बिग बॉस - मराठी

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47

येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर Happy

मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?

बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल उषा नाडकर्णीन्नी कुणाच्या तरी ओठान्चा 'सुजलेले ओठ' असा उल्लेख केला. ती स्मिता गोन्दकर असावी बहुतेक. काल मला तिचे ओठ वेगळेच वाटले. सर्जरी केली वाटत तिने.

रेशम टिपणीसने ॠजूताला (सुसल्या) घरातून घालवण्यासाठी दिलेल कारण न-पटणेबल होत. काय तर म्हणे, ॠजूता न्यूकमर असूनही पहिल्याच सिझनमध्ये कशी काय आली?

विनितने एलिमिनेशन Positively घेतल. नन्तर Captain बनल्यावर त्याचा आत्मविश्वास काय वाढला! हे अनिल थत्तेने पण बोलून दाखवल. त्याच confession room मधल बोलण heart touching होत. Happy

तू कोण? कोणत्या मालिकेत होतीस असं आधी विचारलेलं आमच्या टीव्हीत दाखवलं. मग मिठी.>>> हो का? मेबी मी ऐकल नसेल.

अनिल थत्ते ८०-९० च्या दशकात एक गगनभेदी नावाचं एक पत्रक (पेपर) काहीतरी प्रकाशित करत, त्यात फक्त आणि फक्त मसाला/ प्रौढाकरिताचे विनोद वगैरे असत. >>>> तेच थत्ते काल सन्सकृतीच्या बाता मारत होते. पण थत्तेन्नी एक गोष्ट बरी केली, त्यान्नी
एकट्यान्नी एलिमिनेशनला उषा नाडकर्णीन्नच नाव घेतल, बाकी कुणाची हिम्मत होत नव्हती, उ. ना चे नाव घेण्याची. छुपी दहशत! Happy

थत्ते तसा ईरिटेटींग आहे पण
घरात भांडने देखिल तोच लावेल
मला नाही वाटत त्याला इतक्यात बिबाँ मधुन काढतील
उनाचा दरारा आहेच
आणी त्या एका जाडीच्या गळ्यातुन आवाजच निघत नाही बिच्चारी

काल उषा नाडकर्णीन्नी कुणाच्या तरी ओठान्चा 'सुजलेले ओठ' असा उल्लेख केला. ती स्मिता गोन्दकर असावी बहुतेक. काल मला तिचे ओठ वेगळेच वाटले. सर्जरी केली वाटत तिने. >>> हो उना नी तिला विचारलेही कि तुझे ओठ सुजलेत का? Lol

बिग बॉस हे काय प्रकरण आहे हे आजवर फक्त ऐकले होते... एकही भाग कुठलाच कधीच पाहिलेला नाही...
पण मराठी आणि अतरंगी मांजा होस्ट करणार म्हणून बघायचे ठरवले... आणि माझ्या साठी तरी मांजा चे सूत्र संचालन एकदम वसूल आहे... त्याची स्टाईल आणि एकंदरीत पंचेस आवडले.. विशेषतः "माझ्या बा च्या टीव्ही वर.." हे.
ऊषा नाड्करणी सोडल्यास बाकी सगळेच तसे नवखे... त्या निमित्तामे रेशम टिपणीस पुन्हा बघायला मिळाली... हाच फायदा! Wink आणि जोडीला सई ला पण घेतलय म्हणजे 'बोनस' की. Happy

अनिल थत्ते म्हणजे आमच्या ठाण्यातील एक अत्यंत वादग्रस्त व्यक्तीमत्व... काहीही करून स्वता प्रसिध्धीत राहण्यासाठी एखादा माणूस काय करू शकतो याचं ऊत्तम ऊदाहरण. अर्थातच ईथे मात्र ते कोल्ह्याच्या कळपात भरकटलेल्या मेंढरागत आहेत. असो.

केवळ मांजा च्या कॉमेंट्स साठी बघणार..

