गुढीपाडवा काय खरे??? आणि काय खोटे ???

Submitted by ऋग्वेद. on 6 March, 2018 - 11:59

मी नुकतेच व्हॊटस ऍप वापरावयास सुरुवात केली. सुरवातीला फक्त individual मेसेज यायचे तेव्हा बरे वाटायचे नंतर बर्याच ग्रुप मधे इच्छा नसतानाही ऐड् झालो. पण या ग्रुप मधे गेल्यावर लक्षात येऊ लागल. की मोबाईल मुळे लोक नावालाच सोशल झालेत. मानसिकता तशीच आहे अशिक्षितपणाची
याला काऱण एक मेसेज जो गुढीपाडव्यानिमित्त् फिरतोय. या मेसेजनुसार एका ठरावीक जातीने हा सण संभाजी महाराजांच्या निधनांनंतर चालु केला.
अजुन बरेच काही आहे पण येथे नमुद करत नाही. पण या मेसेज मधे याचे स्पष्टीकरण नाही. याला उत्तर म्हणुन अजुन एक मेसेज फिरतोय त्यात गुढिपाडव्याचे अनेक पुरावे सांगितलेत. याबद्दल बरेच सर्च केले पण कोठेही माहिति मिळत नाही. म्हणजे खरच त्यावेळी हत्तीवरुन साखर वाटली की आत्ताचे काही रिकामटेकडे हत्तीवरुन अफवा पसरवतायेत.
काय खरे आणि काय खोटे?

Group content visibility: 
Use group defaults

तु मुर्ख आहेस का रे..?
कशाच्या ऐकिव माहीतीवरून कसल्या मानसिकतेतून काहीही किंमत नसलेल्या विषयावर धागा काढतोयस?

कृपया अॅडमिन यांनी धागा बंद करावा

मोबाईल मुळे लोक नावालाच सोशल झालेत. मानसिकता तशीच आहे अशिक्षितपणाची >> हे मात्र एकदम खरे..
मी सर्व व्हाट्सएप ग्रुप, यात नातेवाईक आणि मित्रांचे पण आलेत, डिलीट केलेत. आता मनाला आणि मोबाईल ला छान मोकळं वाटतय. काही वेळ जो मी अशा प्रकारच्या निरर्थक गोष्टी वर वाया घालवत होतो, तो वेळ मि आता कुटुंबातील सदस्यां बरोबर घालवतो.

ठराविक जातीने म्हणजे नक्की कुठल्या?
संभाजीची जात कुठली?
हत्तीची जात कुठेली?
तो ग्रुप भक्त आहे का अ-भक्त? जो काय असेल... त्यातील लोकांच्या जाती कुठल्या?
यातील कुठल्याही जातीला सध्या आरक्षण हवं आहे का?
सध्या निवडणुका आहेत का?
आणि तुम्ही सर्च करताना कुठे पुरावे शोधलेत ? ह्या रसदार प्रश्नांची उत्तरे धाग्यात द्या की!!!
कुणीसं म्हटलंच आहे ना ... (हत्तीवरुन वाटलेल्या) साखरेचे खाणार त्याला देव (प्रसिद्धी) देणार.

http://bsambhaji.blogspot.in/2011/03/blog-post.html?m=1

याच्याबद्दल बोलताय का?
संभाजी महाराज, ब्राह्मण, मराठा वगैरे बाजूला ठेऊन काही प्रश्न:

• गुढीपाडवा फक्त महाराष्ट्र मधेच साजरा होतो का?
रामाशी संबंध असेल तर उत्तर प्रदेशतपन व्हायला हवा
• हिंदू नवीन वर्ष नक्की कधी चालू होते?
• दिवाळीतला पाडवा कशासाठी साजरा करतात?

Oh... ऋग्वेद id आहे होय... घाई घाईत मी ऋन्मेष वाचले,
बाकी धाग्याची जातकुळी थेट तशीच आहे.

स्वतः ला दोन प्रश्न विचारा
१. संभाजीराजे यांच्या मृत्यु पुर्वी पाडवा साजरा होत होता का? आणि कसा साजरा होत होता?
२. असे निरोप कधी पासून, कोण, का पाठवतो ?
मग आपले मत नक्की करा, आणि महत्वाचे म्हणजे त्यावर ठाम राहा.

आम्ही लहान असताना, आज काय आहे असं विचारायचो. कोणी बोललं गुढीपाडवा की लग्गेच नीट बोल गाढवा बोलायचो त्याला Lol

>> गुढीपाडवा फक्त महाराष्ट्र मधेच साजरा होतो का?

मी हैद्राबादला होतो तेंव्हा मला कळले कि हा सण तिकडे पण साजरा करतात. तिथे याला उगडी म्हणतात. काही वर्षापूर्वी याच दिवशी बाली (इंडोनेशिया) मध्ये होतो. तिथे पण हा उत्सव साजरा करतात. तिकडे साजरा करण्याची पद्धत फार इंटरेस्टिंग आहे. रात्री उजेड असेल तर राक्षस येतो अशी समजूत असल्याने सगळे बाली शहर पूर्ण अंधार करतात. सर्व घरे हॉटेल्स रिसोर्ट सगळी कडे पूर्ण अंधार कम्पल्सरी आहे. कोणालाही बाहेर फिरायला परवानगी नाही. पर्यटकांना सुद्धा. क्षणभर आपण परीकथा जगतोय असे वाटले होते Happy असो. कर्नाटकात पण साजरा करतात असे ऐकले. तिथे युगडी असे म्हणतात. फक्त या सर्व ठिकाणी महाराष्ट्रातल्या प्रमाणे गुढीची काठी वगैरे उभी केली जात नाही.

