Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47
येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर 
मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?
बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच 
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काय ते इव्हल गृपचं बदला
काय ते इव्हल गृपचं बदला घेण्याच्या मिटींग्स, जणु काही गँगवार मधे खूनच पाडलाय् राजेशचा +१
मोठा इश्यु केलाय राजेश्च्या जाण्याच उगीचच.
असे वाटतेय... पुर्ण घरात
असे वाटतेय... पुर्ण घरात सुतकी वातावरण आहे..>> तेच कि! किती ती रडारड; किती ती नाटकं! , फक्त सै आणि मेघा न पुष्कर नाही; मला तर वाटतंय सगळ्यांना माहित असणारे कि राजेश कुठे आहे ..कारण नेहेमीपेक्षा याची एक्सिट वेगळ्या प्रकारे झाली

याच वेळी एलिमिनेशन न करता अस का केलं ?लास्ट २ टाइम्स का नाही केलं?किंवा नेक्स्ट time साठी का नाही असं ठेवलं ??
एवढं सगळं होऊन हि रेशम च नाक वरच .. आता मी बदला घेईन यंव नी त्यंव
आत चाललेला सगळा प्रकार जर राजेश ने तटस्थ पणे पहिला तर ठीके . पण पूर्वग्रहदूषित मनाने पाहिला ,तर सै / मेघा च्या टीम मधले कायम वाईट च वाटणार त्याला ..
काल मेघा जेव्हा म्हणत होती बिग बॉस रेशम ला घरात घ्या वगैरे तेव्हा सरळ कळत होता कि हि नाटकी न मनापासून बोलत नाहीये ..हेमावैम
>>जणु काही गँगवार मधे खूनच
>>जणु काही गँगवार मधे खूनच पाडलाय् राजेशचा
अगदी अगदी!
आणि त्याच्या बाहेर जाण्याचा ब्लेम पुष्करवर ढकलून मोकळी..... आणि तो पण बिच्चारा पुष्कर गिल्ट घेउन बसलाय आणि क्लॅरिफिकेशन्स देतोय!
राजेश एलिमिनेशनमध्ये आला म्हणून गेला म्हणे!
अरे! अजुन पण इतर तीन जण होते एलिमिनेशनमध्ये.... तोच का गेला?.... आणि आता बदला घेणार म्हणे?.... कुणाचा?
राजेश बाहेर पडला तर त्यात मेघा-सई गॅंगचा काय दोष?
सई परत एकदा आवडली जेंव्हा ती रेशमला कन्सोल करायला गेली.... तिने रिस्पॉन्स दिला नाही तर निघून गेली तिथून..... उगाच अति आव आणला नाही वाईट वगैरे वाटत असल्याचा!
She is very rational and practical!
अस्ताद एकदम वस्ताद निघाला की!
राजेशच्या बाहेर जाण्यानंतर तो या ग्रूपची सुत्रे आपल्या हातात घ्यायला बघतोय!
सई आणि मेघाला फोडण्याचा मास्टरप्लॅन हुकुमी आहे.... पण त्या बाकीच्या माठ लोकांच्या डोक्यात शिरला नाही बहुतेक!
मेघा चांगलाच होमवर्क करुन आलीय.... सगळे टास्क तोंडपाठ..... माहीत आहे सगळे तर गप्प बसून हुश्यारीने खेळायचे ना!..... सगळ्यांना सांगरत फिरायची काय गरज आहे?
सई परत एकदा आवडली जेंव्हा ती
सई परत एकदा आवडली जेंव्हा ती रेशमला कन्सोल करायला गेली.... सईने रिस्पॉन्स दिला नाही तर निघून गेली तिथून..... उगाच अति आव आणला नाही वाईट वगैरे वाटत असल्याचा>>++१११११
मेघा चांगलाच होमवर्क करुन आलीय.... सगळे टास्क तोंडपाठ..... माहीत आहे सगळे तर गप्प बसून हुश्यारीने खेळायचे ना!..... सगळ्यांना सांगरत फिरायची काय गरज आहे?>>+११११
हे वाचाच
जनता..... हे वाचा
लोक काय पिसे काढतात एकेक!
https://www.facebook.com/BBMarathiTrolls/
मेघाला बहुदा माहित असणार, ती
मेघाला बहुदा माहित असणार, ती होमवर्क करून आलीये फॉरमॅटचा म्हणून मुद्दाम राजेश बद्दल चांगलं बोलणार ती.
