Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47
येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर 
मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?
बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच 
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सईने ज्याप्रकारे स्मिताच्या
सईने ज्याप्रकारे स्मिताच्या बुटाची लेस न कापता लपवून ठेवली होती आणि ती परत केली तसेच आउंना समजवण्यासाठी स्मिताने मेघाला गळ घातली (आणि मेघाने पण स्मिताची बाजू मांडण्याचा प्रामाणिक प्रयन्त केला) ते पाहता या तिघी एकत्र यायला वाव आहे का? (यायला पाहिजेत खरतर.... टास्कमध्ये वाट लावून ठेवतील इतर स्पर्धकांची)
'मला तरी रेशम च्या वागण्यात
'मला तरी रेशम च्या वागण्यात असा काही मुद्दामून दादागिरी पणा दिसला नाही... ती तशीच आहे आणि ती व्यक्त होते आहे. ' ते मला तरी जाम आवडून गेलं.. for that I support Rajesh. >> मला पण रेशम अजिबात उद्धट किंवा दादागिरी करणारी वाटत नाही. फार स्ट्रेट फॉरवर्ड आहे. त्यामुळे ती खूप आवडते किंवा आवडत नाही हा मुद्दा नाही. पण प्रसंगी ती निधड्या छातीने हो मी हे बोलले, मी हे केलं हे जे मान्य करते ते मला आवडतं.
ऋतुजाच्या ब्रा च्या एपिसोडच्या वेळी रेशम घसा फोडून सांगत होती की मी ते फ्लॉन्ट केलं नाही, फक्त हातातलं दाखवून 'हे' कोणाचं आहे हे विचारत होते (जे ऋतुजाने बाहेरून काचेतून पाहिलं) आणि तिला वाटलं की रेशम ते फ्लॉन्ट करते आहे. शिवाय त्याच टास्क मध्ये जेव्हा सुशांतला ती 'आय डोन्ट केअर' म्हणाली ते फक्त आपण काय चोरतो आहे या बाबतीत होतं. ते ऋतुजाचं आहे म्हणून आय डोन्ट केअर म्हणाली नाही. पण या दोन गोष्टीचे असे काही रामायण केले गेले की बस.
योग मला तुझा
आऊ, मेघा, सई यांच्या रे रा शी संबंधीत असएल्या कॉमेंट्स वरून स्पष्ट होते. म्हणे राजेश चे घर मोडेल, बायको सोलून काढेल.. कुठे कुठे धरताहेत.. थोडक्यात स्वतःला हाय क्लास, सेलेब्रिटी, वगैरे म्हणवून घेणार्यांना मात्र ते दोघे अॅडल्ट आहेत व त्यांचे खाजगी निर्णय व आयुष्य त्यांचे आहेत हे 'झेपत' नाही... डबल ढ्लकी तर हे लोक वाटतात मला. पुष्कर शी फालतू व फेक फ्लर्टींग करू पाहणार्या सई पेक्षा रे रा चे असे थेट व्यक्त होणे मला आवडते. ते चूक का बरोबर हा वेगळा विषय होईल..
मला तरी काहीच चूक वा अवघडल्या सारखे वाटले नाही. कदाचित, अनेक देशातू रहिले फिरल्याने काही गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोन अधिक inclusive झाला असावा असे म्हणूयात. >> हा पॅरा अतिशय आवडला आणि पटला सुद्धा. मला पण जजमेंटल व्हायला नाही आवडत, आणि मी शक्यतो तसं न होण्याचा(च) प्रयत्न करत असते, पण समाजाचा फार पगडा असतो आपल्या मनावर त्यामुळे दबावाखाली आपण जर नैतिकतेला छेद देणारा विचार मांडला की लोक आपल्याकडे भिंगातूनच पाहू लागतात.
