एका धावकाचे (म्हणजे माझेच :P ) ‘मैत्री’ खातर आवाहन

Submitted by हर्पेन on 22 May, 2017 - 11:39

एका धावकाचे ‘मैत्री’ खातीर आवाहन

मी बराच काळ कामाच्या निमित्ताने एका गावी फार स्थिर असा राहू शकलो नव्हतो. त्यामुळे मला माझे छंद जोपासायला नीट सलग असा कालावधी मिळालाच नाही. त्याकारणाने माझे छंद एक ना धड भाराभर चिंध्या अशा प्रकारचे आहेत / होते. पण गेले काही वर्षे पुण्यात रहायला आल्यापासून जीवनाला जरा स्थिरता आली आणि मग साधारण एकाच सुमारास चालू झाले, मैत्री (नावाची एक संस्था जी मेळघाटात काम करते तिच्या) करता स्वयंसेवक म्हणून काम करणे आणि माझे धावणे.

माझ्या धावण्याच्या अगदी सुरुवातीच्या दिवसापासूनच्या प्रवासाला मायबोली साक्षी आहे. तसेच माझ्या मेळघाटातल्या अनुभव लिखाणाबरोबर ‘मैत्री’ ला मदत करा अशा केलेल्या आवाहनाला देखील अनेक मायबोलीकर कायमच प्रतिसाद देत आले आहेत. काही मायबोलीकरांनी तर मेळघाटात प्रत्यक्ष जावून स्वयंसेवक म्हणूनही काम केले.

आता ह्या दोन्हीचा इथे / परस्परांशी काय संबंध असे वाटणे स्वाभाविक आहे. तर तो संबंध असा.

मी आता यावर्षी ९ सप्टेंबर रोजी लदाख येथे होणाऱ्या खारदुंग ला चेलेंज मध्ये भाग घेण्याचे ठरवले आहे. ही स्पर्धा लेह पासून चालू होउन खारदुंग ला आणि परत लेह अशी एकूण ७२ किमी अंतराची आहे.

अधिक माहीती http://ladakhmarathon.com/races/khardung-la-challenge/

तसे पाहता मी आजवर चार वेळा मुंबई मॅरेथॉन, एकदा हैदराबाद आणि एक कच्छच्या रणातली अशा सहा पूर्ण मॅरेथॉन (४२.२ किमी) तसेच लोणार येथील ५० किमी ची अल्ट्रा अशा शर्यती पार पाडल्या आहेत. पण तरीही ही अल्ट्रा माझ्याकरता खरोखरच मोठे आव्हान आहे.

मी माझ्या परीने सगळ्याप्रकारची तयारी चालू केल्ये. रजा मिळवून झाल्ये, जाण्यायेण्याची तिकीटे काढून झालेली आहेत. वेळापत्रकानुसार धावणे सुरु केले आहे. ( मागच्या आठवड्या पर्यंत सरासरी ६० ते ७० किमी धावणे करत होतो ह्या आठवड्यातले ध्येय एकूण १०० किमी आहे)

इतक्यातच 'मैत्री' संस्थेला त्यांचे मेळघाटातील उपक्रम चालू ठेवण्याकरता निधी कमी पडतोय अशी बातमी कळली. त्यामुळे मी ही स्पर्धा मैत्री संस्थेच्या कार्याला समर्पित करायचे ठरवले आहे आणि माझी अशी आकांक्षा / संकल्प आहे की या तीन-चार महिन्यात ‘मैत्री’ च्या मेळघाटातील कामाकरता किमान १००० रुपये देणारे किमान ७२ दाते तयार करायचे.

मैत्री संस्थेचे मला भावलेले वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या सामाजिक, आर्थिक, राजकीय पार्श्वभूमी असले ल्या नागरिकांचे एका चांगल्या कामाकरता एकत्र येणे आणि तब्बल वीस वर्षे ते काम चालू ठेवणे. फक्त अडीच माणसे सोडली तर बाकी सर्व जण मैत्रीकरता काम विनामुल्य / स्वयंसेवा म्हणून करतात. ओव्हरहेड जवळ जवळ नाहीच. मेळघाटातल्या लोकांना औषधे सोडली तर वैयक्तिक वापराच्या कुठल्याही वस्तू फुकट वाटत नाहीत. सामुहिक वापराकरता सोलर वर चालणारा पंप आणि पाण्याची टाकी बसवून दिली पण त्याची देखभाल स्थानिक रहिवाश्यांकडून वर्गणी काढून केली जाते. स्थानिक लोकांनी आत्मनिर्भर व्हावे म्हणून प्रयत्न केले जातात. शाळा चालाव्यात म्हणून शैक्षणिक साहित्य दिले जाते. सध्या चालू असलेल्या योजनांचा ही सगळा भर कौशल्ये विकास (skill buildng/ development), व्यवसाय निर्मिती व उद्योजकता, सरकारी योजनांविषयी माहिती व पाठपुरावा, सेंद्रिय व पारंपारिक शेतीमधून उत्पादकता वाढवणे अशा कार्यक्रमांवर आहे.
अधिक माहीती करता - http://www.maitripune.net/Home.html

मी स्वतः काही वेळा काही दिवसांकरता मेळघाटात स्वयंसेवक म्हणून जाऊन आलो आहे.

