गुढीपाडवा काय खरे??? आणि काय खोटे ???

Submitted by ऋग्वेद. on 6 March, 2018 - 11:59

मी नुकतेच व्हॊटस ऍप वापरावयास सुरुवात केली. सुरवातीला फक्त individual मेसेज यायचे तेव्हा बरे वाटायचे नंतर बर्याच ग्रुप मधे इच्छा नसतानाही ऐड् झालो. पण या ग्रुप मधे गेल्यावर लक्षात येऊ लागल. की मोबाईल मुळे लोक नावालाच सोशल झालेत. मानसिकता तशीच आहे अशिक्षितपणाची
याला काऱण एक मेसेज जो गुढीपाडव्यानिमित्त् फिरतोय. या मेसेजनुसार एका ठरावीक जातीने हा सण संभाजी महाराजांच्या निधनांनंतर चालु केला.
अजुन बरेच काही आहे पण येथे नमुद करत नाही. पण या मेसेज मधे याचे स्पष्टीकरण नाही. याला उत्तर म्हणुन अजुन एक मेसेज फिरतोय त्यात गुढिपाडव्याचे अनेक पुरावे सांगितलेत. याबद्दल बरेच सर्च केले पण कोठेही माहिति मिळत नाही. म्हणजे खरच त्यावेळी हत्तीवरुन साखर वाटली की आत्ताचे काही रिकामटेकडे हत्तीवरुन अफवा पसरवतायेत.
काय खरे आणि काय खोटे?

Group content visibility: 
Use group defaults

>>>>पण माझ्या वाचनात आला की मी आणखी दहा ग्रूपवर टाकतो. सालं डोक्याचे भजे होणार असेल तर ते माझ्या एकट्याच्याच का? एवढाच त्यामागे दुष्ट विचार असतो.>>>>
हे असे करताना आपण त्या खोट्या थिअरी किंवा विखारी विचार जास्त लोकांपर्यंत पोहोचायला मदत करतो आहोत, असा विचार तुझ्या निष्पाप मनात येत नाही का?

हे असे करताना आपण त्या खोट्या थिअरी किंवा विखारी विचार जास्त लोकांपर्यंत पोहोचायला मदत करतो आहोत, असा विचार तुझ्या निष्पाप मनात येत नाही का?

>>>>

सिरीअसली??
तुम्हाला असे वाटते या जनरेशनमध्ये कोणाला काही पडलेय या फालतू थिअरी आणि दंतकथांमध्ये? ईथे जॉब फॅमिली गर्लफ्रेण्ड एक्झाम एवढे सतरा टेंशन असतात. कोणाला पडलीय हे असले जाती धर्म सणवार खरे खोटे करायला आणि काही का खरे खोटे असेना व्हू केअर्स डूड ! जो आजवर जसे सेलिब्रेट करत आला आहे तसेच करणार.

होळीबाबतही काहीतरी गलिच्छ मेसेज फिरत होता. तुम्हाला सिरीअसली असे वाटते की तो मेसेज वाचून एकाने तरी होळी पेटवणे वा रंगपंचमी खेळणे बंद केले असेल?

मुळात ज्याला विश्वास ठेवायचा असतो त्याला मी फॉर्वर्ड केलेला मेसेजच कश्याला हवा, अश्या दुबळ्या मानसिकतेचे आणि अपंग विचारांचे लोकं जे समोर येईल त्यावर विश्वास ठेवतच असतात. त्यांच्या विनाशाला तेच जबाबदार असतात. मी फक्त माझ्यासारख्या विचारांच्या लोकांचे डोक्याचे भजे करायला असे मेसेज फॉर्वड करतो. मग मित्रांचे रिप्लाय येतात,
अरे हरामखोर ऋनम्या काहीतरी चांगले फॉर्वड कर ना..
एखादा ग्रूपमधील नवीन ईडियट सिरीअस होतो आणि मला उद्देशून विनंती करतो, ग्रूपमध्ये प्लीज असे मेसेज टाकू नका..
मग एखादा जुना मला ओळखणारा टिप्पणी करतो, साल्या तुझ्यातले किडे काही संपणार नाहीत..

