आयपीएल-११ (२०१८)

Submitted by स्वरुप on 6 April, 2018 - 02:23

उद्यापासून आयपीएलचा ११ वा सीझन सुरु होतोय
या सीझनच्या आधी मेगा ऑक्शन झाल्याने बहुतेक संघांचा मेकओव्हर झालाय..... कोण नक्की कोणाकडून खेळतय हे अजुनही बऱ्याच जणांचे कंफ्युजन आहे!
RR आणि CSK परत आलेत.... पुणे आणि गुजरात बाहेर गेलेत.... रहाणे, कार्तिक, अश्विन यांचे पूर्णवेळ कॅप्ट्न म्हणून पदार्पण असेल..... SRH सोडले तर बाकी सर्व संघांचे कॅप्ट्न भारतीय आहेत.... स्पर्धा सुरु होण्याआधीच काही स्टार खेळाडू स्पर्धेबाहेर गेलेत.... सोनी ऐवजी स्टारस्पोर्ट्स आलेय.... आयपीएलमध्ये पहील्यांदाच DRS येतेय

सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-११ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अरे काय सुपर मॅच झाली!
एकहाती काढली राव ब्राव्होने..... केदार जाधवने शेवटच्या ओव्हरमध्ये खेळलेले पहीले काही बॉल बघितले आणि वाटले की घालवतोय गडी हातात आणून दिलेली मॅच पण मस्त ओढला सिक्स त्याने!
CSK is back in style
I am impressed with Deepak Chahar and Markande.... both have bowled superbly!

ओपनिंगला साजेशी झाली मॅच.... आता बाकीच्या मॅचेसही अश्याच चुरशीच्या होवोत!

इम्रान ताहिरची स्टाईलच आहे राव ती!

विकेट वगैरे काढल्यावर जो तो असला जल्लोष वगैरे करायचा तेंव्हा उगाचच arrogant वाटायचा कधीकधी पण आजच्या त्याच्या आनंदात टीम स्पिरिटच दिसले.... He was happy for the team!

स्वरुप, इम्रान ताहीरबद्दल +७८६
मागच्या पानावरची पोस्ट वाचून शब्द न शब्द हाच लिहिणार होतो ते तुमची पोस्ट पाहिली..

आपला सपोर्ट दिनेश कार्तिक, गंभीर, युवराज, आणि धोनी ला, या क्रमाने

मात्र केकेआर-दिल्ली जेव्हा होईल तेव्हा आपला सपोर्ट गंभीर ला. त्याला काढल्यामुळे सहानुभूतीची लाट (फक्त माझीच असली तरी Happy ) त्याच्या मागे. ५-६ वर्षांपूर्वी असाच दादा ला काढला होता तेव्हा त्याच्यामागे सपोर्ट होता. तेव्हा गंभीर ला विरोध होता Happy

रहाणे पुण्यातून खेळला तेव्हा सपोर्ट त्यालाच होता. पण आता न्यूट्रल.

बाकी सगळे "ओल्ड हॉर्सेस" कधीतरी बाहेर जाणारच, पण त्यापूर्वी एकदा चमकावे म्हणून सपोर्ट.

दिल्ली पंजाब मॅचमधली हवाच काढून घेतली राहुलच्या फास्टेस्ट फिफ्टीने
मग पुढच्यांसाठी अगदीच सोपी झालेली मॅच!
दिल्लीकडून गंभीर आणि पंत मस्त खेळले पण नंतर म्हणावा तसा पेस वाढवता आला नाही त्यांना
फिंचच्या अनुपस्थितीत तरी गेल ला खेळवतील असे वाटलेले पण राहुलने त्या दोघांचीही कमी जाणवणार नाही याची काळजी घेतली
कम्माल खेळला राहुल!

गंभीरला KKR ने काढले नसावे... उलट गंभीरलाच दिल्लीकडून खेळायचे होते असे ऐकले.... त्यामुळे त्याचे KKR to DD transition सर्वसहमतीने झालेय असा आपला माझा समज!