>> आंध्र, कर्नाटक, बालीमधे काय कारण सांगतात? रामाचा संबंध आहे का?

माझ्या माहितीप्रमाणे नवीन वर्ष सुरवात म्हणून साजरा करतात इतकेच.

भारतात दोन शक अजूनही वापरले जातात. एक आहे विक्रम संहत व एक शालिवाहन शक. विक्रम संहतचा पहिला दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा. त्यामुळे जे समूह हे कॅलेंडर पाहतात ते चैत्राचा पहिला दिवस नववर्ष म्हणून साजरा करतात. शालिवाहन शकाचा पहिला दिवस सुध्दा हाच आहे.

विक्रम संहतचे यंदा 2078 आणि शक 1939 आहे. जुन्या काळी राजे लोक महत्वाच्या घटनांचे स्मरण म्हणून स्वतःच्या नावाने शक सुरू करायचे. शिवरायांनी पण राज्याभिषेकपासून शक सुरू केले होते.

बाकी चैत्र वैशाख वगैरे महिने कसे सुरू झाले ही माहिती अद्याप मला माहित नाही, पण माहीत करून घ्यायला आवडेल. दोन्ही शकांचा पहिला दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे चैत्र महिना त्या आधीपासून माहीत होता हे नक्की.

हिंदू संस्कृती जिथवर पोचली तिथे हे महिने व शक पोचले. बाकी इंडोनेशिया व आसपासच्या बेटांवर रामायण तेव्हाच पोचले होते. गुगल केल्यास माहिती सापडेल.

या दिवशी राम अयोध्येत पोचला म्हणून नवे वर्ष असे मला वाटत नाही. उलट राम आधीच पोचून 'आता इतक्या वर्षांनी आलोत तर नववर्षाचा मुहूर्त साधून राज्यात जाऊया' म्हणून बाहेर थांबल्याचीही शक्यता नाकारता येत नाही Happy

विक्रम संहतचा पहिला दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा.>>>

विक्रम संवत दिवाळीच्या पाडव्या पासून सुरु होते! कार्तिक प्रतिपदा!

शालिवाहन शक चैत्र पाडव्याला सुरु होते!

मार्च/एप्रिल महिन्यात नवीन वर्ष सुरवात हा प्रकार जगात अनेक संस्कृती आणि राष्ट्रांमध्ये फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे असे दिसून येते. ग्रेगरीयन कॅलेंडर येण्यापूर्वी युरोपात २५ मार्च हा नवीन वर्षाचा दिवस म्हणून साजरा केला जात असे. जिथे जिथे मार्च/एप्रिल महिन्यात नवीन वर्ष दिन साजरा केला जातो अशी खूप सारी राष्ट्रे/संस्कृती आहेत. त्यांची संपूर्ण यादीच या आर्टिकल मध्ये आहे:

https://en.wikipedia.org/wiki/New_Year

मार्च मध्ये इक्विनोक्स (Equinox) असतो. म्हणजे या दिवशी मध्यानीचा सूर्य हा बरोबर विषुववृत्तावर असतो. वरील यादी मधली अनेक नवीन वर्षे हि हि गोष्ट लक्षात घेऊन झालेली आहेत.

आपण ज्याला शालिवाहन शक म्हणतो तो खरा कुषाण किंवा शकराजांपैकी कुणीतरी सुरू केला असे अनेकांचे मत आहे. चष्टन नावाच्या शक क्षत्रपाचा राज्याभिषेक इ. स. ७८ साली झाला तेव्हापासून त्याने नवीन कालगणना सुरू केली. शकांचा पराभव झाला तरी पुढे सातवाहनांनी तीच कालगणना चालू ठेवली या मताला अलीकडे मान्यता मिळू लागली आहे.

Oh... ऋग्वेद id आहे होय... घाई घाईत मी ऋन्मेष वाचले,
बाकी धाग्याची जातकुळी थेट तशीच आहे.

>>>>

माझा धागा असता तर मी ती खटकलेली पोस्ट ईथे पुर्ण लिहिली असती. तिचे खरे खोटे मला करायचेय ही जबाबदारी उचलली असती. भले चार लोकं काडी काडी ओरडले असते तरी त्याची मोळी बांधून स्वत:च्या खांद्यावर उचलली असती Happy

अर्थात ऋग्वेद यांनीही तसेच करावे अशी अपेक्षा नाही. प्रत्येकाची स्टाईल वेगळी असते. प्रत्येकाने आपापले वेगवेगळेपण जपावे Happy

@ टॉपिक, असे मेसेज दरवर्षी येतात आणि जातात. लोकं प्रभावित होतात की नाही कल्पना नाही. पण माझ्या वाचनात आला की मी आणखी दहा ग्रूपवर टाकतो. सालं डोक्याचे भजे होणार असेल तर ते माझ्या एकट्याच्याच का? एवढाच त्यामागे दुष्ट विचार असतो.

कोणी बोललं गुढीपाडवा की लग्गेच नीट बोल गाढवा बोलायचो त्याला ळोल् >>>> अय्या आम्ही पण असंच बोलतो.. बहुधा तुमची आणि आमची जात सेम असावी Happy

धन्यवाद वरदा. आजकालचे वातावरण बघता अशा रिक्षाच काय पण १८व्हीलर ट्रकवर डिजेंच्या भिंती उभारुन सत्य फिरवले पाहिजे असे वाटते.

Pages