कमॉन ईट्स फन.. अश्या मेसेज पासून आनंद घ्यायला शिका. जसे शेणापासून गोबरगॅस करता तसे यांचा वापर करा आणि आपले जीवन आनंदी करा Happy

Wow,
त्या लिंक वरती लिहिलेले वाचून जर तू त्याचा "आनंद" घेऊ शकतोस तर तुला कोपरापासून नमस्कार .
ओव्हर अँड आउट

कमॉन ईट्स फन.. अश्या मेसेज पासून आनंद घ्यायला शिका.

ॠन्म्या डोक आहे ना ठिकाण्यावर?
अशा मेसेजवरून दंगली होतात. कित्येकांचा जीव जातो, मालमत्तेचे नुकसान होते. दोन समाजात तेढ होते ते वेगळे.. आणि अशा मेसेज मधून आनंद घ्या म्हणतोस?

जा काही वर्ष मायबोली व सोशल मिडीया पासून ब्रेक घे..

Wow,
त्या लिंक वरती लिहिलेले वाचून
>>>>>

कुठली लिंक?
मी वाचायलाही गेलो नाही
कोण डोक्याचे भजे करणार Happy

कुठले मेसेज भडकाऊ असतात आणि कुठले डोक्याचे भजे करणारे ते मला समजते. काहीही पातळी सोडून असलेले मी फॉर्वर्ड करत नाही. तेवढी स्वत:चीही ईज्जत जपावी लागते.

आणि हो,
व्हॉटसप मेसेजवरून दंगली नाही भडकत. कोणी मेसेज वाचला आणि उतरला रस्त्यावर नंगी तलवार घेऊन असे होत नाही. जेव्ह राजकीय इच्छाशक्ती असते तेव्हाच दंगली घडतात.

तसेच जर एखादा मेसेज दंगली करणारा असेल तर त्याची लिंक मायबोलीवर काय करतेय?
मेसेज सरळ द्या किंवा लिंकमधून द्या. त्याचा प्रसारच झाला ना?
बायदवे कोणत्या लिंकबद्दल बोलत आहात. बहुधा मागच्या पानावर गेली असावी. तिथे काही लिंक होत्या..

त्या लिंक वरती लिहिलेले वाचून जर तू त्याचा "आनंद" घेऊ शकतो
>>>

आणखी एक गोष्ट सिंबा, चुकीचे शब्द टाकू नका. माझी पोस्ट पुन्हा वाचा. मी कुठल्याही दंतकथेचे मेसेज वाचून आनंद उचलत नाही. तर ते मेसेज वाचून माझ्या डोक्याचे जे भजे झाले ते दुसरयाचेही व्हावे म्हणून फॉर्वर्ड करून, ईतरांनाही वाचायला लावून, त्यांचा वेळ श्रम पैसा वाया घालवून त्यातून आसुरी आनंद उचलतो.

तू आसुरी आनंद घेण्यासाठी पुढे ढकल किंवा निर्मळ आनंद घेण्यासाठी पुढे ढकल, त्याचा परिणाम एकच आहे, तुझ्या पर्यंत पोहोचलेला विखारी मेसेज (जो तुझ्यापर्यंत येऊन टर्मिनेट होऊ शकला असता) तो तू 10 गृप=कमीत कमी 100 माणसांपर्यंत पुढे पाठवलास.
आता असे मेसेज व्हायरल असतात, मी नाही पाठवला तर त्यांना दुसरीकडून मिळेल वगैरे सारवासारव नको.

एवढी सारवासारव करण्यापेक्षा, प्रतिसाद देताना एक क्षण थांबून आपण काय लिहितो आहोत याचा विचार केल्यास तर जास्त बरे होईल.

{त्यांचा वेळ श्रम पैसा वाया घालवून त्यातून आसुरी आनंद उचलतो}
यह पॉइंट नोट किया जाए, माय लॉर्ड.

ऋन्मेष, गेले काही दिवस ,आठवडे तुम्ही फारच पीळ मारताय.
आधी तुमच्या प्रतिसादांत कधीतरी काहीतरी सेन्सिबल मिळायचं. आता निव्वळ बाल की खाल, नाकाने कांदे, इ.करताय.
दिसणारा लांबलचक प्रतिसाद तुमचा नाही, हे पाहूनच मग वाचायची सवय लावून घेतलीय मी .
आता यावरून तुमच्या प्रतिसादातलं एक वाक्य मी कसं वाचलं म्हणून सुरू कराल.

