इंटरमिटंट फास्टिंग ( IF ) - अनुभव

Submitted by केदार on 25 April, 2017 - 10:05

ओके ! इंटरमिटंट फास्टिंग ! IF

* * * * * फॅ़क्ट * * * * *
१. तुमच्याच भल्याकरता, तुम्हाला त्या अवधीत काही न खाता उपाशी राहावे लागते!
२. IF ही लाईफस्टाईल आहे. वेटलॉस प्रोग्रॅम नाही !
३. IF च्या आधीचे वजन ७३ किलो, सध्याचे वजन - ६९.८ आधीच्या बॉडीफॅट २० / IF नंतर १६%, सध्याच्या रिव्हाईज गोल - १०%

मी एन्डुरंस अ‍ॅथलिट (?!) आहे. IF चे नेट वर कळायच्या आधीच मी उपाशीपोटी मध्येच व्यायाम करायचो. म्हणजे सकाळी ६:३० ला सायकल चालवायला जायचो, तेंव्हा नाश्ता न करताच जायचो आणि जर ३ तासापेक्षा जास्त राईड असेल, ( किंवा १०० किमी पेक्षा जास्त ) तर १ १/२ तासानंतर मध्येच टपरीवर नाश्ता ( हाय कार्ब, उदा पोहे वगैरे) खायचो. पण २ एक तासाची राईड असेल तर काही न खाताच घरी यायचो, थोडक्यात माझ्या शरीराला काही न खाता व्यायाम करायची सवय होती.

मागे इथे सईचा लेख वाचून अन नंतर गुगल रिसर्च करून मी देखील IF ट्राय करायला काय हरकत आहे? हा विचार करून सुरूवात केली. खरे तर व्यायाम आणि उपास ह्यांची जोड कशी घालता येईल ह्यावर मी गुगली टाकला आणि मला लिनगेन्स साईटचा शोध लागला. http://www.leangains.com/ ह्याची लिंक मागच्या वर्षी मी सईच्या लेखावर पण दिली होती. ह्यावर बरीच चांगली माहिती उपलब्ध आहे. अर्थात मी वेटलिफ्टर नाही अन मला ६ पॅक्सही नाहीत, किंवा आणायच्या नाहीत. पण ह्यासाईटमुळे मला १६:८ प्रकाराबद्दल माहिती झाली आणि तीचा अवलंब करायला मी शिकलो.

माझा प्रवास !

मला ब्रेकफास्ट रोज हवा असायचा. अगदी लहानपणापासून वगैरे. त्यावेळी काही खाल्ले नाही की चिडचिड व्हायची. पण एकदा ठरवले की ठरवलेच. मग पहिल्या आठवड्यात हळूहळू एक प्लेट पोह्यांऐवजी अर्धी प्लेट पोहे असे केले आणि एकाच आठवड्यानंतर जमायला लागले. मग दुसर्‍या आठवड्यापासून ब्रेकफास्ट पूर्ण स्किप करून १६:८ सुरू केले. थोडक्यात जर ब्रेकफास्टची सवय असेल तर सुरू करायला अवधी द्या, अन्यथा सोडून द्याल.

संध्याकाळी ८:३० ते दुसरे दिवशी सकाळी १२:३० ते २ ह्या वेळात मी उपाशी राहतो. अर्थात ह्या वेळांमध्ये सकाळचा अन १० चा चहा किंवा कॉफी मात्र घेतो. थोडक्यात जे काही खायचे ते १२:३०-१ ते संध्याकाळी ८:३० पर्यंतच. शिवाय मी साखरेचे काहीही शक्यतो खात नाही. अगदी चहात साखर वगैरे सोडूनही दीड पावने दोन वर्षे झाली आहेत. मध्येच कधीतरी हुक्की आली की गोड खातो, पण ती हुक्की नेहमी येत नाही.

मग भूक लागल्यावर मी काय करतो?

* * * * * फॅ़क्ट * * * * *
हंगर पँग्स येतात. पण ते फक्त १० मिनिटेच टिकत असतात.

ह्याच वेळी मोह टाळायचा. जर निग्रह नसेल तर आपण स्नॅक कडे नक्कीच वळणार. थोडक्यात, आपण हे का सुरू केले? ह्याचा तेंव्हा विचार केला, तर ती १० मिनिटे निभावून जाऊ शकतात. त्यावेळी पाणी प्यायचे. विचार केला तर हे सहज जमण्यासारखे आहे. फक्त आपण तेवढे निग्रही नसतो.

हळू हळू मला १६:८ जमायला अन आवडायला लागले. मग जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मी बॉउंड्रीज पार करायचा विचार केला.

