माह्या भैताड नवर्‍याची दुसरी बायको-२

Submitted by रश्मी. on 31 October, 2017 - 07:31

माझ्या नवर्‍याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तो सम्या, गुरु ऐकतोय असे पाहील्यावर फोनवर खोटे खोटे सांगतो की आम्ही नासिकला येतोय. दोन जणांसाठी रुम बुक करा. आम्हाला वाईनरी पण बघायचीय. मग गुरु पिसाळतो. म्हणून तो शन्याला घेऊन सम्या आणी राधा दोघांचा पाठलाग करतो कारने. पण त्यांची गाडी शिर्डीला जात असल्याचे पाहील्यावर तो पण जातो त्यांच्या मागे.

मग त्याला कोणाकडे ठेवले ?रेवती की नानी ?>>
कित्ती आपण काळजी करतो सगळ्या पात्रांची!! राधाक्काला ही नव्हती एवढी काळजी खुशाल निघाली तो सौ चल म्हणाला की! आणि नागपुराहून बाबा पण प्रकटले बाबांच्या दर्शनाला तरे तिथ त्यांचाच बाब्या भेटला त्याच्या बच्च्या सोबत! Proud

कालचा एपिसोड शिर्डीच्या मंदिराने स्पॉन्सर केलाय की काय असे वाटत होते ...... सतत आपलं तेच तेच उगाळणं मंदिराची महती ....जणू काही कोणी शिर्डीला नाही गेलं तर त्याचं जगणं व्यर्थ आहे असाच आविर्भाव.ते हल्ली नाहीका बऱ्याच चॅनेल वर एखाद्या प्रॉडक्ट ची अर्धा अर्धा तास मार्केटिंग/डेमो करत बसतात तसेच काहीसे.

दुसरं हे सगळे सकाळी सकाळी मुंबईहून निघतांना दाखवले आहेत थोडे अंतर पुढे गेल्यानंतर हे मुस्लिम जोडपे लिफ्ट मागते संध्याकाळपर्यंत एकही बस नाही असे ती बाई म्हणते आणि ही भैताड तिला लिफ्ट देते.
ते मुसलमान जोडपं कथानकात प्लांट करतांना त्या दाढीवाल्या भिकारड्या लेखकाला थोडा तरी होमवर्क करावासा वाटू नये ?
एक फोन जरी केला असता दादर बस स्थानकात तरी ही गोष्ट कन्फर्म झाली असती की मुंबई/दादर हून शिर्डी करता दर अर्ध्या तासाने बस सुटतात.तरी बरं प्रेक्षक महाराष्ट्रीयन आहेत बंगाली किंवा आसामी नाहीत वाटेल ते ठोकून द्यायला.कारण बरेच जण कधी न कधी जाऊन आले असतील शिर्डीला.

त्या राधेला झाशीची राणी / रणरागिणी दाखवण्यासाठी इतके भैताड कथानक?
ही भैताड राधा जर आधीच रणरागिणी सारखी वागली असती तर काय मजाल होती त्या शन्याची यांच्या आयुष्यात यायची? >>> हो ना. मागे ती कामासाठी कुठल्याशा hotel मध्ये एका लोचट businessman ला भेटते तेव्हा वागायच होत की रणरागिणीसारख. तेव्हा मात्र गुरुच्या पाठीमागे घाबरुन उभी राहिली.

नऊवारी नेसलेली पुर्ण मराठी गेट अप मधली बाई. आप की जोडी सलामत रहे. अस उर्दू मिश्रीत आशिर्वाद का देते!!!???? >>> हा आशीर्वाद जर सौमित्र आणि राधिकासाठी असेल तर मग ठीकै. पण गुरु आणि राधिकाची जोडी सलामत? बिग नो! Angry

फलटूगिरीचा कळस झालाय.. मी आठवड्यातून एकदा बघायचो आता ते पण बंद..
कुणी तरी विपु करा चणा पूर्ण बरबाद झाली आणि दाढी आणि चपटी चे लग्न झालं, मोस्टार सोडून गेला की तिला.तोपर्यंत आपला पास या धाग्याला पण आणि सिरीयल ला पण..
तुम्ही लोक पण बघणे बँड करा.. trp खाली घसरू दे..

अथर्व चा उल्लेख आला ना कालच्या एपिसोडात Uhoh तो नागपुरात आहे आजी अजोबा जवळ.
कधी गेला कोण जाणे, कोण सोडून आलं की उडत गेला ते. Uhoh

शनाया नुसती नावे ठेवते, गुरूच्या बाबाना हिटलर, गुरूच्या मुलाला मॉन्स्टर.. मग गुरू कोण?

