आयपीएल-११ (२०१८)

Submitted by स्वरुप on 6 April, 2018 - 02:23

उद्यापासून आयपीएलचा ११ वा सीझन सुरु होतोय
या सीझनच्या आधी मेगा ऑक्शन झाल्याने बहुतेक संघांचा मेकओव्हर झालाय..... कोण नक्की कोणाकडून खेळतय हे अजुनही बऱ्याच जणांचे कंफ्युजन आहे!
RR आणि CSK परत आलेत.... पुणे आणि गुजरात बाहेर गेलेत.... रहाणे, कार्तिक, अश्विन यांचे पूर्णवेळ कॅप्ट्न म्हणून पदार्पण असेल..... SRH सोडले तर बाकी सर्व संघांचे कॅप्ट्न भारतीय आहेत.... स्पर्धा सुरु होण्याआधीच काही स्टार खेळाडू स्पर्धेबाहेर गेलेत.... सोनी ऐवजी स्टारस्पोर्ट्स आलेय.... आयपीएलमध्ये पहील्यांदाच DRS येतेय

सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-११ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

<< तसे तर त्यांना जवळपास सर्वच जिंकायच्या आहेत. पण ... >>

तुमची मुंबैची टीम 'चला हवा येवूं द्या'च्या
मंचावर येतेय म्हणे - 'प्रमोशन'साठी !!

havaayev.jpg

RR is probably the worst team. They should not even compete and bring the intensity down. May be RR and RCB can have their own bilateral series.

त्या कौल ने वोहरा चा कॅच सोडल्यावर डोक्यात विचार आला की आयपीएल मधे फिल्डींग स्टँडर्ड्स किती सामान्य असतात, तितक्यात कोहली चा कॅच सुटला आणी कॉमेंटेटर म्हणाला की गेल्या ३९ मॅचेस मधे ७० कॅचेस सुटले आहेत. Wink अंपायरिंग स्टँडर्ड्स तर आयएसआय मार्क्ड दर्जा(हीन) आहेत. Happy

एनी वे, ही मॅच आरसीबी जिंकेल असं वाटतय. मोईन अली चं सिलेक्शन ही चांगली मूव्ह होती.

"एनी वे, ही मॅच आरसीबी जिंकेल असं वाटतय." - हे वाक्य टाकेपर्यंत एबी आऊट! काहीही चाल्लय आरसीबी चं. खरच त्यांनी आणी रॉयल्स नी एक वेगळी लीग खेळावी .... चुरशीची तरी होईल - म्हणजे कोण हारतं ही चुरस!

गेल्या ३९ मॅचेस मधे ७० कॅचेस सुटले आहेत. >>> त्या सुद्धा कित्येक हलवा कॅचेस, चांगल्या चांगल्या फिल्डरकडून .. संशयास्पद.. त्या दिवशी जडेजाने लागोपाठ दोन बॉल वर दोन हातातल्या कॅच सोडल्याचे पाहिले आणि मग तर संशय आणखीनच दाट झाला.. मर्कंडेने उथप्पाची सोडलेली कॅच तर अशक्य सोपी होती. त्यानंतर ड्युमिनीने हातातून पार सिक्स जाऊ दिला.. काहीतरी स्पॉट फिक्सिंग नक्की चालत असणार. खास करून मुंबई चेन्नई हे दोन मला जास्त संशयास्पद वाटतात. त्यांचे सामनेही फार क्लोज होतात आणि विचित्र घटनाही घडतात.

"एनी वे, ही मॅच आरसीबी जिंकेल असं वाटतय." - हे वाक्य टाकेपर्यंत एबी आऊट! >>>
मला शंका आहे की जगातले सर्व सर्वोत्तम फलंदाजांचा भरणा असलेला ( हे फलंदाज तीनही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करतात) संघ एकही कसोटी सामना न खेळलेल्या गोलंदाजांसमोर एवढा कसा ढेपाळतो!

>>RR is probably the worst team.

शांत गदाधारी भीम! शांत!
अजुनही मिड टेबल येउ शकती ती टीम

पॉईंटस टेबलवर काही जरी दिसत असले तरी सगळे सामने मस्त चुरशीचे होतायत!
फार क्वचितच सामने डल आणि अगदीच एकतर्फी झालेत.... हरणाऱ्या टीमही लढून हारतायत.... आणि आपले भारतीय डोमॅस्टीक खेळाडू मस्तच खेळतायत!

