इंटरमिटंट फास्टिंग ( IF ) - अनुभव

Submitted by केदार on 25 April, 2017 - 10:05

ओके ! इंटरमिटंट फास्टिंग ! IF

* * * * * फॅ़क्ट * * * * *
१. तुमच्याच भल्याकरता, तुम्हाला त्या अवधीत काही न खाता उपाशी राहावे लागते!
२. IF ही लाईफस्टाईल आहे. वेटलॉस प्रोग्रॅम नाही !
३. IF च्या आधीचे वजन ७३ किलो, सध्याचे वजन - ६९.८ आधीच्या बॉडीफॅट २० / IF नंतर १६%, सध्याच्या रिव्हाईज गोल - १०%

मी एन्डुरंस अ‍ॅथलिट (?!) आहे. IF चे नेट वर कळायच्या आधीच मी उपाशीपोटी मध्येच व्यायाम करायचो. म्हणजे सकाळी ६:३० ला सायकल चालवायला जायचो, तेंव्हा नाश्ता न करताच जायचो आणि जर ३ तासापेक्षा जास्त राईड असेल, ( किंवा १०० किमी पेक्षा जास्त ) तर १ १/२ तासानंतर मध्येच टपरीवर नाश्ता ( हाय कार्ब, उदा पोहे वगैरे) खायचो. पण २ एक तासाची राईड असेल तर काही न खाताच घरी यायचो, थोडक्यात माझ्या शरीराला काही न खाता व्यायाम करायची सवय होती.

मागे इथे सईचा लेख वाचून अन नंतर गुगल रिसर्च करून मी देखील IF ट्राय करायला काय हरकत आहे? हा विचार करून सुरूवात केली. खरे तर व्यायाम आणि उपास ह्यांची जोड कशी घालता येईल ह्यावर मी गुगली टाकला आणि मला लिनगेन्स साईटचा शोध लागला. http://www.leangains.com/ ह्याची लिंक मागच्या वर्षी मी सईच्या लेखावर पण दिली होती. ह्यावर बरीच चांगली माहिती उपलब्ध आहे. अर्थात मी वेटलिफ्टर नाही अन मला ६ पॅक्सही नाहीत, किंवा आणायच्या नाहीत. पण ह्यासाईटमुळे मला १६:८ प्रकाराबद्दल माहिती झाली आणि तीचा अवलंब करायला मी शिकलो.

माझा प्रवास !

मला ब्रेकफास्ट रोज हवा असायचा. अगदी लहानपणापासून वगैरे. त्यावेळी काही खाल्ले नाही की चिडचिड व्हायची. पण एकदा ठरवले की ठरवलेच. मग पहिल्या आठवड्यात हळूहळू एक प्लेट पोह्यांऐवजी अर्धी प्लेट पोहे असे केले आणि एकाच आठवड्यानंतर जमायला लागले. मग दुसर्‍या आठवड्यापासून ब्रेकफास्ट पूर्ण स्किप करून १६:८ सुरू केले. थोडक्यात जर ब्रेकफास्टची सवय असेल तर सुरू करायला अवधी द्या, अन्यथा सोडून द्याल.

संध्याकाळी ८:३० ते दुसरे दिवशी सकाळी १२:३० ते २ ह्या वेळात मी उपाशी राहतो. अर्थात ह्या वेळांमध्ये सकाळचा अन १० चा चहा किंवा कॉफी मात्र घेतो. थोडक्यात जे काही खायचे ते १२:३०-१ ते संध्याकाळी ८:३० पर्यंतच. शिवाय मी साखरेचे काहीही शक्यतो खात नाही. अगदी चहात साखर वगैरे सोडूनही दीड पावने दोन वर्षे झाली आहेत. मध्येच कधीतरी हुक्की आली की गोड खातो, पण ती हुक्की नेहमी येत नाही.

मग भूक लागल्यावर मी काय करतो?

* * * * * फॅ़क्ट * * * * *
हंगर पँग्स येतात. पण ते फक्त १० मिनिटेच टिकत असतात.

