गुढीपाडवा काय खरे??? आणि काय खोटे ???

Submitted by ऋग्वेद. on 6 March, 2018 - 11:59

मी नुकतेच व्हॊटस ऍप वापरावयास सुरुवात केली. सुरवातीला फक्त individual मेसेज यायचे तेव्हा बरे वाटायचे नंतर बर्याच ग्रुप मधे इच्छा नसतानाही ऐड् झालो. पण या ग्रुप मधे गेल्यावर लक्षात येऊ लागल. की मोबाईल मुळे लोक नावालाच सोशल झालेत. मानसिकता तशीच आहे अशिक्षितपणाची
याला काऱण एक मेसेज जो गुढीपाडव्यानिमित्त् फिरतोय. या मेसेजनुसार एका ठरावीक जातीने हा सण संभाजी महाराजांच्या निधनांनंतर चालु केला.
अजुन बरेच काही आहे पण येथे नमुद करत नाही. पण या मेसेज मधे याचे स्पष्टीकरण नाही. याला उत्तर म्हणुन अजुन एक मेसेज फिरतोय त्यात गुढिपाडव्याचे अनेक पुरावे सांगितलेत. याबद्दल बरेच सर्च केले पण कोठेही माहिति मिळत नाही. म्हणजे खरच त्यावेळी हत्तीवरुन साखर वाटली की आत्ताचे काही रिकामटेकडे हत्तीवरुन अफवा पसरवतायेत.
काय खरे आणि काय खोटे?

Group content visibility: 
Use group defaults

बुलेट हे वाहन आहे, कपडा नाही. वाहन आपल्याला कॅरी करतं, आपण वाहनाला कॅरी करायचा प्रश्नच येत नाही! कोणत्या वाहनातून जाताना कोणते कपडे घालावेत असे काही नियम नाहीत.
मला विचाराल तर सलवार-कमीज आणि स्पोर्ट शूज घालणार्‍या बायका जास्त विचित्र वाटतात!

IMG-20180318-WA0000_0.jpg
घ्या भाऊ.

ईथे कोणी विचित्र वाटणेची व्याख्या उलगडेल का? कॅन येनीवन डिफाईन विचित्र वाटणे? त्याचे निकष प्यारामीटर वगैरे?

विचित्र वाटणे हे व्यक्तीसापेक्ष असते का?

एखादी गोष्ट आपल्या डोळ्यांना विचित्र वाटते याचा अर्थ एवढाच नाही का की आजवर आपण ते कधी पाहिले नसते.

एक साधे उदाहरण - ज्या व्यक्तीला तुम्ही आयुष्यभर दाढी वाढवलेले पाहिले आहे तो जेव्हा पहिल्यांदा तुमच्यासमोर तुकतुकीत दाढी करून येतो. तेव्हा तुम्हाला ते विचित्र वाटते. अगदी टिडींग टिडींग याईये वाटतो. पण कालांतराने नजर सरावताच तुम्हाला तोच स्मार्ट वाटू लागतो.

तर स्टाईलबाबत विचित्र वाटणे वगैरे काही नसते. बस्स आपल्या नजरेचे चोचले असतात.

म्हणून माझा सर्व मित्रांना सल्ला आहे की कुठलीही नवीन फॅशन ट्राय करावीशी वाटली तर बिनधास्त ट्राय करा. लोकांच्या विचित्र नजरा एंजॉय करा. कारण तुम्ही जे केले आहे ते आजवर त्यांनी कधी फारसे पाहिले नाही हाच त्याचा अर्थ होतो. लोकांनी आखलेल्या चौकटीत स्वत:ला फिट करायची काहीएक गरज नाही.

पाफा, शाहरूखचा फोटो ईथे शेअर केलात त्याबद्दल धन्यवाद.
कारण विषय कपड्यांच्या स्टाईलचा निघाला आहे. आणि आजवर बॉलीवूडच काय भारतात त्याच्यासारखा ड्रेसिंग सेन्स असलेली व्यक्ती मी आजवर दुसरी पाहिली नाही.

आज हिंदू धर्म के अनुसार हम अपना 15,55,21,96,08,53,120 वा हिंदू नववर्ष मना रहे हैं !

और अंग्रेजी कैलेंडर के हिसाब से यह सिर्फ 2018 वा साल है..

गर्व से कहो हम हिंदू है..

××××××

खरे खोटे करा

ख्रिश्चन पुस्तकात लिहीले आहे की जग सहा हजार वर्षांपूर्वी निर्माण झाले.
काही ख्रिश्चन अतिरेक्यांपेक्षा जास्त कडवे असतात. त्या ख्रिश्चनांसमोर उगाच वाद घालू नका, किंवा बंदुकीचे द्वंद खेळायची तयारी ठेवा, जुन्या अमेरिकन वेस्टर्न चित्रपटांत दाखवल्या प्रमाणे.

BC विसरला का. 2018 AD आहे, BC किती आहेत?
>>>>
एव॑ढी एबीसीडी येत असती तर जगभरात माझ्या ईंग्रजीची ईतकी खिल्ली उडवली गेली असती का?

