बिग बॉस - मराठी

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47

येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर Happy

मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?

बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेशमला ठेवतील भांडायला, राजेशला काढतील. परत wild card एन्ट्री देऊ नका त्याला. पुढच्यावेळी रे ला काढा. पुरे आता रेरा फेरा. बोअर करतात.

रेशम अति वचवच करते मग त्यावर मेघा वचवच करते, मग फार डोकं दुखायला लागतं. मेघाचे काही चुकत नाही, ती पुरून उरते.

पण दोघी अति भांडखोर आणि मी अशी मी तशी करणाऱ्या आहेत पण मेघा स्पोर्ट स्पिरीट उत्तम आणि जिद्द उत्तम. रे कशात काही नाही तरी मी अशी मी तशी.

I think they are you going to get rewarded for open air honeymoon footage >>> हे Reward राजेशच्या बायकोकडून मिळणार असेल दोघान्ना. आज ती रे रा चा स्पेशल सत्कार करणार असेल. Lol म्हणून तर म मा म्हणाला ना, आम्ही हे एलिमिनेशन उद्या का दाखवतोय ते कळेलच उद्या तुम्हाला.

रे रा दोघान्ना हाकलायला हव

दोघांना स्पेशल रूममध्ये ठेवतील >>> नही (कानावर हात ठेवून पळणारी बाहुली)

स्मिता पुन्हा चाचपडत कशीतरी लो ऑन कॉन्फिडन्स बोलत होती, मेघा मस्तं बोलली होती परवा तिला “ तू फक्त कपडे घेऊन आलीस, अक्कल घरीच ठेऊन आली“ >>> अगदी अगदी. स्मिता बोलताना मेधा ने 'स्क्रु ढिला असल्याचा' इशारा सईला केला होता.

उपमा प्रकरणात स्मिता खर बोलतेय असे वाटतेय. ते तिने ठामपणे प्रुव्ह करायला हवे होते.

उनाने स्मिताच मडक फोडल असेल. ती स्मिता घाबरत घाबरत बघत होती. अनिल ने कुणाच मडक फोडल?

बिगबॉसच्या पुढच्या टास्कची एक छोटी क्लिप लीक झालीये ज्यात रेशम दिसतेय पण राजेश नाही.

म्हणजे राजेशला सिक्रेट रूम मध्ये टाकला Uhoh

ममां रेशमला एवढं फेवर का बरं करत असतील?

शिव ठकरे म्हणून कोणीतरी, हा माहित नाही.>>> शिव ठाकरे रोडिजवाला.

http://tvinterest.com/shiv-thakare-roadies-rising-x5-contestant-wiki-bio...

इतका काही वाईट नाही. सध्या तरी सिन्गल आहे म्हणे. Wink असे bachelor टाईप्स यायला हवेत वाईल्ड कार्ड म्हणून.

म्हणजे राजेशला सिक्रेट रूम मध्ये टाकला>>> म्हणजे काय नक्की ? दोघांपैकी कोणीतरी एक बाहेर जाणार ना ? तसं नाहीच का शेवटी (हिरमुसलेली बाहुली )

पुष्करने स्मिताला नॉमीनेट केले आणि तिला सेफ करण्यासाठी आस्तादने टक्कल केले.

सिक्रेट रुम काय प्रकार आहे? एका खोलीत अनिश्चित काळासाठी डांबून ठेवतात का?
आणि वाका एन्ट्री घरातुन गेलेल्या सदस्यालाच देतात ना? कि दुसरा कोणीही येऊ शकतो?

एका खोलीत अनिश्चित काळासाठी डांबून ठेवतात का?. हो पण तिथुन त्याला घरात काय चाललय, कोण कोणाबद्दल काय बोलतय हे दिसत राहतं.
मग तो परत आला की आग लावायला मोकळा.