ह्याच वेळी मोह टाळायचा. जर निग्रह नसेल तर आपण स्नॅक कडे नक्कीच वळणार. थोडक्यात, आपण हे का सुरू केले? ह्याचा तेंव्हा विचार केला, तर ती १० मिनिटे निभावून जाऊ शकतात. त्यावेळी पाणी प्यायचे. विचार केला तर हे सहज जमण्यासारखे आहे. फक्त आपण तेवढे निग्रही नसतो.

हळू हळू मला १६:८ जमायला अन आवडायला लागले. मग जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मी बॉउंड्रीज पार करायचा विचार केला.

Eat Stop Eat चा प्रवास. : १६ तास जमू लागल्यावर मी एकेदिवशी विचार केला की २४ तास ट्राय करून पाहायला काय हरकत आहे? आणि मग मी त्या दिवशी दुपारी जेवलोच नाही. दुपारी ३ वाजता ( नेहमीची वेळ संपल्यावर ३ तासाने) भूक लागली, पण पाणी प्यायलो. अन घरी चक्क साबुदाण्याची खिचडी केली होती. पण निग्रह ! मग चारला चहा. मग अचानक फ्रेशच वाटलाला लागलंन भौ ! एकदम अ‍ॅक्टिव्ह. अचानक कुठून तरी एनर्जी आल्यासारखे. रात्रीचे ८ वाजले, तरी जेवायला नको वाटले. मग ९:३० ला जेवलो. २५ तास ३० मिनिटे !! याहू !! मग दर आठवड्यात एकदा तरी २४ + तास उपाशी राहावे असे उगाचच वाटू लागले. मग सोमवार किंवा गुरूवार माझ्यासाठी बिझी दिवस असतात, त्या दिवशी मी २४ + तास उपाशी राहू लागलो. अन त्यातच आनंद वाटू लागला. थोडक्यात रोज १६:८ पण आठवड्यातून कधी कधी दोन तर एक दिवस तरी २४ + तास उपास. ब्लेंडेंड IF ! सोमवारी दुपारी कामच्या जागी पोचल्यावर जर जेवायचे ठरलेच तर सॅलड खात आहे. ( ३०० कॅलरीज) जेंव्हा २४ तास उपाशी राहायचे असते, तेंव्हा कामात गुंतवणे वा काही काम असणे आवश्यक आहे. अन्यथा विचारात "अन्नच" असतं.

मग व्यायामाचे काय?
* * * * * फॅ़क्ट * * * * *
खूप सारे बॉडी बिल्डर १६:८ फॉलो करतात !
उपाशी राहण्यापूर्वी व्यवस्थित खाल्ले असेल तर उपाशीपोटी व्यायाम करू शकतो.

दोन स्क्रिन शॉटस. पिक्चर्स स्पीक .... वगैरे वगैरे. ही सायकलिंग मी उपाशीपोटी केली आहे. आणि ह्यात HIIT - हाय इंटेंसिटी ट्रेनिंग केली आहे, त्यामुळे माझा हार्ट रेट पण खूप वाढलेला दिसेल. माझ्या हार्ट रेटच्या लेखांमध्ये तुम्हाला HIIT ची आणखी उदाहरण दिसू शकतील.

IMG_0872.PNG

ह्या वरच्या सायकलिंग मध्ये १००० पेक्षा जास्त कॅलरी ह्या उपाशीपोटी लागल्या आणि माझ्या शरीराने त्या विनासायस पुरवल्या. सायकलिंग झाल्यावरही मी अजिबात थकलेलो नव्हतो. फक्त खूप वार्‍यामुळे इरिटेट झालो होतो, कारण इथे वारे हे २५ ते ३० किमी प्रति तास असते, अन वार्‍यात सायकल चालवणे म्हणजे ..
आणि ह्या खालील चित्रात ८०० कॅलरीज

