Submitted by रश्मी. on 31 October, 2017 - 07:31
माझ्या नवर्याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे आडनाव फेमस आहे, ऐकलंय आधी.
हे आडनाव फेमस आहे, ऐकलंय आधी.
राजन बनहट्टी लेखक आहेत ना.
राजन बनहट्टी लेखक आहेत ना.
हे विदर्भातील अतिशय कॉमन
हे विदर्भातील अतिशय कॉमन आडनाव आहे.
ओके. मी आताच ऐकलं.
ओके. मी आताच ऐकलं.
खरंतर मला सिंघम पण आडनाव असतं हे ही सिंघम पिच्चर आला तेव्हा माहित झालं.
पण हे कसं आडनाव? बनहट्टी. मी
पण हे कसं आडनाव? बनहट्टी. मी पहिल्यांदाच ऐकलं. >>> राजेन्द्र बनहट्टी नावाचे एक मराठी लेखक आहेत.
हो हो नताशा राजेंद्र बनहट्टी
हो हो नताशा राजेंद्र बनहट्टी बरोबर.
पण त्याच्या तोंडून मला समहाऊ
पण त्याच्या तोंडून मला समहाऊ 'राधा राधा'.... करणं आवडलं आहे! (राधा हा शब्दच तितका छान आहे!)

राधक्का व त्याची जोडी जरा बरी दिसते..गुरवा पेक्षा खरेतर!
गुरु ला जरा गेट अप चेंज कर म्हणा....सारखं काय आपलं दाढी, जॅकेट, फॉर्मल्स, गॉगल..............
त्या राधिकाने बनहट्टीशी शेवटी
त्या राधिकाने बनहट्टीशी शेवटी लग्न करावं किंवा मुलाबरोबर एकटे राहावं पण गुरुसाठी बिग बिग नो.
त्या राधिकाने बनहट्टीशी शेवटी
त्या राधिकाने बनहट्टीशी शेवटी लग्न करावं किंवा मुलाबरोबर एकटे राहावं पण गुरुसाठी बिग बिग नो.>>>>+१
गुरुने सर्व जगासमोर इतके लाथाडल्यावर राधिकाने स्वाभीमान गमाऊ नये
गुरुने सर्व जगासमोर इतके
गुरुने सर्व जगासमोर इतके लाथाडल्यावर राधिकाने स्वाभीमान गमाऊ नये >> झालं रश्मे, तु तर झी च्या हिरविणिंकडून लैच अपेक्षा करून राहिलिस बै!
अगं नवरा म्हणजे देव, त्याने कितीही लाथाडलं तरी आपण गरिब मान्जरासारखं त्याच्या पायाशी पायाशी घोळायचं.. हेच शिकवतात त्याना डायरेक्टर्स
एक समजत नाही, ३ मित्रांमध्ये
एक समजत नाही, ३ मित्रांमध्ये दोघां ना अहो जाहो एकाला एकेरी...
सध्या ही मालिका आणि ब्रेक अप
सध्या ही मालिका आणि ब्रेक अप एकाच रुळावरुन चालल्या आहेत.
हिरोच्या मित्राने ( प्लॅन करुन) हिरविणीवर लाईन मारायची मग हिरो जळुन परत हिरवीणीला मिळणार.
नको ती जळ्वा जळवि, राधिकाने
नको ती जळ्वा जळवि, राधिकाने गुरुला बिलकुल माफ करु नये.
काल गुरवा ची अगदी दुखरी नस
काल गुरवा ची अगदी दुखरी नस पकडली गेली.... ! शनाया नेहमीच त्याच्या कडून मूव्हीज, शॉपींग , आउटींग ची अपेक्षा करत असते.... तो थकलेला असतो व नॅचरलीच कंटाळलेला असतो. राधिका असती तर , " काऊन..काय झालं...बरं नाही का वाटून राह्यलं तुम्हाला? " असं म्हणत डोकं दाबून दिलं असतं!
