सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३२ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.
वसंत ऋतुचे कौतुक करून, ग्रीष्माच्या पाठवणीची तयारी करून, ’वर्षा ’च्या स्वागताला आपण सर्व सज्ज झालो आहोत.
वसंतात नेत्रसुख मिळालं. विविध रंगाने, गंधाने, न्हालेला निसर्ग बघून मन हरखून गेलं. कोकिळकूजनाने कान तृप्त झाले.
ग्रीष्मात रसना तृप्त झाली. आंबे, फ़णस, जांभळं, कलिंगड, करवंद, जांभ, द्राक्षं, अशा विविध, फ़ळांनी आपलं मन जिंकलं.
आणि आता सर्वांना उत्सुकता आहे ती,
"घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा ! "
खरं तर एकच गोष्ट, परत परत घडली तर आपल्याला कंटाळा येतो पण याचे मात्र आपण कौतुक करतो आणि म्हणतो,
" नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा ! "
अशा या पर्जन्यराजाची आपण सर्वच फ़ार आतुरतेने वाट पहात आहोत. आपणच नव्हे तर उन्हाच्या चटक्याने लाही लाही झालेली
ही धरा, आपले अनंत हात पसरून भेटायला येणार्या पर्जन्याची आतुरतेने, नटून थटून वाट पाहत आहे.
पशु, पक्षी, झाडे, वेली, सर्वांनाच आता वेध लागलेत ते पावसाचे. त्यात चिंब भिजण्याचे.
"पाऊस" ! पाऊस म्हटलं की आपण लगेच पोहोचतो बालपणात. थुईथुई नाचनारा मोर, त्या कागदाच्या होड्या करून पाण्यात सोडणं,
मोठ्यांचं लक्ष चूकवून पावसात भिजणं, आणि साठलेल्या पाण्यात उड्या मारून स्वत: व दुसर्याला भिजवणं. अनंत आठवणी!
"पाऊस" ! पाऊस म्हटलं की मला आठवतो आणि आवडतो तो कोकणातला पाऊस. पण त्याच संपूर्ण वर्णन मी शब्दात करूच शकत नाही.
तो ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, पावसाचा थयथयाट, पाण्याचा खळखळाट.
पहिल्या पावसाबरोबर दरवळणारा मृदगंध, ते लाल, मऊ मऊ रेशमी किडे, अंगणभर ऊड्या मारणारी, पायाखाली येणारी, अगदी
नखाएवढी छोटी बेडकांची पिल्ले, आपला पिटुकला देह नाचवत तिरके तिरके पळणारे चामटे, (खेकडे,)
अंगणात पडणार्या पागोळ्या, त्यात हात पाय़ भिजवणं, हळूच पाणी पिणं, हळूच अंगणात धाऊन परत येणं, छत्री घेऊन पावसात फ़िरणं.
घरात गळणार्या पाण्याखाली लावलेली भांडी, आनंदाने डोलणारी हिरवीगार झाडं, छोटे छोटे निर्झर, अळवाच्या पानांवर नाचणारे मोती.
सकाळीच शेतावर खोळ घेऊन निघालेले शेतकरी आणि बैल, बैलांच्या गळ्यातल्या घुगुरांचा नाद, थोड्याच वेळात न्याहारी घेऊन जाणार्या कारभारणी, नदीला आलेला पूर, त्यात वाहून जाणारी झाडे, साप, साकव, आणि ह्या सगळ्यात नम्र होऊन वाचलेली लव्हाळे!
झाडाखाली उगवलेली छोटी छोटी रोपं, आणि त्यात ते काजूचं असेल तर त्यावर मारलेला डल्ला. सगळं कसं लख्ख उभं रहातं डॊळ्यासमोर!
तर अशा या पावसाचं आपण स्वागत करूया आणि एक वाक्य जरूर लक्षात ठेऊया,
"आला पावसाळा, तब्बेत सांभाळा! "
निसर्गाने आपल्याला मुक्त हस्ताने दान केलयं, "घेता किती घेशील दो कराने". पण आपण त्याची योग्य निगा राखली पाहिजे .
त्याचा योग्य उपयोग केला पाहिजे. त्याच संरक्षण, संवर्धन करायला पाहिजे.
वरील मोगर्याच्या अक्षरातील फोटो व मनोगत नि.ग. प्रेमी शोभा हिचे आहे.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825
मध्ये नवऱ्याने apple बोरं
मध्ये नवऱ्याने apple बोरं आणली होती.>> ती कशी असतात बरे?
अशी, फोटो नेटवरुन घेतलाय पण
अशी, फोटो नेटवरुन घेतलाय पण आमच्याकडे हल्ली रोज असतात म्हणुन माहिती आहे
आकार बर्यापैकी मोठा म्हणजे जवळपास चिकु एवढा असतो
नविन वर्षाच्या हार्दिक
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.




