आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ६

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 August, 2017 - 14:22

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -५ : http://www.maayboli.com/node/62885

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१९७२ हिंदी (१९५०-६०)

अ स त ह त ब ह
र र क म क त ब ह

गायिका संगीतकाराची लाडकी नाहीये पण गाणे अफाट सुंदर आहे.

मी जयंत कु.आणि वंदना पंडीत शोधत बसले... >>>>>>>
माननीय प्रशासक --- साष्टांग नमस्काराची स्मायली उपलब्ध करून द्यावी, ही नम्र विनंती. Happy
अगं, जयवंत कु दादा कोंडकेंचा आवाज (राज-मुकेश सारखा) आणि दादा कोंडकें म्हणजे उषा चव्हाणच बहुतेक

माननीय प्रशासक --- साष्टांग नमस्काराची स्मायली उपलब्ध करून द्यावी, ही नम्र विनंती. >>> Lol
लक्षात ठेवेन आता..

गायिका संगीतकाराची लाडकी नाहीये पण गाणे अफाट सुंदर आहे. >>>
ओ पी नय्यर + लता?
नॉन -- ओ पी नय्यर + आशा
ओ पी नय्यर + नॉन--आशा - लता
यापैकी काही?

नाही. ओ पी नय्यर + लता हे काँबो कधीच अस्तित्वात नव्हते. Happy

नॉन -- ओ पी नय्यर + आशा - हो Happy

यात तीन नायक आहेत. एका नायकाचे दोन्ही भाऊ खूप प्रसिद्ध झाले. हा मात्र कधीच फारसा प्रसिद्ध नव्हता.

नाही. ओ पी नय्यर + लता हे काँबो कधीच अस्तित्वात नव्हते >>>> हो, हे ऐकून माहीत आहे. पण अभ्यासू माहिती नाही. म्हणून म्हटलं विचारावं... एखादेच, चुकले माकले गाणे असायचेही.

१९७३ हिंदी ५०-६०
ज त न ब क
र च प म ब
र र क म म क स अ
म न र म न र
ज ज ज ज

१९७३ हिंदी ५०-६० -- उत्तर
जा तोसे नहीं बोलूं कन्हैया
राह चलत पकडी मोरी बैया
रूठी राधिके कृष्ण मनावत, मुरली की सौगंध उठावत
मानत नहीं राधा , मानत नहीं राधा , मानत नहीं राधा
जा जा जा जा तोसे नहीं बोलूं कन्हैया

Submitted by कारवी on 8 September, 2017 - 01:03 >> कारवी, मध्यरात्री कोड सोडवलत? नमस्कार घ्या माझा.

अक्षय, तुमची असं नाही पण मी जनरल सगळ्यांचीच वाट पहात होते. काल पासुनच खुप कमी वर्दळ आहे इथे Sad

1975 हिंदी ५०-६०
अ च अ अ च अ
त अ न द ब
अ त स ज अ त स ज
क न न प ग

अजी चले आओ, अजी चले आओ
तुम्हें आँखों ने दिल में बुलाया
अब तो समझ जाओ, अब तो समझ जाओ
क्यों निगाहों ने परदा गिराया

कोडे क्र १९७६ मराठी
र र त श र प न भ
अ त व भ ह व क ब
त स ल स अ ह
र ह ब र ह ब ....

क्लू :- गोड गळ्याचा गायक राधेची सगळी गाणी हाच म्हणतो

रंगात रंग तो श्यामरंग पाहण्या नजर भिरभिरते
ऐकून ताण विसरून भान हि वाट कुणाची बघते
त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकुनी होई
राधा हि बावरी हरीची .....राधा हि बावरी ...

बाकीचे कुठे गायब आहेत??? Uhoh Uhoh

क्रुश्नाजी आले.. Happy सोप्पा क्ल्यु देते..
क्ल्यु :
१) एका शहराच्या पॉलिटिक्स वर आधारित सिनेमा
२)नायक : हा एका खाण्याच्या सिरियलचा अँकर आहे/सुत्रसंचालन करतो..

अरेच्चा मराठी होते का?

मी आपला कावेरिचे गाणे म्हणून हिंदी शोधत बसलो आणि मला त्यात संजीव कपूर फक्त माहिती स्वैपाकी.. त्याचा सिनेमा कोणता कळेना!! Wink

Pages