पुष्कर शी फालतू व फेक फ्लर्टींग करू पाहणार्या सई >> धिस इज सो ट्रु. सई फुन्कून फुन्कून फेक फ्लर्टिंग करते, असं केल्याने आपण अफेअर करतोय असा भास (अयशस्वी प्रयत्न) करून चर्चेत राहू, शिवाय फुन्कून फुन्कून वागल्याने फार बदनाम होणार नाही किंवा आपल्याला संस्कृतीरक्षकांच्या रोषाला बळी पडावे लागणार नाही असा तिचा समज असावा. घर का ना घाट का अशी अवस्था..
आउंना समजवण्यासाठी स्मिताने
आउंना समजवण्यासाठी स्मिताने मेघाला गळ घातली....... ते पाहता या तिघी एकत्र यायला वाव आहे का? > > अजिबात नाही येणार. आऊ ने नवर्याबद्दल सांगितलेले ऐकले ना? म्हणे तो माणूस मेला पण मी पहायला पण गेले नाही. इतकं टोकाचं असून फायदा नसतो. मेघा ने स्मिता काय म्हणत होती ते मांडायचा प्रयत्न खूप केला पण आऊ ने तिचे ऐकून न घेता तिला तोडत मोठ्या आवाजात आपली स्टोरी सांगितली. मेघा एक दोन वेळा प्रयन्त करायचं नाटक नक्की करेल, पण ती या (भांडणाचा) फायदा नक्की करून घेईल कारण ती तेव्हढी पक्की आहे.
अरे ती राजेशची बायको असेल
अरे ती राजेशची बायको असेल एकदम पती परमेश्वर नवर्यासाठी वाट्टेल ते काकूबाई कॅटेगरी! >>>> माझा आधुनिकतेला विरोध नाहिये, पण एखादी बाई नेहमी भारतीय पेहरावात असते म्हणून ती काकूबाई हे काही पटत नाही. हा, पण ते एकदम पती परमेश्वर नवर्यासाठी वाट्टेल ते ह्य गोष्टीला सुद्दा माझा विरोधच आहे.
ती एकदम बुरसटलेली नसेल थोडी ओपन माईंडेड असेल... >>> एखादा नवरा देईल का आपल्या सेलिब्रिटी बायकोला big boss मध्ये अस काही वागण्याची परवानगी? तिचा नवरा असेल का ओपन माईंडेड?
>>कारण ती तेव्हढी पक्की आहे.
>>कारण ती तेव्हढी पक्की आहे.
म्हणूनच ती स्मिताला आपल्या कंपूत ओढायची शक्यता जास्त वाटते!
आऊ, मेघा, सई यांच्या रे रा शी
आऊ, मेघा, सई यांच्या रे रा शी संबंधीत असएल्या कॉमेंट्स वरून स्पष्ट होते. म्हणे राजेश चे घर मोडेल, बायको सोलून काढेल.. कुठे कुठे धरताहेत.. थोडक्यात स्वतःला हाय क्लास, सेलेब्रिटी, वगैरे म्हणवून घेणार्यांना मात्र ते दोघे अॅडल्ट आहेत व त्यांचे खाजगी निर्णय व आयुष्य त्यांचे आहेत हे 'झेपत' नाही. >>>> Sorry नाही पटल हे. रा़जेशच्या बायकोची काहीही चूक नसताना तिला हा माणूस (राजेश) का फसवतोय?
काल टास्कच्या निमित्ताने का होईना, उना चान्गल्या वागल्या थत्तेन्शी .
रा़जेशच्या बायकोची काहीही चूक
रा़जेशच्या बायकोची काहीही चूक नसताना तिला हा माणूस (राजेश) का फसवतोय? >> हे पण अॅझम्प्शन आहे असं नाही वाटत का?
त्यांच्या नात्यातलं डायनामिक्स आपल्याला काय माहिती?
अनेक शक्यता आहेत
* राजेश ने त्याच्या बायकोला पुर्ण कल्पना दिली असेल.
* बिग बॉस नेच हा अजेंडा ठरवून दिला असेल.
* राजेश चे बायकोशी अज्जिबात पटत नसेल, तिला खिजवायला मुद्दाम तो नॅशनल टिव्हीवर हे करत असेल.
