डास, झुरळे, पाली, मुंग्या यांचे तुम्ही काय करता?

Submitted by mi_anu on 4 January, 2018 - 07:02

प्रेरणा: हा धागा https://www.maayboli.com/node/44433
घरात काही प्राणी येतात का?
घरात येणारे डास, झुरळे, पाली, मुंग्या यांचा बंदोबस्त तुम्ही कसाकसा करता?
तो करताना काय काय अडचणी येतात?
शेरास सव्वाशेर प्राणी भेटतात का?
(इथे हे ३ सोडून घरात शिरणार्‍या इतर प्राण्यांबद्दल पण लिहू शकता.)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

ह्या सर्व गोष्टींची भिती जाण्यासाठी काही ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लासेस असतील तर करायची इच्छा आहे.

डासांची जगात गरज काय आहे?
अन्नसाखळीत त्यांचं स्थान काय?
जगातून सगळे डास एकदम कायमचे गायब झाले तर किती बरं होईल.

Mosquito larvae and tadpoles play imp role in Fish life cycle as nourishment for fish fry and juveniles /semi fingerlings.

nourishment for fish fry and juveniles /semi fingerlings.
<<

फिश फ्राय वाचून तोंपासु.

(बाकी, मला ही डेफिनिशन माहिती आहे : Juvenile fish go through various stages between birth and adulthood. They start as eggs which hatch into larvae. The larvae are not able to feed themselves, and carry a yolk-sac which provides their nutrition. ... When they have developed to the point where they are capable of feeding themselves, the fish are called fry.)

-मत्स्यशेतकरी

Stages are
hatchlings (yolk sac absorption)
spawn (most often passive feeder/drifters)
fry मत्स्य जीरे(active feeders on zoo plankton and insect larvae)
बाकी ते फ्राय वाचून गडबडणार कोणीतरी म्हणून पुढे फिंगर्लिंग / बोटुकलीचा पण उल्लेख केलेला.
---------
मूळ प्रश्न डासांची गरज काय असा होता
हाच प्रश्न मला अनेकदा झुरळाबाबत पडलेला Happy पण निसर्गात कधीच कोणी बिनकामाचे नसते हे १०० % खरे !!

अज्ञानी +1

एखाद्या गोष्टीची गरज संपली तर ती नामशेष होते, माणसाच्या शेपटी सारखी, पण माणसातले माकड अजून संपले नाहीये. Rofl

या सगळ्या लिस्टमध्ये मला पण एक विचारायचं आहे, घरात ढेकूण झाले आहेत, lockdown नंतर च दिसतं आहेत, त्यामुळे पेस्ट कंट्रोल करू शकत नाही, कोणी काही उपाय सुचवू शकता का? घरात लहान मुले आणि वयोवृध्द आहेत

ढेकणांना फार उपाय दिसत नाहीत.इथे एक खास ढेकूण स्पेशल धागा होता आ रा रा यांचा.
आमच्याकडे एक घडीचा बेड आहे सिंगल(तो प्रदर्शनातला बेड सोफा असतो तो.त्याच्या गादीच्या शिवलेल्या कव्हर च्या आतल्या बाजूला ढेकूण होते. आमचा पेस्ट कंट्रोल वाला धनकवडी चा आहे.(तो थोडा सतीश राजवाडे सारखा दिसतो.)त्याने सांगितले की फ्युमिगेशन हा उत्तम उपाय आहे.तो केल्यावर ढेकूण गेले खरोखरच.
हा अत्यंत विषारी उपाय आहे.खिडक्या दारं टेप ने बंद करून केमिकल च्या 10-12 डिश घरात ठेवून दार रात्रभर रिकामे घर बंद ठेवून सकाळी अगदी सावध पणे टप्प्यात खिडक्या उघडून 10 मिनिटं वारा खेळता ठेवून आत यावे लागते.सर्व अन्न पदार्थ नीट डब्यात बंद ठेवावे लागतात.उपाय अति टोकाचा आणि कारसिनोजेनिक वगैरे असेल.पण ढेकूण असल्यास जालीम उपयोगी.घरात बाळं असल्यास करू नये.आम्ही अगदीच त्रास वाटला तरच 2 वर्षांत एकदा वगैरे करतो.
यावेळी इको फ्रेंडली पेस्ट कंट्रोल नंतर पाली बाहेर पडायला लागल्यात Sad
परवा सुपरमून चा चांगला फोटो काढायला नवऱ्याने डास वाली जाळी पण उघडली.लगेच एक पाल आत आली.त्याने हिट आणि झाडू ने मारली.ती टाकायला जाणार तोवर या टेन्शन मध्ये बाहेरचं दार उघडं होतं(डेडबॉडी वालं केर भरणं घेऊन लगेच बाहेर जाता यावं म्हणून) त्यातून अजून एक पाल आली.नवऱ्याने तीही मारली.पळवायला पाहिलं पण ती शु रॅक मध्ये घुसल्याने जीव घ्यावा लागला.दोन्ही पाली केर भरण्यात सोसायटी गार्डन च्या सर्वात लांबच्या कोपऱ्यात टाकून आले.
प्रदर्शनातुन चार पाल रिपेलर आणले आहेत.किमान ते चिकटवले आहेत त्या जागी तरी पाल आलेली नाही.ते कसे काम करतात माहीत नाही.वास वगैरे नाहीय.बहुधा प्लासीबो इफेक्ट असेल.
आता परत संधी मिळाली की 10-12 आणून सर्व एन्ट्री पॉईंट ला लावणार आहे.