कोणी बोललं गुढीपाडवा की लग्गेच नीट बोल गाढवा बोलायचो त्याला>>>>>>>>>>>>>>>>>अगदी ..मी तर अजूनही हाच खेळ खेळत असते .. चार आणे हरवलेत तुझे अश्या प्रतिक्रिया आल्या तरी !!! Lol

एव॑ढी एबीसीडी येत असती तर जगभरात माझ्या ईंग्रजीची ईतकी खिल्ली उडवली गेली असती का?
Submitted by ऋन्मेऽऽष on 19 March, 2018 - 01:46>>>>

अरे इथे तुझ्या जुन्या एका धाग्याची (या देशात इंग्रजी न येणाऱ्यांची खिल्ली का उडवली जाते?) या धाग्याची लिंक द्यायची ना! तितक्याच त्या धाग्यावर प्रतिक्रिया वाढल्या असत्या ना!!!

पाफा, शाहरूखचा फोटो ईथे शेअर केलात त्याबद्दल धन्यवाद.
कारण विषय कपड्यांच्या स्टाईलचा निघाला आहे. आणि आजवर बॉलीवूडच काय भारतात त्याच्यासारखा ड्रेसिंग सेन्स असलेली व्यक्ती मी आजवर दुसरी पाहिली नाही.>>> असहमत याबाबतीत शाखा खुप खाली आहे त्याच्या आधी अमिताभ रितिक फरहान अख्तर यासारखे दिग्गज येतात्. त्याचा नंबर सहावा सातवा असावा
मोस्ट् चार्मिंग् आणि हॅंड्सम चा अवोर्ड् ही आर माधवन ला गेलाय .
सध्या शाखाचे चित्रपट ही चालत नाहीत. सध्या एवढी प्रसिद्धी मिळवुन एकामागोमाग एक असे फ्लॊप् चित्रपट देणारा नायक भारतात नाही असे म्हणावे लागेल Happy

>>Submitted by madhusudan on 19 March, 2018 - 15:58

हाय कम्बख्त, अखिर तुने कुल्हाडी पे पैर मार ही दिया.....
making a note not to visit this thread in future Uhoh

>>हाय कम्बख्त, अखिर तुने कुल्हाडी पे पैर मार ही दिया.....
नुसता पैर नाही, तर ते नाच नाच नाचलेत कुल्हाडीवर Lol

>>हाय कम्बख्त, अखिर तुने कुल्हाडी पे पैर मार ही दिया.....
नुसता पैर नाही, तर ते नाच नाच नाचलेत कुल्हाडीवर Lol
नवीन Submitted by महेश on 19 March, 2018 - 21:23
>>>>
भांगडा केलाय भांगडा Rofl
देवा वाचव

पाफा,महेश, मला याची पुर्ण जाणीव आहे. पण मी फक्त मत सांगितले रुन्मेष शी दांडीया खेळण्यात आजिबात इंटरेस्ट् नाही
बादवे शाखाचा लास्ट् चित्र्पट कोणता होता ?? आठवत नाहिये. Happy

मधुसुदन, आपल्या मताचा आदर आहे. पण मी त्याच्याशी असहमत आहे.
सौरव गांगुलीचा मी सुद्धा फॅन आहे. त्याची कप्तानी, अ‍ॅटीट्यूड, फलंदाजीची शैली वगैरे मला फार आवडायची. पण जेव्हा चर्चा निव्वळ फलंदाजीच्या क्लासची व्हायची तेव्हा मी त्याला कधीही सचिनपेक्षा वरचढ म्हटले नाही.
हेच अमिताभ आणि शाहरूखबाबत लागू.
दोघांच्या स्टारडमबद्दल आपण खुशाल कधीही न संपणारा वाद घालू. मात्र ईथे चर्चा ड्रेसिंग सेन्सवर चालू असताना तिथे शाहरूखला तोड नाही.
फरहान अख्तर तर माझ्यामते गिणतीतही नाही. तो फक्त एक पडद्यावरचा सुसह्य जीव आहे ईतकेच.
आणि माधवन. येस्स, त्याची स्टाईल आणि पर्सनॅलिटी माझ्याही आवडीची. पण तुम्हाला ठाऊक आहे का? तो देखील शाहीद कपूर प्रमाणे करीअरच्या सुरुवातीला शाहरूखलाच कॉपी करायचा. मोअर पॅसिफिकली सांगायचे झाल्यास डीडीएलजेचा राज बनायला बघायचा. जर त्याला तुम्ही म्हणता तसे "मोस्ट् चार्मिंग् आणि हॅंड्सम चा अवोर्ड्" दिला असेल तर आनंदच आहे. चेला आहे आपला Happy

अरे हो, आपले हे अवांतर विधान,
<<<< सध्या एवढी प्रसिद्धी मिळवुन एकामागोमाग एक असे फ्लॊप् चित्रपट देणारा नायक भारतात नाही असे म्हणावे लागेल >>>>>
यावरून समजते की आपल्याला शाहरूख समजलाच नाही Happy
त्याला फक्त चित्रपट आणि बॉक्स ऑफिसच्या यशावर मोजू नका हो. ते तर त्याच्या अथांग व्यक्तीमत्वाचा एक ईवलासा पैलू आहे. किंबहुना अजून सलग दहा फ्लॉप चित्रपट दिले तरी दहा वर्षांनी सुपर्रस्टार म्हटले की लोकं झोपेतून उठूनही शाहरूखच बोलतील हिच तर त्याची खरी कमाल आहे Happy

अवांतराबद्दल क्षमस्व, तसेही गुढीपाडवा झाला आहे. ईतके चालून जावे Happy

>>अजून सलग दहा फ्लॉप चित्रपट दिले तरी दहा वर्षांनी सुपर्रस्टार म्हटले की लोकं झोपेतून उठूनही शाहरूखच बोलतील Rofl

Pages