Submitted by रश्मी. on 31 October, 2017 - 07:31
माझ्या नवर्याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जरा एक ऑर्डर नाही मिळाली
जरा एक ऑर्डर नाही मिळाली तोवर (वशिल्याने) स्वयंसिद्धा मध्ये मुलाखत वगैरे?
दक्षे करेक्ट
दक्षे करेक्ट
तो बनहट्टी का अति करतोय, ह्याला का बसवला तिथे गुरुला. बरं गुरुही सांगत नाही की आम्ही एकत्र नाही, मी मुलाखत देत नाही.
दक्षे म्हणते तो शॉट बघितला.
दक्षे म्हणते तो शॉट बघितला. आधी काही झालं का इंटरेस्टिंग की फालतू वेळ घालवला.
मला प्रश्न असा पडला आहे की
मला प्रश्न असा पडला आहे की राधाक्का यशस्वी उद्योजिका झाली कधी ? >> अगं एक दिवस तिने makeover ची गोळी घेतली, मग तिला संकटकाळी अति धावून येणार्या सौमित्र ची ( एक च १०० मित्रांना पुरून उरेल) लौटरी लागली, त्याने तिला एक पुस्तक भेट दिले, उद्योजिका फौर ठमीज, ते वाचून राधिका त्वरित यशस्वी उद्योजिका झाली, हे सगळं डोळ्याची पाती लवते न लवते इतक्या कमाल वेगात झाले म्हणून कुण्णाकुणणाला कळले नाही
आज गुरू आणि राधाक्कात
आज गुरू आणि राधाक्कात प्रेझेंटेशनची स्पर्धा झाली. राधा जिंकली (तिने तिथेही घरून डबा आणला होता सगळ्यांसाठी) आणि गुरवाने अभिनंदन पण नाही केले.
घरुन डबा नाही...कुणा महेश वडे
घरुन डबा नाही...कुणा महेश वडे वाले चे वडा पाव! सिग्नेचर टेस्ट ऑफ राधिका मसाले म्हणे!! वडा पावात काय एव्हढा मसाला असतो खरं तर?
म्हणजे मिसळ मसाला, छोले मसाला, पाव भाजी मसाला वगैरे ठीके....!!
काहीही!
वड्यासाठी स्पेशल मसाला तयार
वड्यासाठी स्पेशल मसाला तयार केला का यांनी. वडे पारंपारिक आवडतात मला. असले नाही आवडणार. का वड्यातला ठेचा करून विकतात.
एनीवे कसा का होईना गुरु चा अपमान झाला आणि contract गेलं त्याचं ह्याचा मला फार आनंद आहे.
वडा पावात काय एव्हढा मसाला
वडा पावात काय एव्हढा मसाला असतो खरं तर?>>>तिच खासियत असेल राढिका मसालेची. ज्यात मसाले नाही लागत त्याचाही मसाला आहे त्यांच्याकडे
तिने जर पाभा, मिसळ, रस्सा असे मसालेवाले पदार्थ आणले असते तर पंगत बसवावी लागली असती आणि राधाक्का हे वाढू ते वाढू का?, तुम्ही काही खाऊनच नाही राहिले...करत बसली असती. वडापाव पेक्षा दाबेली, व्हेज पफ, समोसे सुचले नाहीत तिला त्यात असतात मसाले.
ओ, आमच्या कल्याणचे वझे (खिडकी
ओ, आमच्या कल्याणचे वझे (खिडकी वडावाले) ब.व. मसाला विकतात बरका!
खरेच असतो का मसाला घातलेला
खरेच असतो का मसाला घातलेला वडापाव? इकडे कधी पाहिला नाही. असेल तर पाकृ सांगा, करून बघेन. मला खूप आवडतो वडापाव
घ्या लिंक
ही घ्या लिंक http://khidkivada.com/khidkivada-masala.html
वक्तृत्व स्पर्धा होती का ती,
वक्तृत्व स्पर्धा होती का ती, मिटींगला आलेले सगळे पोरगेलेसेच होते राधिका आणि गुरू सोडून. शनायाने आज काहीतरी जासूसी केलेली आहे आणि बनहट्टी मोठा माणूस आहे हे गुरूला कळलंय, पण मग काय. राधिका आणि बनीचं (शनायाने दिलेलं नाव) काहीतरी लफडं आहे असा निष्कर्ष काढणार का तो की आणखी काही. पन्हयाचे काय पैसे घेतले राधिकाने, काहीही, ईतरवेळी ओळख नसलेल्या लोकांनाही उगाच खायला घालत असते आणि गुरूनेही पोसलंच की तिला ईतकी वर्ष, तिचा भैताडपणा सहन करून. रस्त्यात येत असताना अपघात झाला कोणालातरी, मग महान राधिकाने मदत केली पण तिचे कपडे तर अजिबात खराब झालेले नव्हते, एखादातरी रक्ताचा डाग वगैरे, ती तर टकाटक होती.
खिडकीवडा अनया. इथेही मागे
खिडकीवडा अनया. इथेही मागे स्टेशनजवळ मिळायचा, हल्ली नाही मिळत. भाऊ कल्याणला कॉलेजला असताना तो आणायचा कधीतरी, फार पुर्वीची गोष्ट.
गुरूनेही पोसलंच की तिला ईतकी
गुरूनेही पोसलंच की तिला ईतकी वर्ष>>>नाही पटले.
ज्या गृहिणी पैसे कमवत नाहीत, संसाराची एक बाजू पूर्ण संभाळतात त्यांना त्यांचा नवरा पोसतो असे म्हणणे किती योग्य आहे?