तो शन्या वरच चिडलेला....आणि शनाया पण अगदी छान अभिनय करते.... " ओके...ओके... चिल...!! सँडविच खाणार?" असं म्हणाली!
काल गुरवा ची अगदी दुखरी नस
काल गुरवा ची अगदी दुखरी नस पकडली गेली.... ! शनाया नेहमीच त्याच्या कडून मूव्हीज, शॉपींग , आउटींग ची अपेक्षा करत असते.... तो थकलेला असतो व नॅचरलीच कंटाळलेला असतो. राधिका असती तर , " काऊन..काय झालं...बरं नाही का वाटून राह्यलं तुम्हाला? " असं म्हणत डोकं दाबून दिलं असतं! >>> ये तो होना ही था.
म्हणजे गुरवाला बायको नको,
म्हणजे गुरवाला बायको नको, दासी हवी आहे.
नुसतीच दासी नकोय तर फॅन्सी
नुसतीच दासी नकोय तर फॅन्सी दासी हवी आहे.
आज चलो शिर्डी! बहुतेक
आज चलो शिर्डी! बहुतेक निर्मात्या चा नवस बोललेला असावा!
हो, राधाक्काच्या बकुळामावशी
हो, राधाक्काच्या बकुळामावशी पण नवस बोलल्यात. पण त्या कुठे लाईनीत दिसल्या नाहीत. आणी तिथे जाऊनही नवरा बायको एकमेकांवर उखडलेच शेवटी.
वा! वा! वा! काय कृत्रीम कथानक
वा! वा! वा! काय कृत्रीम कथानक, काय राधाक्काचा अभिनय, काय टि आर पी साठी नाटके, वारे वा दिग्दर्शक आणी वा रे वा तो केड्या. काल राधाक्का आणी मंडळी शिर्डीला पोहोचले. मला कधी नव्हे तर गुरु जेन्युईन वाटला आणी राधाक्का नाटकी. शिर्डी ला येतांना त्यांना एक मुस्लिम जोडपे भेटते, राधाक्का त्यांना लिफ्ट देते. तर तिथे त्या जोडप्याचा मुलगा , अली हरवतो. मग सगळ्यांची शोधाशोध!. एक फकीर तिला सांगतो की साईबाबाच त्यांना मार्ग दाखवतील, या दरम्यान त्या रडणार्या अलीला गुरु बघतो आणी चौकशी करणार तेवढ्यात काही गुंड लोक अलीला उचलुन तो आपला मुलगा असल्याचे सांगतात. अली खुशाल त्याच्या बरोबर जातो, अथर्वच्या वयाचा मुलगा काहीच बोलत नाही हे पाहुन काय करावे समजेना. मग जेव्हा राधाक्का फकीराशी बोलत असते तेव्हा तिला तो अली त्या गुंडाकडे दिसतो, मग ती अली करुन ओरडते. काल एक तास याच्यात खतम.
आज राधाक्का त्या गुंडाला काठीने बडवते, सगळे टाळ्या वाजवतात, गुरु वाजवणार असतो ( टाळ्या ) पण शन्या त्याला रोखते. असे दाखवणार आहेत.
मला प्रश्न पडले की एखाद्या बाईचा मुलगा हरवला तर ती अशी एका जागी रडत बसेल की सैरभैर होऊन मुलाच्या शोधासाठी सैरावैरा धावत चार लोकांना विचारेल? अलीचा बाप ही ढिम्म! अरे काय हे! त्यातल्या त्यात आनंद, राधा आणी बाकी मंडळी त्या अलीला शोधत फिरतात, पण आई बाप शांत. त्या राधेला झाशीची राणी / रणरागिणी दाखवण्यासाठी इतके भैताड कथानक?
ही भैताड राधा जर आधीच रणरागिणी सारखी वागली असती तर काय मजाल होती त्या शन्याची यांच्या आयुष्यात यायची?
दक्षिणा यु आर राईट! खूप मुर्खासारखा भाग होता कालचा. काल या राधाने आणी तिकडे त्या रमाने पिसाळले. भिरभीर, पिरपीर नुसती.
