माह्या भैताड नवर्‍याची दुसरी बायको-२

Submitted by रश्मी. on 31 October, 2017 - 07:31

माझ्या नवर्‍याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो कबीर चं
खून भरी मांग मधलं मै तेरी हू जानम, तू मेरा हे गाणं पहा.
लय हॉट आई XXXX Wink

रच्याकने राधिका ने केसांच्या शेवया नाही मॅग्या केल्यात.

There is a big section of educated stay at home urban crowd who religiously follow this serial and completely believe in it. Radhika is an ideal women for them.

Dakshina, I wish it was true.
I used to think that its just senior citizens who think like this. but I was wrong.
There is big section of sensible people like us who know that what is going on is wrong.
But there is an equally big section who watch it and believe in it.

ती रोहीणी निनावे अत्यंत खालच्या दर्जाची लेखिका आहे. आजतागायत ती फक्त विवाहबाह्य संबंध या एकाच विषयावर तेच ते लिहीते आहे. या लिखाणामूळे बहुधा तिच्याच डोक्यावर परिणाम होउन पुढील परिणामांना घाबरत तीने लग्नच केलं नाहीये म्हणे

रश्मी.. दाढीधारी लोकांबद्दल चं निरीक्षण एक नं ! Biggrin

काल काय झालं?
केड्या ला मार पडला ना? किती खालच्या लेव्हल वर जाऊन प्लॅन करतो तो! आणि दाढी नं २ ला काहीच काम नाही कही? 'राधा' च्या अवती-भवती करण्या खेरीज?
काल अनपेक्षित पणे हिने शन्यालाच बाहेर जायला सांगितले ! म्हणजे ठीक केले पण एक्स्पेक्टेड नव्हते ना!

अहो मालिकांवरील सगळ्यात जास्त चर्चिला जाणारा हा धागा आहे ह्यावरूनच टीआरपी समजतो ना! आणि झी वाले डोकावून जात असतील इथे जोवर इथे धोधो चर्चा चाललिये म्हणजे आवडत नाही म्हणणारे एवढ्या आवडीने बघतायेत मालिका तर इतर किती तरी असतील!

हल्लि पाट्या टाकतात तसे episodes दाखवत आहेत, काहीच घड्त नाहि नुस्ते fillers, इथे पिसे काढ्ण्यासाठी विषय नाहि मिळ्त.
srsly.gif

continuity काही राहीलीच नाहीये, परवा नाना-नानी चर्चा करत होते अथर्व साठी आमरस करू नी काय काय, काल राधाक्का रिकाम्या घरात रडत होती. अथर्वने काम सोडलं की काय ?

हो ना...काल तर निव्वळ पाट्या टाकल्या... शनाया व केड्या चे सीन्स अती भिकार बोअर होतात. ती किती खोटी रडते!
पण तिने गुरवाला चांगली सुनावली! म्हणे की नाशिक पासून माझा तुझ्यावर विश्वासच नाही राहिलाय, मी तुला सोडून जाईन.!
गुरुने दोन महिन्यांची मुदत मागून घेतलीय!
गुरवाला तरी काय आनंद मिळतो यात? ना घरका ना घाट्का असं राहून! काल जुने पूर्वीचे सीन्स दाखवित बसले...राधिका किती अगदी खुश होती गुरुसोबत इ इ...!! महा बोअर! पण सिरीयल पाहणार्‍या सतीसावित्रींना हे पटत ही असेल बहुदा.!!
अजूनही तिला ( म्हणजे खरे तर केड्याला!!! Angry ) गुर्वा बद्दल फारसा राग नाहीचे ! सगळा राग - हेवा- मत्सर- वैर फक्त शन्या बद्दल!! Angry

केड्याला मारलं हे कळल्यावर बघितला तो एपिसोड. बरं झालं धुतला. राधिका गुलाबी साडीत छान दिसत होती त्या कॉर्पोरेट अटायर पेक्षा.

कालचा का बघितला, कित्ती बोअर. ती शनाया पण कित्ती बोअर करते आता. काही म्हणा समिधा एकदम ग्रेसफुल आहे. रेवती पण आहे पण समिधा पेक्षा कमी.

राधिकाला गुरु बरोबरचे सीन आठवले बघून मी बंद केलं voot, काय डोक्यात जाते ही. ही गुरूला माफ करणार. काही बघण्यात अर्थ नाहीये.

राधिकाला गुरु बरोबरचे सीन आठवले बघून मी बंद केलं voot, काय डोक्यात जाते ही. ही गुरूला माफ करणार. काही बघण्यात अर्थ नाहीये. >>>> पण तिला जर अथर्व साठी गुरु हवा असेल तर..

