एका धावकाचे ‘मैत्री’ खातीर आवाहन
मी बराच काळ कामाच्या निमित्ताने एका गावी फार स्थिर असा राहू शकलो नव्हतो. त्यामुळे मला माझे छंद जोपासायला नीट सलग असा कालावधी मिळालाच नाही. त्याकारणाने माझे छंद एक ना धड भाराभर चिंध्या अशा प्रकारचे आहेत / होते. पण गेले काही वर्षे पुण्यात रहायला आल्यापासून जीवनाला जरा स्थिरता आली आणि मग साधारण एकाच सुमारास चालू झाले, मैत्री (नावाची एक संस्था जी मेळघाटात काम करते तिच्या) करता स्वयंसेवक म्हणून काम करणे आणि माझे धावणे.
माझ्या धावण्याच्या अगदी सुरुवातीच्या दिवसापासूनच्या प्रवासाला मायबोली साक्षी आहे. तसेच माझ्या मेळघाटातल्या अनुभव लिखाणाबरोबर ‘मैत्री’ ला मदत करा अशा केलेल्या आवाहनाला देखील अनेक मायबोलीकर कायमच प्रतिसाद देत आले आहेत. काही मायबोलीकरांनी तर मेळघाटात प्रत्यक्ष जावून स्वयंसेवक म्हणूनही काम केले.
आता ह्या दोन्हीचा इथे / परस्परांशी काय संबंध असे वाटणे स्वाभाविक आहे. तर तो संबंध असा.
मी आता यावर्षी ९ सप्टेंबर रोजी लदाख येथे होणाऱ्या खारदुंग ला चेलेंज मध्ये भाग घेण्याचे ठरवले आहे. ही स्पर्धा लेह पासून चालू होउन खारदुंग ला आणि परत लेह अशी एकूण ७२ किमी अंतराची आहे.
अधिक माहीती http://ladakhmarathon.com/races/khardung-la-challenge/
तसे पाहता मी आजवर चार वेळा मुंबई मॅरेथॉन, एकदा हैदराबाद आणि एक कच्छच्या रणातली अशा सहा पूर्ण मॅरेथॉन (४२.२ किमी) तसेच लोणार येथील ५० किमी ची अल्ट्रा अशा शर्यती पार पाडल्या आहेत. पण तरीही ही अल्ट्रा माझ्याकरता खरोखरच मोठे आव्हान आहे.
मी माझ्या परीने सगळ्याप्रकारची तयारी चालू केल्ये. रजा मिळवून झाल्ये, जाण्यायेण्याची तिकीटे काढून झालेली आहेत. वेळापत्रकानुसार धावणे सुरु केले आहे. ( मागच्या आठवड्या पर्यंत सरासरी ६० ते ७० किमी धावणे करत होतो ह्या आठवड्यातले ध्येय एकूण १०० किमी आहे)
इतक्यातच 'मैत्री' संस्थेला त्यांचे मेळघाटातील उपक्रम चालू ठेवण्याकरता निधी कमी पडतोय अशी बातमी कळली. त्यामुळे मी ही स्पर्धा मैत्री संस्थेच्या कार्याला समर्पित करायचे ठरवले आहे आणि माझी अशी आकांक्षा / संकल्प आहे की या तीन-चार महिन्यात ‘मैत्री’ च्या मेळघाटातील कामाकरता किमान १००० रुपये देणारे किमान ७२ दाते तयार करायचे.
मैत्री संस्थेचे मला भावलेले वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या सामाजिक, आर्थिक, राजकीय पार्श्वभूमी असले ल्या नागरिकांचे एका चांगल्या कामाकरता एकत्र येणे आणि तब्बल वीस वर्षे ते काम चालू ठेवणे. फक्त अडीच माणसे सोडली तर बाकी सर्व जण मैत्रीकरता काम विनामुल्य / स्वयंसेवा म्हणून करतात. ओव्हरहेड जवळ जवळ नाहीच. मेळघाटातल्या लोकांना औषधे सोडली तर वैयक्तिक वापराच्या कुठल्याही वस्तू फुकट वाटत नाहीत. सामुहिक वापराकरता सोलर वर चालणारा पंप आणि पाण्याची टाकी बसवून दिली पण त्याची देखभाल स्थानिक रहिवाश्यांकडून वर्गणी काढून केली जाते. स्थानिक लोकांनी आत्मनिर्भर व्हावे म्हणून प्रयत्न केले जातात. शाळा चालाव्यात म्हणून शैक्षणिक साहित्य दिले जाते. सध्या चालू असलेल्या योजनांचा ही सगळा भर कौशल्ये विकास (skill buildng/ development), व्यवसाय निर्मिती व उद्योजकता, सरकारी योजनांविषयी माहिती व पाठपुरावा, सेंद्रिय व पारंपारिक शेतीमधून उत्पादकता वाढवणे अशा कार्यक्रमांवर आहे.