तर अशा 'मैत्री' खातर ज्यांना जसे शक्य होईल तसे त्याप्रमाणे, यथाशक्ती यथामती जी काही रक्कम देउ करायची असेल ती मैत्रीच्या खात्यावर परस्पर जमा करावी अशी मी विनंती करतो.

देणगी: “मैत्री” या नावाने चेक / रोख देणगी म्हणून देता येईल.
“मैत्री”साठी दिलेल्या देणग्या आयकर कायद्याच्या ८०जी खाली करमुक्त आहेत.

ONLINE DOMESTIC DONATION
Maitri Account Details (avail this facility at no cost)
Bank : H D F C Bank
Branch : Kothrud, Pune
Savings Account Number : 01491450000152
Account Name : Maitri
MICR : 411240009
Details for RTGS / NEFT / IFS Code : HDFC0000149

ONLINE FOREIGN DONATION
Maitri Account Details (avail this facility at no cost)
Bank : H D F C Bank Limited
Branch : Kothrud, Pune, Maharashtra, India.
Savings Account Number : 01491170000017
Account Name : Maitri
MICR Code : 411240009
Swift Code : HDFCINBB

जे कोणी जी काही रक्कम जमा करेल त्यांनी इथे तसे कळवावे. जर कोणाला स्वत:चा नामोल्लेख नको असेल तर त्यांनी मला तसे संपर्कातून (९८८११५२८८४) कळवल्यास त्यांनी दिलेली रक्कम अनामिक देणगीदाराकडून म्हणून नमूद करण्यात येईल. रक्कम परस्परच जमा करायची आहे मात्र केली की इथे जरूर कळवा. तसेच मी 'खारदुंग ला' करता करत असलेल्या तयारीबद्दलही वेळोवेळी इकडे कळवत राहीनच पण असे (मनोरंजन मुल्य नसलेले) धागे लगेच मागे जातात म्हणून वेळोवेळी मला शुभेच्छा देत राहून ह्या धाग्याला वर आणत रहा. कृपया धन्यवाद Happy

आठवडा पहिला - देणगीदार ६ - जमा झालेली रक्कम रुपये ३२००१/-
आठवडा दुसरा - देणगीदार ७ - जमा झालेली रक्कम रुपये ११६१२/-
आठवडा तिसरा - देणगीदार ४ - जमा झालेली रक्कम रुपये ५०००/-
आठवडा चौथा - देणगीदार ६ जमा झालेली रक्कम रुपये १०००१/-
आठवडा पाचवा - देणगीदार ४ जमा झालेली रक्कम रुपये १००००/-
आठवडा सहावा - 'जैसे थे' परिस्थिती
आठवडा सातवा - देणगीदार १६ जमा झालेली रक्कम रुपये २२५००/- एकूण (४३/७२) (९२११४/- /७२०००/-)
आठवडा आठवा चालू

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज पुणे ते लव्हासा धावलो. म्हणजे टोल/ वाहन प्रवेश फी घेतात तिथपर्यंत धावलो. एकूण अंतर ४९ किमी, लागलेला वेळ ६ तास.
बरोबर बरीच मित्रमंडळी होती.
सविस्तर वृत्तांत नंतर

काल लव्हासा करता पहाटे ४:२० वा टिळक तलावापासून धावायला सुरुवात केली, बरोबर राम यादव, निखिल, पन्नु , शँनन, अमन दीप, आणि सपोर्ट करता अभिनव अशी मोठी टोळी होती. त्यातले राम, निखिल अमन दीप ह्यांनी पूर्ण अंतर धावून संपवले. अरुण नेहेमीप्रमाणे वाटेत आम्हाला सामील झाला, त्याची बाईक शेनन ने घेतली आणि तो ही सपोर्ट करू लागला. नंतर सुनील आम्हाला परत नेण्यासाठी कार घेऊन आला होता तोही शेवटचे ५ किमी धावला.