स्वरूप बरोबर

गंभीर ची ही लास्ट आयपीएल आहे. त्याला दिल्लीला कप जिंकून द्यायचा आहे

त्यामुळे त्याचे KKR to DD transition सर्वसहमतीने झालेय असा आपला माझा समज! >>>
गंभीर ची ही लास्ट आयपीएल आहे. त्याला दिल्लीला कप जिंकून द्यायचा आहे >>>

ओह थॅन्क्स. मग तर सपोर्ट आहेच एनीवे. बाय द वे, म्हणजे ते सिली पॉइण्ट चे स्किट परफेक्ट होते Happy

Same story repeat in 2nd match

यावेळी नरीनने जबरदस्त फिफ्टी मारली आणि धावांचा पाठलाग सोपा करुन ठेवला!
नितिश राणा आणि कार्तिकने गाडी रुळावर ठेवण्याचे काम चोख केले

बाकी राणाच्या त्या ओव्हरमध्ये कोहली-एबीडी लागोपाठ आऊट झाले नाहीतर ज्या पद्धतीने मनदीप खाली खेळला RCB २०० ला जाउन टेकले असते!

अजुनतरी कुठल्याही संघाने साफ निराश केलेले नाही!

"आपला सपोर्ट राजस्थानला...... mostly for Rahane and for old memories of RD's stint with RR" - पर्फेक्ट!!! म्हणूनच काल कुठेतरी दिल्ली जिंकावी असं वाटत होतं. Wink

कसल्या फेकतायत विकेट्स RR वाले:
उचलून उचलून कॅचेस देतायत.... एकाचा पण शॉट ग्राऊंडच्या बाहेर जाईना.... श्या!

ज्या पद्धतीने मनदीप खाली खेळला RCB २०० ला जाउन टेकले असते! >> मागे KKR ला IPL जिंकून दिली ।ओती मनदीपने. U-19 मधून खेळताना एकदम त्याचा गवगवा झाला होता. तो मधे एकदम हरवून गेला होता.

नितिश राणा consistently खेळला तर रैनाला sub मिळेल मस्त - someone who can also play short pitch deliveries.

यार कृणाल पांड्या चे टेंपरामेंट कसले जबरी आहे. He needs a chance to play for India ASAP.

>>मागे KKR ला IPL जिंकून दिली ।ओती मनदीपने.
मनदीपने?..... तुझा मनविंदर बिसला आणि मनदीपमध्ये काही घोळ होतोय का?

विनयकुमार 2 ओव्हर 35 रन्स

मॅन आॅफ द मॅच

पुढच्या मॅचमध्ये जर खेळताना दिसला तर कार्तिकच्या निर्णयक्षमतेवर प्रश्नचिन्ह लागणार

तुझा मनविंदर बिसला आणि मनदीपमध्ये काही घोळ होतोय का? >> काही नाहि बराच घोळ होतोय रे Happy

विनयकुमार ला आज परत वॉर्नर आठवला असेल Wink

रसेल चे काही शॉट्स बघून मला नेहमी गल्ली क्रिकेट मधले गेम्स आठवतात. त्यात एखादा असतो ज्याला बॅटींग वगैरे फारशी येत नसते पण आपला माणूस असल्यामूळे बॅटींग द्यावी लागते. मग तो येणार्‍या प्रत्येक बॉल ला टेरेस वर मारीन अशा स्टाईलमधे दांडपट्टा फिरवतो, त्याचे काही नीट कनेक्ट होतात. लोक मग 'भाई क्या बात है' म्हणतात. Happy रसेल तसा खेळतो असे नाही फक्त त्याची फिरवण्याची स्टाईल बघून आठवले.

कालची मॅच जबरदस्त झाली. उथप्पा ची सुसायडल विकेट होती. तो स्पिनर्स ना मस्त मारत होता. तो आणी कार्थिक तशी शेवटची रेकग्नाईझ्ड पेयर होती, नुकतीच विकेट गेली होती आणी १० ओव्हर्स सुद्धा झाल्या नव्हत्या. अशा वेळी त्या चोरट्या सिंगल ची गरज नव्हती.

