Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47
येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर 
मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?
बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच 
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
राजेश आज माझ्या मनातून उतरला.
राजेश आज माझ्या मनातून उतरला. तो मला किती आवडत होता पण रेशम बरोबर लव्हस्टोरी करणार मुद्दामून, लोकांना आवडतं असं बघायला हे म्हणाला म्हणजे तिचं नाव नाही घेतलं पण तीच असावी बहुतेक. फार चीप पब्लिसिटी.
आस्ताद ऋतुजाला नंतर बडबडत बसला पाणी वाया घालण्याबद्दल तर खरं म्हणजे डायरेकट सांगायला हवं होतं वाद झाला तर झाला. त्याचं म्हणणं चुकीचं नव्हतं.
रेशमला उशांचे अभरे म्हणजे काय
रेशमला उशांचे अभरे म्हणजे काय समजलं नाही. मोबाईल वरून नीट लिहिता येत नाहीये.
पुष्कर एकटाचं वेगळा पडलाय male actors मध्ये.
आस्ताद काळे आमच्या शाळेतील
आस्ताद काळे आमच्या शाळेतील सरांचा मुलगा (प्रमोद काळे). सर मराठी व maths ऊत्तम शिकवायचे.
मी आज १ल्यांदा बघीतला एक भाव
मी आज १ल्यांदा बघीतला एक भाग वूटवर ,
मला नाही आवडले ईतके मराठी बिग बॉस
घर ठिक वाटतेय , पण ही मंडळी ... नाही आवडली ईतकी
ऊ ना अन ते थत्ते तर बिग नो
मी हिंदी बिग बॉसची फॅन आहे , कदाचित त्यामुळे हे नाही आवडत आहे. तिकडे जि मजा असायची त्यामानाने हे एकदम बकवास वाटले मला
अजुन एखादा एपि बघेन, तो आवडला तर ठिक नाहीतर फक्त ईकडेच वाचेन
मला घर अजिबात नाही आवडलं,
मला घर अजिबात नाही आवडलं, भरगच्च, भरजरीत, भडक रंगसंगती वाटली मला. फक्त ती वारली पेंटींग्जची चौकट आवडली.
ते बिग बॉसचं घर बाकी साडीचं
ते बिग बॉसचं घर बाकी साडीचं दुकान वाट्तं
पैठणीचे सोफे, साड्यांच्या पदराच्या डेकॉरच्या भिंती , भरमसाट साड्यांचे रंग सगळिकडे !
आत्ता कोणी सेल्समन साड्या दाखवेल असं वाटतं !
मेरीवाली पैठणी कोणती ते
मेरीवाली पैठणी कोणती ते शोधतोय मी.
म मां ने काय विचित्र combo
म मां ने काय विचित्र combo घातलंय आज. बाकी थत्ते काय कायमच विचित्र.
कडू जाईल की काय आज.
स्विमींग पूल चा वापर होईल तो
स्विमींग पूल चा वापर होईल तो दिन सगळ्यात जास्ती टिआरपी वाला असेल बहुतेक .. >> काय उपयोग?

उना बसल्या असतील ना 'टराटरा बिकिनी घालून फराफरा पवायला' आलेल्यांना अडवायला ..
च्या भागात आरती सोळंकी आणि
च्या भागात आरती सोळंकी आणि भूषण कडू ना डेंजर झोन मध्ये ठेऊन नंतर भूषण कडू ना काढणार असा आपला अंदाज
मला पण कडू जाईल असं वाटतंय.
मला पण कडू जाईल असं वाटतंय. तो तसा साधा वाटलाय आत्तापर्यंत.
त्याने म मां ची मिमिक्री मस्त केली.
खरं म्हणजे पुष्कर काहीतरी
खरं म्हणजे पुष्कर काहीतरी सांगत होता, त्याला म मां नी बोलू दिलं नाही. विषय वळवला. मला समहाऊ पटलं नाही ते.