* बायको बाहेर असे वागत असेल ऑलरेडी, तिला दाखवायला "की बघ आपला माणूस दुसरीकडे अडकल्यावर कसा त्रास होतो" करत असेल.
* राजेश आणि बायकोची मिळून स्ट्रॅटेजी असेल.. "जिंकण्यासाठी वाट्टेल ते"
* वरिल पैकी काहीही नसेल आणि राजेश ला खरंच रेशम आवडली असेल, आणि ते अत्यंत नैसर्गिक आणि मानव्य सुलभ आहे.
आजच्या एपीची विडीओ क्लिप
आजच्या एपीची विडीओ क्लिप पाहिली. सई-पुषकर टास्क मधे पुष्कर वैतागलेला दिसतोय मेघावर,ती फार मधे मधे करते म्हणुन.
>>रा़जेशच्या बायकोची काहीही
>>रा़जेशच्या बायकोची काहीही चूक नसताना तिला हा माणूस (राजेश) का फसवतोय?
तसे असेलच कशावरून? आणि असले तरी आपल्याला फरक पडता कामा नये. ते सर्वच काय ते बघून घेतील. तुम्ही सावरून देणार/घेणार आहात का राजेश च्या बायकोला?
कॅमेराच्या पाठी कोण कुणाच्या कुठल्या संबंधात आहे हे तरी कुठे माहित आहे?
पण हे तुमचे मत्/अनुमान आहे..
[असो. हे काल माझे सौ. शी संभाषण व तीचे 'भाषण' रिपीट होते आहे. तेव्हा थांबतो. :)]
>>म्हणे तो माणूस मेला पण मी पहायला पण गेले नाही.
माणूस मेल्यावर त्याच्याशी असलेली दुष्मनी, वैर संपते, असे आपल्याकडे म्हणतात. तेव्हा अर्थातच वैयक्तीक आयुष्यात असहा सर्व संकेतांना छेद देणार्या आऊ सारख्या व्यक्तींना रे रा वर बोलण्याचा काय अधिकार. टिपीकल स्वतःबद्दल फार मोठा अभिमान व आपण किती सोसले वगैरे चे ढोल बडवणार्या व्यक्तीमत्वाचे आऊ हे ऊत्तम ऊदाहरण आहे. मी करते ते एकदम योग्य, सर्वात महान... ईतर सर्व मात्र चीप, थोबडावून काढण्या लायकीचे याच थाटात त्या तिथे पहिया दिवसापासून वावरत आहेत. for me she is completely mis fit candidate. she can't influence but believes in moral dicatatorship..! I think Big Boss contest is about following:
1. Leadership qualities
2. Influencial skills
3. People management
4. EQ not IQ
5. Strategic defence
6. Perseverance
7 and some entertainment...!
पण ईथे क्रम ऊलटा आहे..
सई आणि मेघाला opposite teams
सई आणि मेघाला opposite teams मध्ये टाकलं पाहिजे पुढच्या टास्कमध्ये.. मग खरी मजा येईल..
राजेश रेशमला खेळवतोय पण ती खरंच involve झालीये असं वाटलं काल. (अर्थात हेमावैम)
योग आऊ बदलच्या प्रत्येक
योग आऊ बदलच्या प्रत्येक शब्दान शब्दाला अनुमोदन.
आणि पण ईथे क्रम ऊलटा आहे.. >> लय हासले
एखादा नवरा देईल का आपल्या
एखादा नवरा देईल का आपल्या सेलिब्रिटी बायकोला big boss मध्ये अस काही वागण्याची परवानगी?
>>> परवानगी परवानगी काय? नवरा म्हणजे मालक आणि बायको नोकर असते का परवानगी द्यायला?
