माह्या भैताड नवर्‍याची दुसरी बायको-२

Submitted by रश्मी. on 31 October, 2017 - 07:31

माझ्या नवर्‍याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि तरीही हे लोक्स गुरु राधिकाला शेवटी एकत्र आणणार असतील तर घालीन लोटांगण वंदीन चरण ह्या मानबा टीमला.

तो दाढी केड्या, दाढी वाल्या गुरुला सांगतो की सौमित्रचा अ‍ॅक्सिडेंट कर. कारण हे येडं त्या केड्यासमोर नेहेमीप्रमाणे रडगाणे गातो ना.

एका दाढीवाल्याने दुसर्‍या दाढीवाल्याला तिसर्‍या दाढीवाल्याचा अ‍ॅक्सिडेंट करण्यास सुचवले आहे. दाढीवाले ( १. गुरोबा, २. केड्या, ३. सौमित्र ) >>> Uhoh फारच चीप झालं हे Angry

आणि तरीही हे लोक्स गुरु राधिकाला शेवटी एकत्र आणणार असतील तर घालीन लोटांगण वंदीन चरण ह्या मानबा टीमला. >>> असच होणार आहे अंजु. लोटांगणाची तयारी कर Sad

मला कालचा भाग अजिबात आवडला नाही. राधिकाने सौमित्र ला थोबाडित मारली ते तर अजिबातच आवडलं नाही. जर आपण साफ आहोत हे माहित आहे तर जग काय बोलेल आणि तो मुर्ख आणि नाकर्ता नवरा काय आरोप करेल याचा विचार हिने करायची काय गरज आहे? Uhoh म्हणे माझ्या नवर्‍याचा हा असला आरोप मी कधीही सहन करू शकत नाही. अजूनही माझा नवरा? Uhoh आणि क्वालिटी कन्टेन्ट काहिही नाही. की सौमित्र तु आम्हाला एकत्र आणायचा प्रयत्न करण्यात असे मुर्ख धन्दे करू नको, किंवा मला आता फक्त करियर करायचं आहे. इ.
राधिकाला नक्की करायचं काय आहे तेच नाही कळत Uhoh
नवरा हवाय की नकोय? हवा असेल तर सौम्या ला थोबाडीत का मारली? त्याचा हेतू तर चांगला होता ना? आणि नको असेल तर पर्वा कशाची करते मग? त्या केस मध्ये पण सौमित्रला थोबाडीत का मारली? डिव्होर्स देऊन आनंदात का नाही रहात? Uhoh
वाट्टेल ते म्हणजे वाट्टेल ते. जी मिटिंग मुम्बईत करता येऊ शकत होती, तीच मिटिंग इथे येऊन? तसा पण केकचा सत्यानाश झाला. अरे आणि तो केक कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याच्या आनंदाप्रित्यर्थ होता ना? मग लग्नाचा वादि कुठुन आला अचानक? Uhoh

काय? राधिकाने सौमित्रच्या थोबाडीत मारली?
वा वा. कोणत्याही कारणाने मारलेली असो, उत्तम झालं.
आधी रिसेप्शनिस्टशी लगट करून झाल्यावर , तो राधिकाला
म्हणे , माझी रूम शेजारीच आहे. हळद तिखट मीठ साखर काही लागलं तर ये.

माझी रूम शेजारीच आहे. हळद तिखट मीठ साखर काही लागलं तर ये. >> संवाद फालतू आहेत खरे, पण अद्वैत या सिरियल मध्ये बरं काम करायचा प्रामाणिक प्रयत्न करतो आहे. रेवती, गुप्ते, समिधा... ही २-३ च नावं आहेत घेण्याजोगी. फॉर दॅट मॅटर... शनाया पण बर्‍याचदा प्रामाणिक अभिनय करते, आता लेखकूने तिचे पात्रंच बिनडोक लिहिलेय त्यामुळे तिचा अभिनय लक्षातच येत नाही.

कालची शनायाची acting & dialogues मला आवडले. अगदि पोटतिडकिने बोललि हो >>> अस काय बोलली ती? आणि त्या सौमित्रला राधिकाने थोबाडीत का मारली?

भिरभिरतो पिडपिड्तो रमाचा काउ अन म्हणतो प्रेक्श़काना आज काय मी दाउ ???? >>>:हहगलो:

अभिनेत्याची अभिनयक्षमता किंवख या मालिकेतला अभिनय आणि रंगवलेल्या पात्रांचे बरेवाईट गुण यांत गल्लत होतेय का?
अभिनय चांगला केला म्हणजे ते पात्र चांगलं ठरत नाही ना?

या मालिकेचं दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद सगळं शाळकरी लेव्हलचं आहे. तेही पोरांनी स्वतःच बसवल्यासारखं.

आणि त्या सौमित्रला राधिकाने थोबाडीत का मारली? >> सौमित्र ने राधिकाच्या नकळत प्लान केलेला असतो ( बनाव) असा की तो आणि राधिका (दोघेच) शिर्डिला जातायत आणि नाशिक ला एकाच रूम मध्ये राहणार आहेत. (हे सगळं गुरू ला जेलसी व्हावी यासाठी) खरंतर अख्खं राधिका मसाले सोबत आहे. पण गुरूला जेलसी वाटावी आणि तो मागे यावा यासाठी तो आनन्द आणि पानवलकर यांना लपून छपून वावरायला सांगतो, आणि श्रेयस आणी जेनी नंतर येणार असतात. मग गुरू नेहमीप्रमाणे आपली बायको हे फिलिंग उफाळून आल्यावर तिच्या मागे मागे तिथे पोहोचतो आणि हॉटेलात मिटिंग (राधिका मसालेची) च्या वेळी पोहोचतो शहानिशा करायला तेव्हा अद्वैत सांगतो की त्याने मुद्दाम हे त्या दोघाना (गुरु-राधाला) एकत्र आणण्यासाठी हे नाटक केलं. तेव्हा राधिका त्याला म्हणजे माझ्यावरचे अनेक आरोप मी पचवू शकते पण माझ्या नवर्‍याने केलेला (कॅरेक्टरलेस असण्याचा) आरोप मी सहन करू शकत नाही. आणि मग अद्वैत साहेबांच्या श्रीमुखात भडकवते.

