बिग बॉस - मराठी

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47

येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर Happy

मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?

बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतरंगी थत्ते आणि पर्वताएव्हडा ईगो असणार्‍या आऊ हे टीआरपी खातर ईतक्यात बाद व्हायचे नाहीत असे वाटते... करेक्ट.

सुसल्याला का टार्गेट करतायत सगळे?

सुसल्याला का टार्गेट करतायत सगळे?>>>
कारण त्यांच्या मते ती industry मध्ये नवीन असून पण तिला पहिल्याच पर्वात घेतलं हे चुकीच आहे म्हणून

कारण त्यांच्या मते ती industry मध्ये नवीन असून पण तिला पहिल्याच पर्वात घेतलं हे चुकीच आहे म्हणून >>>> नाही. ती आक्रमक आहे, कुठल्याही क्षणी रागावते म्हणून तिला काहीजण हाकलतायत.

सुसल्याने big boss साठी एक सिनेमा सोडला म्हणे. बादवे, कालच कलिन्गडपुराण ऐकल का? उना थत्तेन्ना बेअक्कल म्हणाली. हा हा हा

सुसल्या खरेच भारी दिसते. गोंदकर पण मस्त आहे दिसायला. सुसल्या रहायला पाहिजे. माझ्या अंदाजाप्रमाणे आरती/थत्ते/भूषण कडू पैकी कुणीतरी जाणार.
थत्ते- आस्ताद -रेटि यांची टीम जमणार असे दिसतेय. राशृ- सुशे- विनित- पुष्कर यांची टीम बनेल. बाकीच्या पोरींची वेगळी टीम असेल. उना एकटी पडणार. जुई लवकरच बाहेर जाईल असे वाटते.

ती सई लोकूर मुद्दामून त्या पुष्कर जोग च्या पाठी पडलेय . मुदामून त्याच्या आजूबाजूला घोटाळत असते. मी तुझ्या डिशमधलं थोडास खाऊ का म्हणून पुष्करलाच विचारतेय . मी जाडी दिसत नाही ना ? म्हणून परत त्यालाच विचारतेय म्हणजे लोकांना चघळायला विषय देतेय . लोकांच्या नजरेत आपलं वागणं यावं . प्रेक्षकांनी तिच्या वागण्यावर गॉसिप करावं अशी तिचे ईच्छा दिसते जेणेकरून ती शो मध्ये टिकून राहील असं तिला वाटत असावं .सगळे जण शो मध्ये टिकून राहण्याकरता काय वागावं कास वागावं हे आपल्या मनाशी ठरवून येत असतील . भले मी आहे तशीच वागेन / तसाच वागेन असं काही जण सांगत असले तरी . उषा नाडकर्णी मात्र त्यांच्या स्वभावानुसारच वावरताहेत . त्यांना ते जमवून घेणं जमत नाहीये Happy

दुसर्‍या भागात आरती सोळंकी आणि उषा नाडकर्णी यांच्यात "वास" सोडण्यावरून चर्चा होती. नंतर काही मंड्ळी यावर बोलत होते. "नाकातले केस जळाले ", "आधी कोणाला वास येतो" वगैरे वगैरे... एकदम घ्रुणास्पद...!!

अनिल थत्ते जरी विचित्र माणूस वाटत असला तरी त्याने नॉमिनेशन करताना विनित आणि आरती यांच्याबाबतीत दिलेली कारणे एकदम पटण्यासारखी...पत्रकार असल्याने माणसांची पारख करण्याची जाण असावी त्यांना असे वाटले.

ती सई अतीच करतेय कालपासून, सारखी पुष्करच्या मागे, ती सोलंकी पण पुष्करच्या मागे. बिच्चारा पुष्कर.

पुष्कर चा सध्या पोटापाण्याचा उद्योग काय होता?

पुण्याच्या सोलारीस क्लब/ gym च्या जाहिरातीत दिसला होता तो वर्षभरापूर्वी

हे लोक स्वयंपाक स्वतःचा स्वतः करतात का ? की कुक वगैरे असतात ?
काल नाडकर्णी बाई त्या पोळ्यांना तेल लावण्यावरुनच खूप वाद घालत होत्या.... म्हणे तू गोल गोळे करुन दे..मी लाटते...... आणि रेशम सारखी कढईत काय भाजी हलवीत होती कोण जाणे...इतकी कंटिन्युअस नाही हलवावी लागत भाजी (ऑर व्हॉटेव्हर!)! इतक्यांचा स्वयंपाक- जेवणी- भांडी घासणे...वगैरे कोण करतं...आणि त्यांचं डाएट वगैरे नसतं का?