रसेल ची इनिंग पॉवर-हिटींग चा उत्तम नमुना होती. पण सीएसके ने तोडीस तोड उत्तर दिलं. वॉटसन आणी रायडू ने जोरदार सुरूवात केली आणी खाली बिलिंग्ज एक अविश्वसनीय इनिंग खेळून गेला. धोनी क्रीझ वर असेपर्यंत केकेआर ला चान्स होता Wink

आज राजस्थान वि. दिल्ली. कागदावर तरी दिल्ली चं पारडं जड वाटतय. अय्यर, मन्रो, गंभीर, पंत, मॅक्सवेल आणी मॉरीस हा लाईन-अप, रहाणे, त्रिपाठी, सॅमसन, स्टोक्स, बटलर पेक्षा किंचित उजवा वाटतोय. अर्थात स्टोक्स आणी बटलर ला किती संधी मिळते ह्यावर सगळं अवलंबून आहे. जर स्टोक्स आणी बटलर ला पुरेसा वेळ मिळाला तर ते कुठल्याही बॉलिंग अ‍ॅटॅक विरुद्ध मोठी आणी फास्ट इनिंग खेळू शकतात. बघू काय होतं ते.

They need to re-order their lineup
Tripathi and Short should open followed by samson to take advantage of Powerplay then Rahane and buttler for middle over stabilty and Stokes and Jofra Archer for slogging

Or may send in S Gopal as a pinch hitter

Klaasen can replace Short in the playing 11. Tripathi can open and Klaasen, Stokes and Butler provide the fire power in the middle order.

क्लासेन पण चांगला आहे पण तरी शॉर्टला अजून एखादी संधी मिळायला पाहिजे..... दोन्ही मॅचेसमध्ये रनाआउट झाला राव तो!

पाऊस काय अरे श्या!
चांगला १७०- १७५ चा चान्स आहे!

"चांगला १७०- १७५ चा चान्स आहे!" - बटलर आऊट झालाय. माहीत नाही त्रिपाठी इतका करू शकेल की नाही. मी त्याला डोमेस्टीक मधे ह्या वर्षी काही फार उल्लेखनीय केलेलं पाहिलेलं नाही. एनी-वे, बघू काय होतं ते.

दिल्ली ला ६ ओव्हर्स मधे ७१ चं टारगेट मिळालय. >> हे अगदीच बोगस वाटले. कमीत कमी दहा ओव्हर्स हव्यात नाहितर दुभागून द्या गुण. नाहि तर सरळ ३ overs च्या सुपर ओव्हर्स खेळवा दोघांमधे.

It is, what it is. पण राजस्थान ने बॉलिंग चांगली केली. उनाडकट ने सुद्धा ४ बॉल्स चांगले टाकले (१२ पैकी). गौथम, धवल आणी लँग्लिन ने मस्त बॉलिंग केली.

जिंकले एकदाचे राजस्थान!!!

मोस्टली डकवर्थ लुईसचा फायदा नंतर बॅटींग करणाऱ्या संघाला होतो... पण यावेळी मात्र दिल्लीसाठी हे टारगेट अवघड होते.... पण त्यांची बॅटींग बघता अगदीच न जमणेबल नव्हते.... in fact मॅक्सवेलच्या हाणामारीनंतर तर ते बरेचसे शक्य वाटत होते
पण रॉयल्सच्या बॉलर्सनी चांगले रिस्ट्रिक्ट केले
धवल कुलकर्णीची दुसरी ओव्हर तर केवळ अप्रतिम!

गंभीरची चिडचिड समजण्यासारखी होती पण असल्या सिच्युएशन्समध्ये त्याचा लगेच मूड जातो (आणि ते लगेच दिसून येते)..... and here dhoni scores above all other IPL captains!

राजस्थान आणि रहाणेचे परत एकदा अभिनंदन!

Pages