सर्वांचे फोटो सुंदर!
सर्वांचे फोटो सुंदर!
धन्यवाद विबी.. मस्त जागू..
धन्यवाद विबी..
मस्त जागू..
ओळखा पाहू मी कोणत्या पक्षाचे
ओळखा पाहू मी कोणत्या पक्ष्याचे पीस आहे?
कांचनची पाकळी आहे ना गजानन
कांचनची पाकळी आहे ना गजानन
अरे बाप रे! पहिल्या फटक्यात
अरे बाप रे! पहिल्या फटक्यात ओळखलेस जागू? __/\__

कांचन..
कांचन..
अरे जागू बोलली का..
ते पिस कसेच दिसत नाही..हाहा
आज मावशीकडे गेले होते, तिच्या
आज मावशीकडे गेले होते, तिच्या कुंडीतील गुलाब
मस्त फोटो!
मस्त फोटो!
गजानन कांचनाच्या फुलाचा फोटो टाकाल का? माहित नाही कसे दिसते ते.
देवकी, उद्या काढतो फोटो.
देवकी, उद्या काढतो फोटो.
धन्यवाद!
धन्यवाद!
VB, मस्त गुलाब..
VB, मस्त गुलाब..
माझ्या अंगणातला पारिजातक ...
माझ्या अंगणातला पारिजातक ...


टीना दिप्ती पारिजात मस्तच
टीना
दिप्ती पारिजात मस्तच
माझ्या अंगणातला पारिजातक ..
माझ्या अंगणातला पारिजातक ...अहा! किती मस्त.
गजानन पण पिसाची कल्पना छान
गजानन पण पिसाची कल्पना छान आहे.
दिप्ती अंगणातील पारीजात सुंदर.
टिना काय सुंदर फुलला आहे ग गुलाब.
उलव्यामध्ये कोणी जात असेल तर पहा पुर्ण रस्ते कांचनच्या झाडांनी बहरले आहेत.
सर्व फोटो भारीच.
सर्व फोटो भारीच.
उलवे कुठे आहे? डोंबिवलीत पण कांचनची झाडं लावली आहेत बऱ्याच ठिकाणी. लहान आहेत पण.
देवकी, कांचनाचे फूल.
देवकी, कांचनाचे फूल.
.

.

सुंदर प्रचि गजानन
सुंदर प्रचि गजानन
Gajaanan,dhanyavaad.खूप सुरेख
Gajaanan,dhanyavaad.खूप सुरेख आहे.माzyaa yenyaajaanyaachyaa vaatevar aahe kaanchan.pan kadhee fule paahilee naahit.
वा कित्ती गोड कांचन. इथे
वा कित्ती गोड कांचन. इथे जास्त पांढऱ्या रंगाची आहेत.
उलवे नवी मुंबईत आहे.
उलवे नवी मुंबईत आहे.
कांचनच फुल सुंदर आहे.
आत्तापर्यंत लावू कि नको या
१. आत्तापर्यंत लावू कि नको या द्विधा मनस्थितीत अडकलेली मी पण माझ्या रुममेट ला एक छोटूसं रोपट गावलं आणि तिने लगेच ते उपडून रिसायकल करुन कुंडी म्हणुन उपयोगात आणलेल्या फुड पार्सलच्या डब्ब्यात लावलेलं हे रानतुळशीचं पिटुकलं लगेच मोठ्ठ झालं बघा..