IMG_0871.PNG

* * * * * फॅ़क्ट * * * * *
उपासामुळे डायबेटिस बरा होण्यास मदत होते. ज्यांनी IF केले त्यांचा अनेक रिव्हर्सल केसेस नेट वर दिसतील ( T2) आणि अनेक मेडिकल पेपर्स देखील ह्या विषयावर उपलब्ध आहेत.
वजन कमी होते. ( ओके ! वजन कमी होते. )

माझे वजन मुळातच "योग्य" आहे. रादर जीवनात मी कधीही जाड नव्हतोच. पण माणसाने नुसते वजन कधीही मोजू नये. बॉडी फॅट फॅक्टर मोजावा. माझ्याबाबतीत बॉडी फॅट हाच फॅक्टर होता. IF च्या आधी बॉडी फॅट साधारण १९% + होते. IF नंतर माझे वजन फक्त ७ पाउंडड्स कमी झाले, पण बॉडी फॅट आत्ता फक्त १६% आहे.

माझ्या मेंटेनन्स कॅलरी, म्हणजे आहे तसेच मेंटेन ठेवायला ( मी करत असणारा व्यायाम धरून ) लागणार्‍या कॅलरीज ह्या २२५० कॅलरी डेली आहेत ! आता हा कॅलरी गोल पाहून वजन कमी करणारे म्हणतील, बापरे, हे तर आमचं दोन दिवसाचं जेवण !

मी काय शिकलो? किंवा हवे तर टिप्स म्हणू

- भुक सहन होत असते, आपण ती सहन करत नाही.
- पूर्वी दुपारचे जेवण ते संध्याकाळचे जेवण ह्यात मी अनंत वेळा किचन मध्ये जाऊन उगाच काही तरी खायचो, किंवा निदान फ्रिज उघडून पाहायचो. ( मी खूप वेळा घरून काम करतो.) गेले ३-४ महिने असे काही होत नाही.
- सध्या मी जे काही खातो, ते खायच्या आधी आपोआप मनात कॅलरी / फॅट इत्यादी काउंट होतात, हे ओव्हरकिल आहे असे तुम्ही म्हणू शकता, पण IF मुळे माणसाला काय खावे ह्याचा IQ आपोआप निर्माण होतो.
- कधीकधी २० तासानंतर डोके दुखू शकते, किंवा वेळ जात नाही, त्यावेळी थोड्या दुधाचा चहा / ब्लॅक कॉफी हे पर्याय खूप चांगले आहेत.
- अ‍ॅज लाँग अ‍ॅज तुम्ही कॅलरी डेफिसीट ठेवता, तो पर्यंत तुम्ही हवे ते खाऊ शकता. जंक फुड ते हेल्दी फुड. लिबरेशन. अगदी हवे ते खा.
- घरी पाहूने आले किंवा आपण दुसर्‍यांकडे गेलो, तर १६:८ वेळापत्रकातच राहायची गरज नसते, त्या त्या वेळी, ते ते खायलाच पाहिजे ( किंवा नको) असा हा प्रोग्राम नाही. आपण ज्या क्षणी उपास सुरू केला त्या क्षणापासून आपण उपाशी, अश्या छोटे मोठे प्रसंगात उपाशी राहणे योग्य नाही.
- योग्य ते प्रोटिन आणि कार्ब व फॅट, दोन्ही वेळी जेवताना मिळणे आवश्यक आहे, अन्यथा थकायला झाल्यासारखे होऊ शकते.
- कुठल्याही डायट विना, वजन कमी होते. वजन कमी होताना पहिले कंबर आणि पोट ह्यातील फॅट्स कमी होतात. आणि ३ एक आठवड्यात फरक जाणवायला लागतो, तो इतरांना दिसेलच असे नाही, पण तुम्हाला जाणवतो.
- वजन केवळ उपाशी राहण्यामुळे कमी होते, त्यासाठी व्यायामाची अजिबात आवशक्ता नाही. पण व्यायाम केला, तर ज्यांना वजन लवकर कमी करायचे आहे, त्यांना जास्त मदत होते. कॅलरी डेफिसिट इज द की !