मुकुंद कंपनीचे डेड लाईन बग फायटर हे वापरा त्या ढेकणांवर. उग्र वास आहे पण पेशन्स ठेवा. चादरी उचलुन मागे पुढे खाली- वर त्यांची कुठे अंडी असतील तिथे पण रागा रागाने मारा, म्हणजे बदला घेतला जाईल. साधारण सकाळ ची वेळ निवडायची म्हणजे वास कमी होतो दुपार पर्यंत. पेशन्स ठेवुन दर दिवशी हे केले तर पेस्ट कंट्रोल करायची वेळ येणार नाही. लहान मुले व वयस्कर लोकांना दुसर्‍या खोलीत बसवावे त्या वेळी.

गनीम कधी नजरेसमोर आलाच तर cypermethrin थोडं पाण्यात डाइल्यूट करून स्प्रे करा आणि ८४च्या फेऱ्यातून झटपट मोक्ष दिल्याबद्दल त्याचे १००१ आशीर्वाद मिळवा.

आमच्या घराला दोन बाल्कन्या आहेत.. हाॅललगतची बाल्कनी सहसा वापरत नाही.. बेडरूमच्या बाल्कनीत 3 सिलेंडर ठेवले होते आणि काही जुने वापरत नसलेले कपडे व्यवस्थित बाॅक्समध्ये पॅक करून ठेवले होते.. आज म्हटलं बेडरूमची बाल्कनी मोकळी करूया..जेणेकरून संध्याकाळी बाल्कनीत बसून लिहता यावं..मनसोक्त चहाचा आस्वाद घ्याता यावा..

ऐरवी वेळ मिळत नाही म्हणून बाल्कनीत फक्त कपडे सुकवण्या जाण्यापर्यंतच काय तो संबंध ..

पण आज सिलेडरमागे एक चांगली जाडजूड पाल दिसली..तीन तीन सिलेंडर असल्यामुळे आणि मला ते तिथून हलवायचे असल्यामुळे पालीचा आणि माझा हातात झाडू घेऊन चांगलाच अर्धा पाऊण तासाचा लपाछपीचा खेळ रंगला.. त्यात बेडरूमध्ये शिरली की पंचाईत व्हायची म्हणून घाईघाईत मी बेडरूमचे स्लाईडचे दरवाजे बंद केले..

शेवटी एकदाची ती बाहेर आली आणि ग्रीलवर इथून तिथून येरझारा मारू लागली...मला कुठल्याच जीवाला मारायला आवडत नाही पण तिला हाकलणे गरजेचे होते..मी शुक शुक झाडू आपटत तिला पळवायचा प्रयत्न करत होतो..शेवटी न राहून एक दणका दिला आणि ती पाल डायरेक्ट दुसर्या माळावरून खाली पडली ..

"मुझे माफ कर दो सीमा" असं मी तिला म्हणणारच होतो..तेव्हा माझ्या लक्षात आलं...मी स्लाईडचा दरवाजा बंद केल्यामुळे आता बाल्कनीत अडकलो होतो...

मग बायकोला फोन लावला .नशीब बायकोने माहेरी जाण्याच्याआधी माझा वेंधळटपणा ध्यान्यात घेऊन एक चावी बाहेर शू रॅकमध्ये लपवून ठेवली होती..