रेशम करतेय बहुधा स्वयंपाक. नाडकर्णी बाई कामे वाढवत होत्या. त्या छोट्या लाट्या लावून देऊन आरतीला त्याला तेल लावून तु त्रिकोणी घडी घाल म्हणत होत्या. आरती म्हणत होती की आम्ही आतमध्ये तेलासोबत थोडं पिठ पण लावतो. आता हे इतकं छोटं (न मदत लागणारं काम) कशाला दोन दोन व्यक्तिंनी करायचं? Uhoh
सई लोकुर खरंच पुष्करच्या मागे मागे करत होती Sad
अनिल थत्ते काय अवतार करून यज्ञाला बसले होते Uhoh
छातीला दोन बाजूला दोन टिकलया? Uhoh

गॅसवर ठेवलेल्या भांड्यावरचं काचेचं भांडं जेव्हा तडकलं तेव्हा आरती काळजीने बाजूला व्हा म्हणाली तर रेशम ने ते उगिच ताणून धरलं की तू सतत अशी पॅनिक होतेस म्हणून.. काहिहि. Uhoh

त्यातल्या त्यात मला सध्यातरी अस्ताद काळे, राजेश, जुई अणि तो प्रफुल्ल का? जो जुईला काल टुटिफ्रुटि म्हणाला तो? तो बॅलन्स्ड वाटतायत. इव्हन विनित.. बेस्ट आहे. मला फार्फार आवडला.

छातीला दोन बाजूला दोन टिकलया? Uhoh

तु बरा शब्द वापरलास दक्षे ! ती भैताड बाई तर आणखी वाईट विशेषण लावून हसत होती. एकुणात जरी लुटुपूटीचं असलं तरी डोक्यात जाणारं आहे.

<आस्ताद काळे> आजिबातच बॅलन्स्ड वाटला नाही. तो रेटि, मेधा यांच्याबरोबर बर्‍याच काड्या करतोय. ऋतुजाला उगाच टार्गेट करताहेत याच्याशी सहमत.
राजेश, जुई, स्मिता हे बॅलन्स्ड वाटले. जुई इतकी शाम्तपणे वागतीये, ती लवकरच बाहेर जाइळ असे वाटते. Sad

स्मिता दिसते चांगली, पण खरंच तिचे ओठ विचित्र दिसतात. सर्जरी केली असेल बहुधा >>>> लिप प्लम्पिंग म्हणतात त्याला. फार कमी जणांना चांगले दिसते. आठवा अनुष्का शर्मा सुद्धा किती वेगळी आणि विचित्र दिसत होती. कित्येक हॉलिवुड हिरोईन्सनी पण चेह्ररे बिघडवुन घेतले. वेस्टर्न देशात जसं ब्रेस्ट ऑगमेंटेशन सर्रास करतात तसं आपल्याकडे लिप प्लम्पिंग फोफावलं आहे. एखादीच प्रियांका चोप्रा आहे जी त्यानंतर अजुन छान दिसायला लागली

मला काल राजेश, पुष्कर, सुशांत आवडले. बाकी थत्ते बोअर पण त्यांना ठेवतील, ते फेकाफेकी करतात जास्त. पत्रकार म्हणून काय चांगलं कर्तृत्व यांचं. नुसते चमको आहेत.

मी हिन्दी बीबॉ पहिल नाहीये. पण हे असच असत का?
म्हणजे फक्त अन फक्त गॉसिप्स करतात हे लोक. एकमेकाना नावच ठेवत आहेत.
काहीच क्रियेटीव्ह नाही करता येत का?

हिन्दि बिग बॉस जास्त एन्टरटेनिन्ग वाटलं मला. इथे अजून धमाल यायची आहे.
हिन्दि बिग बॉस मध्ये सगळे एकाच रूम मध्ये झोपायचे, अगदी स्त्री पुरूष पण एकत्र एका बेडवर (बहुधा) इथे दोन वेगळ्या खोल्या आहेत. आणि परवा विनित स्विमिंग पूल पण वेगवेगळा (अर्धा यानी अर्धा त्यानी) असं किंवा वेळा ठरवून वापरायचं असं काहीतरी सांगताना प्रोमोत दिसला होता.
मराठी बिग बॉस म्हणजे बालवाडीच आहे.
अनिल थत्ते अगदी बोर म्हणजे श्यॅ!

दुसर्‍या भागात आरती सोळंकी आणि उषा नाडकर्णी यांच्यात "वास" सोडण्यावरून चर्चा होती. नंतर काही मंड्ळी यावर बोलत होते. "नाकातले केस जळाले ", "आधी कोणाला वास येतो" वगैरे वगैरे... एकदम घ्रुणास्पद...!! >>+११
हो ते लोक स्वैपाक स्वतःचा स्वतःच करतात असं दिसतंय . पण मग बिग बॉस रिलीज व्हायच्या आधी पेपर मध्ये वाचत होते कि कुक आहे म्हणून. त्याच काय झालं ?
इतक्यांचा स्वयंपाक- जेवणी- भांडी घासणे...वगैरे कोण करतं..>> हि सगळी काम विनीत कप्तान ने वाटून दिली आहेत सगळ्यांना . तसच करायचं असत . म्हणजे एकमेकांमध्ये लुडबुड करत नाहीत
राजेश, जुई, स्मिता हे बॅलन्स्ड वाटत असले तरी इतके शांतपणे वागले तर ते लवकर बाहेर पडतील . भूषण कडू पण
मराठी बिग बॉस म्हणजे बालवाडीच आहे.>> म्हणजे स्त्री पुरुषांनी एकाच बेड वर झोपायचं का ? म्हणजे ते ऍडल्ट वाडी होईल

पुर्वी हिंदी बिग बॉसमधे वेगळ्या खोल्या होत्या की दोघांसाठी. गेले अनेक वर्ष बघितलं नाही, म्हणून माहीती नाही. सोनीवर होतं तेव्हा पहीले दोन तीन फॉलो केले होते.

Pages