राजेश आणि रेशम हे प्रेमाचं
राजेश आणि रेशम हे प्रेमाचं जसं नाटक करतायेत तसंच ती रेशम आता प्रेमभंगाचं अगदी वैधव्य आल्यासारखं नाटक करतेय. मराठी कलाकारांच्या अॅक्टींगला तोड नाही. जसं रे रा ला नाटकी अफेअर करायचा अधिकार आहे तसाच बघणार्या प्रेक्षकांनाही त्यांच्या नाटकी अफेअरची चवीने चर्चा करायचा व पिसं काढायचा फुल्ल अधिकार आहे. बाकी तो बिबॉ च्या घराबाहेर काय करतो हा त्याचा वैयक्तीक प्रश्न आहे पण बिबॉच्या घरात..चर्चा तर होणारच! तेच तर त्या दोघांनाही व बिबॉलाही हवंय.
बाकी दोन्ही ग्रूप्स ना फोडून टास्क द्यावेत व आस्त्या ला रे च्या ग्रूपला बॅकस्टॅब करायचा सिक्रेट टास्क अथवा डायरेक्ट एलिमिनेशन असा ऑप्शन द्यावा. तरीही तो एलिमिनेशनच निवडेल, त्याचा आत्तापर्यंतचा प्रवास बघता.
आऊ 72 वर्षांची आहे हे विसरू
आऊ 72 वर्षांची आहे हे विसरू नका. या वयात चिडचिड जास्तच असणार.. बोललेले विसरणे वगैरे कॉमन आहे.
१. राजेश-रेशमच्या बेताल
१. राजेश-रेशमच्या बेताल वागण्याला, तेहि नॅशनल टिवीवर इंक्लुजिवच्या नांवाखाली मी तरी डोळेझाक करणार नाहि. चार भिंतींच्या आड दोन अडल्ट व्यक्तिंनी (रिगार्डलेस ऑफ देर मॅरिटल स्टेटस) केलेले चाळे त्यांच्या जबाबदारीवर सोडता येतील, पण डिग्निटीच्या गप्पा करणारेच असे प्रकार राजरोस निर्ल्ज्जरित्या करतात तेंव्हा त्याची घृणाच येते. भारत सोडा, अमेरिकेत हि अशाच प्रतिक्रिया उमटल्या असत्या जश्या आज भारतात उमटत आहेत.
२. रेशम गँगने थोडं बॅकफुटवर येउन मवाळ धोरण स्विकारायला हवं. टाक्झिक वातावरण निर्मिती करुन त्यांनी घरात ऑल्रेडी दलदल निर्माण केलेली आहे, यापुढे सूडाची भावना कायम ठेवली तर तेच त्यात रुतत जातील.
३. पुष्कर इन्सिक्युर अथवा इंफिरियॉरिटी कांप्लेक्स असल्यासारखा का वावरतोय समजत नाहि. सई त्याची एक चांगली सपोर्ट सिस्टम होऊ शकते.
४. सुशांत एव्हढ्या लवकर गळपटेल याची क्ल्पना नव्हती. होमसीक होणं ठिक आहे पण आता त्याला आवरा म्हणायची वेळ आलेली आहे.
५. आस्ताद बहुतेक कुठल्यातरी बाँबची असेंब्ली करत असावा, त्याने वेळ मागुन घेतलेली आहे. आशा करुया तो सुतळी बाँब ठरु नये.
६. माझ्या रँकिंगमध्ये सई टॉपवर. बॅलंस्ड अॅप्रोच सगळ्या बाबतीत. आशा करुया ती स्वतःचं संतुलन सांभाळुन ठेवील.
७. डंबच्या यादित जुईचं नांव टाका. कँप्टंसी बरोबर इम्युनिटी मिळते हे तिला ३ आठवडे झाले तरी माहित नव्हतं...
>>आऊ 72 वर्षांची आहे हे विसरू
>>आऊ 72 वर्षांची आहे हे विसरू नका.

ते तर दिसतच आहे की...
>>बोललेले विसरणे वगैरे कॉमन
हे नाही पटले... नवर्याचे सगळे डीटेल्स घडा घडा पाठ होते.. असो. everyone has baggage.. she is still carrying it with her and hence reflects in her behaviour. We can't be judgemental about it anyways, but that doesn't give her any extra right or authority over anyone else in Big Boss. In Industry she deserves it well..