तो सुशान्त रड्या आजही हमसून रडत होता, जसं काही त्याचाही प्रेमभंग झालाय रा च्या जाण्याने !
या आधी राजेश म्हणत होता कि सई आणि पुष्कर जोडी तोडायला पाहिजे , आता अस्ताद म्हणतोय मेघाला फोडा!
त्यासाठी तो मि. सुशान्त रडे चा प्यादं म्ह्स्णून उपयोग करेल , मेघाचा जुना मित्रं असल्यामुळे.
मि. डबल ढोलकी स्वतः सईला फोडायचा प्लॅन करतील, सईचा एके काळचा मित्रं असल्याने.
आउ ऋतुजा पुष्कर कनफ्युज होतील, थत्ते वाइट न होता मज्जा बघतील, आंखमिचोली खुर्चीची चढाओढ् चालुच राहील !
राजेशला सांगायला पाहिजे होतं
राजेशला सांगायला पाहिजे होतं की त्यांची फेक लवस्टोरी लोकांना आवडत नाहीये. हे कळल्यावर घरवापसी झाल्यावर राजेश काय स्टॅण्ड घेतो ते बघायला मजा आली असती.
मेघाला मस्त धरलाय की..
मेघाला मस्त धरलाय की..
मे-स अतीप्रचंड प्रॅक्टिकल
मे-स अतीप्रचंड प्रॅक्टिकल आहेत, त्या ह्या भुरट्यांच्या प्लानला बळी पडतील असे वाटत नाही आजिबातच. आस्ताद यावेळी नॉमिनेट व्हायलाच पाहिजे.
सलमान च्या तुलनेत मांजरेकर
सलमान च्या तुलनेत मांजरेकर काही म्हणजे काहीच नाही. कडक चहाच्या पुढे नुसते कोमट पाणी..
त्या इमाम आणि झुबिर ला कसल सोलल होत त्याने..
हो मान्जरेकर मऊ पडतात कुठे
हो मान्जरेकर मऊ पडतात कुठे कुठे. त्या गडकरी ने एकदा त्यांना गप्प पण केलं त्या दहा मिनिटात, मग त्याचा बदला म्हणून मान्जरेकरांनी अस्ताद ला का डिफेन्ड करतेस म्हणून परत परत तिच्यावर तोंड्सुख घेतलं.
आऊ पेक्षा थत्ते कित्तीतरी ओपन आहेत, उनाला त्यांच्यासारखं ड्रेसिंग करायचं आहे हे समजल्यावर किती प्रेमाने सोपं सोपं आणलंय, मी मदत करतो म्हणाले, पण उना मात्र सतत त्यांना हाडतुड करते. अरे प्रसंग असेल त्याप्रमाणे वागा आणि विसरा ना कुठे तुम्हाला जन्मभर एकत्र रहायचं आहे?
पुष्करने पहिल्यांदा फोन उचलला आणि नॉमिनेट झाला तर त्याचा चेहरा इतका पडला होता, स्पष्ट दिसत होतं चेहर्यावर लिहिलं की कुठून झक मारली आणि हा फोन उचलला
>>तर त्याचा चेहरा इतका पडला
>>तर त्याचा चेहरा इतका पडला होता, स्पष्ट दिसत होतं चेहर्यावर लिहिलं की कुठून झक मारली आणि हा फोन उचलला
हो पण तुलनेने सोप्पे चॅलेंज आले त्याला.... आउंना थत्तेंसारखे तयार करण्याचे!
पण उ ना सहज पणे तयार झाल्या
पण उ ना सहज पणे तयार झाल्या हे करायला. कुठलेही आढेवेढे न घेता. त्यांची अॅक्टींगही करून दाखवली कॅमेर्यासमोर बोलतानाची .
