खेळ शब्दांचा
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
पहिला विषय आहे : आपला सगळ्यांचा आवडता! खाण्याचे पदार्थ !!
पहिला क्लू -
गहू , गुळापासून केलेले पक्वान्न, जास्त करून मोहरमच्या वेळी करतात.
म - -
अरे आत्ता कुणी खेळत नाहीये
अरे आत्ता कुणी खेळत नाहीये असे दिसते. आता झोपण्याआधी उत्तर लिहून जाते.
उत्तर होतं मांडे. मनातल्या मनात खाता येतात ते.
धागा चालावा म्हणून मी देतो
धागा चालावा म्हणून मी देतो पुढचा शब्द
एक चार अक्षरे गोड पदार्थ
नरसोबाच्या वाडीच्या परिसरात मिळतो..... बाकी इतरही मिळत असावा
कवठ बर्फी, करंदट.
कवठ बर्फी, करंदट.
करदंट बरोबर
करदंट बरोबर
ओहह. सॉरी मला दोन्ही एकाचीच
ओहह. सॉरी मला दोन्ही एकाचीच दोन नावं वाटली म्हणून एकत्र लिहिली. काहीच माहीती नाही फार वाडी प्रसादाची.
एक खाण्याची वस्तू तीन अक्षरी,
एक खाण्याची वस्तू तीन अक्षरी, जिला दोन वेगळ्या नावाने ओळखलं जातं. ज्यात पहिली दोन अक्षरं सकारात्मक आहेत आणि मधलं आणि शेवटचं नकारात्मक.
जिलेबी?
जिलेबी?
नाही
नाही
हुरडा
हुरडा
धिरडे
धिरडे
कुमार बिंगो. करेक्ट.
कुमार बिंगो. धिरडे करेक्ट.
तीन अक्षरी. हे मुलीचे नाव पण
तीन अक्षरी. हे मुलीचे नाव पण आहे. कर्नाटकात प्रसिध्द
सुशीला
सुशीला
सुशीला का
सुशीला का
बरोबर!
बरोबर!
अंजू, पुढचा तुम्ही देताय की
अंजू, पुढचा तुम्ही देताय की मी देऊ?
द्या तुम्ही
द्या तुम्ही
तीन अक्षरी. म्हटलं तर खमंग
तीन अक्षरी. म्हटलं तर खमंग पदार्थ म्हटलं तर मार.
धपाटे
धपाटे
बरोबर.
बरोबर.
३ अक्षरी गोड पदार्थ्,ऐकून
३ अक्षरी गोड पदार्थ्,ऐकून आनंद होतो.
मोदक का
मोदक का
हो ना
हो ना
अन्जू, शब्द दे.
अन्जू, शब्द दे.
देते, थोडा विचार करते.
देते, थोडा विचार करते.
काही ठिकाणी पाच अक्षरी
काही ठिकाणी पाच अक्षरी
काही ठिकाणी तीन
चविष्ट चमचमीत
आमटीत ही न्यारी
कुठलंही नाव चालेल तीन पैकी
कुठलंही नाव चालेल तीन पैकी
फोडणी?
फोडणी?
नाही तीन पैकी एक गुज्जू नाव
नाही तीन पैकी एक गुज्जू नाव आहे आणि आमटी मस्ट आहे यासाठी
वरणफळं
वरणफळं
Pages