समोरच्या बाईला फोन करून बायकोने सगळा प्रकार सांगितला.. ती घरात आली तेव्हा मी बाल्कनीत उघडाबंब होतो... हाय रे माझ्या कर्मा.. ती आत आली तेव्हा मला कसंतरीच वाटलं... एकूण ह्या पाल प्रकरणाने माझी चांगलीच फजिती झाली.. आज मी त्या "सीमा" ची शपथ घेऊन मी भीष्मप्रतिज्ञा केली ..तत्व गेलं चुलीत.. जिथे पाली दिसतील तिथे आता हयगय नाही...डायरेक्ट त्यांना वरचा रस्ता दाखवायचा...

अजय जी, कृपया हलके घ्या, तुम्हाला कसंतरीच झाले, पण त्याआधी बाल्कनीतला व्ह्यु किती जणांनी पाहीला असेल त्याचा विचार करा.

कृ ह घ्या कंटिन्यू बर्र का Light 1
बाल्कनीतला व्ह्यु किती जणांनी पाहीला असेल त्याचा विचार करा.>>
पाफा त्याहीपलीकडे जाऊन विचार केला तर एक मुद्दा लक्षात आला की ... ह्याच कारणामुळे तर त्या पालीने बाल्कनीतुन उड़ी नसेल मारली !!

पाफा नाही हो...आमचा फ्लॅट एका कोपर्यात आहे.. बेडरूमच्या बाल्कनीसमोर एक ब्लिडींग बरीच लांब आहे.. त्यामूळे तिथून कुणी टक लावून बघितलं तरच दिसेल..
त्यातही कपडे, टाॅवेल वाळत घातलेले.. त्यामुळे स्पष्ट दिसण्याचे चान्सेस कमी आहेत.. उगाच का उघडा गेलो होतो मी..

@ अजय
बाल्कनीत पाल होती आणि तुम्ही स्लायडींग बंद करत स्वत:ला बाल्कनीतच कोंडून घेतले? पालीसोबत? ती अंगावर आली असता स्वत:साठी पळायला मार्गच ठेवला नाही...?
एवढा शूर कोणी असते का? अविश्वसनीय आहे

अवांतर - आपल्या उघडेपणाचे असले आंबटशौकीन किस्से मायबोलीवर हल्ली फार येऊ लागलेत असे कोणाला वटत नाही का Proud

Rofl
ऋन्म्या लेका, घरात बसून रिकामटेकडे पणा करताहेत सगळे. एनर्जी अशी बाहेर पडते आहे. एकदा का लॉकडाऊन संपले अन रूटीन लागले की इथे फक्त वाचन मात्र. एन्जाॅय.

आयला..लोकांना जोक पण कळत नाही...
Anu तुम्ही बाजिगर पाहीला नाही वाटतं? बाकी पालीचे बारसं आमच्याकडे तरी करत नाही...

ऋन्मेष - करून घेणं आणि हातून घडणं ह्यात फरक असतो...
आणि प्रसंग बाका आला की, सगळे शूर होतात आपोआप..

तुमच्या अवांतरला मी तरी उत्तर देणार नाही...बाकी शाहरूख दर्दे डीस्को म्हणतं उघडा झाला की, कुल होतो..आणि आम्ही मजबूरीने उघडे झालो की, आंबटशौकीन काय?

कुछ तो बात है तुममें गालिब..इतनी हिपोक्रीसी लाते कहासे हो?

अजय चव्हाण... त्या आंबटशौकीनला सध्या गाजत असलेल्या धाग्याचा संदर्भ आहे... तो जोक होता.. पण तुम्ही शाहरूखल ईथे आणून मला शाब्दिक राडा करायला भाग पाडू नका Proud मग मी कोणाच्या झुरलं पालीला ऐकणार नाय .. Proud

काल रामायणात, त्या हनुमानाला त्याच्या शक्ती ची आठवण करून द्यायचा सीन होता. इथे ऋ भाऊंच्या शक्तींची आठवण कोणालाच येत नाहीये. भाऊ तुमचे ते सवयींचे धागे वर काढून उपकृत कराल का? Wink

बाजीगर पाहिलाय हो आवडीने.पण तुम्ही पालीच्या पायाचा किस घेऊन नंतर तिला न ढकलल्याने जरा संदर्भ जुळवायला वेळ लागला ☺️☺️☺️

@Jui.k,
झुरळे कमी करण्यासाठी स्वच्छता हाच सर्वात चांगला उपाय आहे.
ऑन सिरीयस नोट, मिळालेल्या/ मिळ्णार्या वाढीव सुट्टीचा उद्योग करून झुरळे हॉटस्पॉट साफ करून घ्या. ही मुळापासून ची स्वच्छता जास्त कामाला येते. WFH करत असाल तरी थोडा वेळ नक्की काढा.

Pages