आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ६

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 August, 2017 - 14:22

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -५ : http://www.maayboli.com/node/62885

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरेली कि बर्फी

तू नज़्म नज़्म सा मेरे
होंठो पे ठहर जा
मैं ख्वाब ख्वाब सा तेरी आँखों में जागूं रे
तू इश्क इश्क सा मेरे रूह में आ के बस जा
जिस ओर तेरी सहनाई उस ओर मैं भागूं रे
ना ना..

ताई द्या तुम्ही पुढचं कोडं..

बरेली कि बर्फी

तू नज़्म नज़्म सा मेरे
होंठो पे ठहर जा

यात म द क ल म / त ख ह ज / न न क प ल हे शब्द कुठे येताहेत Uhoh
म द क ल म
त ख ह ज २
न न क प ल

मेरे दिल के लिफाफे में
तेरा खत है जानिया
तेरा खत है जानिया
नाचीज़ ने कैसे पा ली
जन्नत रे जानिया वे
तू नज़्म सा मेरे
होटों पे ठहर जा
मैं खाब खाब सा तेरी
आँखों में जागूं रे

मला गाणं बरोबर माहीत होतं पण तरी चुकायला नको म्हणून गुगल मामांना विचारलं तर त्याने दोनदा हेच लिरिक्स दाखवले. मग मी विचार केला मामा एवढं खात्रीनं सांगतायत तर कशाला आपलं घोडं दामटवायचं म्हणून तेच लिरिक्स दिले आणि नेहमीप्रमाणे मामाने घात केला उद्या येउदे पोरगी घेऊन लग्नाला मग सांगतो मामला Lol

हो ,ऐकलय..
आणि तुम्ही होतात म्हणून आज दिलं...

थोडा है थोडे कि जरुरत है..
(क्रुश्नाजी अंताक्षरी खेळताना हे गाण लिहितात म्हणून माहितेय.. Happy )

२०२६,हिन्दी,१९९४-२००० -- उत्तर
प्यार के लिए चार पल कम नहीं थे
कभी तुम नहीं थे कभी हम नहीं थे
प्यार के हसीं कब ये मौसम नहीं थे
कभी तुम नहीं थे कभी हम नहीं थे

२०२७ हिंदी ५० - ६०
म ह न ज स व ज प क ज
न द क त स ज ह झ क ज
अ त क क अ त ह अ ह
ग क क क क त क ज

२०२८ हिदी १०-१७
म श भ क ह
ड न य क क ह
क ग म ल ज
क श क
ह र य त क ह
म व ड ड
ड ड क ह

मेरी शान्ति भंग करती है
डे नाईट ये कॉल करती है
मेरी शान्ति भंग करती है
डे नाईट ये कॉल करती है
कभी गड्डी में ले जाओ कभी शौपिंग करा
ओ हर रोज़ ये तंग करती है
मेरा वाली डिंग डांग
डिंग डांग करती है Lol

मोहब्बत ही ना जो समझे वो जालिम प्यार क्या जाने
निकलती दिल के तारों से जो है झन्कार क्या जाने

मुहब्बत ही न जो समझे,
वो ज़ालिम प्यार क्या जाने
निकलती दिल के तारों से,
जो है झंकार क्या जाने

Pages