आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ७

Submitted by कृष्णा on 7 October, 2017 - 00:31

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

२३७३ हिंदी (६०-७०) -- उत्तर
चुनरी संभाल गोरी उडी चली जाये रे
मार ना दे डंक कहीं नजर कोई हाय

२३७४ मराठी ६०-७०
त र च र म त न
द प द स क क
स क क त र च र

२३७४ - उत्तर
तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम
देह प्रपंचाचा दास सुखे करो काम

२३७५
हिंदी (१९७० - ८०)

त स म थ प क अ न थ
ह अ द अ थ ज त क थ

२३७५.

तुम से मिला था प्यार
कुछ अच्छे नसीब थे
हम उन दिनों अमीर थे
जब तुम करीब थे

खट्टा मिठा

२३७६.

हिंदी

अ ब त प ज
ख क क ह म न क
ज म ह य अ अ अ
त द क ल क ज न क

६०- ७०च्या दरम्यानच चित्रपट

गोड गळ्याचा गायक बहुदा गोड गळ्याच्या कोकीळेच्या आवाजातही हे गाणे आहे!

अगर बेवफा तुमको पहचान जाते
खुदा की कसम हम मुहब्बत न करते
जो मालूम होता, ये इलजाम ए उलफत
तो दिल को लगाने की जुर्रत न करते

२३७७ हिंदी ६० - ७०
अ ह म ब म त ह
म ल अ म ल
द क न न क अ
ज ल अ ज ल

द्वंद्वगीत - कोकीळा

२३७७ हिंदी ६० - ७० -- उत्तर
आप हुये मेरे बालम मैं तुम्हारी हुई
मान लीजिये अजी मान लीजिये
दिल का इरादा नज़र के इशारा हुये
जान लिजीये अजी जान लीजिये

२३७८ हिंदी ६०-७०
त ह ह ह म
क द च ज द
अ स त भ क
न च ह द

सॉरी, तुक्के मारून तुमची राजमार्गाने केलेली मेहनत फुकट घालवली.

द्वंद्वगीत आहे ; गायिका --- पण तो क्ल्यू कामी येत नाही.... उगीच कोकिळेला उचक्या लागणार फक्त; गायक -- थोडा घोगरा पण सुश्राव्य
पापपुण्याचा हिशोब ठेवता ठेवता संगीतही देता येतं ?
मराठी म्हण आहे.... या २ गोष्टी करून बघितल्या कीच कळते काय काय उचपत्या कराव्या लागतात, त्यापैकी एकाशी साधर्म्य -- चित्रपटाच्या नावाचे

२३७८
तुमने हँसी ही हँसी में
क्यु दिल चुराया जवाब दो
आँखो से तुमने भी कितनी
निंदे चुरायी हिसाब दो

या २ गोष्टी करून बघितल्या कीच कळते काय काय उचपत्या कराव्या लागतात, त्यापैकी एकाशी साधर्म्य -- >>>

विशेष म्हणजे ह्या चित्रगुप्तांचे ३ सिनेमे सापडले साधर्म्य वाले

१. शादी
२. मैं शादी करने चला
३. घर बसाके देखो

बरोबर द्या पुढचे Happy

मी नावावरून क्ल्यूसाठी गेले... शब्दशः भाषांतर जवळपास जाणारे तिसरेच... घर पहावे बांधून..

२३७९.
हिन्दी
एकदम सोप्पे

छ स घ ह ब क छ म
अ द म म ब ब
ह ह ह च त क अ ग म
अ क र ह य स

तुम ही तो मेरी पूजा हो,तुम्हें दिलमें बसाया है
तुम ही तो मेरी दुनिया हो,तुम्हें दिलसे लगाया है

Pages