मार्ग असा होता
कर्वे रस्ता, पौड फाटा, चांदणी चौक, भूगाव, पिरंगुट, मुठा घाट, मुठा गाव, आंदगाव, टेमघर धरणा च्या भिंतीसमोरून मग पार लव्हाशाच्या गेट पर्यंतचा घाट.
मुठा घाट संपवून गावात पोचेपर्यंत मस्त चाललं होतं नंतर मग टेमघर धरणाची भिंत येता येईना, आणि मग अखेर आली तेव्हा लगेचच घाट घेऊन आली Happy
४० किमी धावल्यानंतर शेवटचे १० किमी घाट रस्ता चढणे लईच अवघड काम, मधल्या तीव्र चढाच्या पॅचेस वर, यु टर्न वर चाललो, श्वासावर नियंत्रण आणून मग परत धावलो. अशा चढावर सपोर्ट करणारे, प्रोत्साहन देत असताना देखील चिडवताहेत असे वाटू लागते Proud
पण शेवटी दीडेक किमी समतल रस्ता होता तो मात्र धावूनच पार पाडला.
या रस्त्यावर टेमघर च्या पुढे या आधी कधीही अगदी सायकलीवरही आलो नव्हतो. मुठा घाट माथ्यापर्यंत माबोवरच्या केदार आणि पिंगू यांच्या बरोबर सायकलवर आलो होतो त्याची सुखद आठवण झाली.

पावसानंतर हिरवाईने शालू वगैरे ल्यालेली धरती बघून निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घ्यायची ताकद जाताना अजिबात उरली नव्हती पण हवामान आल्हाद दायक असल्याने धावण्याकरता खूप मस्त वातावरण होते.

कार मधून परत येताना मात्र निर्मळ आनंद घेत आलो.

या शनिवार रविवारी मिळून ट्रेनिंग मधला एक मोठा टप्पा नीटपणे पार पडला त्याचे अतीव समाधान आहे.

बरोबर सपोर्ट करायला येणारे आणि सदिच्छा देणारे मित्र ह्या सर्वांकरता मनात ओतप्रोत कृतज्ञता आहे.

हर्पेनदा, बर्‍याच दिवसांनी धाग्यावर आलो.
मागच्या महिन्यात पुण्यात होतो, पावसात कुठे बाईक वर हिंडायचं कसा कंटाळा करत सुट्टी संपवली. त्याच रस्त्यावरुन तू ४९ किमी धावलास हे वाचून अजूनच ओशाळल्यासारखं होतंय. _/\_
उपक्रमाला पुनःश्च शुभेच्छा.

मित, सध्या माझ्याकडे कारण आहे म्हणून मी करतोय हे नाहीतर मी पण घरकोंबडे पणा करतो बरेचदा.

मामी, थक्क तर मी पण आहे, आपल्याच कॅपॅसिटीची जाणीव आपल्याला नसते.

मी नेहेमी म्हणतो तसे, मी करू शकतोय हे तर इतर कोणीही करू शकेल.

आज प्रवीण झेले सोबत काही वेळ धावलो. त्याचा अनवाणी पायांनी २१ किमी धावण्याचा सलग १००वा दिवस, त्यामुळे त्याच्या सोबत निदान १० किमी तरी धावायचा विचार होता, जरा लवकर पोचल्याने १२ किमी धावू शकलो.
त्याच्या सोबत धावायला विद्यापीठात बरेच जण आले होते.
१०० दिवस सलग रोज २१ किमी धावणे म्हणजे जंक्शन काम!
मस्त वाटलं Happy

मागच्या आठवड्यात एकूण ९ जणांनी मिळून रुपये ३००००/- मैत्रीला दिले आहेत. २ जणांनी १० हजार, ३ जणांनी २ हजार, आणि ४ जणांनी १ हजार अशा प्रकारे ही रक्कम जमा झाली आहे.

आजवरचे एकूण देणगीदार ६०
आजवरची एकूण देणगी १,५०,११४/-

मागच्या आठवाड्याअखेर खूप मस्त वाटतंय.
दोन्ही बाबतीत ७२ हा आकडा आवाक्यात आल्यासारखा वाटतोय. Happy

आज ११ किमी धावलो. सुरुवात अडखळत झाली पण ३-४ किमी नंतर लय सापडली. चतुःशृंगी देवळाच्या पायऱ्या एकदा चढून उतरलो, घरी आल्यावर योगासने केली.

---/\---
पुण्यात येउनही फोन करु शकलो नाही, त्याबद्दल सॉरी मालक.
तयारी जोरात चालु आहे तुझी
लव्हासाला पळत !!! महान आहेस तु !!!!