>>मला शंका आहे की जगातले सर्व सर्वोत्तम फलंदाजांचा

जसे आपले uncapped फलंदाज मिशेल जॉन्सन, डेल स्टेन, मलिंगा वगैरे आंतरराष्ट्रीय किर्तीच्या गोलंदाजांना सहजी फटकवतात तसेच!
Its all about your game and not the name and fame!

>>त्या कौल ने वोहरा चा कॅच सोडल्यावर डोक्यात विचार आला की आयपीएल मधे फिल्डींग स्टँडर्ड्स किती सामान्य असतात,

हल्ली झालेत!..... विशेषतः या आयपीएलमध्ये जरा जास्तच!

कारण आयपीएलच्या आधीच्या सीझनमध्ये काही अत्त्युच्च दर्जाचे कॅचेस आपण बघितलेच आहेत की!

हल्ली झालेत!..... विशेषतः या आयपीएलमध्ये जरा जास्तच! >> +१ आधीच्या वर्षांमधे अधिक चांगली फिल्डींग बघायला मिळाली होती. कदाचित एकंदर दर्जा वाढल्यामूळे आपल्या अपेक्षाही वाढल्या असाव्यात. आय्पील चे एकंदर स्क्येड्यूल जसे असते त्यामूळे जसे जसे अधिक सामने होतात तसा एकंदर फटीग वाढत असावा नि त्याचा परीणाम दिसत असेल.

काल आरसीबी जिंकली असती तर मुंबईचे वांदे होते. कोलकताला किमान 3-4 सामने जिंकायचे आहे पण कार्तिकच्या मुर्ख कॅप्टनशीपमुळे हाताशी येणारे विजय गमावून बसण्याची शक्यता अधिक आहे.

त्यात मुंबईचा सामना कोलकत्याशी आहे म्हणजे तो सेमीफाइनल स्वरूपात खेळला जाईल जो जिंकला तो 4थ्या क्रमांकावर जाणार. काल हैदराबादचे स्थान निश्चित झाले निव्वळ स्लोबाॅल आणि याॅकर्स या दोनच चेंडू परिनामकारक वापरले गेले त्यात फलंदाज फसले. जिथे गेल ने तुडवले तिथे काहीही डाळ शिजली नाही. फलंदाजने बाऊ केला आहे. डिविलियर्स स्वतःच्या चुकिने आऊट झाला. दोन्ही चेंडू समान होते बॅकफुटवर न जाता खेळला असता तर चित्र वेगळे असते

<< मला शंका आहे की जगातले सर्व सर्वोत्तम फलंदाजांचा भरणा असलेला.......... संघ एकही कसोटी सामना न खेळलेल्या गोलंदाजांसमोर एवढा कसा ढेपाळतो! >> सगळेच फलंदाज संघातल्या इतर सर्वोत्तम फलंदाजांवर भिस्त ठेवून बाद होत असावेत ! ' Too many slips spoil the catch' सारखंच !! Wink
<< भाऊ, मुंबैवाल्यांनी तुमचा फारच भ्रमनिरास केला दिसतोय! >> मी हल्लीं मुख्यत्वें मुंबैचेच सामने बघतो, त्यामुळे असावं; शिवाय, अजूनही ती सचिनची टीम आहे ,हें डोक्यातून जात नाही व तीचा पराभव अधिकच झोंबतो !!! Sad

tattoo.jpg

>>अजूनही ती सचिनची टीम आहे ,हें डोक्यातून जात नाही व तीचा पराभव अधिकच झोंबतो

अगदी असेच असेच मला (आणि कदाचित फेफ ला पण) राजस्थान रॉयल्स बद्दल वाटत असते! ..... अजुनही तो राहुल द्रवीडचाच संघ वाटतो!

पण राहुल द्रवीड अंडर १९ आणि अ संघाचा कोच बनल्यापासून त्याचा कनेक्ट सगळ्या संघांबरोबर तेव्हढाच वाटतो..... most of the youngsters talk about his mentoring and its role in shaping up their careers as a better player..... त्यामुळे पंत खेळला तरी आनंद होतो, सॅमसन खेळला तरी, गिल किंवा मावी खेळले तरी तेव्हढाच आनंद होतो आणि पृथ्वी शॉ खेळला तरी भारी वाटते!

