खेळ शब्दांचा १ - खाण्याचे पदार्थ

Submitted by संयोजक on 23 August, 2017 - 19:47

खेळ शब्दांचा
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.

काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.

हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !

पहिला विषय आहे : आपला सगळ्यांचा आवडता! खाण्याचे पदार्थ !!

पहिला क्लू -
गहू , गुळापासून केलेले पक्वान्न, जास्त करून मोहरमच्या वेळी करतात.
म - -

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जाउदे.. येत नाही. सरकी पासून तेल काढल्यावर त्या ढलप्या (ऑएली) थोड्या थोड्या घालून आजी भाकरी करत असे.. मोठी चविष्ट लागे ती.. पण उपासाच अनाही हा पदार्थ...

१००२

मंजूताई, आता पदार्थ सांगा व वेगळा धागा काढून रेसिपी लिहा बरं.

गाठोडी Happy राजगीरा कापडात बांधून ती गाठोडी वाफवतात. थंड झाल्यावर दूध साखर किंवा ताक मीठ घालून खातात. मितानने ही हेल्दी विस्मरणात गेलेली गाठोडी खाऊ घातली

मंजूताई, आता पदार्थ सांगा व वेगळा धागा काढून रेसिपी लिहा बरं.---+1
त्यानिमित्ताने मी आत्ता out ऑफ the blue बरेच फोन केले Happy

मजा आली हा खेळ खेळायला Happy मायबोलीवर मी बरीच वर्षे आहे पण एवढे प्रतिसाद मी पहिल्यांदाच दिले Happy

हा धागा सुरू ठेवला आहे कारण जर दुसरा झब्बू अडकून बसला तर इथे येउन ज्याना उत्साह आहे त्याना खेळता येईल. किंवा झब्बू खेळायची इच्छा आहे पण दुसर्‍या विषयांवर लिहता येण्यासारखे शब्द माहिती नाहीत. सगळ्यांनाच सगळ्याच विषयांशी निगडीत पुरेसा शब्दसंचय असेल असे नाही.

हाय्ला. नो क्लू?

अरे जिस तरह लखनौ के दो नवाबोंकी गाडी
'पहले आप' 'पहले आप' मे निकल गई थी,
इसी तरह ये मस्ती भरा गेम खतम ना हो जाए..

इस्लिये मै क्लू देता हूँ।

हा प्रकार बनवायला सोपा, खायला गोड, अन दिसायला गोरापान. एकाच वस्तूपासून बनतो.

आजकाल फारसा दिसत नाही.

- - -

Pages