Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47
येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर 
मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?
बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच 
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पण अर्थ काय अज्ञातवासाचा ?
पण अर्थ काय अज्ञातवासाचा ?

पुरेशी शिक्षा देऊन परत आणणार ?
लोकांनी जोड्याने पूजा करु नये म्ह्स्णून लोकांनी त्याला विसरेपर्यत टाकणार का आत ?
तो स्पर्धकांना बघु शकत असेल तर रेशम आणि त्याचा ऑन स्क्रीन रोमान्स चालुच राहील, रेशम कॅमेर्याकडे बघून करेल ना हवं ते
रेशम रडतेय ठिकेय.. सुशांत का
रेशम रडतेय ठिकेय.. सुशांत का रडतोय
सुशांत, सई, जुई, आऊ हे हुकमी
सुशांत, सई, जुई, आऊ हे हुकमी रडके आहेतच की!
त्यातली सई रडकी असली तरी
त्यातली सई रडकी असली तरी इतरांना बडवायची आणि रडवायचीही तिच्यात हिंमत आहे, बाकी सगळेच नुसतेच डंब क्राय बेबीज.
सुशान्तला तर शिक्षा केली पाहिजे बिग बॉसने अजुन रडला तर
सुशान्तला तर शिक्षा केली
सुशान्तला तर शिक्षा केली पाहिजे बिग बॉसने अजुन रडला तर >>> हो ना. बघता बघ्ता रडायला लागतो! हार्मोनल इशू आहे का त्याला काही ?!


राजेश अज्ञातवासात मग त्याचे कपडे कोण धुणार ? आयते जेवण कोण देणार ?
आयसोलेशन म्हणजे नुस्ते एकटे रहाय्चे आणि १-२ आठवड्यांनी परत असे आहे का ? अरे मग तो गेल्यावरच्या सूतकापेक्षा तो परत येईल तेव्हाच्या प्रेमानंदाच्या उधाणाचा विचार करा
त्या सुशांतला प्यायला मिळत
त्या सुशांतला प्यायला मिळत नाय तिकडे म्हणून रडत असतो सारखा, काय घरची आठवण नाय येत, बाटलीच्या आठवणीने रडत असतो. ते दारूचं व्यसन सोडायला येतात हॉस्पिटलमध्ये ते पण सुरवातीचे काही दिवस यांच्यासारखेच रडत असतात.
कल्पतरू
कल्पतरू
कल्पतरू >> पण तिकडे प्यायला
कल्पतरू >>
पण तिकडे प्यायला मिळत नाही हे खरं आहे का?
गेल्या आठवड्यात राजेश आणि रेशम बोलताना थोडे इनटॉक्सिकेटेड वाटत होते.
सुशांतला प्यायला मिळत नाय
सुशांतला प्यायला मिळत नाय तिकडे म्हणून रडत असतो सारखा, काय घरची आठवण नाय येत, बाटलीच्या आठवणीने रडत असतो. ते दारूचं व्यसन सोडायला येतात हॉस्पिटलमध्ये ते पण सुरवातीचे काही दिवस यांच्यासारखेच रडत असतात.

