्पिरीट दिसत नाहीये.... ती जिगर दिसत नाहीये!
खर म्हणजे गंभीर आणि पॉंटींग या जोडीची बरीच हवा झालेली स्पर्धा सुरु होण्याअगोदर.... श्रेयस अय्यरने मुलाखत वगैरे सुद्धा दिलेली द्रवीड आणि पॉंटींगची तुलना करत पण प्रत्यक्ष स्पर्धेत या दोघांचा impact फारसा जाणवलाच नाही.... गंभीर स्वताच्याच परफॉर्मन्सच्या प्रेशरखाली असल्यासारखा दिसतोय!

त्यातून त्यांचा हुकमी एक्का 'मॉरिस' यंदा बिलकुलच चालत नाहीये!

काल पृथ्वी शॉ आणि आवेश खान ने मात्र इंप्रेस केले!

मुंबई कडे स्पेशल टॅलेंट आहे. त्यांना ही कला जमलीये. अर्थात ते नेहेमीच ठाण्याहून सीएसटी ला जाताना, कर्जत लोकल पकडून, डोंबिवली किंवा कल्याण ला उतरून फास्ट लोकल पडून मग सीएसटी ला जातात. अजून तर त्यांचा ७ मॅचेस चा थ्रेशोल्ड सुद्धा पार व्हायचाय.

मुंबई ला बॅटींग नि बॉलिंग मधे शेवटच्या ओव्हर्स झेपत नाहियेत. आज त्यांनी SRH ला शेवटची ओव्हर बॉलिंग न करून वेळ मारून नेली Wink

रोहितची खेळी बंगळुरू सोबत झाली त्यामुळे अजून ३-४ डाव तरी प्रतिस्पर्ध्याना त्याच्या खेळाची भीती नाही..
पोलार्ड ऐवजी दुसरा घ्या कुणीतरी..

कालच्या सामन्यात पोलार्डला मोजलाच नव्हता. अश्या लो स्कोअरींग सामन्यात फुकट एक विकेट आहे ती. पोलार्ड अंबानी परीवाराचा फार लाडका असावा. येनीवेज, ड्युमिनी आहे का मुंबईच्या बेंचवर? त्याला घ्यायला हवे. कालही असता तर कामात आला असता.. चांगल्या टेंपरामेंटचा प्लेअर आहे

दिल्लीच्या कर्णधारपदावरुन गंभीर पायउतार.... श्रेयस अय्यर कर्णधार!

ऑस्ट्रेलियन कोच आणि भारतीय कर्णधाराची तडकाफडकी उचलबांगडी/राजीनामा/पायउतार होणे (जे काही असेल ते) हा निव्वळ योगायोग असावा का?

माझ्या एका मित्राने हे (किंवा असेच काहीसे) भाकीत माझ्या एका फेबु पोस्टवर स्पर्धा सुरु होण्याअगोदरच केले होते!

गौतम ने केकेआर सोडून गंभीर चूक केली.. 4-5 वर्षापासून ज्या संघाला ओळखून आहे ते सोडून अचानक नविन संघात जाणे व तेथील कर्णधार होणे सगळे गणित लगेच जमून येणारे नव्हते

मला दिल्ली चा कर्णधार (गंभीर नंतर) पंत होईल असं वाटलं होतं. पंत डोमेस्टीक लिमीटेड ओव्हर्स टूर्नामेंट्स मधे दिल्ली चा कॅप्टन आहे. अय्यर कधीच कुठेच कॅप्टन नसताना त्याला कॅप्टन करणं ही वेगळीच मूव्ह आहे. hopefully, it will work.

Pages