आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ७

Submitted by कृष्णा on 7 October, 2017 - 00:31

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

'सैया बिना' ला तुमच्या त्या भंपक Wink संगितकाराच संगित आहे, खर वाटत नाही>>>

अहो अशी काही चांगली गाणी दिलीत चक्क त्या संगीतकाराने!
शराबीचे 'मंजिले अपनी जगह है' किंवा 'चलते चलते मेरे ये गीत याद रखना' वैगेरे!

२४२१ हिंदी ८० - ९०

अ क अ अ व ह ह
ल म ह ज ह ह
क ब ज ह ह त ह
क ब ज अ न ह त ह
ज अ द ज फ ह ह

अरे, बरं. द्वंद्वगीत / प्रसिध्द त्रिकुटा पैकी दोघे आणि मराठी गायक

सत्यजितजी आहात का?

२४२१ हिंदी ८० - ९० -- उत्तर
और क्या अहद-ए-वफ़ा होते हैं
लोग मिलते हैं जुदा होते हैं
कब बिछड़ जाये हमसफ़र ही तो है
कब बदल जाये इक नज़र ही तो है
जान-ओ-दिल जिसपे फ़िदा होते हैं
आरडी // आशा // सुरेश वाडकर

२४२२ हिंदी ००-१०
अ ज अ ज अ ज अ ज
क र ह द अ ज
ह स अ क म अ ज
द द स न ज
न न न
द ल र न न न
द च र न न न
प म अ न

क्ल्यू -- गेंगाणा संगीतकार (पण पारितोषिक विजेता) ; माजी राष्ट्रपतींची केशरचना ; एरोबिक्स व्यायामासाठी सुयोग्य ठेका ; रिपीट झालेली अक्षरे सारखेच शब्द आहेत

ओ जाना ओ जाना
कह रहा है दिल ओ जाना
हमसे आ के मिल ओ जाना
दूर दिलसे न जाना
ना ना ना
दिल लगाना रे ना ना ना
दिल चुराना रे ना ना ना
पास मेरे आना ना

२४२३.हिन्दी (१९६०-१९७०)
द क स त ह क ज द
त न ह ख त ह क ज द
प क क द क क छ अ ह
क क स अ र अ ज त अ ह
म ह अ अ ह त ह क ज द

२४२३ उत्तर
दुनिया करे सवाल तो हम क्या जवाब दे
तुमको न हो खयाल तो हम क्या जवाब दे

कोडे क्र २४२४ मराठी (२०१५-२०१७)
ज अ य म भ
त न ब न अ स घ न
स र म त द
उ ब क त स स अ
अ च च त म क अ
म प क ब घ ज झ
ड त स स स त न
त अ अ न ज
उ त ह क क
अ च ह ह क

कोठारेंची सूनबाई नायिका
कोंबडी पळाली गाण्याचा गीतकार नायक
बांगडीवर आधारित चित्रपट
आवर्जून ऐकावं असं गाणं Happy

कोडे क्र २४२४ मराठी (२०१५-२०१७) -- उत्तर
जगण्याची आशा.. या मनाची भाषा..
तू न बोलता न ऐकता समजून घे ना..
स्वप्नांचे रंग.. मी तुझ्यात दंग..
उरे बाकी काय तुझी साथ संग असताना..
आकाशी चंद्र चांदण्या.. तोडून मी का आणल्या..
मनाचा पाळणा करू.. बांधुनी घे जरा झुला..
डोळ्यात तूच साजणी.. सुखाचा स्पर्श तू नवा..
तुझ्या विना उरे न अर्थ जीवना..
उजळे तुझ्या हसुने कण कण..
अन चंद्र हे हातीचे काकण..

सापडलं....

कोडे क्र २४२५ मराठी (२०१५-२०१७)
म ल घ भ
स न ब द
ल म अ अ ह अ
भ अ अ ख न र

मी नसेन थोडा वेळ... ओळखा आणि पुढे जा प्लीज

मिटुनी लोचने घे भिरभिरती
सूर नांदीचे बघ दरवळती
लालचुटुक मखमली आता
अलगद ही उमलेल
भारुनिया अवकाशच अवघा खेळ नवा रंगेल

कोडे क्र २४२६ (१९७५-१९८०)
र न न र न न
त न ब म न ब स ब ग
सॉरी हिंदी आहे चुकून मराठी टाईप झालं