जो तुझ्यापर्यंत येऊन टर्मिनेट होऊ शकला असता

>>>

ईथे मुळातच तो मेसेज टर्मिनेट करावा असा माझा हेतू कधीच नसतो. मला असा कुठलाही मेसेज टर्मिनेट करण्यात जराही रस नाही. कारण त्याने काहीही साध्य होत नाही. वर तुम्हीच म्हटले आहे, असे मेसेज वायरल असतात त्यामुळे जिथे पोहोचायचे असतात तिथे पोहोचतात.

आता तुम्हाला जरा एक फंडोलॉजी सांगतो.
@ भरत, तुम्हीही हे वाचत असाल, तर वाचा.

जेव्हा असा एखादा मेसेज वाचून कोणी प्रभावित होऊन जाणीवपूर्वक पुढे पास करतो तेव्हा त्या व्यक्तीच्या त्या हेतूला सारे ओळखून असतात. कारण व्हॉटसपग्रूप हे मित्रांचेच असतात, सारेच एकमेकांना ओळखून असतात. त्यामुळे त्या मेसेजपासून ज्यांना प्रभावित व्हायचे असते ते होतात आणि ज्यांना व्हायचे नसते ते सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात.

पण जेव्हा माझ्यासारखी व्यक्ती ग्रूपमध्ये असा मेसेज टाकते तेव्हा त्या मेसेजलाच एक वेगळाच अर्थ आणि वेगळाच पैलू प्राप्त होतो.

आता तो काय...

तर त्या आधी माझ्यासारखी व्यक्ती म्हणजे काय हे जाणून घेऊया..

मी कुठलीही जातपात, देव धर्म, प्रांत प्रदेश, राजकीय पक्ष, अगदी राष्ट्र, खंड वगैरे कुठल्याही प्रकारचा मानवनिर्मित समूह मानत नाही हे माझ्या सर्वच मित्रांना माहीत आहे.
तसेच माझ्यात असे मेसेज थटटा मस्करीच्या हेतूने फॉर्वर्ड करायचा किडा आहे हे देखील माहीत आहे.
(हे मी माझ्या व्हॉटसपग्रूपवरील मला प्रत्यक्ष ओळखणारया मित्रांबद्दल बोलत आहे, मायबोलीवर अजूनही मी नेमका काय, कसा आहे हे रहस्यच आहे. प्रत्येक जण आपल्या मनाने एक अर्थ काढतो ईतकेच)

असो, तर आता त्यामुळे होते काय हे बघूया..

असा एखादा मेसेज ईतर एखाद्या व्हॉटसपग्रूपमध्ये पडतो तेव्हा काही वेळा चिडीचूप वातावरणात वाचला जातो आणि बहकणारे बहकतात. तर कधी त्यावर घमासान वाकयुद्ध होते आणि वातावरण पेटते. बरेचदा पहिलीच शक्यता असते कारण व्हॉटसपग्रूप मित्रांचे असल्याकारणाने लोकं आपल्यातील जातीयवाद मनातच दडवून ठेवतात.

पण जेव्हा असा मेसेज मी टाकतो तेव्हा त्याची मस्त खेचली जाते. त्यातील बनावाला टराटर फाडले जाते. जर खरेच त्यात काही तथ्य असेल तर ते तेवढेच शिल्लक राहते. बाकी सर्वांच्या चिंधड्या उडवल्या जातात. आत एक बाहेर एक असे काही शिल्लक राहत नाही. मित्रांच्या मनात जर काही असेलच तर त्याचा निचरा होतो. त्यांनी तोच मेसेज ईतर ग्रूपवर पाहिला असतो तेव्हा त्याने त्यांच्या मनात काही संभ्रम सोडलेले असतात. पण तोच मेसेज आमच्या ग्रूपवर पडतो तेव्हा मनाची पाटी कोरी झाली असते.

मतितार्थ काय..तर मेसेज महत्त्वाचा नाही, तो फॉरवर्ड कोण करतं त्यावर त्या मेसेजचं काय होणार आहे ते अवलंबून आहे..प्रोब्लेम हाच आहे ना की मायबोलीवर ऋन्मेष यांचे व्यक्तिमत्व रहस्यमय आहे त्यामुळे काय होतंय की मनाची पाटी कोरी ठेवता येतंच नाहीये त्याला ऋन्मेष तरी काय करणार Sad कशाला त्याला दोष देता? उलट त्याच्या शांत, स्थितप्रज्ञ, स्वत:चे डोके अजिबात न भडकवून घ्यायच्या मनोवृत्तीचे मनापासून कौतुकच वाटते Happy

>>मायबोलीवर ऋन्मेष यांचे व्यक्तिमत्व रहस्यमय आहे>> छ्या, काहीही रहस्यमय वगैरे नाहीये. ज्यांना खरं माहित नाही त्यांना तसं वाटू शकतं हे कबूल.

