बिग बॉस - मराठी

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47

येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर Happy

मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?

बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विनित कॅप्टन झाला. पहील्या दिवशी तरी त्याने भारी डोकं चालवलं. त्या थत्तेना सुनावलं. कामाची वाटणी केली. हळूहळू गट पडायला लागले. एक थत्ते सोडले तर सर्वच एकाच फिल्डमधले तर घेतलेत. थत्ते इरीटेट करतात. ती सोलंकी पण इरीटेट करते. मला फार काही मजा आली नाही. तेच तेच असणार, गट होऊन खुसपुस आणि धुसपुस. राजेश शृंगारपुरे आवडतो मला.

सो थोडक्यात असं आहे की शाहरूख सारखं, यू लाईक हिम ऑर यू डोन्ट लाईक हिम, बट यू कान्ट इग्नोर हिम. Proud
>>>>>>>>

अहो कोण कुठला थत्ते त्याला शाहरूख क्याटेगरीत काय टाकताहेत. हे वाक्य तेव्हा म्हणायचे असते जेव्हा लाईक करणारयांचा भला मोठा आकडा असतो, आणि मग त्यानंतर उगाचच हेट करणारेही बरेच असतात. मराठीत सई स्वप्निल वगैरेंना शोभावे हे.. अन्यथा ती राखी सावंत क्यॅटेगरी झाली. त्यात टाका थत्तेंना...

बाकी मला माहीत नाही ते कोण आहेत. वरील चर्चेला अनुसरून हे लिहिलेय. भले माणूस असतील तर सॉरी थत्ते !

आस्ताद काळे, सुहृद गोडबोले, सई ताम्हणकर आणि त्यांचे काही सेलेब्रिटी (तथाकथित सेलेब्रिटी) मित्र-मैत्रिणी इ. मंडळींनी कोथरूडच्या एका सोसायटीत दारू पिऊन अपरात्री धिंगाणा घातला होता.. पोलीस केस झाली होती.. रात्रभर जेल मध्ये होती मंडळी.. 2012 किंवा 13
खरं तर सई या घटनेनंतरच ग्लॅमरस म्हणून प्रसिद्ध झाली..
>>>>

नाही हो! या घटनेने सई ग्लॅमरस म्हणून कशी प्रसिद्ध होईल...
उलट सई ग्लॅमरस सेलिब्रेटी होती म्हणून या घटनेला जास्त प्रसिद्धी मिळाली.
आपल्याकडे हे फार कॉमन आहे. वर्षभरात शेकडो प्राण्यांच्या शिकारी होतात. कित्येक केसेस होत असतील. कित्येकांना शिक्षाही होत असेल. पण सलमान काळवीट मारतो त्या केसला जास्त प्रसिद्धी मिळते.
अन्यथा असे दारू पिऊन धिंगाणा घालण्यात माझ्या कित्येक मित्रांचे आयुष्य गेलेय. आजवर कोणी दखल घेतली नाही त्यांची.. ना कुठे साधी पेपरात बातमी छापून आली...

या एका वाक्यात 'बिग बॉस - मराठी'ला (धाग्याला) सहस्त्रकी वाटचालीकडे घेवून जायचं पोटेन्शियल आहे..
का केलीत भविष्यवाणी.. (irritated बाहुली)

पहा नाडकर्णी बाईंनी गॉसिपिंगला सुरूवात केली. त्या विनीतला चला हवा येऊ द्या मधून काढून टाकलं यावर ती बोलत होती.
आता रेशमचा डीव्होर्स आणि अंकुश चौधरी सह इतर लफडी काढेल.

सई अगदी विवस्त्र नव्हती आब्रु झाकण्यापुरत्या चिंध्या होत्या अंगावर.

ही मेधा धाडे कोण माहीत नाही. मला मेधा घाडगे असेल अस वाटलं होतं.

आरती सोलंकी ही भलतीच कळकट आहे.

एकच टॉयलेट आणि तिथेही कॅमेरा ही फार खालच्या दर्जाची गोष्ट आहे.

रेशम कोण आहे? टिपणीस? ... हो
आरती सोलंकी कोण आहे? कलर्स वर्च्याच 'झुंज मराठमोळी' मधे होती व 'फु बाई फु' मधे पण होती बहुदा.
विनीत कोण आहे? चहयेद्या' मधे बरेच एपी होता.उंचीने कमी आहे तो.

एकच टॉयलेट आणि तिथेही कॅमेरा ही फार खालच्या दर्जाची गोष्ट आहे.
>>>
नळावरची भांडणं टिपायला असेल Happy

सई अगदी विवस्त्र नव्हती आब्रु झाकण्यापुरत्या चिंध्या होत्या अंगावर.
>>>>>>>
आपल्या दुटप्पी समाजात पुरुषांच्या आणि स्त्रियांचे आब्रूचे निकष वेगवेगळे आहेत. स्त्रियांनी आब्रू झाकण्यापुरते कपडे परीधान केले तरी त्या बेआब्रू होतात. एखादा पुरुष मात्र बिनधास्त कुठेही शर्ट काढून सलमान बनू शकतो. तो तोकड्या कपड्यांवरून कधीच हिणवला जात नाही Happy

ऋन्मेऽऽष
हो हिणवला जातो!!!! मी कॉलेजला लेक्चर घ्यायला योगा क्लासवरून गेलो होतो.
थ्री फोर्थ पँट वरून खुप दंगा झालेला.
कॉलेजात पोरं खुष मास्तर असा आला म्हणून पण घरीदारी संस्काराचे डोस मिळाले.