राही नये-नये रस्ता नया-नया
तुम ना बदलीं मैं ना बदला सब-कुछ बदल गया

२४२७ हिंदी ६० - ७०
स क य ग झ अ च न अ
झ च त स क य ग झ
च ज न अ द न क ग क
च क ह द र च ज न अ

सोच के गगन झूमे अभी चाँद निकल आयेगा
झिलमिल चमकेंगे तारें सोच के गगन झूमे
चाँद जब निकल आयेगा देखेगा न कोई गगन को
चाँद को ही देखेंगे सारे चाँद जब निकल आयेगा

सॉरी हिंदी आहे चुकून मराठी टाईप झालं >>>> वाटलेलंच.... राधे नाच नाच शिवाय काही मराठी फ्रेज जुळेना... आणि त्याकाळात शब्द ओघवते असायचे... ट ला ट प ला प नाहीत..
पण हिंदी शब्द नाही जुळवले...स्निग्धा ग्रेट Happy

@ अक्षय, कोण जवळ असेल त्याच्याकडून २ धपाटे घ्या बरं घालून Happy
आणि सांभाळून बरं का,
विथ शब्द ही अशी गत, तर शब्देविण प्रयत्नात.... एखादी नायजेरियन वहिनी बघायला लागायची आम्हाला डीपीमध्ये... आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये पण त्याचाही....

कोडे क्र २४२८ मराठी (गझल)
ह त अ व ल ब न
च ग झ ब न
नविन जुनी माहीत नाही हल्लीच मी ऐकलीय लिरिक्स भारी आहेत

ताई ट ला ट, प ला प नाही मी र ला ट लावतो Lol
ताई इथं हिंदीची बोंब आणि तुम्ही नायजेरियन आणा म्हणजे झालं...
गडबडीत झालेला गोंधळ आता पोटात घ्या. पाठीवर लय वजन असतं तिथेच फटके पडले तर कसं चालेल Lol
स्निग्धां ताई खरंच ग्रेट आहेत पटकन ओळखलं इथून पुढं अक्षरं मराठीत जुळली नाही तर हिंदीत पण जुळण्याची शक्यता आहे.

शब्देविणमध्ये असा लोच्या केलात तर अजून काय होणार दुसरं? जिला सिग्नल कळणार / डीकोड करता येणार तीच वजीर...
मग मागाहून तुम्ही म्हणाल ताई चुकलो ... तुमच्यासाठी नव्हतं .... तर ती राखी थोडीच बांधेल? बघा बाबा काय ते... Happy
आता मी निघतेय... उद्या भेटू... शुभरात्री

२४२९.हिन्दी (१९५०-१९६०)
य ह क द म म ध ल
ख द स द क ब क अ र ल
घ स च थ ह त ख क त म
ग र म ख थ व ह स ह ल
म च ह फ भ य द फ ह त ह
अ अ क ख अ क म त
ह क स च त ज न य क
य च स क ल ह अ क त ब

२४२९ - उत्तर
यूँ हसरतों के दाग़, मुहब्बत में धो लिये
खुद दिल से दिल की बात कही, और रो लिये

घरसे चले थे हम तो, खुशी की तलाश में
ग़म राह में खड़े थे वही, साथ हो लिये

मुरझा चुका है फिर भी ये दिल फूल ही तो है
अब आप की ख़ुशी इसे काँटों में तोलिये

होंठों को सी चुके तो, ज़माने ने ये कहा
ये चुप सी क्यों लगी है अजी, कुछ तो बोलिये
खुद दिल से दिल की बात कही, और रो लिये

२४३०
हिंदी (१९६० - ७०)

अ स अ स अ य क ख
म क अ द क न न ल
प क व म ख ज
अ स अ य क ख
फ प क म ड
अ द स द ह ज

ऐ सनम आज ये कसम खाये
मुड़ के अब देखने का नाम ना ले
प्यार की वादियों में खो जाये

ऐ सनम आज ये कसम खाये
फ़ासले प्यार के मिटा डाले
और दुनिया से दूर हो जाये

२४३१ गझल / गैरफिल्मी आहे का? मराठीच आहे ना?
कविता / भावगीत आहे बहुतेक... एखादा क्ल्यू द्या ना.. दत्तजयंती निमीत्त आहे का?
मंडळी, सोडवा कुणीतरी... मी नसेन आता सोमवारपर्यंत

Pages