<<
खरच मेंटली डिफ्टर्ब्ड वाटतो फो.
पण मला त्या रा च्या
पण मला त्या रा च्या अज्ञातवासाचा काही फायदा दिसून येत नाहीये. त्याचा ग्रूप ठरलेला आहे. त्याच्या ग्रूपमधली माणसं धुवा म्हणलं की काय हे नं विचारता धुणारी आहेत, शिवाय विरुद्ध टीममधल्या लोकांचीही त्याच्याबद्दल काय मतं आहेत हे त्याला स्वतःला माहिती आहे. तर मग जरी त्याने गुप्तपणे काय चाल्लंय ते पाहिलं तरी काय फरक पडणारे?
हां, आता स्वतः रेशम, सुशांत अथवा आस्त्याने त्याच्या माघारी उलटसुलट बोलायला सुरुवात केली तर मजा येईल. पण याची शक्यता अगदीच कमी आहे. लेट्स सी!
सिक्रेट रूम म्हणजे त्याला एका
सिक्रेट रूम म्हणजे त्याला एका रूम मध्ये ठेवतात. तो त्याच्या रूम मधून बाहेरच्या घरात काय चाललंय - कोण काय कस बोलत आहेत ते त्याच्या रूम मधल्या टीव्ही वर बघू शकेल .त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था बिग बॉस च करतात त्याने फक्त रूम मध्ये राजाप्रमाणे रहायचं . घरातली सगळी माणस कशी वागताहेत . कोण कुणाबद्दल बोलताय . एकमेकांबद्दल काय बोलतात ते सगळं त्याला दिसेल ऐकू येईल . पण तो कोणाला दिसणार नाही . अगदी रेशम ला सुद्धा दिसणार नाही . तो सिक्रेट रूम मध्ये आहे हे पण घरातल्या लोकांना माहिती नसत . ते फक्त बिग बॉस आणि त्याच्या मधल डील ( करार ) असेल . बाहेरच्या घरातल्याना कोणालाच कल्पना नसणार तो असा आपल्या वागण्यावर वोच ठेऊन आहे ते. आणि मग काही आठवडयांनी त्याला परत एंट्री देतील शेवटचे तीन चार आठवडे . हे असं प्रत्येक बिग बॉस मध्ये असतं
आता रेशम चा आणि त्याचा चॅनल पुरस्कृत जो रोमान्स चाललाय तो लोकांना आवडत नाहीये . म्हणून हि व्यवस्था
त्याने फक्त रूम मध्ये
त्याने फक्त रूम मध्ये राजाप्रमाणे रहायचं >>>> याच एका कारणासाठी मला सिक्रेटरूम ही कंसेप्ट कधीच पटत नाही. बाकी एखादी कमी प्रसिद्ध व्यक्ती चांगली खेळत असून फक्त कमी लोक ओळखतात म्हणून वोट्स अभावी गेली तर एकवेळ ठीक वाटतं पण रा सारखी बर्यापैकी प्रसिद्ध पण स्वतःच्या चीप उद्योगांमुळे गेलेल्या लोकांना असा अॅडव्हांटेज? नाही पटत!
हं, मग काय मज्जाच आहे, फाइव
हं, मग काय मज्जाच आहे, फाइव स्टार जेल, कामं आणि टास्क्स पण करायला लागणार नाहीत