हो पण तुलनेने सोप्पे चॅलेंज
हो पण तुलनेने सोप्पे चॅलेंज आले त्याला>> हो चॅलेंज ऐकून मला पण हुश्श असे वाटले .. आणि नशीब आऊ पण लगेच तयार झाल्या!
उनाला त्यांच्यासारखं ड्रेसिंग करायचं आहे हे समजल्यावर किती प्रेमाने सोपं सोपं आणलंय, मी मदत करतो म्हणाले>> हो ना , आणि आऊंनी ती टोपी घातली डोक्यावर त्यानंतर पण आनंदाने (खखोदेजा ) उडया मारल्या !! थत्तेंचे हावभाव भांडण /वाद मिटवण्याची हि योग्य संधी मिळाली अश्या type चे वाटत होते .
थत्तेंचे हावभाव भांडण /वाद
थत्तेंचे हावभाव भांडण /वाद मिटवण्याची हि योग्य संधी मिळाली अश्या type चे वाटत होते >> हो ना. पण उना त्या बेतात नव्ह्त्याच. जणू काही तुमचे कपडे, दागिने मी घालतेय हे तुमच्यावर उपकारच आहेत असे भाव होते चेहर्यावर.
हो पण तुलनेने सोप्पे चॅलेंज आले त्याला.... आउंना थत्तेंसारखे तयार करण्याचे! >> बिचारा हकनाक नॉमिनेट झाला होता त्यामुळे बिबॉ नीच ठेवला असेल असा सोप्पा टास्क.
उना अॅक्चुली खूप कुजकट वागतात, लगेच तापतात, आवाज मोठा करून बोलतात. माघारी बरंच काही बोलतात आणि नंतर बोललेच नाही असं म्हणतात.
ते उपम्याबद्दल जे स्मिता सांगत होती त्यावर माझा पुर्ण विश्वास आहे, पण उना कसली अंगावर गेल्यासारखी बोलत होती त्यामुळे स्मिता घाबरून कोण म्हणालं ते सांगायलाच तयार नव्हती.
रेशम एकदम राजेशच्या मांडिवर जाऊन बसली ते एक मिनिट मला पण टिव्हीवर पहायला कसं तरी वाटलं. तिथे प्रत्यक्ष पाहणार्यांना काय वाटत असेल? भूषण तिथेच होता तो राजेश ला दाजी दाजी म्हणाला
ते कस्काय?
आपण जे पाहतो तो दिवसाचा लेखाजोखा असतो. दिवसभर तिथे काय काय चालते ते तिथल्यांना आणि त्या बिबॉलाच माहिती. अख्ख्या दिवसाचं फुटेज पाहून त्यातले हायलाईट्स काढणं हे जिकिरिचं काम आहे खरंतर. बहुधा २४ तासाचं फुटेज पहायला तिथे एक माणूस कायम बसवलेला असला पाहिजे.
आधी मला सई आणि मेघा दोहीही अजिबात आवडायच्या नाहित, पण टास्क उत्तम खेळल्यामुळे मला सई बरी वाटायला लागली, पण मेघा अजूनही डोक्यात जाते. चिरकट आवाजात बोलणं.
आणि राजेश रेशम ला घराबाहेर राहण्याचा टास्क दिला तर ते असे बेघर सारखे दिसतायत ते आवडत नाहिये, राजेश गेल्यावर रेशम ब्रेक होईल तिला घरात येऊ द्या असं कॅमेर्यासमोर बोलून बोलून चांगुलपणाचा आव आणत होती.
कसली काळजी ते बिग बँग
कसली काळजी ते बिग बँग थिअरीच्या व्ह्युअरसना आठवत असेल >>> हा हा हा
आणि राजेश रेशम ला घराबाहेर राहण्याचा टास्क दिला तर ते असे बेघर सारखे दिसतायत ते आवडत नाहिये, राजेश गेल्यावर रेशम ब्रेक होईल तिला घरात येऊ द्या असं कॅमेर्यासमोर बोलून बोलून चांगुलपणाचा आव आणत होती.>>> तिला माहिती आहे कि नुसता माज करून काहीही हाती लागणार नाही. आधि झाडझाड झाडते मग रडते मग माफी मागते किंवा त्यांच्याबद्दल चांगले बोलते. उत्तम खेळते आहे.
