माह्या भैताड नवर्‍याची दुसरी बायको-२

Submitted by रश्मी. on 31 October, 2017 - 07:31

माझ्या नवर्‍याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

राधिका फार कमी वेळा चांगली दिसली, गुढीपाडवा, रेवती लग्न, मुंज अशावेळी. बाकी तिला नीट प्रोजेक्ट केलं नाही, काही कॅरी करता येत नाही. आधी ती भयानक वेणी, दात काढून हसणं. हल्ली चा असा मेकओवर.

शिर्डिचा एपिसोड भयाण फिअ‍ॅस्को होता , आक्खि सिरियलच धन्यवाद आहे म्हणा पण तरी कालचा एपिसोड लास्ट मिनिट प्लॅनिन्ग दिसत होत, काहिही चालल होत, आधी म्हणजे जेनि आणी श्रेयस येणार नाही कारण खुप काम आहे मग सगळ्याना नाशिकलाच काय बोलावुन घेतल, सौमित्र बरा वाटत होता तोवर त्याच्या पात्राला त्याच येडपट लेव्हल ला नेल लेखक महाशयानी, राधिका आणी गुरु मधे इतक काही झालय हे स्पश्ट दिसत असताना पुन्हा पुन्हा सन्सार जोडण्याचे महान कार्य करायची कुणाला तरी हुक्की येतेच...

आणि संताप जनक म्हणजे.....गुरवाला पुन्हा राधिका बद्दल काही वाटू लागलंय हे दाखविणं...!!
त्यांचा पॅच अप पाहाणं माझ्याने तरी सहन होणार नाही! Angry
समहाऊ...गुरव आणि राधिका एकत्र...अगदी साई बाबांच्या समाधी पर्यंतही एकत्र....दाखविण्याची काय गरज होती ? आणि ती लाजत काय होती ..आणि हसत काय होती... !!
शनायाला आता ही सुद्धा बच्चा म्हणून पोटात घेईल अशी मला भिती वाटू लागलीये!!

मला वाटते शेतात मस्त मिरच्या लावाल्या १०-१२ एकर. एक दोन कांडप मशीन घ्यावे लगेच त्या टॉवर मध्ये प्रशस्त कार्यालय होईल आणि अमेरिकन कंपनीची ऑर्डर मिळायला हरकत नसावी!

अमेरिकन लोक कुठे इतकं स्पाईसी खातात? काहीही! भारतीय मसाल्यांना काय मागणी असणार अमेरिकेत? (म्हणजे आपले लोक जे खातात ते सोडून)
उगीच आपलं प्रत्येक गोष्टीला 'अमेरिकन' टच कशाला?

वेगळी रूम बुक आहे>> अहो हे सर्व नखरे असतातच. पण मग डिवोर्स घेउन काय ती लफडी करावीत ना. बाहेर काम करणार्‍या, व्य्वसाय चालवणार्ञाआ ब बायका अशीच कामे मिळवतात असा चुकीचा संदेश जातो. ती काही इतकी पण लहान नाही बच्चा इतकी. नवर्‍याने इतके रिजेक्ट केल्यावर हिला कळत नसेल का सौ मि किती लघळ पणा करतो आहे. त्या रिसेप्शनिस्ट बरोबर तर चक्क इनॅप्रोप्रिएट वागला असेच मग टीव्ही बघून इतर लोके करतात कूल वाटावे म्हणूण. डिस्ग स्टिंग गुरू व राधिका दोघांनाही लफडे धड करता येत नाही. कायम बरोवर छप्पन लोक घेउन मग लाजत मुरकत फिरतात. फालतू निव्वळ. व ते बाबा पण कसे तिथे आले? तो माणू स जो आगे बाबा राह दिखाएगा म्हणणा रा तो तर मेंटल दिसत होता. असे खूप लोक फिरत असतील शिर्डीत

वर्‍याने इतके रिजेक्ट केल्यावर हिला कळत नसेल का सौ मि किती लघळ पणा करतो आहे.>> अहो तिला नवरा रीजेक्ट करतो आहे हेच कळत नव्हतं किती काळ आधी.

गुरू व राधिका दोघांनाही लफडे धड करता येत नाही >>>> Lol

मी एक सिन बघितला त्यात तो गुरु, हॉटेल मधे बुकिंग करत असताना, शनाया कशी वागते, अल्लड , पोरकट एकवेळ ठिक पण मलातरी मंदबुद्धी वाटली, ती एक्साईट होवुन बालीश चाळे करते तेव्हा तो गुरु बोलतो हॉटेलवाल्यांना बोलतो पण की लहान मुल नाहिये म्हणुन.