वर मी व्यायाम करणार्‍यांना फायदा होतो असे लिहिले आहे. पण व्यायाम करायची गरज नाही, हे ही लिहिले आहे. दोन्ही एकत्र करत असताना नेमके काय होते?

ह्या चित्रात परत एकदा मी फास्टिंग मध्ये सायकल चालवली आहे.
स्पीड - ३१+ आणि हार्ट रेट अगदीच नगण्य - १३६ जो माझ्यासाठी लोअर झोन २ आहे. मागच्या चित्रात HIIT होते, ह्या चित्रात एरोबिक एन्ड्युरंस हा प्रकार आहे.

एवढ्या वेगाने दीड तास सलग अवघड असतं आणि खूप एनर्जी लागते. आणि ही सर्व एनर्जी उपाशीपोटी देखील आरामात मिळाली. हे IF मुळे
पण माझा हार्ट रेट तरीही गप्पा मारत चालवण्याच्या घरात आहे, आणि ते शक्य झाले, मी सतत सायकलिंग करत असल्यामुळे माझ्या मिचो मसल्स, तयार होणारे लॅक्टेट प्रचंड फास्ट प्रोसेस करायला शिकल्या, हा त्याचा गेन. ज्यात IF चा शून्य रोल आहे.

cycle_1.jpg

थोडक्यात काय? तर IF हे फक्त वेट लॉस साठीच नाही, तर ती लाईफस्टाईल आहे. जी मी आनंदाने फॉलो करतो.

http://www.diabetesincontrol.com/intermittent-fasting-and-its-beneficial...
http://jap.physiology.org/content/99/6/2128.long ( Intermittent fasting increases whole-body insulin sensitivity)
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC4257368/
http://journals.plos.org/plosone/article?id=10.1371/journal.pone.0079324 ( black coffee for breakfast and the same total-caloric intake as the other two diets for lunch )
https://intensivedietarymanagement.com/fasting-cures-diabetes-t2d-4/

लोकांचे अनुभव आणि काही डॉक्टर्स मधुमेह व उपास ह्यावर बोलताना ह्या युट्यूब सर्च मध्ये दिसतील.
https://www.youtube.com/results?search_query=intermittent+fasting+and+di...

- तळटिप - मी स्वतः डॉक्टर नाही, मी फक्त अनुभव लिहितो आहे. ह्या विषयात टेक कंट्रोल ऑफ युवर लाईफ हे शब्दशः खरे आहे, पण मधूमेहाच्या गोळ्या बंद करण्याआधी आपल्या डॉक्टरशी नक्कीच भेटा व बोला.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सई, तुमच्या प्रतिसादातल्या खालील वाक्यांत विसंगती आहे.

१. आयएफचा खरा फायदा खाण्याच्या वेळेत पोटभर खाता येणे हा आहे. त्यामुळे आयएफ करून आहारही कमी करायचा हे योग्य नाही.

२. म्हणून आपल्या वजनाप्रमाणे जेवढे उष्मांक वजन टिकवून ठेवण्यास लागतात त्यापेक्षा रोज फक्त ३००-५०० कमी खावेत.

माझ्यामते इथे कोणी "आहार खूप कमी केला पाहिजे" अशा अर्थाचे विधान केलेले नाही, निदान मला तरी दिसले नाही, नजरेतून सुटले असल्यास माहित नाही.

>>>म्हणून आपल्या वजनाप्रमाणे जेवढे उष्मांक वजन टिकवून ठेवण्यास लागतात त्यापेक्षा रोज फक्त ३००-५०० कमी खावेत.
माझ्यामते इथे कोणी "आहार खूप कमी केला पाहिजे" अशा अर्थाचे विधान केलेले नाही, निदान मला तरी दिसले नाही, नजरेतून सुटले असल्यास माहित नाही.