अरे आदित्य येऊन गेलासही! का कोण जाणे मला तू पुढच्या आठवड्यात येणार असेच डोक्यात बसले होते, १५ ऑगस्ट च्या आधी च्या शनिवार रविवारी. हरकत नाही, पुढच्या खेपेस भेटू. होपफुली माझ्याकडे मेडल असेल दाखवायला Happy

आज धावण्याला सुट्टी Happy

आजही ५ तासाचे धावणे लव्हासा रस्त्यावर केले. बरोबर अमनदीप होता.
अरुण आणि प्रदीप सपोर्ट करता बाईकवर आले होते, त्यांच्याच बरोबर परत आलो.
मी साडे पाच तास लावून ४६ किमी धावलो. (शेवटचे ३ किमी नाही धावलो)

सही

आज नेहेमीच्या रस्त्यावर टिळक तलावा पासून सुरु करून पहिली फेरी २० किमी ची आणि नंतर १६ किमी ची असे एकूण ३६ किमी धावलो. पहिल्या फेरीच्या वेळेस सोबत धावायला अमनदीप आणि वॉटर सपोर्टकरता राम आणि राजश्री थेट खराडी वरून सकाळी ४ वाजता आले होते. दुसऱ्या फेरीच्या वेळेस राम अरुण सुनील सुधाकर हेही सोबत धावले. अशा रीतीने ट्रेनिंग मधला सर्वात जास्त अंतराचा टप्पा पार पडला.
आता येणाऱ्या २ विकांतांना धावायचे अंतर कमी होत जाणार, तिसऱ्या विकांताला मी लडाख मधे असेन चौथा विकांत स्पर्धा Happy

रेस्ट अँड रिकव्हरी वर लक्ष केंद्रित करायचे दिवस

आदित्य Happy
केश्वे आकडे उलट सुलट वाचायचे म्हणजे पूर्वपदावर यायला होईल Wink

मला ते धावण्याचे किलोमीटरमधले आकडे पाहूनच चक्कर येतेय. >>> +१

हर्पेन तयारी तर जोरदार चालुच आहे , तुझे प्लॅनिंगही फार उत्तम आहे.
परत एकदा ऑल द बेस्ट

अदित्य, देवकी, जिज्ञासा, धनश्री अनेकानेक धन्यवाद

देवकी - मी सहजपणे म्हणतोय असे वाटत असेल तर माझी लिहिण्यातली उणीव म्हणावे लागेल, कारण यावेळी वाईट हालत झालेली एकदम, ते शेवटचे ३ किमी जमले नाहीत मला. सर्दी , वाहते नाक, त्यामुळे श्वास घ्यायला न सापडलेली लय, पोटर्‍यात येऊ लागलेले गोळे.... बापरे !
फार कठीण गेले असते ते शेवटचे ३ किमी. दुखापतीच्या धसक्याने नाही केले मग. जे केले तेच कसेबसेच केले
अर्थात माझ्या प्लॅननुसार धावायचे अंतर पुरे झाले असल्याने समाधान आहे.

नेटवर अल्ट्रा मॅरॅथॉन करता अनेक ट्रेनिंग प्लॅन आहेत पण मला आधीच अल्ट्रा त्यातून विरळ हवेकरता असा काही मिळाला नाही मग थोडे फेर्फार केले आणि वळवून घेतला. या वेळी एकूण प्लॅन पैकी केवळ दोन -तीन वेळेसच रन चुकवली असेन मी, त्यामुळे खरेतर प्लॅनिंगपेक्षा अंमलबजावणी बद्दल खूष आहे स्वतःवरच.

आज कोरेगाव पार्क, कल्याणीनगर मधे १२ किमी धावलो. मोठी गँग होती. आमचे बरेच मित्र येत्या रविवारी असलेल्या हैदराबाद मॅरॅथॉन मधे भाग घेण्यासाठी जात आहेत त्यांना शुभेच्छा देण्याकरता सगळे एकत्र जमलो होतो. बरेच दिवसांनी जमलो आणि खूप दिवसांनी कोरेगाव पार्कात धावलो त्यामुळे खूप मजा आली.

मागच्या आठवड्यात मिळालेल्या देणग्यां बाबत तपशील खालीलप्रमाणे
४ देणगीदार, ९००० रुपये देणगी रक्कम
५०००ची एक, २००० ची एक आणि १००० च्या दोन

आजवरचे एकूण देणगीदार ६४
आजवरची एकूण देणगी रक्कम १,५९,११४/-

सर्व देणगीदारांना आणि शुभेच्छुकांना मनापासून धन्यवाद.

देवकी - मी सहजपणे म्हणतोय असे वाटत असेल तर माझी लिहिण्यातली उणीव म्हणावे लागेल>>>>> अरे तसे नाही हो. ४६ किमी धावलो,हे आकडे ऐकूनच गपगार व्हायला होते.

धनश्री, मला किती जास्त जेवायला लागेल याचा विचार करत होतो Proud

देवकी, बरोबरे तुमचं म्हणणं कसं कोण जाणे माझ्या कडून भरपूर अंतर ह्या स्पर्धेच्या निमित्ताने धावले जातेय हे मात्र खरे, मलाही अचंबा वाटतोय Happy

आज तळजाई टेकडी रस्त्यावर २वेळा वरखाली करण्या बरोबरच एकूण १० किमी धावलो.

Pages