अधिक माहीती करता - http://www.maitripune.net/Home.html
मी स्वतः काही वेळा काही दिवसांकरता मेळघाटात स्वयंसेवक म्हणून जाऊन आलो आहे.
तर अशा 'मैत्री' खातर ज्यांना जसे शक्य होईल तसे त्याप्रमाणे, यथाशक्ती यथामती जी काही रक्कम देउ करायची असेल ती मैत्रीच्या खात्यावर परस्पर जमा करावी अशी मी विनंती करतो.
देणगी: “मैत्री” या नावाने चेक / रोख देणगी म्हणून देता येईल.
“मैत्री”साठी दिलेल्या देणग्या आयकर कायद्याच्या ८०जी खाली करमुक्त आहेत.
ONLINE DOMESTIC DONATION
Maitri Account Details (avail this facility at no cost)
Bank : H D F C Bank
Branch : Kothrud, Pune
Savings Account Number : 01491450000152
Account Name : Maitri
MICR : 411240009
Details for RTGS / NEFT / IFS Code : HDFC0000149
ONLINE FOREIGN DONATION
Maitri Account Details (avail this facility at no cost)
Bank : H D F C Bank Limited
Branch : Kothrud, Pune, Maharashtra, India.
Savings Account Number : 01491170000017
Account Name : Maitri
MICR Code : 411240009
Swift Code : HDFCINBB
जे कोणी जी काही रक्कम जमा करेल त्यांनी इथे तसे कळवावे. जर कोणाला स्वत:चा नामोल्लेख नको असेल तर त्यांनी मला तसे संपर्कातून (९८८११५२८८४) कळवल्यास त्यांनी दिलेली रक्कम अनामिक देणगीदाराकडून म्हणून नमूद करण्यात येईल. रक्कम परस्परच जमा करायची आहे मात्र केली की इथे जरूर कळवा. तसेच मी 'खारदुंग ला' करता करत असलेल्या तयारीबद्दलही वेळोवेळी इकडे कळवत राहीनच पण असे (मनोरंजन मुल्य नसलेले) धागे लगेच मागे जातात म्हणून वेळोवेळी मला शुभेच्छा देत राहून ह्या धाग्याला वर आणत रहा. कृपया धन्यवाद 
आठवडा पहिला - देणगीदार ६ - जमा झालेली रक्कम रुपये ३२००१/-
आठवडा दुसरा - देणगीदार ७ - जमा झालेली रक्कम रुपये ११६१२/-
आठवडा तिसरा - देणगीदार ४ - जमा झालेली रक्कम रुपये ५०००/-
आठवडा चौथा - देणगीदार ६ जमा झालेली रक्कम रुपये १०००१/-
आठवडा पाचवा - देणगीदार ४ जमा झालेली रक्कम रुपये १००००/-
आठवडा सहावा - 'जैसे थे' परिस्थिती
आठवडा सातवा - देणगीदार १६ जमा झालेली रक्कम रुपये २२५००/- एकूण (४३/७२) (९२११४/- /७२०००/-)
आठवडा आठवा चालू
आज तळजाई टेकडीवर ४ वेळा
आज तळजाई टेकडीवर ४ वेळा वरखाली धावलो. वॉर्मअप सकट एकूण १६ किमी धावलो.
ट सर, जिन्यांवर पळण्याचा सराव सर्वात जास्त दमवतो - हे बाकी अगदी खरं आहे. काल चतु:शृंगी देवळाच्या पायर् या जरा कुठे वरखाली केल्या तर टाच-पोटरीपासचे स्नायु 'आहोत' 'आहोत' अशी जाणीव करून देताहेत लगेच आज.
पण अर्थात ह्या व्यायामामुळे पायांमधली आणि फुफ्फुसांची ताकद पण जबरदस्त वाढते.
_/\_
_/\_ वाचतोय
वाचतेय.... फोटो खूपच छान !