>>बिगबॉसचा एकही एपिसोड अगदी पाच मिनिटेही न बघितलेल्यांच्या यादीत मी आहे.. अजून कोणी आहे का?<<

ऋन्म्या, तुझ्यासारख्या तरुणांनी हा शो पर्सनॅलिटी डेवलप्मेंटच्या दृष्टिकोनातुन बघावा. माणसाचं जगणंच आता स्पर्धात्मक असल्याने स्पर्धेत कसं टिकुन रहावं, याचे काहि धडे मिळु शकतात. हे एक आणि हे दुसरं आर्टिकल्स जरा वाचुन बघ...

राज छान आहेत लेख आणि त्यातील मुद्दे.
मी आधीही म्हटलेय की मला अश्या एखाद्या कार्यक्रमाचा हिस्सा व्हायला आवडले असते पण बघायला तितके नाही. त्यात आपल्याकडे रिएलिटी शो च्या नावावर फालतूगिरीच बरीच चालत असल्याने रस नसतो. बघूया तरी. मराठी कार्यक्रमांबाबत रिमोट आईच्या हातात असतो. तीच ठरवणार आमच्या घरात बिग बॉस बघितला जाणार की नाही Happy
तुर्तास आयपीएल मनोरंजन करतेय...

अवांतर - सईबाबत शाहरूख टाईप्स यू कॅन लव हिम, हेट हिम, बट कॅन नॉट इग्नोर हिम सिद्ध होतेय Happy

बाई दवे,
बिग बॉस मध्ये कोण सई आहे का?

काल तर थत्ते फुल टू फेकाफेकी करत होते. सगळे पेपर संपादक जणू यांच्या खिशात टाईप काहीतरी म्हणाले एक गिरीश कुबेर सोडले तर. फार सर्वच लपेटत होते बहुतेक.

हिंदी बिबॉ कधीच पाहिलं नाही.
मराठी चॅनल्सवरच कायम रमणार्‍या आमच्या मातोश्री (म्हणजे एका सिरियलच्या ब्रेक मधे, दुसर्‍या चॅनलच्या दुसर्‍या सिरियल मधे काय झालं हे पाहणे, आणि जे जे चुकेल त्याचे दुसर्‍या दिवशी रिपीट पाहणे !), रोज ममां ची मराठी बिबॉ ची येणारी जाहिरात पाहून काय आहे ही नवी सिरीयल/रियालिटी शो म्हणून फार उत्सुकतेने वाट पहात होत्या. पहिल्या दोन भागातच या सर्व मंडळीची दिनचर्या पाहणे हेच काय ते कार्यक्रमाचे स्वरुप ( त्यातच ती रेशम टिपणीस काल तोंडात ब्रश घेऊन तशीच फिरत होती घरभर वगैरे पाहिलं तिने) हे लक्षात येताच 'अग्गोबाई' म्हणत डोक्याला हात लावून घेतला ! Happy
असो ! मराठीत असल्याने कदाचित सध्या तरी बरं वाटतंय पहायला.
कालचा जेवढा भाग पाहिला त्यात, मेघाबाईंची दर्दभरी दास्तान, रंगीबेरंगी मी माझ्याजीराव माझे यांचं आख्यान आणि उषाताईंना सर्वात जास्त नॉमिनेशन मिळाली ह्या प्रमुख घटना वाटल्या ...

थत्ते एवढा इरिटेटींग नाही वाटला जेवढा विनीत वाटतोय. तो गेला पाहिजे. बाकी ठीक, रेशम विरूद्ध उना वाजणार हे दिसतेय.
एंटरटेनमेंट पोटेन्शियल मात्र नक्की आहे या कार्यक्रमाचे.

पण मला तो विनित (कॅप्टन झालेला उंचीने कमी असलेला) तो तर छान वाटतोय. तो काही विचित्र वागतोय का? Uhoh मी काल पहिल्यांदा पाहिला भाग.

अजून करमणूकिला विशेष सुरूवात झालेली नाहिये. उषा नाडकर्णीला किती जणांनी नॉमिनेट केलं Uhoh
अनिल थत्ते सारखं तिला गिधाड गिधाड म्हणत होते ते फार खटकलं मला.

