बिग बॉस - मराठी

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47

येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर Happy

मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?

बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुक्ता बर्वेबाबत बरेच लोकांची वेगवेगळी मते आहेत. अभिनय चांगला करते पण तोच तोच करते हा आरोप बरेच जणांकडून तिच्यावर होतोच. म्हणून च्रप्स यांना शाहरूख आठवला. पण त्याच्याकडे स्टारडम आहे. अर्थात ते वेगळ्याच लेव्हलचे आहे, पण मुक्ताकडे स्टारडम नावाचा प्रकार आहे का हा प्रश्न आहे. अपवाद मुंबई पुणे मुंबई वा स्वप्निल सोबत जमलेली जोडी. अन्यथा जे सईकडे आहे ते तिच्याकडे नाही.

मी हाच विचार करतोय की धाविघाभुने (धाग्याला विळखा घा. भुजंग) अजुन च्प्र्स्ला सामिल होऊन नेहेमीचे कीर्तन कसं सुरु केलं नाही! झालं झालं...
कीर्तनाला बळी पडू नका!

>>>मुक्ता बर्वेबाबत बरेच लोकांची वेगवेगळी मते आहेत. अभिनय चांगला करते पण तोच तोच करते - +१

मुक्ता बर्वेबाबत बरेच लोकांची वेगवेगळी मते आहेत. अभिनय चांगला करते पण तोच तोच करते >>> एक डाव धोबीपछाड, जोगवा, गुलाम राणी बदाम चोर , मुंबई पुणे मुंबई हे चित्रपट तसेच एलदुगो आणि नुकतीच संपलेली रुद्रम या मालिका आणि कबड्डी कबड्डी, छापाकाटा , कोडमंत्र ही नाटकं हे सगळं पहा आणि आपल्या वक्तव्याचा पुनर्विचार करा....फरक आपोआप कळेल.
धन्यवाद

च्रप्स, शाहरूख आणि मुक्तामध्ये अभिनयक्षमता नाहीये असे नाही. ती त्यांनी काही चित्रपटात दाखवून दिली आहे. तुम्ही पाट्या टाकणे, वा तोचतोच पणा म्हणतात ते त्यांच्याकडून निर्माता दिग्दर्शकाची तशीच अपेक्षा असते म्हणून घडते. हा व्यवसाय आहे आणि ते व्यावसायिक कलाकार आहेत.
मुक्ताचे माहीत नाही पण शाहरूखचे मी सुरुवातीपासूनचे ईतके चित्रपट दाखवेन की त्याने विविध भुमिका विविध अंदाजाने केल्या आहेत... त्याची राहुल-राज ईमेज बनायच्या आधीचे डर, बाजीगर, चमत्कार, राजू बन गया जंटलमॅन, कभी हा कभी ना, गेला बाजार कॉमेडीमध्ये डुप्लिकेट, बादशाह असे कैक चित्रपट आठवा.. वाटल्यास माया मेमसाब वा ओह डार्लिग्ग येह है ईंडिया बघून घ्या.. थेट स्वदेस वा चक दे वर उडी मारायची गरज नाही. लोकांना त्याच्या वेगळेपणाच्या उदाहरणात तेच तेच आठवते. प्रत्यक्षात डिडिएलजेचा राज, परदेशचा अर्जुन, आणि कुठलातरी राहुल यामध्येही त्याने त्या त्या भुमिकेच्या गरजेनुसार फरक दाखवला आहे. विविधता तिथेही आहे. फक्त पुढे ती काही वेळा रीपिट झाली. करन जोहार, यश चोप्रा, फराह खान यांनी त्याला वापरून आपले दुकान चालवून घेतले ईतकेच. पण आज त्याने जी ओळख जे ईतके नाव आणि स्टारडम कमावले आहे ते त्याच चित्रपटांमुळे हे अमान्य करता येणार नाही. त्यामुळे त्याला चूकही म्हणता येणार नाही.

हे सगळं पहा आणि आपल्या वक्तव्याचा पुनर्विचार करा....
>>>

माझे वक्तव्य नाही. लोकं असे म्हणतात. शाहरूखबाबतही म्हणतात. पण मी त्याच्या चित्रपटांची उदाहरणे देऊन खोडून काढू शकतो. मुक्ता बर्वेचे फारसे चित्रपट न पाहिल्याने नो कॉमेंटस Happy

जे सईकडे आहे ते मुक्ताकडे नाही यासाठी देवाचे आभारच मानले पाहिजेत. मुक्ता एकमेवाद्वितीय आहे. बिकीनी घालणा-या कैक सापडतील.

माझ्यामते मुक्ता बर्वे सध्याची सर्वात उत्तम अभिनेत्री आहे. रुद्रम भूमिका काय जगलीय ती, hats off. नि:शब्द. मला खूप आवडते.

मुक्ता एकमेवाद्वितीय आहे.
>.>>>>
हे या जगातील प्रत्येक व्यक्तीला लागू होते.

बिकीनी घालणा-या कैक सापडतील. >>>> पण सईसारखी सईच Happy

माझ्यामते मुक्ता बर्वे सध्याची सर्वात उत्तम अभिनेत्री आहे. रुद्रम भूमिका काय जगलीय ती, hats off. नि:शब्द. मला खूप आवडते. >>>>+१००००

अय्यो...ईथे मुक्ता आणि सई अशी तुलना रंगली आहे की काय.. असोच...
माझ्यामते मुक्ता बर्वे सध्याची सर्वात उत्तम अभिनेत्री आहे. रुद्रम भूमिका काय जगलीय ती, hats off. नि:शब्द. मला खूप आवडते. > >+११११११
सई चं म्हणजे नुसतचं " झगा मगा मला बघा " असं काम असतं....मुक्ता ईतक्या विविध प्रकारच्या भुमिका तिला झेपणार पण नाहित...असोच
बाकी सई फिट आहे एकदम बिग बॉस साठी ;-)..तिथे विनाकारण ड्रामा करणारे लागतात आणि ते काम सई ला बरोब्बर जमेल.