अंजू...:-) अगदी अगदी...हेच म्हणत्येय मी! ही डोक्यात जाते जेव्हा आताही जेव्हा गुरुच्या प्रेमात असते तेव्हा!! :रागः:
हळूहळू शन्याला घलवून गुरवाला उपरती झालेली दाखविणार..आणि आधीच ऑल्मोस्ट तयार असलेली राधक्का त्याला परत आपल्या पदरात घेणार!!
ज्याचा शेवट गोड ते सर्वच गोड!! :रागः:
भयंकर अपमान आहे हा प्रेक्षकांचा, चांगुलपणाचा, नैतिकतेचा, न्यायाचा !!!
क्षमाशीलता ही सत्याची, कर्तव्याची, माणुसकीची ..मुख्य म्हणजे नीतीची बूज राखू शकत नसेल तर काय कामाची?

अथर्व साठी गुरु हवा असणे हा बिग जोक. ह्यांनीच दाखवल्याप्रमाणे एक बाप म्हणून त्याची लायकी शून्य आहे. कामातुरम न भयं न लज्जा असं म्हटलं होतं मागे रश्मीने तसा आहे तो. आता एकत्र आणायचं असेल तर उपरती, मुलावर प्रेम उफाळून येणं काहीही दाखवतील तर disgusting.

आं गो करेक्ट.

परवा महिला सक्षमीकरणकरण यावर एवढं लेक्चर देत होती तर अग बायो तुझ्या नवऱ्याला धु धु धुण्याच्या लायकीचा असून कधी धुतला नाहीस ते, कायम शनायाचा हात पिरगळत राहिलीस.

परवा महिला सक्षमीकरणकरण यावर एवढं लेक्चर देत होती तर अग बायो तुझ्या नवऱ्याला धु धु धुण्याच्या लायकीचा असून कधी धुतला नाहीस ते, कायम शनायाचा हात पिरगळत राहिलीस.
नवीन Submitted by अन्जू on 26 April, 2018 - 17:09 >>>> हि सिरियल सम्पेपर्यन्त एक इच्छा आहे एकदातरी राधाक्काने गुरुला कानफडावे. (खरे तर माझेच हात शिवशिवतात).

अथर्व साठी गुरु हवा असणे हा बिग जोक. ह्यांनीच दाखवल्याप्रमाणे एक बाप म्हणून त्याची लायकी शून्य आहे. >>> सुरुवातीच्या एका भागात , अथर्वला ताप असतो तेन्व्हा औषध नाही आहे, घेउन येतो असं सांगून तो बाहेर पडतो आणि रात्रीचा शनायाला भेटायला जातो .

अथर्व साठी गुरु हवा असणे हा बिग जोक. ह्यांनीच दाखवल्याप्रमाणे एक बाप म्हणून त्याची लायकी शून्य आहे. >>> + १२३

आता गुरूला शनाया पण हवीय आणि बायकोला पण सोडायचं नाहीये, ती दुसऱ्या कोणाबरोबर असणं त्याला मान्य नाहीये. एकदम फालतू chara गुरु. त्या केड्यासारखा ह्याला बदड बदड बदडायला हवंय. माझे पण हात शिवशिवतात अपर्णासारखे.

केड्या एक नम्बर बकवास आहे अरे हे लोक मास प्रेक्शकाना आवडेल म्हणून राधाकक्का कितिहि मोठि उध्योजिका झालि तरि किति शालिन, सोज्वळ आणी आदर्श भारतिय नारि प्रमाणे आपल्या पतिशिच प्रामाणिक, नवरयाने भाहेर कितिहि शेण खाल्ले तरि हि आप्लि माह्या नवरा नवरा करणार. स्त्रिला खरच पुरुषाचा आधार लागतो का ? तरि मागे एका एपि मध्ये गुरु राधिकाला सावरतो तेव्हा हि बेसिन मध्ये जावुन हात धुते लेखक हे विसरला वाटते,

मला प्रश्न असा पडला आहे की राधाक्का यशस्वी उद्योजिका झाली कधी ? अजून तर एकच ऑर्डर आल्ये, ती पूर्ण झाली की नाही कळयला मार्ग नाही. पूर्वी त्या बायका मसाले बनवताना, त्या दुकानात काहीतरी करताना दिसायच्या, आता तर काहीच नाही.

ते सगळे खयालात बनववुन राहिले. आणि काल दाखविले ना राधिका बाईनी विन्टरवु दिला रेवतिच्या शो मध्ये as a successful business women and housewife.

अहो तब्बल एक लाख रुपये मिळालेत आगाऊ रकमेचा चेक!!!!
कित्ती ते पैसे त्यावर चाललयं सगळं!!
एक लाख अ‍ॅडव्हान्स मधे ही एकदम यशस्वी उद्योजिका!!! मोठ्या टॉवर मध्ये कार्यालय!!!
जे लाखभर रुपयाच्या स्मार्ट टीव्ही वर ही सिरेल बघत असतील ते तर अर्थिक दृष्ट्या जागतिक क्रमवारीत पहिल्या १० मध्ये असावेत!

Pages