मला ऋतुजाच बोलणं एकदम पटलं
मला ऋतुजाच बोलणं एकदम पटलं रेशम कोण अशी नाराजी व्यक्त करणारी कि "इतक्या नवीन व्यक्तीला बिग बॉस च्या पहिल्या सत्रात कस काय घेतल " असं बोलणारी ? बिग बॉस ऋतुजाला अप्रोच झालेले आहेत ऋतुजा नाही . अशा स्थितीत तिने असं बोलणं म्हणजे बिग बॉस च्या निवडीला चॅलेंज देण्यासारखं आहे . किव्वा त्यांच्या पार्टीसिपंट च्या निवडीवर प्रशचिन्ह उभं करण्यासारखं आहे . तशीही ती रेशम खूप मग्रूर वाटते. ती फक्त या वेळी नॉमिनेट झाली नाहीये इतकच . थोड्यात फटकळ पणाचा आणि स्पष्ट बोलण्याचा विचार केला तर उषाताई/ आरती सोळंकी / आस्ताद काळे ( आणि कदाचित रेशम ) चा नंबर लागेल . फक्त आस्ताद आणि रेशम उघडपणे ( काही ठराविक प्रसंग आणि ठराविक माणसं सोडली तर ) जास्त बोलत नसावेत त्यामुळे ते लक्षात येत नाहीत . इतक्या उघड पणे थत्ते ना त्याने बोलूनही कॅप्टन शिप साठी थत्ते ने आस्तादलाच व्होट केलं हेही जरा नवलच . या पुढे आस्ताद / रेशम आणि राजेश ला पण नॉमिनेशन मिळावं अशी इच्छा आहे . कारण त्यांनी इतरांना नॉमिनेट करायला त्याचा सेपरेट पाच जणांचा ग्रुप केलाय
रेशम अतिच करते. आस्ताद आहे
रेशम अतिच करते. आस्ताद आहे फटकळ, माज आहे त्याला असं त्याची आईच म्हणते ना पण कधी कधी करेक्ट बोलतो विशेषतः थत्तेना बोलला ते. इव्हन ऋतुजाला पण पाण्यावरून मागून बोलण्यापेक्षा समोर सुनावायला हवं होतं.
सध्या मला पुष्कर आवडतोय. राजेश बद्दलचा आदर कमी होत चाललाय. चुकीचं वागतोय टिकण्यासाठी. सुशांत सध्या ओके. विनीत तसा साधा आहे, बोलण्यात फसतो. पहिल्या दिवशी हुशार वाटला तेवढा नाहीये.
काल पहिल्यांदा थोडंसं पाहिलं.
काल पहिल्यांदा थोडंसं पाहिलं. ममांला कमी ऐकू येतं का. तो विनीत का रडत होता. तो काय बोलतो काही कळत नाही. ती साडी नेसलेली कोण होती. ममांने सगळ्यांचं बोलणं ऐकलं पाहीजे, त्यांना पूर्ण बोलू दिलं पाहिजे, ते सोडून ऊगीच काहीतरी पाचकळ जोक मारायला जातात.
काल पहिल्यांदा पाहिला बिबॉ
काल पहिल्यांदा पाहिला बिबॉ.कोणी थोडक्यात बिबॉचा फंडा काय आहे ते सांगेल का?
मराठी कलाकारांत नौटंकीचं
मराठी कलाकारांत नौटंकीचं प्रमाण कमीच असतं. त्यात हिंदी कलाकार वाकबगार.
मला तर ते राजेशचं सांगून
मला तर ते राजेशचं सांगून अफेअर करणं मराठी भोंदू सोवळेपणाचा भाग वाटला. असं वागलो की लोकांना आवडतं, घरी-दारी चर्चा सुरु होते, सहकलाकारांत चर्चा सुरु होते म्हणायचं आणि 'आम्ही नाही त्यातले' हाही मेसेज जाईल असं बघायचं.
खरे प्लेयर्स असते तर आत्ता बिनधास्त अफेअर करुन मोकळे झाले असते. पुढचं पुढे !
पुष्कर जोग पण सईशी जपूनजपून फ्लर्ट करतो. कुठेतरी 'हे खरं नाहीये' असा मेसेज देत असतो. हीच लोकं सिरियल आणि सिनेमात झोकून देऊन काम करतील कारण तिथे खोटं आहे, अभिनय आहे हे माहीतच असतं. इथे चोवीस तास स्वतःचा खरा चेहेरा दाखवल्यासारखा करायचाय ( संपूर्ण उस्फूर्त नसणार आहे हे तर सरळसरळ कळतंय ) ह्याचा आपल्या इमेजला धक्का लागण्याची धास्ती असणार.
चारपाच भागांतच फार एकसुरी वाटायला लागलंय. शिवाय वेगवेगळ्या क्षेत्रांतले लोकं हवे होते - खेळाडू, गायक, वादक, पत्रकार ( अनिल थत्ते बोगस आहे ), दिग्दर्शक वगैरे.