शेवटच्या तीन ओळी आणि तोच तोच सूर आळवणं आता जुनं झालं. नवीन येऊ द्या.

मायबोलीवर अजूनही मी नेमका काय, कसा आहे हे रहस्यच आहे. प्रत्येक जण आपल्या मनाने एक अर्थ काढतो
>>>> Happy अर्थ वगैरे काढण्याइतपत इतक्या लोकांना आपल्यात इन्टरेस्ट आहे असे मानणे हे स्वतःला खूप जास्त मह्त्त्व देणे झाले.
इन जनरल , असल्या काड्या टाकून मजा घेणारे सोशल मिडिया वरचे अटेन्शन सीकिंग लोक अगदी टिपिकल असतात. बहुधा ज्यांच्या प्रत्यक्ष आयुष्यात काही उल्लेखनीय नाही, अभिमानास्पद अचीव्हमेन्ट नाही पण त्याची भरपाई म्हणून सोशल मिडिया मधे कुणीतरी नेगेटिव का होईना पण अटेन्शन दिले यातच धन्यता मानणारे. "लगे रहो" असे म्हणू शकतो आपण.

असो,
केवळ धागा ट्रॅक वर आणण्यासाठी,
इकडचा प्रतिसाद आणि अजून 1 2 मुद्दे वाढवून वरदा ने सेपरेट लेख लिहिला आहे, तो जरूर पहा

मतितार्थ काय..तर मेसेज महत्त्वाचा नाही, तो फॉरवर्ड कोण करतं त्यावर त्या मेसेजचं काय होणार आहे ते अवलंबून आहे..
>>>

येस्स !
हा फार महत्वाचा मुद्दा आहे. फॉर्वर्ड कोण करतंय, त्याचा हेतू काय आहे, ज्यांना फॉर्वर्ड केलेय त्यांच्यामते फॉर्वर्ड करणारयाची इमेज काय आहे, ईत्यादी फार महत्वाचे ठरते.
तसेच पुढे त्या मेसेजवर काय चर्चा घडते आणि ती कश्या अंगाने पुढे जाते हे त्याहून महत्वाचे ठरते.

माझ्या वरच्या पोस्टलाच जोडून.....

सोर्सची विश्वासार्हता हा एक महत्वाचा फॅक्टर असतो.

अमुकतमुक पोस्ट व्हॉटसपवर आली आहे ती अशीच कोणाच्या ब्लॉगचा संदर्भ देऊन आहे की विकीचा संदर्भ आहे की प्रथितयश न्यूज साईटवरच ती माहिती दिली आहे हे मॅटर करते.

एखादे भडकाऊ वक्तव्य वा माहिती एखाद्या सामान्य कार्यकर्त्याकडून आली आहे की एखाद्या वरिष्ठ नेत्याकडून हे मॅटर करते.

मी पोस्ट टर्मिनेट केली म्हणजे मी कोणा एकाचे मन कलुषित होण्यापासून वाचवले हे आपलेच समाधान असते. ज्या गोष्टीत आपल्याला रस नसतो ती तशीही आपण फॉर्वड करत नाही आणि ती पोस्ट बाय डिफॉल्ट टर्मिनेट होतेच.

त्यापेक्षा जर तुम्ही लोकांच्या नजरेत एक अभ्यासू आणि नि:पक्ष व्यक्तीमत्व असा सन्मान आणि विश्वास मिळवला असेल तर तो वापरा आणि ती पोस्ट तिथल्या तिथे बरखास्त कशी करता येईल हे बघा. ते जास्त परीणामकारक राहील. तुम्ही त्याचा केलेला प्रतिवाद काही जण आणखी कुठे ती पोस्ट असेल तर तिथे टाकतील.

आता हे उदाहरण दिले आहे. मी स्वत:ला अभ्यासू म्हणून स्वत:ची आरती ओवाळत आहे असा अर्थ काढू नका. तो मी नाहीये हे माझ्यासकट सर्वांनाच माहीत आहे.

मै, सहमत.