एका खोलीत अनिश्चित काळासाठी डांबून ठेवतात का?. हो >>> का ? का ? का ? नकोय रेरा पैकी कोणीही अज्जिबात Angry

पुष्करने स्मिताला नॉमीनेट केले आणि तिला सेफ करण्यासाठी आस्तादने टक्कल केले.>> हे केव्हा ? आजच्या भागात होणारे का ? Uhoh

हो, राजेश गेलाय वाटते
वुट वर एक क्लिप आहे ज्यात स्मिता अस्तादचे टक्कल करतेय, उना अन थत्ते कॅटवक करताहेत
अन उनाने चक्क थत्तेनसारखे मेकअप केलाय, त्यांचेच कपडे पण घातलेत

शिंगार आणि भंगार दोघे जायला नकोत. तगडे व्हिलन नसले तर मजा नाही बघायला.
पण त्यांना कोण वोट देणार हा पण प्रश्न आहे. ट्विटर वर शिव्या आहेत नुसत्या त्यांना.

आयला गेमच टाकलीये, राजेशला अज्ञातवसात टाकलाय.. त्याला दिसणार आत काय चालू आहे ते, पण तो कमेंट करु शकणार नाही..

महेश मांजरेकर काय फाल्तू आहे. राजेश आणि रेशम शी काय कौतुकाने बोलत होता. वर राजेश ला नॉमिनेट करण्यात प्रेक्षकांचीच चूक आहे, आणि तो खरेच चांगला आहे असे ममा ला वाटते असा त्याच्या बोलण्याचा अर्थ होत होता. रेशम तर राजेश मेल्यासारखी रडत होती.
हे सगळे नक्कीच स्क्रीप्टेड आहे , सगळे ज्याप्रकारे गळे काढतायेत , मेघा रेशम ची कीव करते आहे , सगळेच खोटे आहे. आपणच मुर्खासारखे खरे समजून बघतोय असे वाटते. अता यापुढे ९:३० चा शो बघणार नाही. वूट वर फक्त सई आणि टीम चेच शॉट्स पहाणार.

* उना किती आगाऊ आहे? Uhoh एकिकडे रेशम ला म्हणते की मी तुझ्या आणि राजेशबद्दल काहीहीबोलत नाही. आणि तिकडे रेशिम राजेश च्या मांडिवर बसली तर लगेच किचन मध्ये मेघाला हळूच सांगत होत्या की ती बघ मांडिवर बसली आहे म्हणून.

* रेशम खरंच खूपच रडतेय आणि खरी रडतेय असं वाटतंय.
* सई रेशम शी बोलायला गेली पण रेशम ने दखल पण नाही घेतली.
* उना बोललेलं मान्य करत नाही काहिच. निदान रेशम मान्य तरी करते.

राजेशला अज्ञातवसात टाकलाय.. त्याला दिसणार आत काय चालू आहे ते, पण तो कमेंट करु शकणार नाही..<<< Angry घरी पाठवायला हवा होता. घरच्यांना भेटून आल्यावर रेशमशी परत कसा वागतो ते कळले असते.

परत कधी येतात ही अज्ञातवासातली माणसं?

यात शिक्षा कसली? बाहेर आल्यावर त्याला याचा सर्वाधिक फायदा होणारे. आणि येडा टीपं कसली गाळतो? रेशमच्या खरंच प्रेमात पडल्यासारखं? विसरला का हे नाटक होतं? की हे खरंच गुंतला तिच्यात?

रेशमच्या रडण्याने तिला सिपंथी मिळण्याऐवजी अजून गलिच्छ कमेंट्सच मिळणार सोशल मीडियावर.

रेशम खरंच खूपच रडतेय आणि खरी रडतेय असं वाटतंय. >> अजीबात नाही. ती नवरा मेल्यासारखी रडतीये. आणि मलातर अतिशय ढोंगी वाटतीये.
राजेश नंतर परत गेम मधे येणार ? म्हाण्जे फुकटात सेफ झाला की. यांना बहुतेक रेशम / राजेश लाच जिंकवायचे आहे.

Pages