दक्षे रिपीट अगदी लगेच ११ ला असतो रात्री. पहिला साडेनऊ ते अकरा संपतो. लगेच रिपीट सुरु. >> हो अन्जू तोच पाहिला.

विनीतने काय केलं ईरिटेट व्हायला? तोच बरा वाटतोय सगळ्यात अजुन तरी.captain झाल्यापासुन काँफिडन्स वाढलाय त्याचा वागण्या बोलण्यातला.

थत्त्यांनी दुसर्यांबद्दलची त्यांची मतं मांडताना सभ्य भाषा वापरावी.कसही बोलतायत.

बिना मेकअपची फक्त स्मिताच सुंदर दिसत आहे. बाकीच्या तर बापरे बाप या अशा दिसतात या कॅटेगरीतल्या आहे.
आरती सोलंकी तर उगाच केस कापून अतरंगी काहीतरी करायचे म्हणून आली असणार.
अनिल तथ्थे तर गावावरुन ओवाळून टाकलेला पत्रकार आहे.
रेशम टिपणीस ही निलम सारखी आगलावी आहे.

"शी!!!! हे काय बघायच रोज!!!!!!!" माझी आई ठासून म्हणाली.
तेव्हाच मला कळलं की मला रोज याचे अपडेटस ऐकावे लागणार

इन्टरेस्टिंग व्हायला वेळ आहे. जेव्हा दोन मित्रात्/मैत्रिणीत आग लावणारे टास्क्स करायला लागतील, किंवा आपल्या मित्राला नॉमिनेट करायची वेळ येईल (आणि बिग बॉस ती वेळ आणतातच) तेव्हा मजा येइल.
नॉर्मली हिंदी बिग बॉस मध्ये एखादा गे असतो, मराठित तो पॅटर्न ठेवला नाहिये. पण अनिल थत्ते विचित्र कॅटेगरी मध्ये मोडतात हे माझं मत.
त्यांचा सूर सतत "आम्ही आम्ही गाढवाचे स्वामी' असा असतो.

या आठवड्यात थत्ते किव्वा ती ऋतुजा या दोघांपैकी कोणीतरी एक बाहेर पडेल असं वाटत . थत्ते ना माहितीये आता आपण बाहेर पडणार बहुतेक म्हणून ते जास्तच बोलताहेत . तसे ते आगाऊच आहेत आणि स्वतःच्या प्रेमात वगैरे . पण तसे कोण नसतात. बरेच जण स्वतःच्या प्रेमात आणि मीच म्हणेन ते खर या स्वभावाचे असतातच . पहिल्या पहिल्यांदी थत्ते जितके इरिटेट झाले आणि नको हा माणूस असं वाटलं तितकं आता वाटत नाहीये . बिग बॉस जस ठरवेल तस कारण कोणाला बाहेर काढायचं हे त्यांचं आधीच ठरलेलं असत आणि काल उषाताईंचा मुड गेला सगळ्यांनी ( मेजॉरिटी ) त्यांना नॉमिनेट केलं म्हणून Happy

ऋतुजा किंवा भुषण कडू यांच्यापैकी एक बाहेर पडेल. थत्ते वाद घालून चांगला टीआरपी देतोय. त्याला इतक्यातच नाही हाकलणार.

अतरंगी थत्ते आणि पर्वताएव्हडा ईगो असणार्‍या आऊ हे टीआरपी खातर ईतक्यात बाद व्हायचे नाहीत असे वाटते. पण त्यातही थत्ते 'बाहेरचे' आहेत... त्यामूळे आऊ ना वाचवले जाईल.. आणि मग अजून धुमाकूळ होईल. असो. खरे तर हे असले कार्यक्रम म्हणजे भोचकपणा रसिकांसाठी पर्वणी आहेत.. आपण अधून मधून डोकावण्याचा भोचकपणा करुयात Happy

स्विमींग पूल चा वापर होईल तो दिन सगळ्यात जास्ती टिआरपी वाला असेल बहुतेक .. Wink

Pages