तसही हा बाहेर पडल्यावर टि.व्ही वर बिग बॉस बघणार हे माहितच आहे कि स्पर्धकांना, डायरेक्ट शिव्या घालतील का ?
पण कहानीमे ट्विस्ट आणतीलच मग, हा परत येइ पर्यन्त ती किसी और की असेल मग हा अज्ञस्त्वासस्तून अजुन फुटभर दाढी वाढवून परत येइल , तुम मेरी नही तो किसी और की नही हो सकती थाटात
माझ्या तर डोक्यात असा विचार
माझ्या तर डोक्यात असा विचार आला की याच्या बायकोला सिक्रेट रूम मधे पाठवून घरच्यांबद्दल व खासकरुन त्याचे चिल्लेपिल्ले व रेशमबद्दल विचारायला सांगावं आणि तो पूर्ण शो घरातल्यांना लाइव्ह दाखवून याला परत आणावा. मग खरी मजा येईल.
>>हा परत येइ पर्यन्त ती किसी
>>हा परत येइ पर्यन्त ती किसी और की असेल मग हा
तू बिगबॉसची पार केकता कपूर सिरीअल करुन टाकलीस
मग हा अज्ञस्त्वासस्तून अजुन
मग हा अज्ञस्त्वासस्तून अजुन फुटभर दाढी वाढवून परत येइल , तुम मेरी नही तो किसी और की नही हो सकती थाटात Proud>>>
(No subject)
मग हेच करायचं तर कालच का
मग हेच करायचं तर कालच का नाही केलं? इंटिरिअर बाकी होतं का या रूम चं?
राजेश काल आरोपीच्या पिंजर्
राजेश काल आरोपीच्या पिंजर्यात आला होता तेव्हा जे बोलत होता ते ऐकून बरा (नॉर्मल) वाटत होता अॅक्चुअली.
पुष्कर ला का मदत केली, मेघा, सईचा का राग येतो वगैरे. रेशम मात्र कायमच व्हिलन वाटते. या लोकांनी उलट करायला हवं होतं. रेशम ला त्या रूम मधे पाठवायला हवं होतं. राजेश बद्दल फार लोक काही वाईट धक्कादायक वगैरे नाही बोलणार पण रेशम वर तिच्या मागून बराच पुष्पवर्षाव झाला असता.
पोपट का ठेवले/रंगवले मला
पोपट का ठेवले/रंगवले मला अजुनपन कळलं नाही..
काहीपन रंगवता आलं असत बेडवर..पण पोपट ?
ईथे काहीही लिहिताना जरा जपून.
ईथे काहीही लिहिताना जरा जपून.
....... तो वाचतोय
कोण... अडमीन?
कोण... अडमीन?
राजेशला सोशल मिडियावरचे मेसेज
राजेशला सोशल मिडियावरचे मेसेज पण वाचायला द्या सिक्रेट रूम मध्ये. पब्लिकने केवळ एका कारणाने बाहेर केलं अशी समजूत करून दिली म मां ने याची.
रेशमचा पण काय अश्रूचा पुर वाहतोय. जणू गुडविल ने बाहेर गेला काहीही, हे दोघे संत महंतच ना त्यामुळे गुडविलने बाहेर गेला.
मला तर वाटतंय रेशमला कमी वोटिंग असणार आणि तिला काढायचं नसेल bb टीमला म्हणून हे सर्व.
खरं आहे.. कोण करणार या
खरं आहे.. कोण करणार या दोघांना वोट. मुळात त्या फालतू जुई ला तरी का वोट केलंय लोकांनी काय माहीत. सिपंथी क्वीन.
राजेशच्या बायकोने सांगितले
राजेशच्या बायकोने सांगितले असेल, राजेश, रेशमला वेगळे करा. बाय हुक ऑर क्रुक. पब्लिक वोटिंग वगैरे झुट आहे.
पब्लिक वोटिंग वगैरे झुट आहे.>
पब्लिक वोटिंग वगैरे झुट आहे.>>>>मला तर कायम तसेच वाटते.
अरे ती राजेशची बायको असेल
अरे ती राजेशची बायको असेल एकदम पती परमेश्वर नवर्यासाठी वाट्टेल ते काकूबाई कॅटेगरी! किंवा ते ओपन रिलेशन मध्ये असतील... किंवा तिला विश्वासात घेउन त्याने असं केलं असेल... किंवा ती एकदम बुरसटलेली नसेल थोडी ओपन माईंडेड असेल... किंवा चॅनलनेच सांगितलं असेल त्याला असं करायला!
म.म. लोकांना डेली सोप मधली लफडी आवडतात म्हणूनच चॅनलला टीआरपी साठी अशा क्लुप्त्या करायला लागतात!
आता रेशम बाहेर गेल्यावरच
आता रेशम बाहेर गेल्यावरच राजेशला आत आणायला पाहिजे.
रेशम म्हणते त्याचा फॉल्ट एकच होता कि बाकिचे गेम खेळत होते पण तो गेम खेळत नव्हता.>>> पूढे बोलायला विसर्ली... कि फक्त ओरडायचा.
मेघा-सईला १००% माहिती असणार
मेघा-सईला १००% माहिती असणार तो गेलेला नाहीये हे, पुष्करलासुद्धा. त्यांनी बिग बॉस पाहिले आहे असे सांगत असतात तेव्हा या कुणालाच न भेटवता परस्पर कटवला म्हणजे सिक्रेट रूममध्ये पाठवला याचा अंदाज आला असला पाहिजे.
बाकी, आस्ताद्चा माज अजून गेला नाहीये, एवढा धोपटला त्याला पण अजूनही आता दाखवतो डबल ढोलकी काय असते ते असं म्हणतो तो. स्मिता, जुई, आस्ताद, सु, भू यांना आपल्याला आपला कंपू सांभाळण्ञासाठी बोलावलंय बिबॉमध्ये असंच वाटत असतं, जिंकण्याची इच्छा वगैरे काही नाही. लूझर्स आहेत सगळेच. त्याउलट मेघा, सई, पुष्कर, ऋतुजा, थत्ते, उना सगळेच इर्षेने खेळतात, वेळ पडली तर आरामात दुसर्याचा काटा काढतील आणि उना सोडली तर बाकीचे कुणी गेमा करणार्यावर डूखदेखिल धरणार नाही. स्पोर्टींग स्पिरिट फक्त याच ग्रूपकडे आहे रेरा आणि कंपू निव्वळ फुळकवनी.
पाहिला एपिसोड, काय ती प्रि
पाहिला एपिसोड, काय ती प्रि एलिमिनेशन सुहागरात, ती मुर्खासारखी रडारड , सकाळी दु:खी गाणं, उडी मारून मांडीवर बसणे, तो दुखवटा आणि काय ते इव्हल गृपचं बदला घेण्याच्या मिटींग्स, जणु काही गँगवार मधे खूनच पाडलाय् राजेशचा , सई-पुष्कर-मेघाने

अस्ताद काय बाहुबली होऊ पहातोय का आता राजेशचा अस्तं झाल्यावर, म्हणे राजेशनी सांगितल माझ्या रेशमची काळजी घे , मला बिग बँग थिअरीचा एपिसोड आठवला, हॉवर्ड स्पेस मधे जाणार कळल्यावर राजला स्वप्नं पडत कि तो राजला सांगतोय बर्नाडेटची काळजे घे, कसली काळजी ते बिग बँग थिअरीच्या व्ह्युअरसना आठवत असेल
आज बरेच दिवसांनी आउ आवडल्या, मस्तं ड्रेसप केले थत्तेगिरी स्टाइल !
अस्ताद टकलु हैवान होणार उद्या.
Pages