पण मुक्ताकडे स्टारडम नावाचा प्रकार आहे का हा प्रश्न आहे. अपवाद मुंबई पुणे मुंबई वा स्वप्निल सोबत जमलेली जोडी. अन्यथा जे सईकडे आहे ते तिच्याकडे नाही.>>>>>>>

sai kade kaahich naahiye..
na stardom na acting na kaahee..

je glamer aahe asa tilaa waaTat .. te fakt tilaa aaNi nantar Ru la waaTat..

: dok firalelee baahulee :

सई चं म्हणजे नुसतचं " झगा मगा मला बघा " असं काम असतं....मुक्ता ईतक्या विविध प्रकारच्या भुमिका तिला झेपणार पण नाहित..

>>>

हे म्हणजे असे झाले की मोर हा उगाच राष्ट्रीय पक्षी आहे, नुसता मेला पिसारा काय ते छान फुलवतो. त्याला घारीसारखे आकाशात उंच भरारी घ्यायला जमते का...

अहो एक अभिनयाचीच फूटपट्टी लावून सर्व कलाकारांना मोजायची गरज नसते. जगात किंवा चित्रपटक्षेत्रात किंवा स्पेसिफिकली एखाद्या हिरो वा हिरोईनमध्ये बरेच गुण असतात त्यापैकी अभिनय हा एक गुण आहे ईतकेच..
ज्याचा अभिनय सर्वोत्तम तो सुपर्रस्टार किंवा त्याचे पिक्चरच बेस्ट आणि पैसा वसूल असे नसते.
मुक्ता आपल्या जागी भारी आहे आणि सई आपल्या जागी सही आहे Happy

je glamer aahe asa tilaa waaTat .. te fakt tilaa aaNi nantar Ru la waaTat..
>>>>

हे उधार राहिले..
याचे उत्तर सावकाश देईन Happy

मी 'बिग बॉस'च्या सुरुवातीचे सिझन्सबद्द्ल ऐकुन, अधल्या मधल्या काळात २ सिझन्स पाहिले. घरी कडाडुन टीका व्हायची / टर उडवायचे. तेव्हा मी सांगायचे की हा सॉयकॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी केस स्टडीसाठी पहाण्याचा शैक्षणिक कार्यक्रम आहे Proud ( आठवा इमाम सिद्दिकी) आणि खरच त्यातल्या गॉसिप्स आणि भांडणांपेक्षा मला एकेका सेलेब्रेटीच्या व्यक्तिमत्वाचा आणि त्यांच्या सॉयकॉलॉजीचा अभ्यास करायला आवडायचा ( भले ते बने बनाये प्रसंग का असेनात, जेव्हा किंचित काळ अशा प्रसंगी तुम्ही spontaneous प्रतिक्रिया देता तेव्हा तुमचं खरं/खोटं व्यक्तिमत्व हळुच डोकावुन जातं. )

मराठी बिग बॉस मात्र अजिबात पहाणार नाही. मांजरेकरांना होस्ट म्हणुन पहाणं फार बोअरिंग वाटेल आणि उषा नाडाकर्णी केवढ्या लाउड आहेत. असह्य असेल कार्यक्रम. बाकी नॉर्थ इंडिय्न्स किंवा एकूणच नॉन मराठी लोकांसारखं बहेकणं, फ्ल्र्टिंग, भांडण, मराठी कलाकारांना जमणं अवघड ( असं मला वाटतं). ते स्वतःची इमेज जमत गेम खेळण्याची शक्यता खुप जास्त वाटते.

उषा नाडकर्णी खर्‍या आयुष्यातही लाउड आनि भांडखोर आहेत असं वाटतंय का पब्लिकला?

आणि सई चं नाव मी आधीच गेस केलं होतं. ड्रामा करु शकते ती बर्यापैकी.

उषा नाडकर्णी खर्‍या आयुष्यातही लाउड आनि भांडखोर आहेत असं वाटतंय का पब्लिकला? >>>>>>>> मी आवाजाबद्द्ल आणि बोलण्याच्या पद्धतीला लाउड म्हणाले, व्यक्तीमत्वाला नाही. त्यांना ओळ्खत नाही त्यामुळे असं उगीच मत कसं करुन घेइन? पण त्यांची वोलण्याची शैली, आवाज, मला ऐकायला आवडणार नाही, असंच म्हणायचं होतं मला.

एबीपी माझा च्या माहितीनुसार. उषा नाडकर्णी, राजेश शृंगारपुरे, पुष्कर जोग, मेधा धाडे confirmed. channel किंवा टीम माहिती देत नाहीये म्हणे, सूत्रांकडून मिळालीय.

आस्ताद काळेला मालिकेतून थोडे दिवस रजा देऊन आणायचे प्रयत्न चाललेत. सुशांत शेलार, रेशम टिपणीस असण्याची पण शक्यता. त्यानंतर किचन एक शेफ सांभाळणार ते पराग कान्हेरे किंवा विष्णू मनोहर असण्याची शक्यता. हुश्श.

इथेच बिग बॉस रंगला आहे. काय वाद चालू आहेत. अभिनयशून्य मुक्ता vs सुमार दर्जा सई.
एकीच्या तोंडावरची माशी उडत नाही अभिनय करताना आणि एक बिनीकी घालून स्टारडम मिळवायचा प्रयत्न करते.
धन्य आहेत मुक्ता आणि सई चे फॅन्स __/\__

Pages