) पडेल अस वाटत नाहीए..

.
.
.
२. अश्याच एका रोपट्याला हे फळं धरलय.. चांगलं दोन पेराएवढं झालय.. आणखी लागेल कि नाही हि शंकाच आहे कारण कुंड्यांच शॉर्टेज.. ज्यात झाडंं आहे ती कुंडी लहान आहे आणि आत्ताच एका मांजरीच्या हल्यातून फ्रॅक्चर झालेलं हे बिचार अजुन किती तरणार कोण जाणे.. यावरच्या छोट्या छोट्या चिलटांच काय करावं ?
.
.
.
३. कधी नव्हे ते पुदिन्यानं बाळसं धरलय.. तस तर पुदिना वेड्यासारखा वाढतो म्हणतात पण माझ्याचकडे काय प्रॉब्लेम होतो याला कळेना..
मला याला पाणी किती द्यायचं आणि उन्ह कसं हवं याबद्दल कोणीतरी माहिती पुरवा प्लीज..
.
.
.
४. आणि हा पेट्रिया.. एकदाचा वाढायला लागलाय..
नर्सरीच्या पिशवीतुन कुंडीत...कुंडीतुन मोठ्या कुंडीत असं करत करत इथवर आलाय..
मागच्या वर्षी घेतलेलं याला पण खुप स्लो ग्रोथ आहे.. मला वाटलं यंदा मला फुलं पाहायला भेटतील याची पण यावर्षी ते सुखं पदरात (टॉपमधे
आता एकदा वेळ मिळाला कि परत एम्प्रेस गार्डन गाठते आणि पांढरा पेट्रियापन घेऊन येते मस्त..
बागेत त्याचं शेड करायचं आणि मस्त त्या फुलांच्या झुंबराच्या सावलीत चहा पित पुस्तक वाचायच स्वप्न आहे माझं.. किती इमले रचणारे मी कायम्माहित... हाहाहाहा...
.
टिना तुझ्या पदरात (टॉपमध्ये)
टिना तुझ्या पदरात (टॉपमध्ये) हिरव सुख पडो ह्या करीता शुभेच्छा.
फोटो सगळे सुंदर हिरवेगार.
हा फोटो गुगलवरीन घेतला आहे. ही पेट्रीयाची फुले का? मराठी नाव काय आहे?

आरण्यक मधील जीव https://www
आरण्यक मधील जीव https://www.maayboli.com/node/64916
वा टीना, सर्वच भारी.
वा टीना, सर्वच भारी.
माझी टोमाटोची रोपं मोठी होऊन, फुलं होऊन सुकली, पाणी नीट घातलं तरीही. सध्या पावटे शेंगा येतायेत. आता कुंड्या खाली नेऊन ठेवायची वेळ आली. मी माझ्या मागच्या बाजूला मला वरून दिसतील अशाच ठेवणार आहे. विचारलं मी कमिटी मेंबरला जो आमच्या शेजारी राहतो, म्हणजे मला दिसतील माझ्या कुंड्या. पाणी घालायला फेरा पडणार आहे पण हरकत नाही. शेजारचा मुलगा म्हणाला, घालेल watchman पण मी काही सांगणार नाही. मी घालेन.
@ टीना.सगळे प्रचि सुंदर.
@ टीना.सगळे प्रचि सुंदर.
ती कृष्ण तुळस आहे ना? तुळशी वृंदावनात तीच लावतात
अन्जूताई टोमॅटोला कमी पाणी
अन्जूताई टोमॅटोला कमी पाणी लागत.
Pages