एका धावकाचे ‘मैत्री’ खातीर आवाहन
मी बराच काळ कामाच्या निमित्ताने एका गावी फार स्थिर असा राहू शकलो नव्हतो. त्यामुळे मला माझे छंद जोपासायला नीट सलग असा कालावधी मिळालाच नाही. त्याकारणाने माझे छंद एक ना धड भाराभर चिंध्या अशा प्रकारचे आहेत / होते. पण गेले काही वर्षे पुण्यात रहायला आल्यापासून जीवनाला जरा स्थिरता आली आणि मग साधारण एकाच सुमारास चालू झाले, मैत्री (नावाची एक संस्था जी मेळघाटात काम करते तिच्या) करता स्वयंसेवक म्हणून काम करणे आणि माझे धावणे.
माझ्या धावण्याच्या अगदी सुरुवातीच्या दिवसापासूनच्या प्रवासाला मायबोली साक्षी आहे. तसेच माझ्या मेळघाटातल्या अनुभव लिखाणाबरोबर ‘मैत्री’ ला मदत करा अशा केलेल्या आवाहनाला देखील अनेक मायबोलीकर कायमच प्रतिसाद देत आले आहेत. काही मायबोलीकरांनी तर मेळघाटात प्रत्यक्ष जावून स्वयंसेवक म्हणूनही काम केले.
आता ह्या दोन्हीचा इथे / परस्परांशी काय संबंध असे वाटणे स्वाभाविक आहे. तर तो संबंध असा.
मी आता यावर्षी ९ सप्टेंबर रोजी लदाख येथे होणाऱ्या खारदुंग ला चेलेंज मध्ये भाग घेण्याचे ठरवले आहे. ही स्पर्धा लेह पासून चालू होउन खारदुंग ला आणि परत लेह अशी एकूण ७२ किमी अंतराची आहे.
अधिक माहीती http://ladakhmarathon.com/races/khardung-la-challenge/
तसे पाहता मी आजवर चार वेळा मुंबई मॅरेथॉन, एकदा हैदराबाद आणि एक कच्छच्या रणातली अशा सहा पूर्ण मॅरेथॉन (४२.२ किमी) तसेच लोणार येथील ५० किमी ची अल्ट्रा अशा शर्यती पार पाडल्या आहेत. पण तरीही ही अल्ट्रा माझ्याकरता खरोखरच मोठे आव्हान आहे.
मी माझ्या परीने सगळ्याप्रकारची तयारी चालू केल्ये. रजा मिळवून झाल्ये, जाण्यायेण्याची तिकीटे काढून झालेली आहेत. वेळापत्रकानुसार धावणे सुरु केले आहे. ( मागच्या आठवड्या पर्यंत सरासरी ६० ते ७० किमी धावणे करत होतो ह्या आठवड्यातले ध्येय एकूण १०० किमी आहे)
इतक्यातच 'मैत्री' संस्थेला त्यांचे मेळघाटातील उपक्रम चालू ठेवण्याकरता निधी कमी पडतोय अशी बातमी कळली. त्यामुळे मी ही स्पर्धा मैत्री संस्थेच्या कार्याला समर्पित करायचे ठरवले आहे आणि माझी अशी आकांक्षा / संकल्प आहे की या तीन-चार महिन्यात ‘मैत्री’ च्या मेळघाटातील कामाकरता किमान १००० रुपये देणारे किमान ७२ दाते तयार करायचे.
मैत्री संस्थेचे मला भावलेले वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या सामाजिक, आर्थिक, राजकीय पार्श्वभूमी असले ल्या नागरिकांचे एका चांगल्या कामाकरता एकत्र येणे आणि तब्बल वीस वर्षे ते काम चालू ठेवणे. फक्त अडीच माणसे सोडली तर बाकी सर्व जण मैत्रीकरता काम विनामुल्य / स्वयंसेवा म्हणून करतात. ओव्हरहेड जवळ जवळ नाहीच. मेळघाटातल्या लोकांना औषधे सोडली तर वैयक्तिक वापराच्या कुठल्याही वस्तू फुकट वाटत नाहीत. सामुहिक वापराकरता सोलर वर चालणारा पंप आणि पाण्याची टाकी बसवून दिली पण त्याची देखभाल स्थानिक रहिवाश्यांकडून वर्गणी काढून केली जाते. स्थानिक लोकांनी आत्मनिर्भर व्हावे म्हणून प्रयत्न केले जातात. शाळा चालाव्यात म्हणून शैक्षणिक साहित्य दिले जाते. सध्या चालू असलेल्या योजनांचा ही सगळा भर कौशल्ये विकास (skill buildng/ development), व्यवसाय निर्मिती व उद्योजकता, सरकारी योजनांविषयी माहिती व पाठपुरावा, सेंद्रिय व पारंपारिक शेतीमधून उत्पादकता वाढवणे अशा कार्यक्रमांवर आहे.