>>रेशम एकदम राजेशच्या मांडिवर
>>रेशम एकदम राजेशच्या मांडिवर जाऊन बसली ते एक मिनिट मला पण टिव्हीवर पहायला कसं तरी वाटलं.
खरं तर अत्ता तर कुठे रंगत आली होती... आणि राजेश ला कोंडून ठेवलय..! आपल्याकडे संस्कृती रक्षकांना काहीच झेपत नाही हेच खरं.
असो. त्या सीन नंतर 'आता मी बीग बॉस बघणार नाही' असे आमच्याकडे सौ. ने जाहीर केले आहे. त्यामूळे मी खूष आहे. कारण आता बिना वाद, मस्त एंजॉय करता येईल.
सई प्रचंड फेक, मॅनिप्युलेटीव, व काड्या करणारी आहे... हे अगदी स्पष्ट आहे. मेघा चा माज आणि रेशम चा अॅटीट्यूड जमिनीवर आणू शकणारा कुठलाच स्पर्धक तिथे नाही. त्यामूळे निव्वळ या दोघींच्या भोवताली सर्व काही योजना बनत आहेत असे चित्र आहे.
बिग बॉस हे वाचत असाल तर-
एखादा मोस्ट एलिजीबल बॅचलर आणा रे घरात.. मग येईल खरी मजा. मुलींच्या जोड्या कशा अपोआप फुटतात की नाही पहा.
>>सई प्रचंड फेक,
>>सई प्रचंड फेक, मॅनिप्युलेटीव, व काड्या करणारी आहे...
नाही रे नाही!
मोस्ट एलिजीबल बॅचलर घरात आणण्यासाठी मात्र प्रचंड अनुमोदन!
सई प्रचंड फेक, मॅनिप्युलेटीव,
सई प्रचंड फेक, मॅनिप्युलेटीव, व काड्या करणारी आहे..
अजिबात नाही.
आपल्याकडे संस्कृती रक्षकांना
आपल्याकडे संस्कृती रक्षकांना काहीच झेपत नाही हेच खरं. Happy >> तसं काही नाही योग. मला कसं तरी झालं याचं कारण वेगळं आहे. आपल्याला लाखो करोडो डोळे पाहतायत, आपली प्रत्येक हालचाल टिपली जातेय, ४०० कॅमेरे लावलेल्या घरात आपण राहतो अशात आपले असे प्रेमाचे अत्यंत खाजगी क्षण आपण इतक्या खुलेपणाने उपभोगु शकतो का? तर माझ्या मनाने दिलेलं उत्तर 'नाही'. बरं असं आहे का? की हा बिग बॉस चा पहिलाच सिझन आहे, आणि कुणालाच पॅटर्न माहित नाहिये? सगळ्यांनी बिग बॉस काय आहे, तिथे नेमकं काय दाखवतात हे ही या लोकांना माहित नाही का?
सई प्रचंड फेक, मॅनिप्युलेटीव, व काड्या करणारी आहे... हे अगदी स्पष्ट आहे. >> याला टोटल अनुमोदन. मेघा पण तसलीच आहे. मेकप शिवाय भयंकर दिसते
मला नाही आवडली.
स्मिता, खूपच गोड आणि मृदू भाषी आहे. चांगलं खेळतेय ती.
मला वाटते,
मला वाटते,
24 तास त्याच घरात राहिल्याने आणि बाहेरचे एक्सपोजर नसल्याने आपल्याला लोक पाहात आहेत ही जाणीव बोथट होत असावी,
व्हाट्सअप्प गृप वर हे प्रकर्षाने जाणवते,
काही लोक इतक्या 1-2-1 गप्पा, वाद करतात, की हे सगळे बाकी लोक वाचत आहेत ,हे भान त्यांना राहत नाही
भूषण तिथेच होता तो राजेश ला
भूषण तिथेच होता तो राजेश ला दाजी दाजी म्हणाला Uhoh ते कस्काय? >>>>> रेशमला ताई म्हणतो ना मग ताईचा सो कॉल्ड दादला ... दाजी
काल पुन्हा बोलता बोलता सुशांत
काल पुन्हा बोलता बोलता सुशांत हुंदके देऊन रडायला लागला
मला काल इथे कुणीतरी लिहिलं होतं ते पटायला लाग्ले आहे. (दारूच्या आठवणीने रडणे
)
वर पुन्हा सरळ मी इथे पब्लिक्साठी नाही आलेली, लोकांची पर्वा नाही वगैरे म्हटले त्यामुळे पब्लिक ची सहानुभूती पण तिला कितपत मिळेल शंकाच आहे. मग कशाला हा मेलोड्रामा? आस्ताद , भूषण फुल्ल लक्षुमण - हनुमान मोड मधे होते त्या रेशम ची सेवा करत होते हात जोडून 
लगेच नको परत आणायला त्याला.