>>७. डंबच्या यादित जुईचं नांव टाका. कँप्टंसी बरोबर इम्युनिटी मिळते हे तिला ३ आठवडे झाले तरी माहित नव्हतं... Happy
अगदी! बाकावर ऊभे करा मागच्या रांगेत...
>>भारत सोडा, अमेरिकेत हि अशाच प्रतिक्रिया उमटल्या असत्या जश्या आज भारतात उमटत आहेत.
I dont think so...पुन्हा जनरलायझेशन होत आहे.
Thatte pan 71 varshanche ahet
थत्ते पण ६७ किव्वा ७१ वर्षांचे आहेत . नक्की आठवत नाही
Thatte pan 71 varshanche ahet
योग च्या सगळ्या कॉमेंट्स पटताहेत
आत्तापर्यंत सगळ्यात आवडते
आत्तापर्यंत सगळ्यात आवडते लोक्स, मेघा, पुष्क्या, सै व स्मिता (ही बाई जेव्हा टास्क करते तेव्हाच थोडीफार आवडते आणि जेव्हा ती कुठेही बावळटासारखं हसत राहते, रे रा च्या इशार्यावर नाचते तेव्हा तितकीच डोक्यात जाते). आस्त्या, हा माणूस जर टॉमी मोडमधून बाहेर निघाला तर नक्की आवडण्यासारखा आहे. (मात्र सध्या तो टॉमी+रोनिन मोडमध्ये आहे).
डंबच्या यादित जुईचं नांव टाका
डंबच्या यादित जुईचं नांव टाका. कँप्टंसी बरोबर इम्युनिटी मिळते हे तिला ३ आठवडे झाले तरी माहित नव्हतं... >>
कळस होता तो मूर्खपणाचा
काही का असेना पण सई खुप आवडते
काही का असेना पण सई खुप आवडते आपल्याला तरी... त्या घरात सगळ्यात सुंदर दिसते ती.
कसली मस्त पर्सनॅलीटी आहे तिची.. उंच, लांब केस... डोळ्यात बदाम तिच्या साठी... !!
अजूनही मात्र नक्की कळत नाही-
अजूनही मात्र नक्की कळत नाही- भूषण नेमकी कशासाठी आहे तिथे? फक्त खुश मस्करी व गप्पा गाणी? घालवा त्याला आणि आणा एखादा 'तगडा' वीर..
च्यामारी, मराठी मध्ये हँड्सम हंक, डॅशिंग वगैरे असलेला कोण अशी नावेच समोर येत नाही...! अवघड आहे.
Kon tari roadies winner yenar
कोणीतरी रोडीज विनर येणार आहे असं ऐकलं . ठाकरे आडनाव आहे त्याच . नाव आठवत नाही.
तो आहे यंग वगैरे २८ वर्षांचा आहे
काही का असेना पण सई खुप आवडते
काही का असेना पण सई खुप आवडते आपल्याला तरी... त्या घरात सगळ्यात सुंदर दिसते ती.
>>> आवड आपली आपली. मला तर उदास आणि चिडखोर वाटते. सुंदर तर बिलकुल नाही आहे.
बघा तुम्हाला कालच बोललो होतो
बघा तुम्हाला कालच बोललो होतो त्याला बाटलीची आठवण येते. बाहेर जाऊन कधी एकदा घशाखाली उतरवतोय असं झालाय त्याला. दारू वर कविता केली तसा लगेच खुश झाला. मेघाने जर केस रंगवले असते तर आज परत रडला असता.
सई प्रचंड फेक, मॅनिप्युलेटीव,
सई प्रचंड फेक, मॅनिप्युलेटीव, व काड्या करणारी आहे... हे अगदी स्पष्ट आहे
, हे कसल ठरवून केलेल अफेअर ! मराठी बावळटपणा आड येतो लफडी करताना सुध्दा, हिंमत है तो डंकेकी चोटपे करो अफेअर, would have been much spicier!
<<
Lol , पण म्हणजेच या सो कॉल्ड मराठी वरण भात सेलिब्रिटीज मधे सर्वात स्ट्रॉगेस्ट काँटेस्टन्ट ना ?