वाचतेय.... फोटो खूपच छान ! सगळ्या स्तरावरची तयारी मस्त चाललीये .... इथले अपडेटस वाचून इतकं छान वाटतंय ना ... लगे रहो...
धन्यवाद स_सा आणि मंजूताई.
धन्यवाद स_सा आणि मंजूताई.
कालचा दिवस धावपळीचा गेल्याने इथे येता आले नाही. कालच्या दिवशी तसेही धावायला सुट्टी होती. त्यामुळे लिहिण्यासारखे काही नव्हतेच.
आज ४ तास धावलो एकूण ३७ किमी अंतर पार केले. मधेच जोरात पाऊस लागला होता. संपुर्ण ओलेचिंब व्हायला झाले. वाहत्या पाण्यात फताक फताक करत , पळता पळता पायाने पाणी उडवत जाताना परत एकदा लहानपण जगायला मिळाले. मजा आली.
एकदा लहानपण जगायला मिळाले.
एकदा लहानपण जगायला मिळाले. मजा आली. >>> मस्तच.
एकदा लहानपण जगायला मिळाले.
एकदा लहानपण जगायला मिळाले. मजा आली. >>>> आपल्यात एक लहान मुल दडलेलंच असतं आपण त्याला दडपून टाकत असतो ह्या पळण्यामुळे एन्जोय केलंत.. मस्त वाटलं
समृद्धमय प्रवास !
स्वतःच्या तब्येतीची काळजीही
स्वतःच्या तब्येतीची काळजीही घ्या हर्पेन, एवढं भिजलात तर काढा वगैरे करुन प्या.
हो अन्जू. काळजी घेतोच
हो अन्जू. काळजी घेतोच यापुढेही घेत जाईन. ऑफीसात गरम पाण्यावर भागवावे लागेल. तसेही काढा वगैरे फार काही आवडत नाही.

मंजूताई, मी लिहितो ते वाचून तुम्हाला मस्त वाटतं जे तुम्ही इथे लिहिता आणि मग ते वाचल्यावर मलाही मस्त वाटतं
हर्पेन, गिरनारचा एक डीटॉक्स
हर्पेन, गिरनारचा एक डीटॉक्स ग्रीन टी आलाय, हर्बज अँड स्पायसेस वाला. तो पिऊन बघा. टेस्टी तिखट आहे. मलापण काढा नाही आवडत, मी केला तरी मी पित नाही फार. पण हे आवडलं मला. गरम पाण्यात डीप करायचं.
आज सकाळी साडेपाच वाजता
आज सकाळी साडेपाच वाजता धावायला सुरु केले आणि साडे नऊ वाजता संपवले. घरापासून बोपदेव घाट माथा आणि मग अडीच-तीन तासच झाले होते म्हणून मग तिकडेच परत एकदा घाट वर पर्यंत चढून उतरलो तरी ही साडेअतीन तासच झाले होते मग धावत खडी मशीन चौकातून कोंढव्या कडे जायच्या रस्त्यावर चार तास पुर्ण झाले. नंतर आरजू म्हणून रे स्टॉरंट आहे तिथे ब्रेक्फा स्ट केला आणि तिथला ब्लॅक टी प्यायला ऑलमोस्ट काढाच होता
कहाव्यासारखा पण वेगळा गरमागरम चहा पिताना अन्जू यांची आठवण काढली. 
आजचे अंतर नीट मोजावे लागेल. घाट रस्त्याच्या चढावर वेग कमी होत असल्यामुळे जेम्तेम ३२ किमी झाले असावे असा अंदाज आहे.
सलग दोन दिवस सकाळी चार तास पळून मस्त वाटत आहे.
हर्पेन, मला high altitude
हर्पेन, मला high altitude वरचा acclimatization चा सराव असंच विचारायचं होतं. तुम्ही म्हणता तसं काही दिवस आधी तिथे जाऊन प्रॅक्टिस केल्याने तो होत असेल तर उत्तमच!
कहाव्यासारखा पण वेगळा गरमागरम
कहाव्यासारखा पण वेगळा गरमागरम चहा पिताना अन्जू यांची आठवण काढली. >>> थँक्स, तो गिरनारचा पण कहावा लिहीलंय त्याच्यावर. मी आपला चहा मात्र पित नाही अजिबात.
आज काहीही केले नाही.
आज काहीही केले नाही.