रेशम ने मोठा रडारडीचा तमाशा केला ते बघून हसायलाच आलं. इतकं कसलं ते दु:ख? आता ३ आठवड्याचं तर काय ते अफेअर. तेही तुटले नाही तर जास्तीत जास्त २ महिन्याची जुदाई आहे. इतके काय ते माणूस मेल्यासारखा मातम!
राजेश ला थर्ड पर्सन नजरेतून स्वतःच्याच कंपूचे वागणे बघून अक्कल येतीय का पाहू. बहुतेक उलटच होईल, परत आला की एकदम जास्तच हिरोगिरी, मसीहा मोड मधे जाईल, सई आणि मेघाला संपवायला परत आला तारणहार
मला आउंच्या मेक ओव्हर चा भाग फार आवडला. मजा आणली त्यांनी
>>तसं काही नाही योग. मला कसं
>>तसं काही नाही योग. मला कसं तरी झालं याचं कारण वेगळं आहे. आपल्याला लाखो करोडो डोळे पाहतायत, आपली प्रत्येक हालचाल टिपली जातेय, ४०० कॅमेरे लावलेल्या घरात आपण राहतो अशात आपले असे प्रेमाचे अत्यंत खाजगी क्षण आपण इतक्या खुलेपणाने उपभोगु शकतो का?
बरोबर आहे.. पण तेच तर चॅलेंज आहे न... कॅमेरे आहेत हे सर्वांनाच आधीपासूनच माहित आहे. ऊलट तसे असताना ही 'स्वाभाविक' वागणे हे खरे तर प्रचंड धाडसाचे काम आहे. आता ते खरे आहे का फेक हे त्या दोघांना माहित.. तरी देखिल,सर्वसाधाराण मानसिकता कशी असते याचे ऊत्तम ऊदा.
आऊ, मेघा, सई यांच्या रे रा शी संबंधीत असएल्या कॉमेंट्स वरून स्पष्ट होते. म्हणे राजेश चे घर मोडेल, बायको सोलून काढेल.. कुठे कुठे धरताहेत.. थोडक्यात स्वतःला हाय क्लास, सेलेब्रिटी, वगैरे म्हणवून घेणार्यांना मात्र ते दोघे अॅडल्ट आहेत व त्यांचे खाजगी निर्णय व आयुष्य त्यांचे आहेत हे 'झेपत' नाही... डबल ढ्लकी तर हे लोक वाटतात मला. पुष्कर शी फालतू व फेक फ्लर्टींग करू पाहणार्या सई पेक्षा रे रा चे असे थेट व्यक्त होणे मला आवडते. ते चूक का बरोबर हा वेगळा विषय होईल..
मला तरी काहीच चूक वा अवघडल्या सारखे वाटले नाही. कदाचित, अनेक देशातू रहिले फिरल्याने काही गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोन अधिक inclusive झाला असावा असे म्हणूयात.
खरे तर जेवा राजेश ने ऊत्तर दिले ममां ना की 'मला तरी रेशम च्या वागण्यात असा काही मुद्दामून दादागिरी पणा दिसला नाही... ती तशीच आहे आणि ती व्यक्त होते आहे. ' ते मला तरी जाम आवडून गेलं.. for that I support Rajesh.