वरती २४ / ३६ तास उपास करायच्या डिस्कशन मध्ये आणि नंतरच्या मानिनी यांच्या प्रतिसादावर ती कमेंट होती.
२४ तास उपास झाल्यावर तुम्ही काय खाता याचे पण डिस्कशन झाले पाहिजे. उपास आणि खाणे या दोन्हीच्या समन्वयाने वजन कमी करायचे आहे. आणि २४ तास उपाशी राहिल्यानंतर किंवा १६/१८ कितीही तास काहीही न खाता राहिल्या नंतर खाण्याच्या वेळात सगळी पोषणमूल्ये खाण्यावर भर दिला पाहिजे.

मी ऊठल्यावर मस्त मगभरून दुधाचा चहा साखरेऐवजी सुगरफ्री घालून घेते
नंतर कधी एक ऐपल किंवा काहीच नाही.
दुपारी अन रात्री एक चपाती,.थोडीशी.भाजी .
रात्रीच्या जेवणानंतर साधारण अर्धातास.शतपावली.
ह्या अश्या दिनक्रमाने फक्त बाहेरचे.जंकफुड.टाळुन माझे वजन 10 किलोने कमी झाले ते पण फक्त दोन महिन्यात >>>> ही माझी आधीची पोष्ट वाचुन जर कुणाला असे वाटत असेल की हे अन्न खुप कमी आहे किंवा मी ऊपाशी असते तर असे काही नाही, कारण पुर्वीपासुन माझे जेवन तसे कमीच आहे हां पण जंक फुड खुप जास्त खायला सुरुवात झाली होती मध्यंतरी जे आता बंद केलेय.
तसेही मी हे सर्व चालु करण्यापुर्वी आमच्या फॅ. डॉकशी डिस्कस केलेय अन त्यांच्या सल्ल्यानुसार वागतेय. आणी मला खरचं खुप हलके आणी पॉझीटिव्ह वाटतेय.
अजुन एक काल लिहायचे राहीले की जेव्हा कधी चपाती खायचा कंटाळा येतो तेव्हा मी भात खाते.
अगदी मध्यंतरी वडापावसुद्धा खाल्ला पण त्यावेळेला डिनर स्कीप केले.

>>>>२. म्हणून आपल्या वजनाप्रमाणे जेवढे उष्मांक वजन टिकवून ठेवण्यास लागतात त्यापेक्षा रोज फक्त ३००-५०० कमी खावेत.

टी डी इ इ प्रमाणे कॅल्क्युलेट केलेले उष्मांक हे आपले आत्ताचे वजन टिकवून ठेवण्यासाठी खायचे उष्मांक असतात. समजा तुमचा TDEE २००० आहे आणि तुमचे वजन ६५ किलो आहे, तर तुम्ही रोज २००० उष्मांक खाल्ले तर तुमचे वजन कमी होणार नाही. जर हेतू वजन कमी करायचा असेल तर २०००-५०० अर्थात १५०० उष्मांक रोज खाल्ले तर तुमचे "डेफिसिट" तयार होते. याचा अर्थ तेवढे उष्मांक शरीर साठवलेल्या चरबीतून घेणार आणि परिणामी तुमचे वजन कमी होणार.

काही लोक ५०० उष्मांक कमी खातील, काही २०० खातील आणि काही एकदम १००० खातील. यातील अर्थात २००० च्या ऐवजी १००० च उष्मांक खाणार्याचे वजन झपाट्याने कमी होईल. पण तुम्ही जर सतत १००० उष्मांकांपेक्षा कमी खात राहिलात तर वजन कमी होईल पण ते तसेच कमी ठेवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. सतत कमी खाऊन केलेले डाएट हे सस्टेनेबल नाही.

हेच जर त्या व्यक्तीने ५०० उष्मांक कमी खाल्ले आणि त्या जोडीला ५०० उष्मांकांचा व्यायाम केला तर १००० चे डेफिसिट आहार कमी न करता होते. फक्त व्यायाम केलेले उष्मांक व्यायाम केला आहे म्हणून जास्त खाल्ले तरी चालेल या भावनेनी परत खायचे नाहीत.