सौ मित्र मुद्दाम स्वतःची रूम Mr. & Mrs. सौ मित्र म्हनुन बूक करतो >>>> तो हे (स्वतःची रूम Mr. & Mrs. सौ मित्र म्हनुन बूक करणे, रिशेपनिस्टला रुमवर बोलावणे, राधिकाशी लघळपणा करणे) गुरुला जळवण्यासाठी करत असेल. म्हणजे गुरु आ़णि राधिका एकत्र येतील. कशाला हि नसती समाजसेवा करायची म्हणते त्या बनहट्टीने?

आणि बाकी सगळे जवळ असताना टच पण करत नव्हते का तर राधा हिरोइन.. तो सौ पण नुसता बघत होता >>> आणि तो गुरु तर नुसता टाळया वाजवत बघत होता, जरा सुद्दा तिला मदत करायला पुढे आला नाही.

Submitted by अन्जू on 17 April, 2018 - 02:27
आणि संताप जनक म्हणजे.....गुरवाला पुन्हा राधिका बद्दल काही वाटू लागलंय हे दाखविणं...!! >>>> कारण आता तिचा मेकओवर झालाय ना. त्याआधी ती त्याला गावन्ढळ वाटायची.

काल त्या राधाक्काच्या मारामारीत सगळे केवळ बघ्याच्या भुमिकेत तिथले गार्ड, त्या पोराचा बाप त्याची आई, सौ मित्र, राधाक्काचा एफिशियंट स्टाफ, बाकी भाविक, कुणीही मधे पडत नव्हते एकटी राधिका बदडत होती! काहीही...

अरे , राधिका त्या चाकुवाल्याशी एकटीने भिडलेली ते विसरलात का ?
ती आहेच पहिल्यापासून रणरागिणी . तुम्ही लोक उगाचच ठेवता ना बाप्पा .

साईबाबन्च्या दरबारात हे पवित्र कार्य तिच्याच हस्ते लिहिले होते हे कळत कसं नै तुम्हा लोकांना?
उगिच त्रास देता तुम्ही राधाक्काला.
देव तुम्हाला पुढच्या जन्मी कावळा करणार नक्की

देव तुम्हाला पुढच्या जन्मी कावळा करणार नक्की>>>>>> नssssssssssहीsssssss (कानावर हात ठेवलेली बाहुली )Facepalm नको, नकोच, जर आम्ही कावळा बनलो ना तर ती रमा आम्हाला भिरभीरतो, पिरपिरतो करुन पकवेल.Inside a Washing machine

अजुन कच्चा माल मशिनरी , कारखाना कशा कशाचा पत्ता नाही नुसते ओर्डेरी घेत फिरत्यात .
नुसते मेल मेल आणि प्रेजेण्तेशन खेळून राहिले .
आधी ती राधिका म्हणते अमेरिकन कंपनी कडून अडवान्स खात्यात जमा झाला म्हणून तसा एस एम एस तिला येतो आणि तीच राधिका नानाच्या घरी म्हणते की अमेरिकन कंपनी कडून चेक जमा झालाय ....
त्या गर्दुल्ल्या लेखकाला कंटीन्यूटी नावाची काही चीज असते हे माहीत नसावे आपण आधी काय दाखवलय अन पुढे काय दाखवतोय .. ....

अजुन कच्चा माल मशिनरी , कारखाना कशा कशाचा पत्ता नाही नुसते ओर्डेरी घेत फिरत्यात .>>> अहो ते सगळे चालू आहे चाळीतल्या बायकांच्या घरी. अधून मधून तिकडे बघून यायला राधाक्काने नानींना नेमले आहे.

काल दुपारी काही भाग पाहिला. नेमकं अमांनी लिहिलंय तो हॉटेल रिसेप्शनवरचा सीन चालू होता.
रिसेप्शनिस्ट्सला तीन तीन वेळा सिंगल (आहेस का) असं विचारणं, कीज म्हणून किस मागणं, आमच्या रूमवर ये, मजा करू असं म्हणणं हे सगळं "कामच्या जागी लैंगिक शोषण" यात मोडेल. इथे लिहिणार्‍या अनेक माबोकरांपैकी, रादर माबोकरणींपैकी अमा सोडून कोणालाही ते खटकलं नाही, बाकी अनेक गोष्टींबद्दल ढीगभर लिहिलं गेलंय, याचं मला अजिबात नवल वाटलं नाही.

