बिग बॉस - मराठी

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47

येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर Happy

मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?

बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उषा नाडकर्णी खर्‍या आयुष्यातही लाउड आनि भांडखोर आहेत असं वाटतंय का पब्लिकला?
<
भांडखोर लाउड शब्द नव्हते वापरले पण अशाच टाइपचा स्वभाव त्यांचा आहे असं त्या स्वतःच एका टॉक शो मधे म्हंटल्या होत्या (खुपते तिथे गुप्ते?).
त्या म्हणे मी स्पष्ट आणि ताडकन बोलते, मला लाळघोटेपणा करता येत नाही इतर अभिनेत्रींसारखा ( थोडक्यात इतर समवयस्कं अभिनेत्री तो करतात असं त्यांचं म्हणणं होतं), म्हणुन पोटेन्शिअल दिसलं असावं बिग बॉसला Happy

भरत जाधव आहे..

पण सोर्स विश्वासार्ह नाही .. चेक करा...

उषा नाडकर्णी खूप गोड आहे . मला आवडतात . आहेत फटकळ पण खर तेच बोलतात म्हणूनच लोकांना आवडत नाहीत किव्वा नसाव्यात . पण त्या असल्या तर शो मध्ये रंगत येईल एवढं मात्र नक्की कारण सगळेच गुळू - मुळु -एकमेकांना सांभाळून घेणारे असे पण नकोतच ना . शो मध्ये साइन झाल्यानंतर कलाकारांची मानसोपचार तज्ज्ञाकडून चाचणी पण होणार आहे अशी बातमी आहे . त्याच मानधन आठवड्याच १ लाखापासून ३-४ लाखांपर्यत आहे अस समजत तसच त्यांनी स्वतःहून त्याच नाव फोडल्यास त्यांना बसणारा दंड दोन कोटी आहे अशी हि बातमी आहे . घरातल्या स्वैपाकघराचा ताबा मात्र एका कुकला देण्यात येणार आहे . हिंदी बिग बॉस चा दुसरा एपिसोड बघितला होता त्यानंतर मात्र बोअर झालं . मराठी बिग बॉस बघण्याची नक्कीच उत्सुकता आहेच

धन्य आहेत मुक्ता आणि सई चे फॅन्स >> अशाच पद्धतीने धन्य आहेत मुक्ता बर्वेचे हेटर्स असही म्हणून शकतो . ज्यांना तोंडावरची माशी हलण म्हणजे काय ते तरी समजत कि नाही अशी एक शंका

हो वरचं बरचसं काल एबीपी माझा वर सांगितलं.

मानधन कमी वाटतं पण मला. सिरीयलमध्ये लीड आठवड्याला जास्त कमवत असेल. ज्यांना काम नाही त्यांना योग्य पण आस्तादची सिरीयल सुरु आहे.

मुक्ता बर्वे ही स्मिता पाटील टाईप्स आहे. कोणाला भारी कलात्मक वगैरे वाटेल तर त्याचवेळी कोणाला तरी बोअर वाटेल..

तसे मलाही स्मिता पाटील एकाच टाईप्सच्या भुमिका करणारी वा झेपणारी वाटायची.. एक सोशिक स्त्री जी लढा देऊ शकते वा प्रसंगी देते.. तसे तिचेही कमीच चित्रपट पाहिलेत. त्यामुळे मत चुकीचे असू शकते.

मेधा धाडे कोण?
मेधा घाडगे असेल. ती पछाडलेला मधली "रूपनं देखनी सुपारी चिकनी..."
तिच लाईफ आहे कॉन्ट्रॉव्हर्शिअल.

अरे प्रोमोजमध्ये म मां ला अगदी बघवत नाहीये, रितेश हवा होता. काय चक्र फिरली ऐनवेळी काय माहिती नाहीतर रितेशच करणार अशीच न्युज होती.

मराठी शिकाऊ असलं तरी आमिर खान चालला असता तिथे , मुळात माणुस बॉस आहे आणि मेगास्टार आहे!
मराठीतले मांजरेकर काय नाहीतर रितेश काय , सहन होत नाहीत, बघवत आणि ऐकवत नाहीत !
मराठीतले सिनियर सचिन खेडेकर, अतुल कुलकर्णी , नाना पाटेकर हे रिअ‍ॅलिटी शो व्हरायटी नाहीत .