>>मायबोलीवर अजूनही मी नेमका काय, कसा आहे हे रहस्यच आहे>> अजिबात नाही. गैरसमज आहे तुझा. कोण आहेस ते माहिती आहे आणि काडीचीही क्युरिऑसिटी नाही. Wink

बाकी धाग्याची जातकुळी थेट तशीच आहे. >>>
आजिबात नाही हं मी काड्या करत नाही.
मी जाणुन बुजुन जातीचा उल्लेख केला नाही. उगाच कशाला वादविवाद. सगळाच मेसेज टाकला असता तर धाग्यासोबत माझा आयडी ही उडला असता Happy
बाकि खुप छान माहिती मिळाली खुप धन्यवाद सर्वांचे.

अजिबात नाही. गैरसमज आहे तुझा. कोण आहेस ते माहिती आहे आणि काडीचीही क्युरिऑसिटी नाही. Wink

>>>>

सायो, तुम्हाला शाहरूख खान कोण आहे हे माहीत असेलच.
तो बॉलीवूडचा सुपर्रस्टार आहे, तो किंग ऑफ रोमान्स आहे, त्याच्यामध्ये एक एटीट्यूड आहे, एक एरोगन्स आहे, एक्स फॅक्टर आहे, तो चेन स्मोकर आहे, तो चांगला स्पीकर आहे, एंकर आहे, हजरजबाबी आहे वगैरे वगैरे गुण दुर्गुण जे पेज थ्री न्यूजमधून तुमच्यासमोर आले ते आणि हल्ली आयपीएलमध्ये थोडेफार त्याचे प्रत्यक्ष दर्शन घडते, पण ते देखील ऑनस्क्रीनच, त्यानुसार जे समजले, जे तुम्ही त्याच्या काही झलक वरून अंदाज बांधले ते आणि तितकेच माहीत आहे...

पण हे समजले म्हणजे तुम्हाला शाहरूख खान एक सेलिब्रेटी समजली. शाहरूख खान एक व्यक्ती म्हणून समजायला तुम्ही त्याच्या मित्रपरीवारात वा जवळच्यात वा किमान त्याच्या शाळाकॉलेज सोसायटीत राहणारे नको का?

बघा फरक लक्षात येतोय का...

अच्छा, हे पुन्हा एक उदाहरण आहे. मी स्वत:ला शाहरूख समजत नाही वगैरे असं यावेळी मी म्हणणार नाही Wink

अवांतर - शक्य असल्यास या अवांतर पोस्ट टाळा. मी जे वर उदाहरणात लिहिले होते त्यातील शब्द पकडून माझ्यावर चर्चा नको. उगाच मला संकोचायला होते. वर धागा हायजॅक केल्याचे बिल माझ्यावर फाटते ते वेगळेच.

बहुधा ज्यांच्या प्रत्यक्ष आयुष्यात काही उल्लेखनीय नाही, अभिमानास्पद अचीव्हमेन्ट नाही पण त्याची भरपाई म्हणून
>>>

मैत्रेयी ही देखील अवांतर पोस्ट आहे म्हणून टाळणार होतो, किंबहुना टाळतच आहे, पण धन्यवाद नक्कीच मानेन कारण यावरून मला एक छान धागा सुचला आहे. तुर्तास फक्त नोंद करून ठेवतो. तिथे नक्की बोलूया Happy

तर ते पाडव्याबद्दल बोलत होता त्याच्या बद्दल काय झाले?
शाहरूख खान एक सेलिब्रेटी समजली.
माझ्या माहितीप्रमाणे ऋन्मेSSष हे खरे प्रसिद्ध. खान ची काय प्रसिद्धी हे वरच्या एका पोष्टीत वाचली - काही इम्प्रेसिव नाही वाटत तो.

शाहरुख खान जो असायचा तो असेल पण तो तू नव्हेस हे तुला कळलं म्हणजे झालं. बाकी शाखा मला आवडत नाही त्यामुळे मी उर्वरीत पोस्ट ऑप्शनला टाकली आहे. फक्त पहिली ओळ तेवढी वाचली.
अवांतराबद्दल क्षमस्व.- हे धागाकर्त्याला. एरवी ‘मी मी’ करत फाटे फोडणार्‍यांना नव्हे.

