बिग बॉस - मराठी

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47

येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर Happy

मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?

बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

{मी' 'माझे' किंवा अशा प्रसंगी ' मी' काय केले होते इ इ बायोग्राफीचे परिच्छेद ऐकावे लागतील प्रेक्षकांना.}
च्च. म्हणूनच तर आवडत असेल तो.

समानशीलव्यसनेषु सख्यं

आत्ताच आलेल्या माहितीनुसार बिग बॉस मराठीचे स्पर्धक
1. रोहन गुजर
2. मकरंद अनासपुरे
3. सुवर्त जोशी
4. सायली संजीव
5. देवदत्त नागे
6. उषा नाडकर्णी
7. प्रथमेश परब
8. शशांक केतकर
9. शिव ठाकरे

मकरंद अनासपुरे?
तो सध्या नानासोबत सामाजिक कार्यातही सक्रिय आहे ना? मध्येच अश्या शो मध्ये कुठे आला तो आणि..

बिग बॉसच्या होस्ट बद्दल आदर असणे अपेक्षित आहे का? सलमान बद्दल कोणाला आदर वाटतो Uhoh
>>>
आदर म्हणजे शब्दशा अर्थ घेऊ नका.. भितीयुक्त आदर, दरारा, धाक या अर्थी.. त्याची चालली पाहिजे ना.. तो बिग बॉस या शब्दाला जागणारे व्यक्तीमत्व हवे ना..

आदर म्हणजे शब्दशा अर्थ घेऊ नका.. भितीयुक्त आदर, दरारा, धाक या अर्थी.>>>> करेक्ट ऋ, सल्लू कसाही असला तरी सक्सेसफूल (आत स्पर्धक म्हणून येणार्यांपेक्षा), सिनियर व बर्यापैकी आक्रमक आहे. त्यामुळे काही अपवाद वगळता आतले लोक्स बर्यापैकी त्याला वचकून असतात. मराठी बिग बॉससाठी म मां सिनीयर तर आहेच व बर्यापैकी आक्रमक आहे....आता तो अँकर म्हणून कसा असेल ते बघावेच लागेल..पण सध्या तरी चाल्तंय की!
बायदवे...बिग बॉस (आवाज) कोण असणारे? आणि 'बिग बॉस चाहते हैं!' हे मराठीत कसं वाटेल ऐकायला! Uhoh

abp माझा ची लिस्ट
१. राजेश शृंगारपुरे
२. पुष्कर जोग
३. उषा नाडकर्णी
४. मेघ धाडे
५. सुशांत शेलार
६. रेशमी टिपणीस
७. शिव ठाकरे

शिव ठाकरे>> हे नाव पहिल्यांदाच ऐकलं.. कोण आहे म्हणे?
बाकी बिग बॉस म्हणजे तसंही रोजगार हमी योजनाच असते..

कसली bore मंडळी आहेत सगळी>>>अख्खा कार्यक्रमच बोअर आहे तर त्यातल्या लोकांचं काय वाईट वाटणार??
सूर नवा ध्यास नवा नंतर असा शो आणणं यातच चॅनेलचे (तोडलेले) तारे दिसले की !

लोकांची भांडणे बघण्यात कसली आलीये मनोरंजनात्मक कला?
नवीन Submitted by sulu on 10 April, 2018 - 00:22
>>>>
माबोवर ही आजकाल लोक धाग्याधाग्यावर भांडत असतात. आणि मी ते वाचायला येतो. Proud
अर्थात भांडण ही कला आहे. Rofl

म मांजरेकर अती पकाऊ दिसताहेत. खूपच म्हातारे, पियकड्ड, सुजलेल्या चेहेर्‍याचे!
बोअर!
स्पर्धकही सगळेच बोअरींग आहे त ! फ्लॉप होणार हा कार्यक्रम !

उषा नाडकर्णी
पुष्कर जोग (जबरदस्त film मधला)
सई (किस किसको प्यार करू.. मराठी चित्रपट नो एन्ट्री)
भुषण कडू
राखेचा मधली सुषमा

Pages