अधिक माहीती करता - http://www.maitripune.net/Home.html
मी स्वतः काही वेळा काही दिवसांकरता मेळघाटात स्वयंसेवक म्हणून जाऊन आलो आहे.
तर अशा 'मैत्री' खातर ज्यांना जसे शक्य होईल तसे त्याप्रमाणे, यथाशक्ती यथामती जी काही रक्कम देउ करायची असेल ती मैत्रीच्या खात्यावर परस्पर जमा करावी अशी मी विनंती करतो.
देणगी: “मैत्री” या नावाने चेक / रोख देणगी म्हणून देता येईल.
“मैत्री”साठी दिलेल्या देणग्या आयकर कायद्याच्या ८०जी खाली करमुक्त आहेत.
ONLINE DOMESTIC DONATION
Maitri Account Details (avail this facility at no cost)
Bank : H D F C Bank
Branch : Kothrud, Pune
Savings Account Number : 01491450000152
Account Name : Maitri
MICR : 411240009
Details for RTGS / NEFT / IFS Code : HDFC0000149
ONLINE FOREIGN DONATION
Maitri Account Details (avail this facility at no cost)
Bank : H D F C Bank Limited
Branch : Kothrud, Pune, Maharashtra, India.
Savings Account Number : 01491170000017
Account Name : Maitri
MICR Code : 411240009
Swift Code : HDFCINBB
जे कोणी जी काही रक्कम जमा करेल त्यांनी इथे तसे कळवावे. जर कोणाला स्वत:चा नामोल्लेख नको असेल तर त्यांनी मला तसे संपर्कातून (९८८११५२८८४) कळवल्यास त्यांनी दिलेली रक्कम अनामिक देणगीदाराकडून म्हणून नमूद करण्यात येईल. रक्कम परस्परच जमा करायची आहे मात्र केली की इथे जरूर कळवा. तसेच मी 'खारदुंग ला' करता करत असलेल्या तयारीबद्दलही वेळोवेळी इकडे कळवत राहीनच पण असे (मनोरंजन मुल्य नसलेले) धागे लगेच मागे जातात म्हणून वेळोवेळी मला शुभेच्छा देत राहून ह्या धाग्याला वर आणत रहा. कृपया धन्यवाद 
आठवडा पहिला - देणगीदार ६ - जमा झालेली रक्कम रुपये ३२००१/-
आठवडा दुसरा - देणगीदार ७ - जमा झालेली रक्कम रुपये ११६१२/-
आठवडा तिसरा - देणगीदार ४ - जमा झालेली रक्कम रुपये ५०००/-
आठवडा चौथा - देणगीदार ६ जमा झालेली रक्कम रुपये १०००१/-
आठवडा पाचवा - देणगीदार ४ जमा झालेली रक्कम रुपये १००००/-
आठवडा सहावा - 'जैसे थे' परिस्थिती
आठवडा सातवा - देणगीदार १६ जमा झालेली रक्कम रुपये २२५००/- एकूण (४३/७२) (९२११४/- /७२०००/-)
आठवडा आठवा चालू
वाह वाह! अत्युत्तम बातमी!
वाह वाह! अत्युत्तम बातमी! हार्दिक अभिनंदन! सविस्तर वृत्तांताची आतुरतेने वाट पाहत आहे
वाहवा, एकदम ग्रेट. हार्दीक
वाहवा, एकदम ग्रेट. हार्दीक अभिनंदन. तुमची मेहेनत सफल झाली.
वा वा वा!! अभिनंदन.
वा वा वा!! अभिनंदन.
अरे व्वा! एकदम रोमांचक पणे
अरे व्वा! एकदम रोमांचक पणे पूर्ण केलं....जबरदस्त! अत्याभिनंदन!!
हार्दिक अभिनंदन हर्पेन
हार्दिक अभिनंदन हर्पेन
ग्रेट आहेस तु
साष्टांग नमस्कार तुला.
है शाब्बास !!!! थरारक
है शाब्बास !!!! थरारक वृत्तांताची उत्सुकता.
कमाल आहे. खूप खूप अभिनंदन!
कमाल आहे. खूप खूप अभिनंदन!
आता त्याचा सविस्तर वृत्तांत वाचायला उत्सुक आहे.
अमेझिंग. आता नीट आणि हळू हळू
अमेझिंग. आता नीट आणि हळू हळू रिकव्हर हो आधी.
अभिनंदन! वरच्या सगळ्या
अभिनंदन! वरच्या सगळ्या प्रतिसादांना +1
क्या बात है हर्पेन! आपलं
क्या बात है हर्पेन! आपलं बोलणं राहूनच गेलं आहे. परत आलात की बोलूच. नीट रिकव्हर व्हा. अभिनंदन!
स ला म !!!
स ला म !!!
वृत्तांत वाचण्यास उत्सुक !
सही बातमी हर्पेन.
सही बातमी हर्पेन.
मनःपूर्वक अभिनंदन!
जीव्तोड मेहनत केलीत तुम्ही ती फळाला आली.