मी ती मुलगी असते ना तर दुसृया मिनिटाला मॅनेजराला बोलवून कंप्लेंट नोंदवली असती. माझ्या मुलीशी कोणी असे वागले तर तिथेच कानफटाव ला. असता. आणि हा म्हणे युएस रिटर्न मॅनर्स तर अगदी भैताड आहेत. अश्यानेच वागने
गमती गमतीत अ‍ॅक्सेप्ट केले जाते. राधिकाला पण पर्सनल स्पेस ची आजिबात कन्सेप्ट माहीत नाही. सगळी कडे स्वतःचा ऑडियन्स घेउन जाते. मित्राबरोबर फिरायचे तर एकट्याने जा की. आणि मग नाही का अथर्वची काळजी वाटत्. किती करिअरीस्ट बिझनेसवुमेन वागैरे बायका मुलांच्या काळजीने अर्ध्या होतात दूर राहावे लागले की. दूध प्यायलेका. झोपलास का फोन करून विचारत राहतात. आज पुढचा भाग दिसला नाही बंद पडले का?!

इथे लिहिणार्‍या अनेक माबोकरांपैकी, रादर माबोकरणींपैकी अमा सोडून कोणालाही ते खटकलं नाही, >>>सौमित्र बरा वाटत होता तोवर त्याच्या पात्राला त्याच येडपट लेव्हल ला नेल लेखक महाशयानी >> मी कदाचित सुस्पष्ट लिहल नाहिये पण अमा नी लिहलय त्याला +१ , खुप खटकल पण एकदरितच लेखक महाशयाची विचार प्रेकिर्या यातुन रिफ्लेक्ट होतेय... प्रोब्लेम हा आहे की मिळणारा प्रेक्षकवर्ग आणी टिआर्पी ची गणीत त्यामूळे अति भगार मालिका नको ते पसरवत राहतात.

रिसेप्शनिस्ट्सला तीन तीन वेळा सिंगल (आहेस का) असं विचारणं, कीज म्हणून किस मागणं, आमच्या रूमवर ये, मजा करू असं म्हणणं हे सगळं "कामच्या जागी लैंगिक शोषण" यात मोडेल. >>> मी पण काल पाहिला हा भाग. त्याच्या एक कानाखाली लावायला हवी होती Angry

इथे लिहिणार्‍या अनेक माबोकरांपैकी, रादर माबोकरणींपैकी अमा सोडून कोणालाही ते खटकलं नाही, बाकी अनेक गोष्टींबद्दल ढीगभर लिहिलं गेलंय, याचं मला अजिबात नवल वाटलं नाही.>>>>> तो भाग आणी व कालचा भाग पाहीलाच नाही तर त्यावर कसे बोलणार? पण तुम्ही आणी अमांनी जाणिव करुन दिली त्याबद्दल धन्यवाद. पण निषेध करुन काहीच होणार नाही, कारण मागे कुठल्यश्या संदर्भात अंजूने झी मराठी च्या फेसबुक पेज वर निषेध नोंदवला तर त्या शहाण्यांनी तिची पोस्टच उडवली असे तिने मायबोलीवर सांगीतले होते. पण आपल्या अशा अ‍ॅक्टिंगने लोकांमध्ये काय संदेश जातोय ह्याच्या कडे हे लोक जाणिव पूर्वक दुर्लक्ष करतायत. नाहीतर आतापर्यंत झालेल्या चुका त्यांनी सुधारल्या असत्या.

पैसा आणी प्रसिद्धी करता हे लोक काहीही करु शकतात. मिळेल ते चटकन पदरात पाडुन घ्यावे असाच त्यांचा उद्देश असावा.

येस.. भरत. मीही नेमका तो भाग मिसला. आत काही करायला गेले असेन. पण तसंही मला सौमित्र चा राधिकाशीही लघळपणा आवडत नाहीच. ती का म्हणून सहन करते? जरी गुरवाला जळवायचं असेल तरी ...आपणही त्याच लेव्हल ला उतरायचं का?

झीच्या वॉलवर नाही लिहायचं..आपल्याच भिंतीवर लिहून त्यांना tag करायचं. पोस्ट्स शेअर करायच्या. इतरांना कॉपी पेस्ट करायला सांगायच्या. Hashta g वापरायचा.

Pages