द्रविड मुळे त्याच्या young apprentice कडून अपेक्षा आहेत आणी बरेच वेळा ते त्या पूर्ण करतात, त्यामुळे बरं वाटतं. खरं तर मी आयपीएल कडून हीच अपेक्षा ठेवली आहे. हे यंगस्टर्स कसे खेळतात, प्रेशर हँडल कसं करतात, ते बघायला आवडतं. दिल्ली जरी क्वालिफाय नाही झाली तरी अय्यर, पंत, आवेश खान, पृथ्वी शॉ छान खेळले. केकेआर कडून, गिल आणी मावी मस्त खेळले. नागरकोटी ला खेळताना बघायला आवडलं असतं. इशान किशन आणी संजू नी अपेक्षा पूर्ण नाही केल्या.

मुंबई च्या कँप मधे बसलेला सचिन स्क्रीन वर दिसला, की सगळे अभिनिवेश गळून पडतात. त्या बाबतीत भाऊंशी सहमत आहे.

"कारण आयपीएलच्या आधीच्या सीझनमध्ये काही अत्त्युच्च दर्जाचे कॅचेस आपण बघितलेच आहेत की!" - एखादा प्रेक्षणीय कॅच प्रत्येक मॅच मधे अजुनही दिसतो, पण तरी ग्राऊंड फिल्डिंग आणी साधारण फिल्डिंग स्टँडर्ड्स, क्लब लेव्हल क्रिकेट ला असायला हवेत तितकेच असतात - आणी ते बरोबर देखील आहे.

"शांत गदाधारी भीम! शांत!" - RR put up another mediocre score. पहिल्या ६ ओव्हर्स मधे ६३ रन्स काढल्यावर, पुढच्या १४ ओव्हर्स मधे ९५ रन्स काढल्या आहेत. They simply do not even put up any competition. बॉलिंग मधे काय दिवे लावतात ते बघायचं. गेल, राहूल, तिवारी, नायर, Stoinis असे बरेच जण आहेत आणी १५९ काही विशेष स्कोअर नाहीये.

आर आर नी बॉलिंग जबरी केलीये आत्तापर्यंत, शेवटच्या 4 ओव्हर्स मध्ये काय करतात ते बघायचं? भरपूर पर्याय आहेत, मोस्टली अर्चार आणि स्टोक्स टाकतील उरलेल्या चार ओव्हर्स

"बॉलिंग मधे काय दिवे लावतात ते बघायचं."- जबरदस्त जेवण झालं आज. स्वतःचेच शब्द खाल्ले पोटभर! वेल डन रॉयल्स! किती काळ टिकेल हे मोमेंटम माहीत नाही, पण आज तरी जिंकले. (MH-12 comment!)

ईश सोधी आणि गौतम अप्रतिम, अर्चर क्लास.. तरी स्टोक्स असताना उनाडकट ला शेवटच्या ओव्हर्स देणं पटलं नाही
किती ते बॉलर्स, (मधली एक ओव्हर बळच त्या अनुरीत सिंग ला दिली, काहीच गरज नव्हती,) बटलर, सॅमसन आणि राहणे सोडून सगळेच बॉलर्स..

आजचे आर आर चे टीम सिलेक्शन अतिशय चुकीचे होते!
लोमरोर आणि बिन्नी ऐवजी एखाद्या नवीन बॅट्समनला संधी दिली असती तरी चालले असते!

असो!
आता आर आर अजुन एखादी मॅच खतरनाक वगैरे जिंकतील.... आपल्याला आशेला लावतील आणि मग नेहमीसारखे गचाळ खेळून मिड टेबल येउन बसतील!

आज शेन वॉर्न फारच ॲक्टीव्ह दिसला...... पार फुटबॉलच्या कोचसारखा बॉंड्रीवर उभारुन दोन ओव्हर्सच्या मध्ये सल्ले देत होता!

इंप्रेसड विथ गौथम वन्स अगेन!

बटलरला पहील्यापासून ओपनींगला खेळवल्र असते तर हे चित्र जरा वेगळे दिसले असते!
रहाणेने दबाव झुगारुन देउन मनमोकळा खेळ करण्याची गरज आहे!

"रहाणेने दबाव झुगारुन देउन मनमोकळा खेळ करण्याची गरज आहे!" - हे सगळ्या प्रकारच्या क्रिकेट ला लागू होतं.

"आजचे आर आर चे टीम सिलेक्शन अतिशय चुकीचे होते!" - मला नाही वाटत की फारशी बेंच स्ट्रेंग्थ आहे त्यांच्याकडे. मला आवडेल एखाद-दुसरा बरा बॅट्समन बघायला मधे, पण नसावा बहुदा.

मुंबई वि. कोलकता. माझं प्रेडिक्शन: सालाबादप्रमाणे आता सगळ्या मॅचेस मुंबई जिंकणार.

Pages