विनित ला चला हवा येऊ द्या मधून काढले आहे? Uhoh मला माहिती नव्हतं.
आरती सोळंकी मला आवडते.
रेशम टिपणीस चा डिव्होर्स झाला असेल तर ते तिचं पर्सनल लाईफ आहे ना? Uhoh

स्त्रियांनी आब्रू झाकण्यापुरते कपडे परीधान केले तरी त्या बेआब्रू होतात. > > काही लोक सवस्त्र असूनही त्यांचे अविर्भाव ती नसल्यासारखे असतात... असोच...

बघितले सगळ्यांचे फोटो.
एकेक शोधुन घेतलेत नग.
टुकार कार्य्क्रम असणार ह्यात शंका नाही.

थ्री फोर्थ पँट वरून खुप दंगा झालेला.
>>>>
असाच किस्सा माझ्याशी घडलेला. यावर मी एक हलकाफुलका लेख लिहिलेला.
नक्की वाचा -
व्हाई शूड ‘गर्ल्स’ हॅव ऑल द फऽऽन !!
https://www.maayboli.com/node/52681

पण मला वाटते हे तोकड्या कपड्यावरून हिणवने नसून ड्रेसकोड संबंधित झाले.

काही लोक सवस्त्र असूनही त्यांचे अविर्भाव ती नसल्यासारखे असतात...
>>>
हे सुद्धा खरे आहे Happy

आपल्याकडे लोकांना आपले झाकण्यापेक्षा लोकांचे वाकून बघण्यात जास्त रस असतो. अर्थात हे हुमायुन नेचरच आहे. बिग बॉस सारखे शो या तत्वावरच आधारले असतात.

येनीवेज, बिग बॉस मध्ये कोणी आहे का तोकड्या कपड्यातील ललना? वा पुरुष?

विनीतला काढलं नव्हतं बहुतेक कारण तो अगदी लगेच कलर्सच्या कॉमेडी शो मध्ये दिसलेला त्यामुळे तोच सोडून गेला असा माझा समज आहे. पण काल उषा ना वेगळंच म्हणाल्या.

आरती सोलंकी मला जाम बोअर आणि इरिटेट वाटते. ती, धाडेबाई, एक हेमलता बाणे बाई कसल्या वचावचा भांडायच्या झुंज मराठमोळी मध्ये.

मुलांनाही विरोध होतो हे खरे आहे.
मुळात भारतीयांनी युरोप अमेरीकनांचे अंधानुकरन याही क्षेत्रात केलेले आहे. लॉजीकचे व सामान्य भारतीयाचे जन्मजात वाकडे असल्यामुळे तर्क समजत नाही. का? कसे? हेच का? असेच का? आपल्या हवामानानुसार चांगला पर्याय काय हे कुणीही विचार करत नाही.
एवढ्या गरमीमधे पुर्ण अंग झाकणारे घट्ट कपड्यांची अजिबात आवश्यकता नाही.
इथल्या हवामानानुसार टाईट सुट कोट, जिन्स वगैरे योग्य आहेत का? जीन्समुळे उष्णता नीट बाहेर फेकली जात नाही.
अलीकडे अगदी थोड्याप्रमाणात बंगळुरु सारख्याठिकाणी कार्यालयात अर्धी चड्डी वगैरे मान्यता मिळु लागली आहे.

मागे एकदा रेडीट ईंडीया वर एकाने त्याचा अनुभव लिहिला होता, की तो एकदा हाफ पँट घालुन मुंबई महापालीकेत गेला असता, पोलीसाने अडवले. पुर्ण कपडे घालुन ये मग सोडतो असे सांगीतले. तर याने पोलीसाला विचारले की, मुंबईचे मुळनिवासी कोण? त्यांचा पोषाख काय असतो? ते त्या पारंपारीक पोषाखात आले तर त्यांनाही अडवणार का? मग अर्धी चड्डी काय वाईट आहे?

अध्यक्ष्य,
अ.भा. सगळीकडे अर्धी चड्डी घालु द्या संघटना

हवा येऊ, तसेही बेकार झालाय सिसन केसरी बरोबर. >> केसरी बरोबर नाही वीणा बरोबर. वीणा आता केसरी मध्ये नाहीये
अनिल थत्ते कोणालाच आवडत नाहीयेत आणि ते तसेच आहेत विचित्र . बाकीचे सगळे कलाकार आणि हे एकटेच कोणे एके काळचे पत्रकार . माझ्या मते पहिल्या आठवड्यात बिग बॉस ला घराबाहेर काढण्याकरता कोणी तरी बकरा पाहिजे असेल म्हणून त्यांना विचारलं असावं . एक पहिला आठवडा गेला कि मग सगळे बऱ्यापैकी सेटल होतात म्हणून . थोडक्यात एका आठवड्याचे पैसे घ्या आणि कटा असं असणार . तस बघायला गेलं तर काही ठराविक कलाकार सोडले तर बाकीच्यांना आता या वेळी खरंच काहीच काम नसावं . कोणाचा काही पिक्चर येतोय मालिकेत एंट्री होणार आहे असं काहीच ऐकलं नाही .
आणि या धाग्यावर या कार्यक्रमाबद्दल बोलूया . ऋ बाळा लगेच धावत आला शारुख आणि सईची बाजू घ्यायला Wink

आणि काल त्यांनी ते एका क्यामेरासमोर जाऊन आपल्या कप्पाळावरच्या टिकल्या चम्कवत बोलूनही दाखवलंय...

मला त्या टर्रा-टर्रा अन फर्रा-फर्रा चं भांडण पाहायचंय. होईलच म्हणा पण जाम टाणटाणटाण होईल ते पाहायला मज्जा येईल... :p

Pages