रितेश उत्तम नाहीये पण त्याने विकता का उत्तर हा शो बराच बरा केलेला त्यामुळे म मां पेक्षा तरी उजवा केला असता. बाकी मराठीत फार काही पर्याय दिसत नाहीत हा टाईप कोण चांगलं करेल असा.

असा पाहिजे जो प्रेक्षकांशी फ्रेंडली आणि घरात चुकीचे वागले तर त्यांच्यावर जरब बसवणारा.
>>> सचिन पिळगावकर

लेडीज पर्याय पण कोण आहेत लक्षात येत नाही.

असो आपल्याला काय वाटतं याचा आता काही उपयोग नाहीये. म मां यंदा तरी असणार आहेत हे नक्की.

मला नाही वाटत पिळगावकर सूट होतील.
>>>>
सचिन चतुरस्त्र कलाकार आहे, कुठेही सूट होऊ शकतो. उगाच सलमानने केलेय म्हणून त्याच इमेजमध्ये शोधायला हवे असे गरजेचे नाही. सर्वांना आदर वाटावे असे कुठलेही व्यक्तीमत्व चालेल. जे सचिन आहेच. प्लस तो बोलायला तूफान आहे. अ‍ॅक्चुअली चांगली चॉईस असता सचिन

Lol राज.

इथे नाही सूट होणार पण सारेगमप मध्ये मला आवडायची पल्लवी. तीच सांगायची ना होऊन जाऊदेत टाळ्या का अजून कोणी आहे.

सचिन पिळगावकर >>> प्लिजच. चॅनलला हा शो चालायला हवा असणार. इतका नावाला जागणारा माणुस अक्ख्या जगात नसेल. किती पिळ मारतात पिळगावकर. शो बाजुलाचा आणि 'मी' 'माझे' किंवा अशा प्रसंगी ' मी' काय केले होते इ इ बायोग्राफीचे परिच्छेद ऐकावे लागतील प्रेक्षकांना.

सर्वांना आदर वाटावे असे कुठलेही व्यक्तीमत्व चालेल. जे सचिन आहेच. >>> you mean really? इथे एक ओपिनिअन पोल टाकला तर लगेच उत्तर मिळेल किंवा इतरत्र धाग्यांवर त्यांच्या बद्दल काय लिहिलं जातं ते वाचलं तरी पुरेसं आहे.

कलाकार म्हणुन चांगले आहेतच. वाद्च नाही, पण पडद्याव्यतिरिक्त तोंड उघडलं कि केवढा मी पणा, किती गर्व. मला जो थोडा आदर होता तो 'कट्यार काळजात घुसली'चा एक सुबोध भावे आणि पिळगांवकरांचा इंटर्व्ह्यु पहाताना संपुन गेला. सुबोध भावे सगळ्या कलाकारांबद्द्ल आदराने बोलताना आणि छान माहिती सांगताना पिळगावर तिथे सुद्धा मी कशा टिप्स देत होतो, मी कशा हळुच कानात सुधारणा सांगत होतो, यातच अडकले होते. माझ्या एका माबो मित्राने सिनेमा पाहुन आल्यावर सांगितलं कि सचिनने फार नॅचरल अभिनय केला, रादर करावाच लागला नाही कारण माणुस एवढा गर्विष्ठ आहे कि त्या रोलमधे अगदी स्वतः आहे तसंच दाखवावं लागलं. Lol
( हे गंमत म्हणुन ठीक आहे, पण तो रोल खरंच उच्च केला माणसाने. त्यांच्याशिवाय मला कोणी आठवतही नाही त्या कॅरेक्टरसाठी. पण परत एकदा हा आदर त्यांच्या अभिनय कलेला)

सर्वांना आदर वाटावे असे कुठलेही व्यक्तीमत्व चालेल. >>> बिग बॉसच्या होस्ट बद्दल आदर असणे अपेक्षित आहे का? सलमान बद्दल कोणाला आदर वाटतो Uhoh

Pages