अगो एक्झाटली. विविध
अगो एक्झाटली. विविध क्षेत्रातले काहीजण तरी हवे होते, बोगस थत्तेला आणण्यापेक्षा.
ममांने सगळ्यांचं बोलणं ऐकलं
ममांने सगळ्यांचं बोलणं ऐकलं पाहीजे, त्यांना पूर्ण बोलू दिलं पाहिजे, ते सोडून ऊगीच काहीतरी पाचकळ जोक मारायला जातात.>>>+१
आस्ताद दिलेले काम करण्यासाठी रात्रभर जागला आणि सकाळी त्याची विचारपूस केली नाही म्हणून बोंबलायला लागला. टिमवर्क होते तर मग हा एकटाच का मी-मी करत होता? २-४ तास झाल्यावर झोपायचे होते. पुष्कर तसे बोललाही. या मुद्यावर तर ममां काहीच बोलला नाही.
माझे २ पैसे:
माझे २ पैसे:
१. आस्ताद काळे वस्ताद ठरणार आहे. (बायदवे, आस्ताद मराठी शब्द आहे? त्याचा अर्थ काय?)
२. थत्तेंनी आस्तादला पांढरं निशाण दाखवलेलं आहे. बहुतेक, "इफ यु कांट विन देम, जॉइन देम" हि निती अवलंबलेली दिसतेय
३. रोख-ठोक बोलुन मोठी आउ (उषा नाडकर्णि) आणि छोटी आउ (रेशम टिपणीस) धमाल उडवतील अशी आशा आहे
४. सद्यातरी सुशांत लंबी रेस का घोडा वाटतोय
५. कॅप्टंसी मिळाल्यावर विनीतची अवस्था "डियर इन दि हेडलाइट" सारखी झालेली होती; जास्त दिवस हा टिकेल असं वाटंत नाहि
६. पहिलाच आठवडा अस्ल्याने कोणालाच एलिमिनेट करणार नाहित; आणि केलंच तर बहुतेक भूषणचा नंबर लागेल कारण आउ आणि थत्तेंचा इगो क्लॅश इतरांबरोबर अजुन व्हायचाय...
भुषण राहिला मला फार आनंद झाला
भुषण राहिला मला फार आनंद झाला. थत्ते जायला हवे होते पण आरती पडली बाहेर. ती पण आवडत नव्हती फार पण थत्ते जास्त आवडत नाहीत.
अरेरे थत्ते नाही बाहेर पडले .
अरेरे थत्ते नाही बाहेर पडले . मला ते जायला पाहिजे होते . पण एक आहे त्यांचं, त्यांना कोणीही कितीही टाकून बोलल तरी ते चिडत नाहीत /रागावत नाहीत . त्यांचा पेशन्स दाद देण्याजोगा आहे . त्या सई ने तर पुषकर जोग ला विचारलेल मी अशी तुझ्याशी फ्लर्ट करते तर तुला राग नाही ना येत ? . तुला राग येणार असेल तर नाही करणार . त्यांना काय बिग बॉस कडून सांगितलं गेलाय का ? कि असं कोणी तरी वागा रे जरा मजा येते . लोकांना बघायला आवडत
भुषण जाईल असे वाटले होते.
भुषण जाईल असे वाटले होते. थत्ते आणि आरती यांच्यात आरती गेली हे जरा जास्तच बरे वाटले. ती पहिल्या दिवसांपासून तिच्या घाणेरडेपणाने डोक्यात गेली होती.
मेघाने नंतर थत्तेंची सॉलिड लाज काढली. पुढच्या आठवड्यात थत्तेंचा नक्की नंबर लागेल.
आरतीची काही आठवड्यातच परत
आरतीची काही आठवड्यातच परत वाईल्ड कार्ड ने एन्ट्री होणार . आपल्याला थत्ते जावेसे वाटतात ना मग ते नाही जाणार . आता आउंना नॉमिनेट करायचं नाहीये त्यामुळे थत्ते / विनीत आणि राजेशच्या गुपमधले इतरांना . आणि तो गुप सोडून इतर जे आहेत ते त्या ग्रुप मधल्या लोंकाना असं उलट सुलट नॉमीनेशन होईल . ऋतुजा परत नॉमिनेशन मध्ये आहेच असं वाटतंय . किव्वा थत्ते आणि ऋतुजाला पब्लिकने वाचवलंय तर आणखीन कोणाला तरी करून बघू अशा विचारांनी वेगळीच लोक नॉमिनेट होतील
थत्ते जातील असं मला कधीच
थत्ते जातील असं मला कधीच वाटलं नव्हतं...ते जावेत अशी इच्छा आहेच पण ते जाणार नाहीत हे ही माहीत होतं कारण ते एकमेव आहेत जे सगळ्यांना त्रासदायक ठरतायेत आणि अशा व्यक्तीला लगेच काढल तर मजा नाही येणार, शो च्या टीआरपीच्यादृष्टीने त्यांना ठेवणं फायद्याच आहे..मेय बी अजुन दोन आठवडे ठेवतील त्यांना...पुढच्या नाॅमिनेशनमध्ये सई असू शकते असं मला तरी वाटतं...