तरिही- 'कमाल आहे तुझी.. तुला त्यात काही गैर वाटत नाही? तुझं वेगळ्च आहे बाबा ' असे बोचरे प्रश्ण सौ. विचाराते तेव्हा मात्र गंमत वाटते.
असो.
तर मुद्दा हा आहे की- तिथे स्पर्धकांनी किती खाजगीतले दाखवावे वा दाखवू नये हा ग्त्यांचा वैयक्तीक विषय आहे.. पण जर वोटींग त्याला धरून होत असेल तर मात्र बि बॉ ची टॅग लाईन गंड्लेली आहे- ईथे जसं असतं तसच दिसतं.'
पण काल थत्ते व आऊं नी धमाल आणली. हे असे टास्क आता बिबॉ ने द्यावेत.. ज्यात लोकांना एकेमेकांसाठी काही तरी विशेष करायाची संधी मिळेल व कदाचित एक वेगळेच बाँडींग तयार होईल..
[सई ने मेघा साठी फॅमिली फोटो फाडला असेल तर ते मात्र सेट अप आहे असा संशय येतो.. कारण काल कॅमेरा समोर मला निदान त्यांचा फोटो तरी पाठवा असे ती सांगत होती... प्रचंड मॅनिपुलेटीव दिसते ती. त्यामूळे बिबॉ जिंकाय्ला मेघा ला ती सॉलिड टक्कर देणार हे नक्की.]
रा रे ला सांगितलं तेव्हा
रा रे ला सांगितलं तेव्हा रेशमच्या चेहेऱ्यावरचे बदलणारे भाव आणि नंतर तिला झालेल्या दुःखाचं प्रदर्शन मला फेक नाही वाटलं. खरं असेल नसेल माहीत नाही पण अभिनय असला तरी अस्सल वाटला.
मांडीवर बसणं ही काही वावगं नाही वाटलं. मराठी प्रचंड प्रसिद्ध आणि अभिनयात दादा कलाकारांच्या पडद्या मागच्या सुरस कथा अशाच ऐकल्या आहेत. माबो पब्लिकचा इतका सोवळेपणा मात्र आता नाईव्ह वाटू लागलाय.
आस्ताद आता मेघा सई जोडी फोडणार ऐकून जरा बरं वाटलं, जरा गम्मत येईल. काही स्ट्रॅटेजि करून खेळणार असेल तर तो आवडू लागेल. मेघा डोक्यात जाते सो ती तोंडावर पडलेली बघायला आवडेलच.
राजेशला असं अज्ञातवासात टाकायचं तर ते रविवारी टाकायला मुहूर्त न्हवता का?
आऊ चटकन तयार झाली ते एक बरं झालं आता पुष्कर अडकणार नाही. अर्थात पुष्करला भरघोस मतं मिळतील याची खात्री आहेच.
रच्याकने: कुंकू टीकली आणि
रच्याकने: कुंकू टीकली आणि टॅटू असा काहितर नविन चित्रपट येऊ घातला आहे म्हणे.
ईथल्या काही 'खास' माबो करांनी अचानक चित्रपट सॄष्टीकडे आपली पावले वळवली आहेत की काय? अशी शंका आली..
असो. तसे अस असेल तर चांगलेच आहे... मिळमिळीत व तेच ते रिसाय्कल्ड गुडी गुडी मराठी चित्रपट पाहण्यापेक्षा काहितरी नविन पहायला मिळेल अशी एक शक्यता आहे.
कुंकू टीकली आणि टॅटू >>> ही
कुंकू टीकली आणि टॅटू >>> ही कलर्स मराठीवरची सिरिअल आहे. टिपिकल डेली सोप. चालू झालीये कधीच...
>>ही कलर्स मराठीवरची सिरिअल
>>ही कलर्स मराठीवरची सिरिअल आहे. टिपिकल डेली सोप. चालू झालीये कधीच...
ओह...! ओक्के. अरेरे सिरीयल का... म्हणजे बघायलाच नको... वाईट्ट ताणतील.. विषयच तसा आहे .