मलापण पोसलं हा शब्द प्रचंड
सोनाली मम. मलापण पोसलं हा शब्द प्रचंड खटकला. ती तेव्हाही घरगुती मसाले करत होती ना छोट्या प्रमाणात, असं वाटतं.
सोनाली +११११
सोनाली +११११
चंपा, नाही पटले हे.
बायका घर सांभाळतात म्हणून तर
बायका घर सांभाळतात म्हणून तर पुरुष बिनघोर होऊन बाहेर जातात , जॉब करणाऱ्या बायका पण तर घर सांभाळतात च... पण म्हणून हाऊस वाईफ फुकट असतात किंवा नवरे त्यांना पोसतात हे म्हणणं चूक च आहे.
पन्हया कोण?
पन्हया कोण?
राधाका कधी सुधरणार??
सस्मित...पन्हया नाही..पन्हे!!
सस्मित...पन्हया नाही..पन्हे!!:-)
सुटा बुटात टू व्हीलर ने येणे अगदीच काहीतरी दिसेल नै? आणि ऑटो ने पण जमत नाय!!
हो ना....रस्त्यात कुणाला अपघातात मदत केली म्हणून हिचे लेट येणे क्षम्य!
आणि येते कशी ही ? कार पण घेतली का? मागे रेवती सोबत टू व्हीलर घेतलेली... ती कुठे आहे?
टा बुटात टू व्हीलर ने येणे
टा बुटात टू व्हीलर ने येणे अगदीच काहीतरी दिसेल नै?> बाप्रे. नको. नकोच ते. मी इमॅजिनलं
राधिका कुठल्या कामासाठी
राधिका कुठल्या कामासाठी वेळेवर पोचली आहे , आतापर्यन्त ?
ते गुरुच्या ऑफिसमध्ये फ्युजन जेवण घेउन गेली होती तेन्व्हा लेट पहिलं कॉन्ट्रॅक्ट मिळवायला , सर्पोतदार की कोणाकडे , तेन्व्हा लेट .आता लेट.
आणि प्रत्येक वेळेला काहीतरी कारणं .
वक्तृत्व स्पर्धा होती का ती, मिटींगला आलेले सगळे पोरगेलेसेच होते राधिका आणि गुरू सोडून. >>> हो ना.
आम्ही शाळेत असताना , शिक्षक दिनाच्या दिवशी , दहावीची मुलं यायची शिक्षक बनून , ४ तास शिकवायला , त्याची आठवण झाली मला.
पन्हयाचे काय पैसे घेतले राधिकाने, काहीही, ईतरवेळी ओळख नसलेल्या लोकांनाही उगाच खायला घालत असते >>घेयु दे की . उलट महिनाभराचा खर्च पण घ्यायचा की . गुरु काही खात पीत नाही का घरी? गॅस , फ्रीज , वॉशिन्ग मशिन तर वापरतो ना .
गुरुमध्ये नावालाहि माणुसकी
गुरुमध्ये नावालाहि माणुसकी शिल्लक नाहि राहिलि आणि तो पन्हयाचे पैसे मागितल्यावर राधेमा कडुन अपेक्शा करतोय , आवडले उत्तर राधेमाने त्यावर दिलेले. काय बरे ते " पिझ्झ्यावर सौस फुकट मिळ्ते something
पन्ह्याचे ६० रुपये??
पन्ह्याचे ६० रुपये??
शनायासारखी मठ्ठ बाई काही ना
शनायासारखी मठ्ठ बाई काही ना काही इन्फो काढते आणि हा बनहट्टी राधिकाच्या पुढे मागे नाचतोय. एकदा तो राहतो कुठे, खातो काय याची माहिती तिला काढावी वाटू नये?
सोशल मिडियावर आजकाल माणसाची इत्यंभूत माहिती मिळते त्यात ह्या सौमित्र ला घालून पहावे वाटत नाही हिला? 
सोशल मिडीयावर आपले चमको फोटोज
सोशल मिडीयावर आपले चमको फोटोज, सेल्फिज टाकायचे असतात एवढीच माहिती असेल तिला. तिला अति मठ्ठ दाखवली आहे, तिच्या घरचे वगैरे कधी चौकशी करत नाहीत का, की कोणी येत नाही की ही कधी जात नाही. मागे पुण्याची आहे उल्लेख ऐकलेला. पुण्यात कुठला एखादा भाग आहे का, तिथल्या लोकांना फक्त इंग्लिश कळते. साधे साधे मराठी शब्दही कळत नाहीत.
या असल्या फालतू सिरीयल वर हि
या असल्या फालतू सिरीयल वर हि इतकी चर्चा होते हेच या सिरीयलचे यश म्हंटले पाहिजे
नाही ते सिरीयलचे यश नाही.
नाही ते सिरीयलचे यश नाही. आम्हाला राखेचा नंतर बदडायला कुणी सापडले नाहीये, म्हणून या महाभागांना बदडतोय झालं. तिकडे ती ग्रहण पण असलीच फालतु आहे. ना आगा ना पिछा! मागे जे घडले त्याची पुढे काहीच लिंक नाही.
राधाक्का मनात अजुनहि
राधाक्का मनात अजुनहि गुरवाबद्द्ल कणव बाळगुन आहे.
अपर्णा !!..:रागः:
अपर्णा !!..:रागः:
हो ना...त्याचाच तर राग व्यक्त करायला येतो आम्ही! काल ग्लासात पाणी ओतायची काय गरज...तो आल्यावर ? हिला अशी उर्मी होतेच कशी?
शेवटी आदर्श भारतिय नारि. आणि
शेवटी आदर्श भारतिय नारि. आणि तिकडे ग्रहणात "चमा" नवरा, मुले विसरुन लागलिय निरोबाच्या नादि.
Pages