आज या शोची जाहीरात पाहिली.
आज या शोची जाहीरात पाहिली. पुढच्या आठवड्यात म्हणे सेलिब्रेटी क्रमांक ठरवायचा टास्क आहे. धमाल येईल त्यात. वाद इगो क्लॅश चिक्कार होतील... बघायला हवे बिगबॉस.. अन्यथा घरी लागत असून विशेष बघितले नाही. आमच्याकडे आयपीएल मॅच संपल्यावर साडेअकराला पावणेबाराला वगैरे लावतात. मी आत निघून जातो..
मी यातल्या उषा नाडकर्णी ,
मी यातल्या उषा नाडकर्णी , रेशम टिपणीस , पुष्कर सोडून कोणाचच काम कधी बघितलं नाही , त्यामुळे कोण कुठल्या सिनेमात्/सिरियलमधे माहित नाही, त्यांची ऑन स्क्रीन आयडेंटीटी माहित नाही पण अत्ता पर्यंत फेवरेट फक्तं अस्ताद , त्याने आधी कुठल्या शो मधे काम केलय ?

त्याचं स्पीच काय शुध्द स्पष्ट मराठीत होतं आणि गातही किती छान होता शिवाय हुषार वाटला पॉलिटिकल स्ट्रॅट्र्जीज आखायला, नक्कीच स्ट्राँग कँडीडेट, त्याचं बोलणं आणि गाणं दोन्ही ऐकsssत रहावं !
पुषकरही चांगलाय पण साधा वाटतो अजुन तरी, पॉलिटिकल वागणं किती जमेल माहित नाही.
सईच्या भावाना ओसांडून जातायेत पुष्कर साठी , बिचारा कोकरु दिसतो , जपून वागतो तिच्याशी आणि तो राजेश सांगून फ्लर्ट करतो, टिप्पिकल मराठी मुलं
पारुला पप्पी दे ऐकलं होतं पाहिलं नव्हतं , त्यातली स्मिता गोंदकर एकटीच मुलींमधे ग्लॅमरस तरीही करेक्ट अॅटीट्युडवाली वाटली, मांजरेकर फिदा आहे वाटतं तिच्यावर
ती कोण ऋतुजा, कसली बोअर आहे , कशी बोलते आणि काय ते जत्रेतून घेतलेले टाइप विचित्रं कपडे !
विनित आधी फनी , प्रेझेन्स ईफ माइंड वगैरे असलेला वाटला होता पण आता नुसताच क्राय बेबी वाटतोय !
रंगीत माणुस आणि उषा नाडकर्णी आवडो किंवा न आवडो, राडा घालायला शेवटपर्यंत हवेतच !
रंगीत माणुस आणि उषा नाडकर्णी
रंगीत माणुस आणि उषा नाडकर्णी आवडो किंवा न आवडो, राडा घालायला शेवटपर्यंत हवेतच !>>>+१.
मी पहिले दोनच भाग पाहिलेत.
मी पहिले दोनच भाग पाहिलेत.
पाप्पी दे पारूला वाल्या ताईंच्या खिशात (स्मिता गोंदकर का?) कायम ओष्ठशलाका असते . रात्री साडेअकरा वाजतासुद्धा त्या आपलं धनुष्य नीटनेटकं करत होत्या.
तुझे ओठ सुजलेत का? असं उषा नाडकर्णी जिला विचारणार होत्या, ती हीच का?
पुढचे भाग पाहणार नाहीए. यातले उषा नाडकर्णी आणि रेशम टिपणीस सोडले, तर आधी कोणाचंही काम पाहिलेलं नाही. बोर झालं . दीड तास वेळ खूप जास्त आहे (मला या कार्यक्रमावर घालवायला) .
Pages