आयएफमुळे हे १५०० उष्मांक ८ तासातच खाल्ले जातात. आणि उरलेला वेळ निग्रहाने उपास करता येतो. १५०० उष्मांक जर ५ वेळा थोडे थोडे खाऊन घेतले तर:
१. प्रत्येक वेळेस मोजमापात गडबड होऊ शकते
२. ३०० उष्मांकांनी बऱ्याच लोकांना पोट भरल्याची भावना येत नाही ( १ पोळी = १००, भाजी = ८०, आमटी = १४०). तयार मिळणारी कित्येक उत्पादने अशी असतात ज्यात मीठ आणि साखर खूप असते. त्यामुळे एकदा खाल्ले की अजून खावेसे वाटण्याची शक्यता जास्त आणि त्यामुळे अतिखाणे होऊ शकते.
३. सतत लो कॅलरी स्नॅकच्या तयारीत खूप दमछाक होते, खासकरून ज्यांना लहान मुले आणि इतर जबाबदाऱ्या आहेत त्यांची. त्यामुळे मधेच ताक प्या, मग एकच मूठ शेंगदाणे खा अशा गोष्टी जमत नाहीत. आणि कधी कधी वैतागून जास्त खाल्ले जाते.
४. एखाद्या दिवशी बाहेर जायचे असेल तर सगळे १३०० उष्मांक एकाच जेवणात खाण्याची मुभा मिळते आणि नंतर २४ तास उपास करता येतो. आणि तुम्ही साधारण महाराष्ट्रीयन भरपेट जेवण मोजले तर १३०० उष्मांक होतच नाहीत. अगदीच जंक फूड खाल्ले आणि खूप शीत पेये प्यायली तरच एका जेवणात १३०० उष्मांक खाल्ले जातात.

म्हणून आयएफ करत असाल तर खाण्याच्या वेळात तुमच्या वजनाप्रमाणे (वजन कमी करण्यासाठी) जितके उष्मांक लागतात तेवढे खाणे जरूरीचे आहे असे माझे म्हणणे आहे.

मी ऊठल्यावर मस्त मगभरून दुधाचा चहा साखरेऐवजी सुगरफ्री घालून घेते
>> मी मानिनी, शुगरफ्री किंवा आर्टीफिशल स्वीटनर्स हे आरोग्यासाठी खूप घातक आहेत. इथे ह्यावर लिहिलेले तर आहेच पण आपण ह्यावर अधिक माहिती मिळवावी.

नलिनी, मी ईथे वाचुन डॉकला विचारले या बद्दल, तर ते बोलले की जे काही नॅचरल नसते किंवा सबस्टीस्ट्युट म्हणुया आपण ते शरिरासाठी चांगले नसते पण जर आपण ते योग्य प्रमाणात घेतले तर काही प्रॉब्लेम नाही.

तसेही मी दिवसात एकदाच चहा घेते, तोही अगदी गोड नसतो. मी एक किंवा अगदीच ईच्छा झाली तर दोन छोट्या गोळ्या घालते त्यात. सो आय गेस इट इज ओके

नो इट्स नॉट ओके. डॉ सांगतात ते सगळं प्रमाण मानू नका. स्वतः रीसर्च करा. आर्टिफिशियल स्वीटनर्स अजिबात चांगली नाहीत.

मला आज आयेफ जमले नाही. कडकडून भुक लागल्याने १०:३० ला वाटीभर फोडणीचा भात खाल्ला. व कॉफी. उद्या ट्राय करते परत.. पण रात्रीच्या जेवणाची वेळ्च चुकतीय. १० जरा उशीर आहे.

नलिनी, मला साखर आवडत नाही, मी गोड पदार्थ शक्यतो टाळतेच किंवा खुप कमी खाते

आणी प्लिज मला तुम्ही नका म्हणु, अरे तुरे केले तरी आवडेल

मी मानिनी, तुला गोड पदार्थ आवडत नाहीत ते भारीच आहे पण लवकरात लवकर सुगरफ्री वापरणे बंद कर. अगदीच वाटले तर चमचा- अर्धा चमचा साखर बरी. त्याबद्दल अधिक वाचशीलच.