आणि ...
गुरूला जेलसी व्हावी यासाठी जेव्हा अद्वैत हे सगळं प्लॅनिंग करत असतो तेव्हा तो राधिकाच्या घरातून हॉटेलला फोन करून मोठ्या मोठ्या आवाजात सांगतो की हो मिस्टर आणि मिसेस सौमित्र नावाने रूम बुका. ते गुरू ऐकतो, पण राधिका नाही ऐकत. कस्काय बुवा? आता तुम्ही म्हणाल राधिका नसेल घरी... मग त्या केस मध्ये हा अद्वैत का आला होता घरी राधाच्या? गुरूला ऐकवायला हे सगळं?

नेहमि प्रमाणे राधाक्का नामानिराळ्या... काहिच म्हैत नै बाईंना... हात वर...

पण जिचं तोंड बघवत नाही, ती ब्याद आयतीच कोणाच्या गळ्यात पडून आपला गळा सुटत असेल तर आनंद व्हायला हवा गुरुरायाला?
जेलस का?
हं आता शनायाला पळवत असता तर त्याला इनसेक्युअर वाटायला हवं.
आणि हा कोणत्या तोंडानी बायकोला चारित्र्यहीन म्हणतो?
स्वतः शनायासोबत एका खोलीत राहात आलाय. हॉटेलातही एकच रूम घेतलीय ना?
ऑं?

अरे बालक बालिकांनो. ते अक्का च्या तोंडचं एक वाक्य मिस्स केलंत बघा. सौमित्र हे काय प्रूव्ह करायला तू माझा गैर वापर करून घेतलास. त्या बद्दल ती थोबाडित होती. ती फुल मैत्री आहे ह्या समजात किंवा गैरसमजात त्याच्या बरोबर गेली इतका इनोसंट प्णा ह्या वयात फार बायका दाखवत नाहीत. पण असे होउ शकते. चारित्र्याच्या संशया बरोबरच आपण ज्यावर मित्र म्हणून विश्वास टाकला तो ही आपला वापर करून घेउ शकेल. हे तिच्या साठी लर्निंग होते.
खरे तर स्वतःच्या कानफटात मारून घ्यायला हवे. पण ही हिरॉइन ना. ब्लेमिन्ग अदर्स फॉर युअर फुलिश नेस. हे सर्व लोक लफडे पीडितांना खरे तर इग्नोअर करून स्वतःचे जीवन कधी जगायला लागतील दॅट इज द बेस्ट रिव्हेंज अर्थात इतकी मॅचुरीटी कधीच दिसली नाही शिरेलीत.

राधिका एवढ्या मोठ्या उदयोग समुहाची मालकीण बनलि आहे (??????) तर निदान आता तरी त्या शनया च्या तोन्डि ते good for nothing बोलणे लेखकाने avoid करायला पाहिजे.

अभिनेत्याची अभिनयक्षमता किंवख या मालिकेतला अभिनय आणि रंगवलेल्या पात्रांचे बरेवाईट गुण यांत गल्लत होतेय का?> आजिबात नाही.

अभिनय चांगला केला म्हणजे ते पात्र चांगलं ठरत नाही ना?>>>>>>>>> कोणीही त्या पात्राला चांगलं म्हणत नाहीये. फक्त आणि फक्त वठवलेल्या अभिनयाबद्दल लिहिलंय. (चांगलं तर मला राधाक्काचं पात्रही वाटत नाही. :हाहा:)

लफडे पिडीत.. Biggrin
काल सौमित्र ने अगदी चारचारदा माफी मागितली राधाक्काची ! मला तरी त्याच्या एकदम थोबाडीत ठेऊन देण्या इतका काही त्याचा अपराध वाटला नाही! म्हणजे गुरु काय वाट्टेल ते बोलतोय..तरी त्याला काहीच नाही..फक्त शन्या ला भैताड वगैरे म्हणते..त्याला काहीच नाही! :रागः:
आणि वर म्हणे की प्रेम एकदाच होतं वगैरे...हो ना! सौमित्र कुठे म्हणतोय की माझ्या खरोखरीच प्रेमात पड म्हणून!
त्याचा हेतू चांगला होता... चुकीचा होता तरी! सगळी टीम राम (राधिका मसाले) जीव तोडून सांगत्येय की पॅच अप शक्य नाही तरी हा आपलीच टिमकी वाजवतोय.
आणि अजूनही त्याचे खरे स्वरुप कुणाला माहिती नाही?
काहीही.....दिशा हीन संवाद आणि भरकटवणारी वाक्ये!
केड्याला सुसंगत आणि सलग प्रसंग लिहीता येत नाहीत!

अवो म्हणुन तर ती बालिश, स्वार्थी शन्या जेवढी भैताड वाटत नाही तेवढी ही राधक्का वाटते.

म्हणजे गुरु काय वाट्टेल ते बोलतोय..तरी त्याला काहीच नाही..फक्त शन्या ला भैताड वगैरे म्हणते..त्याला काहीच नाही! :रागः:>>> शन्याचा हात मुरगळत असते ना. पण गुरुला तिने एकदाही मारले नाही. मला तर वाटले आधि गुरुच्या मग सौमित्रच्या कानाखाली द्यायला हवी होती.

Pages