मी ऐकून आहे की हा जिन्यांवर
मी ऐकून आहे की हा जिन्यांवर पळण्याचा सराव सर्वात जास्त दमवतो>>>> खरं आहे.
हर्पेन , गुड गोइंग
धन्यवाद जाई. जिना चढ उताराचा
धन्यवाद जाई. जिना चढ उताराचा अनुभव स्वतः घेतलेला दिसतोय
तर मंडळी आज सोमवार, मागच्या आठवड्यात किती जणांनी किती रक्कम जमा केली ह्यबद्दल माहिती देतो. तर कळवण्यास आनंद होत आहे की, मागच्या आठवड्यात ४ जणांनी मिळून १६००० रुपये मैत्रीकडे जमा केलेत. एकाने ११००० एकाने ३००० आणि दोन जणांनी १००० अशा रितीने ही रक्कम जमा झाल्ये.
सगळ्या देणगीदारांचे आभार !
आज काहीही केले नाही. Happy>>>
आज काहीही केले नाही. Happy>>>> हे ही वाचून छान वाटतं कारण आम्ही वाचूनच दमलेलो असतो
जिना चढ उताराचा अनुभव स्वतः
जिना चढ उताराचा अनुभव स्वतः घेतलेला दिसतोय >>>हो .हेवी वर्क आउट करताना ट्रेनरने करायला लावलेलं. घामटा निघालेला .
हे ही वाचून छान वाटतं कारण
हे ही वाचून छान वाटतं कारण आम्ही वाचूनच दमलेलो असतो >>> मम.
आज १६ कि मी धावलो. ८ किमी
आज १६ कि मी धावलो. ८ किमी च्या दोन फेर्या मारल्या. पहिल्या फेरीच्या वेळेस राम अय्यर बरोबर होता दुसरी फेरी एकट्यानेच मारली. दुसर्या फेरीच्या वेळेस (जाईच्या प्रतिसादातून स्फुर्ती घेऊन) चतु:शृंगी मंदीरच्या पायर्या चढून उतरलो. चढताना जितका त्रास वाटला तितकाच आनंद शरीराला आलेल्या हलकेपणा मुळे वाटला.
ट्रेनिंग असे करा की प्रत्यक्ष स्पर्धा सोपीच वाटली पाहिजे.
एकाच मार्गावर रोज रोज पळून कंटाळा येतो खरा पण नियमितपणामुळे आपल्या सारखे दुसरे चालणारे / धावणारे अनेक लोक तोंडओळखीचे होतात. आपली विपु करतात ते खूप भारी वाटते. दुसर्या फेरीच्या वेळेस असेच एकांनी (तसं पाहिले तर फक्त इतकेच) विचारले, "आज दुसरी फेरी वाटतं?" (पण) त्यामुळे पण मस्त वाटले एकटेपणाची भावना निघून गेली. त्या जोरावर पुढचे बरेच अंतर तरंगत गेल्यासारखे चटकन संपले.
__/\__
__/\__
I feel so proud of u when I read all this
रीया __/\__
रीया __/\__
आज ८ किमी धावलो. आज चतु:शृंगी मंदीराच्या पायर्या चार वेळा चढून उतरलो.
आज ८ किमी धावलो. आज चतु:शृंगी
आज ८ किमी धावलो. आज चतु:शृंगी मंदीराच्या पायर्या चार वेळा चढून उतरलो. >>>>>> बापरे
ईथे मी ४ माळे सलग चढले तरी स्वतः वर खुश होते.
माझापण ____/\___
मस्तच हर्पेन
मस्तच हर्पेन
गेले काही दिवस जरा कामात व्यग्र होतो, प्रतिसाद द्यायला जमलं नाही
पण रोजची अपडेट आवर्जुन वाचत आहे
नमस्कार आणि धन्यवाद VB ,
नमस्कार आणि धन्यवाद VB , आदित्य. (Its ok Aditya)
आज तळजाई टेकडी रस्त्यावर वरखाली धावलो. एकूण १५ किमी अंतर झाले असेल.
मस्त चालु आहे तयारी
मस्त चालु आहे तयारी
काल आरामाचा दिवस होता का?
हो आदित्य काल आरामाचाच दिवस
हो आदित्य काल आरामाचाच दिवस होता, आज धावायचा दिवस होता पण काल रात्री अंगदुखी कणकण ताप आल्यासारखा वाटल्यामुळे आणि जोरदार पावसामुळे आजही सरावाला दांडीच मारली.