साखर आवडत नाही आणि आर्टीफिशल शुगर आवडते. आश्चर्य वाटले जरा. >>> आश्चर्य काय त्यात तसेही मी शुगरफ्री काही ते आवडते म्हणुन नाही तर अगदी पहिल्यापासुन मला असे वाटायचे की ते साखरेपेक्षा जास्त चांगले असते म्हणुन घेते

आज चौथा दिवस आहे, छान वाटत आहे. भूक अशी जाणवत राहते पण उत्साह आहे, एनर्जी, फोकस उत्तम आहे.

माझे रुटीन सकाळी नाश्ता व दुपारी जेवण संध्याकाळी स्नॅक्स (नट्स) असे विपश्यना स्टाईल केले आहे , कॅलरी इंटेक कमी केला आहे.

साखर, बेकरी बंद केलं आहे. 4 पोळ्यांएवजी 2 पोळ्या घेत आहे, घरीच केलेलं तूप वाढवलं आहे आहारात . Carb लगेच कमी करणार नाही. हा रुटीन महिनाभर बघू मग पुढचे....

31st ऑक्टोबर पर्यंत 20 किलो कमी करायचं टार्गेट आहे.

सर्वांचे परत एकदा आभार

शुभेच्छा नानाकळा.
तुम्हाला हायपोग्लायसेमिया आहे तेव्हा कार्ब्ज जरा जपूनच कमी करा.

@ नानाकळा

कार्ब्स कमी कायची आवश्यकता नाही. फक्त कार्ब्स हुशारीने खायचे. जसे की दिवसातील एक जेवण (नाश्ता) कारब्समुक्त ठेवायचा. त्यात व्हेजिटेरियन असाल तर मिश्र डाळीचे धिरडे, मोड आलेल्या कडधान्यांची उसळ (पाव नाही), पनीर घालून केलेले भाज्यांचे सॅलड, उकडलेल्या भाज्या आणि उसळ असे पदार्थ खायचे. दुसऱ्या जेवणात कार्ब्स जरूर खायचे.

साखर बंद केली की ५० % विजय होतोच. एकदा साखर पूर्ण बंद झाली की मग इतर गोष्टी कमी कराव्या लागत नाहीत. कार्ब्स कमी केले तरी त्या जागी प्रोटीन किंवा फायबर जास्त खाल्ले गेले पाहिजे. म्हणजे भूक भूक होत नाही.

लेज वेफर्स, वर दुपारपर्यत राहायची सवय लागली आणि वजन वाढत गेल .आकडा ६० वर गेला आणि डोळे उघडले. त्यानंतर डॉक्टरांना खाण्याच्या सवयी सांगताना त्याबबद्दल बरच काही ऐकून घेतलं . तेव्हापासून अजिबात ब्रेफा चुकवत नाही >>

जाई, तुमची वरील पोस्ट वाचून, मी डॉ़ नसूनही तुमचे वजन का वाढले हे सांगू शकतो. मीच काय, कोणीही. रोज लेज वेफर्स खाल्ल्यावर वजन वाढणारच. डॉक्टरांनी ब्रेकफास्ट सांगणे ह्यात नवीन काही नाही. कारण बरेच डॉक्टर हो तुम्ही उपास करा, असे कधीही सांगणार नाहीत. वजन वाढायला ब्रेफफास्ट न करणे हे कारणीभूत नसून जंक फुड सारखे खात राहणे हे आहे.

सई, रोज एक आंबा? थोडक्यात रोज ४७ ग्रॅम साखर?