आणि टास्क्स मधे फिजिकलीही स्ट्राँग आहे , म्हणूनच सगळ्यांना (इन्क्लुडींग राजेश) थ्रेट वाटते ती
असो, सुरवातीला अजिबातच आवडली नवह्ती , आता मला तिच जिंकलेली पहायला आवडेल.
इन फॅक्ट तिचं फ्लर्टींग वगैरे गोष्टींना पुष्कर भाव देत नाही म्हणून तिला योग्य दिशा मिळाली आहे टास्क्स वर कॉन्सन्ट्रेट करायला.
पुष्कर मेघाही आवडतात पण मेघा काही व्हॉय्लेन्ट टास्क्स आली तर त्यामधे कमी पडु शकते, पायात रॉड आहे , काही टास्क्स ना लिमिटेशन्स आहेत.
स्मिता खरी स्ट्राँग आहे तिनी जरा स्वतःचा स्टँड घ्यायला हवाय , मला तिची आणि सईची टिम परफेक्ट वाटली होती मागच्या टास्क ला, दोघी स्पोर्ट्स मधे माहिर आहेत.
पुष्क्या क्लिन इमेज बाळगून आहे आणि सोशल मिडीयावरून दिसतय कि पोरींना भारी आवडतोय, डार्क हॉर्स ठरु शकतो पण थोडं अॅग्रेसिव्ह बनायला कमी पडतोय , कोणाला थेट खुन्नस देण्यात कमी पडतोय, त्याचबरोबर एक अॅडव्हांटेज आहे कि ऑपोन्नन्ट टिम सुध्दा त्याला काही फार हेट्रेड दाखवत नाही.
बस्की रा.रे. लफड् बघणे काहीच प्रॉब्लेम नाही पण त्या लफड्याला फार वरण भात स्वरुप दिलय याचं हसु येतं, म्हणजे पहिल्याच आठवड्यात राजेश येडा तिला म्हणे आपण चल आपण फेक अफेअर करु
अर्थात तरीही राजेश जायला नको होता, सईला चुरशीची फाइट द्यायला म्हणून तरी तो फिनाले पर्यंत हवाच होता.
त्या आधी जुई, ऋतुजा, सुशान्त, भूषण, आउ जायल्या हव्या होत्या.
मला एकमेकांशी ३६ चा आकडा अस्स्लेले सई आणि राजेश एका टिम मधे एकत्र टास्क्स करताना पहायचे होते
अर्थात अज्ञातवासातून येइलच परत.
असो, त्या आधी बघु कोण वाइल्ड कार्ड येतय आणि गेम पलटतोय का !
नालायक भूषण कडू, ऋतुजा नायतर
नालायक भूषण कडू, ऋतुजा नायतर थत्ते जाणार. भूषण कडूचे दिवस भरले आता लोकांच्या हिट लिस्टवर आला, मारकी म्हैस एक आठवड्यासाठी मोकाट सुटली.
फायनल नॉमीनेशन्स सांगा
फायनल नॉमीनेशन्स सांगा
फायनल नॉमीनेशन्स सांगा>>>
फायनल नॉमीनेशन्स सांगा>>>>आस्ताद, जुई, उना, थत्ते, ऋतुजा, सुशांत
कोण, रेशम ? ती किमान राजेश
मारकी म्हैस एक आठवड्यासाठी मोकाट सुटली.>>> कोण, रेशम ? ती किमान राजेश परत येईपर्यन्त नक्कीच नाही जाणार. राजेश परत येणार , त्यांच्या कँप मध्ये आनंदी आनंद , मेघा-सई ग्रुप ला तो एक आठवडा बेकार छळणार आणि मग पुढच्याच आठवड्यात त्या राजेश च्या दीडपट बायसेप्स वाल्या खंडोबाची एन्ट्री!
मग अर्थात तो मेघा सई ला जॉइन होणार ... वगैरे वगैरे चॅनल पुरस्कृत नाटक इमॅजिन केले आहे मी 
Pages