अभिनंदन
अभिनंदन
हर्पेन, ज.. ब.. र... द...स्त
हर्पेन, ज.. ब.. र... द...स्त !
हॅट्स ऑफ यार. इनस्पायरींग अॅज ऑलवेज... सॉलीड अभिनंदन
हार्दिक हार्दिक अभिनंदन!!!!!!
हार्दिक हार्दिक अभिनंदन!!!!!! वृत्तांताच्या तीव्र प्रतीक्षेत!
हर्पेनजि , solid and so
हर्पेनजि , solid and so encouraging . Superb. Waiting for details. Once again congratulations
अभिनंदन! वरच्या सगळ्या
अभिनंदन! वरच्या सगळ्या प्रतिसादांना +1
धन्यवाद मंडळी!
धन्यवाद मंडळी!
रवीवारी रात्री परत आलो, नित्यक्रम चालू झाला त्यामुळे लगेच इकडे येता आले नाही. रिकव्हरी चालू आहे. आज सकाळी ९ किमी रिकव्हरी रन केली
आज लडाख मॅरॅथॉनच्या साईटवर निकाल अपडेट केला आहे.
त्याचा दुवा
http://ladakhmarathon.com/results/khardungla-challenge-2017/
वृतांत लिहायचे लक्षात आहे .
पहिल्या दहात आलेल्ली लोकं
पहिल्या दहात आलेल्ली लोकं नादखुळा. लडाखच्या उंचीवर १०किमी ताशी वेग ७०किमी साठी ठेवायचा जोक नाहीये. पहिल्या दहातले सगळे लोकल दिसत आहेत. शब्बीर हुसेन आणि मोहंमद इलियास मी कारगिल / झान्स्कार वगैरेचे असतील असा अंदाज बांधला आहे. बाकीचे सगळे लडाखी नावे आहेत. लैच भारी.
हर्पेना, तू एकदम शेवटच्या काही मिनिटात पार पाडलीस हो
हो पहिले नऊ लडाखीच आहेत दहावा
हो पहिले नऊ लडाखीच आहेत दहावा नकुल बुट्टा दिल्लीचा आहे. हा मला स्टोकच्या बेस कॅम्पवर भेटला होता. सध्या पुर्णवेळ धावपटू बनलाय. कोच म्हणून देखिल काम करतो. एकदम भारी रनर पण जमिनीवर पाय. माझ्या बरोबर सराव करणारा अमनदीप एकूणात १६वा आणि बिगर लडाखींमधे ५-६ आलाय.
पहिले आलेले सगळे लडाखी असले म्हणून काय अरे, किती कमी वेळात किती अंतर काटतात बघ ना !
मला खरेतर लाजच वाटली पाहिजे पण मी निर्लज्जपणे हेच समाधान मानून घेतो की शेवटून पहिला ठरलो नाही.
मेंढक पॉईंटला मी एका धावकाला मागे टाकले आणि नंतर तो धावक परत काही मला मागे टाकू शकला नाही. तुका म्हणे त्यातल्या त्यात
हार्दिक अभिनंदन हर्पेन ,
हार्दिक अभिनंदन हर्पेन , मेडलचे फोटोज टाकशील का इथे ?
IMG_20170910_183247.jpg (143
IMG_20170910_183254.jpg (138.87 KB)
मेडल एकदम मस्त आहे. आजवर
मेडल एकदम मस्त आहे. आजवर मिळालेल्या सगळ्यांत उत्तम
काहीतरी मिळवलंय असे वाटायला लावणारे
मस्त!
मस्त!
एकदम भारी मेडल. आम्हांला
एकदम भारी मेडल. आम्हांला अभिमान वाटतो तुमचा, हर्पेन.
अभिनंदन.हर्पेन.
अभिनंदन.हर्पेन.
मेडल खुप छान आहे.
13.57.20.52 हे timing वाचुनच दम लागला
__/\__
अभिनंदन...
अभिनंदन...
तुम्ही स्टोक पण केलत ?
तुम्ही स्टोक पण केलत ?
सही....
प्लीज रेस चा वृत्तांत लिहा लवकर.
स्पर्धकांचे डिटेल्स भारी आहेत
स्पर्धकांचे डिटेल्स भारी आहेत!! चक्क पूर्ण करणाऱ्यांमध्ये भारतीयच जास्त आहेत!! आणि लदाखी लोकांना तर दंडवतच!!! किती स्टॅमिना असावा!! आणि त्यांची तयारीही बहुतेक फारशा सुविधांशिवाय असणार. त्यांच्याविषयी तुमची निरीक्षणेही नक्की सांगाल. वृत्तांताची प्रतीक्षा सुरूच आहे....
धन्यवाद मंडळी,
धन्यवाद मंडळी,
धनश्री, योजनेनुसार स्टोक बेस कॅम्प वरच थांबलो होतो.
मार्गी, भाग घेणारी, जास्त मंडळी भारतीय होती त्यामुळे संपवणारी पण भारतीयच होती.☺
वृत्तांत लिहीणार आहे.
Pages