मानिनी, तुम्ही फक्त दुधाचा चहा घेता? बासुंदी Happy

>>>सई, रोज एक आंबा? थोडक्यात रोज ४७ ग्रॅम साखर?
हा हा! हो!
त्यासाठी मी काय काय त्याग केले आहेत यावर एक वेगळा लेख लिहीन. Proud

>> वजन वाढायला ब्रेफफास्ट न करणे हे कारणीभूत नसून जंक फुड सारखे खात राहणे हे आहे.<<

असं ब्लँकेट स्टेटमेंट, वन साइझ फिट्स ऑल वजन कमी करण्याकरता लागु होत नाहि. मी वर म्हटल्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तिची केस (मेटबॉलिझ्म, लाइफस्टाइल वगैरे) वेगळी असल्याने एकाला झालेला फायदा/नुकसान दुसर्‍याला विरुद्ध टोकाचा रिझल्ट देऊ शकतो.

जंक फुड आणि वेट लॉस याचा संबंध खोडणारं हे उदाहरण रोचक आहे...

राज,
हे तुमच्याच आर्टिकल मध्ये आहे.

While applauding Cisna’s efforts to lose weight and improve his health, his McDonald’s diet is not realistic or reasonable for most people to follow long-term, said Elisa Zied, a registered dietitian nutritionist in New York and author of “Younger Next Week.”

Much of Cisna’s results have to do with cutting his calorie intake, so it’s not surprising that he lost weight and lowered his cholesterol, Zied said

कॅलरी इनटेक कमी करून काय वाट्टेल ते खाऊ शकतो, ( बर्गर ते सॅलड) असे मी वर एका प्रतिक्रियेत देखील लिहिले आहे. आणि वरची लिंकही ते सिद्ध करते आहे. ( अपवादात्मक उदाहरण आहे हे.)

हा डाएट वरचा बाफ आहे, तो कोणी काही जंक खात असेल तर लोकं लिहू शकतील असे वाटते.

पण मीच इथेच, दोनदा लिहिल्यासारखे कुणी काय करतं आणि कुणाला काय लागू होतं त्यामुळे ते दुसर्‍याला लागू होईल असे अजिबात नाही.

>>दोनदा लिहिल्यासारखे कुणी काय करतं आणि कुणाला काय लागू होतं त्यामुळे ते दुसर्‍याला लागू होईल असे अजिबात नाही.<<

एक्झॅटली माय पॉइंट...

असे अपवाद सर्वत्र आढळतात.
जंक फूड सतत खात रहाणे हे वजनवाढीच्या मुख्य कारणांपैकी एक आहेच. ते ब्लॅंकेट स्टेटमेंट आहे असे वाटत नाही

मानिनी, तुम्ही फक्त दुधाचा चहा घेता? बासुंदी Happy >>> . हो ना अगदी असेच बोलतात सगळे पण मला पाणी अन दुध घातलेला चहा नाही आवडत.

जंक फूड सतत खात रहाणे हे वजनवाढीच्या मुख्य कारणांपैकी एक आहेच >>>> मी स्वःत एक ऊदाहरण आहे याचे. जंक फुड एक व्यसन कधी होते ते कळत सुद्दधा नाही
अगदी आता डायटिंगवर असताना सुद्दधा किमान आठवडा पंधरावड्यात एकदातरी तंदुरी /लॉलिपॉप खातेच खाते मग भले डिनर स्कीप करावे लागले तरी चालेल

माझ्या मम्मीने माझ्यावर घेतलेल्या मेहनतीमुळे अन.पाठपुराव्यामुळे मी वजन कमी करायचे मनावर घेतले नाहीतर माझेही काही खरे नव्हते लवकरच मी पण XXXL पर्यंत पो चली असती.

Wafer हा प्रकारच वाईट आहे, आम्ही वर्षातून एकदा असे पदार्थ खातो, त्यामुळे चवीत व गुणवत्तेत पडत चाललेला फरक स्पष्ट जाणवतो, लेज, बालाजी, कुरकुरे, सगळे पॅक पदार्थ खूप मीठ असतं, आणि काहीतरी मसाला जो addict करतो, पॅकेज्ड फूड पासून 100 हात लाम्ब असलेलं केव्हाही बरं, त्यापेक्षा ऊसाचा रस प्यावा नाहीतर सरळ वडापाव खावा काहीच उपाय नसेल तर

Pages