अरे हो काम महाएपिसोड होता ना.
अरे हो काम महाएपिसोड होता ना. विसरलेच होते. अर्थात वरची रश्मीची कमेंट वाचुन विसरले तेच बरे झाले असे वाटते
खरेच रश्मी....! हे साई
खरेच रश्मी....! हे साई बाबांचे काय मधेच? आणि बाबा कसे काय आले तिकडे? आणि जर सौमित्र यांचा येव्हढा क्लोज फ्रेंड होता आधि तर मग नंतर त्याचा काहीच काँटॅक्ट ठेवला नाही त्यांनी? निदान तो काय करतो..कुठे असतो याचा तरी?
आणि कालचा भाग तर अती बोअर! ही तरी त्या सौमित्र सोबत किती लाडावते...? गुरवाला नावं ठेवतो आपण..... हे तरी काय आहे मग?
आणि ते मुस्लीम जोडपे वगैरे तर अती भंपक! केड्या ला हटविले पाहीजे स्क्र्रीप्ट राईटींग मधून! :रागः
काल कलर मराठी वर बिगबॉसचे
काल कलर मराठी वर बिगबॉसचे लौन्चिग होते म्हणून तिथला टीआरपी खेचण्यासाठी हे महा एपिसोड केले असावेत.
पण आम्च्या झी भक्त सासुबाई अन
पण आम्च्या झी भक्त सासुबाई अन अम्ही सगळेच बिग बॉस च पाहत होतो. थोडा वेळ पण राधिकाचे चा़ळे सहन करवले नाहीत....
सर्व धर्म समभावाची काय
सर्व धर्म समभावाची काय आवश्यकता होती.
नऊवारी नेसलेली पुर्ण मराठी गेट अप मधली बाई. आप की जोडी सलामत रहे. अस उर्दू मिश्रीत आशिर्वाद का देते!!!????
एडीटींग सॉलिड गंडलेलं , आनंद आणि पानवलकरांचे तेच तेच डॉयलॉग्ज वेगवेगळ्या तर्हेने आणि वेगवेगळ्या ठिकाणी शूट केले होते.
येस..गुगु...!! तेच ते..
येस..गुगु...!! तेच ते...पनवलकर दोनदा म्हणाले...आधी पोटोबा आणि मग विठोबा...का कायससं.....! घाई घाईत एपिसोड बनविलेला दिसत होताच.! आणि कुणीही बाई आधी खातर जमा केल्या खेरीज असा आशीर्वाद नॉर्मली देत नाही. "तुम्हारी जोडी सलामत रहे" म्हणे! :रागः !
मे बी तो तिचा भाऊ असू शकतो..किंवा कुणीही जस्ट एखादा सहप्रवासी! काहीही काय! मला तर आत्ता पर्यंत कुणीच असा रँडमली आशीर्वाद दिलेला नाहीए!!
अरे पण सगळे शिर्डीला का गेले,
अरे पण सगळे शिर्डीला का गेले, राधिका, अथर्व आणि कोणी नवस केला तिने जायचं.
काय आहे शिर्डीला साई समाधी
काय आहे शिर्डीला साई समाधी शताब्दी वर्ष आहे... त्या निमित्त सगळे गेले फिरायला शिर्डीला चला जरा फिरुन येऊया... आणि मुंबई ते शिर्डी कार ने पाठलाग करीत! काहीच्या काही!
भैताडपणाचा कळस! मध्ये चहापाण्याला पण थांबले नाही! ते एक लिफ्ट द्यायला तेवढे थांबले...
का सहन करतोय आपण हे सगळं?
जाऊदे trp आहे एक नं तर काहीही
जाऊदे trp आहे एक नं तर काहीही दाखवणार. लोकं नावं ठेवण्यासाठी तरी आठ ला बघत असतील तर मालिका अजून दोन वर्ष पण चालेल only trp matters.
Pages