पहिल्यांदाच असे होतेय की लाँगरनच्या दिवशी गॅप घ्यावी लागत्ये. पण फंडा क्लियर आहे मेजर आजारी पडायचे नाहीये आणि दुखपतग्रस्त व्ह्यायचं नाहीये. त्यामुळे नो रिग्रेटस !
उद्या बद्दलही अजून विचारच करतोय.
आज विचार असा केला की जास्त
आज विचार असा केला की जास्त काही झाले तर मधल्या सरावात गॅप घेऊ पण रवीवारची लाँग रन हुकवायला नको.
आजचा अरूण च्या डोक्यातून आलेला आणि खूप दिवस न करू शकलेला प्लॅन होता, दांडेकर पूलापासून सिंहगड किल्ल्याच्या माथ्यापर्यंत घाटरस्त्याने वर जा यचे आणि परत घाटरस्त्ययाने गडाच्या पायथ्याशी धावत परत यायचे. येताना बसने परत.
सिंहगड धावत या अधी बरेच वेळा केलाय पण तो पायथ्यापासून चालू करून. यावेळी १७ किमी अंतर आधीच धावून संपवलेले असणार होते. त्यामुळे आणि कालच्या अंगदुखी-तापामुळे मनात जरा धाकधूक होती पण बरोबर दोन मित्र अमनदीप आणि निखिल नक्की येणार होते त्यामुळे ठरवले चालू तर करू मग जितके जसे जमेल तसे पळायचे. बरोबर पाठीवर पिशवी घेऊन धावलो. त्यात टीशर्ट जर्कीन पाणी आणि ईलेक्ट्रॉल घेतले होते. गडाच्या पायथ्यापर्यंत मस्त गेलो धावणे चालू करून चार वर्षे झाली, पुण्यातले बरेच रस्ते धावून झाले पण सिंहगड रस्त्यावरून पार गडापर्यंत पहिल्यांदाच धावत होतो.
घाटरस्त्याच्या सुरुवातीच्या २-३ किमी मधेच पोटर्यांमधे गोळे आल्यासारखे जाणवले मग लगेच उरलेले सगळे ईलेक्ट्रॉल संपवले आणि थोडेसे अंतर चाललो नंतरही वाटेतल्या खोपटात सरबत पिण्यासाठी थांबलो होतो. बरोबरचे दोघेही पुढे निघून गेले होते ते परत येताना दिसले की मी पण वळणार असे ठरवले कारण शेवटचा चढ अती भयानक आहे. त्याप्रमाणे सिंहगड माथा २ किमी दर्शवणारा दगड ओलांडून अर्धा किमी पण पुढे असेल नसेल तिकडे अमनदीप परत येताना दिसला त्याच्या बरोबर परत वळलो आणि धावत खाली आलो. असे एकूण ३३ किमी अंतर धावलो असेन. परत येताना ठरवल्याप्रमाणे बसने आलो, आज हवा मस्त होती या मोसमात असतेच त्याप्रमाणे धुके वारा पाऊस नयनरम्य नजारे वगैरे नेहेमीप्रमाणेच अफाट सुंदर ! पाऊसही जोरदार पडला पण बदलायला टीशर्ट आणि जर्कीन बरोबर नेले अस्सल्यामुळे येताना थंडी नाही वाजली नाही.
सिंहगड माथा गाठला नाही, थोडे अंतर चाललो अशा बाबी आजच्या धावण्यामधे अंतर्भूत असल्या तरी कालच्या तापामुळे पडलेल्या खंडानंतर लगेच आज हे करू शकलो त्यामुळे समाधान आहे.
एकंदरीत मजा आली
आज विचार असा केला की जास्त
. डबल पोस्ट
हर्पेन पहीली तब्येत महत्वाची,
हर्पेन पहीली तब्येत महत्वाची, आराम करा, टेक केअर.
हर्पेन तापानंतर सिंहगड !!!
हर्पेन तापानंतर सिंहगड !!! तोपण पळत !!
तु तुझा प्लॅन व्यवस्थीत आखला असशीलच अन त्या घाटात बाइक चालवली तरी दमणार्या पंथातले आम्ही ह्याची पूर्ण जाणीव ठेवुन फुकटचा सल्ला - जरा दमाने घे रे !!
Pages