बकुळाची इच्छा असते की राधिकाच काम सुरु झाल की शिर्डिला जायच म्हणून! बाकी एपिसोड बघितला नाही पण अन्दाज होताच

तुम्हाला लक्षात येतंय का?? त्या तुम्हारी जोडी सलामत वाल्या नऊवारी आजी ने काय उगाच आशिर्वाद दिलेला आहे???
बच्चा चा गेम गुरू ला कळला की त्याला राधा ची महती पटणार आणि मग तो तिची माफी मागणार
आणि राधा त्याला माफ करणार आणि ते एकत्र येऊन मग सुखात राहणार

कसला भंपक एपि होता. राधेमाची महती पटवून देण्यासाठी काय वाट्टेल ते दाखवत होते. सम्याला ती राधेमा एवढी अंडरएस्टीमेट (मराठीत काय म्हणतात) का करते. कुठून काम मिळालंय, पैसे कुठून येतात, काहीच बेसिक तपास नाही आणि ही म्हणे उद्योजिका. गरजवंताला मदत करावी असे राधा म्हणते तर सम्या म्हणतो,वा राधा, तुझा फारच अभ्यास दिसतोय, ह्यात कसला आलाय अभ्यास. काठीने मारायचा सीन तर कहरच, त्याच काठीने गुरवाला ठेऊन द्यायच्या ना दोन तीन. शनायाच्या बाललीलांमुळेच सुसह्य झाला थोडातरी.

किती तो फालतू पणा? तो सौमी जरा क्रीपी वागतो आहे. ही एव्ढी धगुर्डी बाई तिला परपुरु षा बरोबर कार मधून हॉटेल वर ओव्हर नाइट राहायचे ह्यातला अर्थ कळत नाही का? किती इनोसंट ते. आणि तो जे रिसेप्शनिस्ट बरोबर बोलतो ते एकदम थोबाडित ठेवुन देण्याच्या लायकीचे आहे. सो क्रीपी. सिंगल आहे का किज दे, तू पण ये मजा करायला?! कॉर्पोरेट मध्ये असे वागले तर नोकरी जाउ शकते.

किती तो फालतू पणा? तो सौमी जरा क्रीपी वागतो आहे. ही एव्ढी धगुर्डी बाई तिला परपुरु षा बरोबर कार मधून हॉटेल वर ओव्हर नाइट राहायचे ह्यातला अर्थ कळत नाही का? किती इनोसंट ते. >>>> राधिकासाठी वेगळी रुम बूक आहे, सौ मित्र मुद्दाम स्वतःची रूम Mr. & Mrs. सौ मित्र म्हनुन बूक करतो, staff sathi vegli room.

Sunday आणि कालचा एपि हा विस्कळीत होता. कुठलाही scene एकमेकान्शि link न्हवता.
नऊवारी आजी चा आशिर्वाद नाहि पटला.
राधाक्काची लुटुपुटु ची लढाई तर हास्यास्पद होती.

अरे ते गुरु राधिका परत एकत्र येणार असतील तर too much. राधिकाच्या मोठ्या मोठ्या बाता कुठे जाणार मग. त्या बनहट्टीला पण उद्योग नाही.

आता ती कुठे करते माह्या नवरा माह्या नवरा तर बनहट्टीचा का हट्ट. जास्तीतजास्त खालच्या पातळीला चाललेला गुरु काय नंतर संत महंत होणार आहे, असं दाखवलं तर पटणार आहे का, काहीही.

Happy पण राधिका अतीच करत्येय..सौमित्रबरोबर..... काय मेक अप , काय साड्या..काय ओव्हर अ‍ॅक्टींग..काय सोज्वळतेचा पोकळ आव, काय फालतूगिरी, काय ऑर्डरींवर ऑर्डरी मिळत असल्याचा देखाव, काय सुपर वुमनत्व ...नक्की कसल्या ऑर्डरी या? मसाल्यांच्याच ना?
Angry

आंगो, ते राग ची स्माईली टाकताना आधी :रागः असे लिही, मग नंतरची दोन टिंबे खोडुन परत दोन टिंबे दे. ( : रागः:) Angry

राधाक्कांना लाखात चेक काम करण्यासाठी मिळालाय, तर ऑफिसमधे पार्टी, नाशिकमधे सेमिनार, सर्व शेजार्‍यांना गिफ्ट्स, येतील त्या सर्वांची शिर्डी दर्शन व्यवस्था, तिकडेही दर्शनाआधी नेहासाठी वगैरे शॉपिंग, येताजाता दानधर्म यात उडवताहेत सर्व पैसे ! हरवलेला अली निदान लहान मुल्ल्गा तरी दाखवायचा , तर तोही चांग्ला मोठा घेतलाय! मंदपणाचा कळस!

हो ना..! कार कुणाची होती आणि ? कारण सौमित्र तर सपोझेडली बेकार आहे.... आणि रेंटेड नव्हती...!! मी मुद्दाम नंबर प्लेट पाहिली !!! Happy

कस्ली अडदांड राधिक साडी वर घेउन .. भयानक कुरळे केलेले केस घेउन त्या माणसाना मारत होती.. आणि बाकी सगळे जवळ असताना टच पण करत नव्हते का तर राधा हिरोइन.. तो सौ पण नुसता बघत होता..
डब्बा सिरिअल..
कोणी चॅनेल पत्र लिहु शकत का .. खुप घाण संदेश देते आहे ही मालिका

कस्ली अडदांड राधिक साडी वर घेउन .. भयानक कुरळे केलेले केस घेउन त्या माणसाना मारत होती..<<<<< खुपच विचित्र दिसत होती राधिका त्याला मारताना.

Pages