सई अन मेघा काड्या करतात? हे
सई अन मेघा काड्या करतात? हे कधी अन कुठे केल्या? दिसलं नाहि.. उलट त्याच दोघींमुळे इतरांना तरी कळलं गेम खेळायचा असतो नुसती दादागिरी नाही करायची. जोडी थोड्या दिवसाकरता का होईना तुटली हे बरं झालं .. त्या लोकांना झापतांना खरच सलमानची खुपच आठवण येते.. म.मां खुपच पार्श्यालिटी करतात.. सरळ कळतं.. स्मि आवडायची खरं पण तिने जो कंपु पकडला आहे त्याने ती काही केलं तरी बिल्कुल आवडत नाहि आता..
बाकी, एव्हाना स्पर्धकांबद्दल
बाकी, एव्हाना स्पर्धकांबद्दल आपली मते व अनुमाने झालेली असतील. तर त्यांना आपाण काय सल्ले (न मागितलेले व आगाऊ) द्याल?:
भाऊ आता शेलारमामा व्हा शेळपट नको.

माझ्या मते:
१. स्मिता: कूल आहे पण फूल सारखी वागते. तीने एकदा स्वतःची अशी ठोस स्ट्रॅटेजी बनवायला हवी.. किती दिवस ईतरांच्या ईशार्यावर नाचायचे?
२. सुशांतः माहेरचा लेंगा चित्रपटासाठी ऊत्तम नट! अरे हा तर अलका कुबल पेक्षा जास्ती चांगला रडतो.
३. आस्तादः एकदा काय ते ठरव रे राजा तू नक्की कुठल्या बोटिवर्/किनार्यावर आहेस? मला वाटते याने जर एकदा नक्की केले तर याच्या ईतका डेंजर स्पर्धक दुसरा नाही.
४. मेघा: प्रत्येकाचा काहितरी वीक पॉईंट असतोच... तुझा काय आहे ते लोकांना कळले नाही तर तू १००% जिंकणार.
५. सई: मेघा (घरात किंवा बरोबर) नसेल त्या दिवसाची तयारी केली तर काहीतरी वाव आहे.. अन्यथा नुसताच छान चेहेरा व मेघाच्या छायेतील कारवाय या फार काळ टीकणार नाहीत.
६. पुष्करः मित्रा, या खेळात तराजू संतुलीत राहण्याचे प्रयत्न करण्यापेक्षा माप स्वता: कडे कसे जास्त झुकेल ते बघायला हवे. ही काट्यावरची कसरत दुसर्यांना करू देत.
७. रेशमः गो गेट देम गर्ल.. फक्त स्वतः बद्दलचा superiority complex जरा बाजूला ठेवून खोटी हुल द्यायला ही शिकावे. she is too predictable.. अॅटीट्यूड लय भारी आहेच पण जोडीला स्ट्रॅटेजी हवी.. त्यासाठी डोके वापरावे लागेल, नुसतेच डोळे व फेंदारलेले नाक ऊपयोगाचे नाही.
८. थत्ते: लगे रहो अनिल भाई..
९. आऊ: काऊ जास्त भिरभिरला तर पंचाईत होईल.. मग ममां पण वाचवू शकणार नाहीत.. जिंकायचे असेल तर लोकांच्या आवळण्यापेक्षा स्वताच्या तोंडाच्या (तुमच्या भाषेत थोबाडच्या) मुसक्या थोड्या आवळल्या तर सर्व सोप्पे होईल..
१०-१२. बाकी ऊर्वरीत बच्चे कंपनी: मिळेल तेव्हडी पब्लिसिटी व पैसे घेऊन कटावे.
१३. आणि शेवटी राजा बाबू: बिबॉ च्या सिक्रेट खोलीत बसल्याने खरे तर हुकुमाचा एक्काच हाती आला आहे... सर्वांचे सर्व कळणार.. तेव्हा शस्त्रांना (स्ट्रॅटेजी) धार लावा या अज्ञातवासात. मग पुनरागमनांतर महाभराता साठी तयार.
एक आगाऊ सल्ला बिबॉ ना: आऊ नी तर ईतक्या अनंत थ्रेट्स दिल्या आहेत सर्वांनाच... त्यांना काहीच बोलत नाहीत... ये बात कुछ हजम नही हुई.
असो. चला आता थोडे काम करुयात.
Pages