खेळ शब्दांचा
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
पहिला विषय आहे : आपला सगळ्यांचा आवडता! खाण्याचे पदार्थ !!
पहिला क्लू -
गहू , गुळापासून केलेले पक्वान्न, जास्त करून मोहरमच्या वेळी करतात.
म - -
इतर ठिकाणी उपासाला खातात जा
Double post
शिंगाडे
शिंगाडे
सध्या फारसा प्रचलित नाही पण
सध्या फारसा प्रचलित नाही पण हेल्दी
भगर (वरीचे तांदूळ वाफवून
भगर (वरीचे तांदूळ वाफवून केलेले गोड / तिखट)
किती अक्षरी? एखादं अक्षर द्या
किती अक्षरी? एखादं अक्षर द्या.
दुष्काळी भागात शिंगाडे !
दुष्काळी भागात शिंगाडे !
कारवी , पदार्थांचे नाव
कारवी , पदार्थांचे नाव
तोच मला प्रश्न पडलाय की पाणी
तोच मला प्रश्न पडलाय की पाणी नसलं तर उपासच घडत असणार मग अजून काय वेगळं उपास स्पेशल!
तीन अक्षरी
तीन अक्षरी
राजगिरा
राजगिरा
खांडवी
खांडवी
शिजलेल्याला काही वेगळे
शिजलेल्याला काही वेगळे म्हणतात? प्रादेशिक नाव नाही माहीत.
राजसी कारवी जवळ आहात कैलशियम
राजसी
कारवी जवळ आहात कैलशियम नाही वरीत
उकडा?
उकडा?
आंबील
आंबील
नाचणीची ऐकून माहीत आहे..... कॅल्शिअम जुळतेय....पण उपासाला चालते का माहीत नाही.
सुरणाचे काप?
सुरणाचे काप?
मला नाचणी कोकणातली वाटायची.
मला नाचणी कोकणातली वाटायची.
प्रचलित नाही. मी २५ वर्ष
प्रचलित नाही. मी २५ वर्ष राहून ऐकलं खाल्लं नव्हतं. आईने त्या पदार्थाची आठवण सांगितली अन् माबोकरीण आईसाठी घेऊन आली. गंमत वाटली.
मी हरलो.
मी हरलो.
आता तुम्ही धागा काढून रेसिपीपण टाका
दलिया?
दलिया?
तुम्ही ऐकलं नव्हतं तर आम्हाला काय येणार!!!
होऊन जाऊ दे हजार! मग धागा बंद
होऊन जाऊ दे हजार! मग धागा बंद करायचाय ना
(No subject)
एखादं अक्षर तरी द्या ना.
एखादं अक्षर तरी द्या ना. नाहितर ह्यातच हजार होवून जातील.
राळ्याची खिचडी
राळ्याची खिचडी
भुरका?
भुरका?
बापरे! तुम्हाला माहिती नसेल
बापरे! तुम्हाला माहिती नसेल तर आमचं अवघड आहे
तीन अक्षरी. पहिलं व शेवटचं -
तीन अक्षरी. पहिलं व शेवटचं - वाहन
चला पटापटा हजार करुया
चला पटापटा हजार करुया
नाचणी -कोकणातलीच, मराठवाड्यात
नाचणी -कोकणातलीच, मराठवाड्यात 25 वर्षमपूर्वी मिळायची नाही. कल्याण ला आलं की आणावी लागायची.
शो धा म्हणजे सापडेल
शो धा म्हणजे सापडेल
Pages