बाकी शाखा मला आवडत नाही त्यामुळे मी उर्वरीत पोस्ट ऑप्शनला टाकली आहे.
>>>

हे गणित नाही समजले.
मी माझा मुद्दा समजवायला उदाहरण दिले आहे. पण त्या उदाहरणात शाहरूखखानचा उल्लेख आहे आणि तो आपल्याला आवडत नाही म्हणून आपण ते वाचलेच नाही. ईथे वैयक्तिक आवडीनिवडीचा संबंध येतोच कुठे.
आता मला बटाट्याची भाजी आवडत नाही म्हणून जर परीक्षेत गणित आले की एक किलो बटाटे दहा रुपयाला तर दहा किलो बटाटे किती रुपयाला तर मी ते न वाचताच सोडून देणार का?

तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत नाही तेव्हा त्याबद्दल कोणी काही लिहिलेले तुम्ही वाचत नाही हे समजले. पण चर्चेत वादात आलेले उदाहरण सुद्धा वाचायचे नाही हे काही पटत नाही.

अवांतर - मध्यंतरी गॉसिपची एक छान व्याख्या वाचलेली ती या निमित्ताने आठवली.
गॉसिप - न आवडणारया व्यक्तीबद्दल आवडीचे वाचायला मिळणे Happy

गप्प रे
जा पियु ताई आणि रुन्मेष बाळाकडे लक्ष दे
अभिषेक तुझ्याबद्दल जो काही थोडा फार आदर होता तो पार मातीत घातला आहेस
तुझे आयुष्यात काय फ्रस्ट्रेशन आहे माहिती नाही पण तुला समुपदेशन करून घेण्याची गरज आहे

>> मी कुठलीही जातपात, देव धर्म, प्रांत प्रदेश, राजकीय पक्ष, अगदी राष्ट्र, खंड वगैरे कुठल्याही प्रकारचा मानवनिर्मित समूह मानत नाही हे माझ्या सर्वच मित्रांना माहीत आहे. >> तुम्ही काही मानत नाही फक्त थापा मारता. Lol
मनोरंजनाबद्दल आभारी आहे.

अरे काय चाल्लंय काय इथे? कसला बटाटा? कसलं गणित? कुणाचं गॉसिप?....आणि आला का as expected शाखा याही धाग्यावर? Angry अमितव म्हणाले तसे मनोरंजन तर होतंय पण शाखायुक्त मनोरंजन नको रे बाबा!
<<जा पियु ताई आणि रुन्मेष बाळाकडे लक्ष दे
अभिषेक तुझ्याबद्दल जो काही थोडा फार आदर होता तो पार मातीत घातला आहेस
तुझे आयुष्यात काय फ्रस्ट्रेशन आहे माहिती नाही पण तुला समुपदेशन करून घेण्याची गरज आहे>> यातलं काहीच नाही झेपलं आशुचँप, ह्यो अभिषेक कोण?

@ अजब, तुम्हाला द्वारकानाथ संझगिरी माहीत असतीलच.
(माहीत नसतील तर त्यांच्याबद्दलच्या अनुभवावर लिहिलेल्या लेखाची लिंक देतो नंतर)
तर ते वृत्तपत्रात क्रिकेटवर लेख लिहितात. तसेच ते अधूनमधून ईतरही लेख लिहितात. पण त्या ईतर विषयांवरच्या लेखातही ते उपमा आणि उदाहरणे क्रिकेटच्या भाषेतीलच देतात. कारण काय, तर क्रिकेट त्यांच्या अंगात भिनले आहे. शाहरूखबाबतही माझे तसेच होते. उदाहरण देताना त्याच्याशी संबंधित समर्पक उदाहरण आणि उपमा मला चटचट सुचतात ईतकेच.

@ अमितव, मी थापा मारतो यावर मी स्वत:च लेख लिहिला आहे. माझ्या वाईट सवयी लेखमालेत..
(लिंक देतो हवे तर नंतर शोधून) सांगायचा मुद्दा हा की यात कसलाही रहस्यभेद नाहीये Happy

@ आशूचॅम्प, आदराबद्दल धन्यवाद Happy
फक्त माझ्यावरील रागालोभापोटी कोण्या तिसरयाच माणसाबद्दलचा आदर कमीजास्त करू नका. अन्यथा हे फॅन चित्रपटासारखे होईल.
(चित्रपट पाहिला नसेल तर त्यावर मी लिहिलेल्या परीक्षणाची लिंक देतो नंतर)

Pages