Eat Stop Eat चा प्रवास. : १६ तास जमू लागल्यावर मी एकेदिवशी विचार केला की २४ तास ट्राय करून पाहायला काय हरकत आहे? आणि मग मी त्या दिवशी दुपारी जेवलोच नाही. दुपारी ३ वाजता ( नेहमीची वेळ संपल्यावर ३ तासाने) भूक लागली, पण पाणी प्यायलो. अन घरी चक्क साबुदाण्याची खिचडी केली होती. पण निग्रह ! मग चारला चहा. मग अचानक फ्रेशच वाटलाला लागलंन भौ ! एकदम अ‍ॅक्टिव्ह. अचानक कुठून तरी एनर्जी आल्यासारखे. रात्रीचे ८ वाजले, तरी जेवायला नको वाटले. मग ९:३० ला जेवलो. २५ तास ३० मिनिटे !! याहू !! मग दर आठवड्यात एकदा तरी २४ + तास उपाशी राहावे असे उगाचच वाटू लागले. मग सोमवार किंवा गुरूवार माझ्यासाठी बिझी दिवस असतात, त्या दिवशी मी २४ + तास उपाशी राहू लागलो. अन त्यातच आनंद वाटू लागला. थोडक्यात रोज १६:८ पण आठवड्यातून कधी कधी दोन तर एक दिवस तरी २४ + तास उपास. ब्लेंडेंड IF ! सोमवारी दुपारी कामच्या जागी पोचल्यावर जर जेवायचे ठरलेच तर सॅलड खात आहे. ( ३०० कॅलरीज) जेंव्हा २४ तास उपाशी राहायचे असते, तेंव्हा कामात गुंतवणे वा काही काम असणे आवश्यक आहे. अन्यथा विचारात "अन्नच" असतं.

मग व्यायामाचे काय?
* * * * * फॅ़क्ट * * * * *
खूप सारे बॉडी बिल्डर १६:८ फॉलो करतात !
उपाशी राहण्यापूर्वी व्यवस्थित खाल्ले असेल तर उपाशीपोटी व्यायाम करू शकतो.

दोन स्क्रिन शॉटस. पिक्चर्स स्पीक .... वगैरे वगैरे. ही सायकलिंग मी उपाशीपोटी केली आहे. आणि ह्यात HIIT - हाय इंटेंसिटी ट्रेनिंग केली आहे, त्यामुळे माझा हार्ट रेट पण खूप वाढलेला दिसेल. माझ्या हार्ट रेटच्या लेखांमध्ये तुम्हाला HIIT ची आणखी उदाहरण दिसू शकतील.

IMG_0872.PNG

ह्या वरच्या सायकलिंग मध्ये १००० पेक्षा जास्त कॅलरी ह्या उपाशीपोटी लागल्या आणि माझ्या शरीराने त्या विनासायस पुरवल्या. सायकलिंग झाल्यावरही मी अजिबात थकलेलो नव्हतो. फक्त खूप वार्‍यामुळे इरिटेट झालो होतो, कारण इथे वारे हे २५ ते ३० किमी प्रति तास असते, अन वार्‍यात सायकल चालवणे म्हणजे ..
आणि ह्या खालील चित्रात ८०० कॅलरीज

IMG_0871.PNG

* * * * * फॅ़क्ट * * * * *
उपासामुळे डायबेटिस बरा होण्यास मदत होते. ज्यांनी IF केले त्यांचा अनेक रिव्हर्सल केसेस नेट वर दिसतील ( T2) आणि अनेक मेडिकल पेपर्स देखील ह्या विषयावर उपलब्ध आहेत.
वजन कमी होते. ( ओके ! वजन कमी होते. )

माझे वजन मुळातच "योग्य" आहे. रादर जीवनात मी कधीही जाड नव्हतोच. पण माणसाने नुसते वजन कधीही मोजू नये. बॉडी फॅट फॅक्टर मोजावा. माझ्याबाबतीत बॉडी फॅट हाच फॅक्टर होता. IF च्या आधी बॉडी फॅट साधारण १९% + होते. IF नंतर माझे वजन फक्त ७ पाउंडड्स कमी झाले, पण बॉडी फॅट आत्ता फक्त १६% आहे.

माझ्या मेंटेनन्स कॅलरी, म्हणजे आहे तसेच मेंटेन ठेवायला ( मी करत असणारा व्यायाम धरून ) लागणार्‍या कॅलरीज ह्या २२५० कॅलरी डेली आहेत ! आता हा कॅलरी गोल पाहून वजन कमी करणारे म्हणतील, बापरे, हे तर आमचं दोन दिवसाचं जेवण !

मी काय शिकलो? किंवा हवे तर टिप्स म्हणू

- भुक सहन होत असते, आपण ती सहन करत नाही.
- पूर्वी दुपारचे जेवण ते संध्याकाळचे जेवण ह्यात मी अनंत वेळा किचन मध्ये जाऊन उगाच काही तरी खायचो, किंवा निदान फ्रिज उघडून पाहायचो. ( मी खूप वेळा घरून काम करतो.) गेले ३-४ महिने असे काही होत नाही.
- सध्या मी जे काही खातो, ते खायच्या आधी आपोआप मनात कॅलरी / फॅट इत्यादी काउंट होतात, हे ओव्हरकिल आहे असे तुम्ही म्हणू शकता, पण IF मुळे माणसाला काय खावे ह्याचा IQ आपोआप निर्माण होतो.
- कधीकधी २० तासानंतर डोके दुखू शकते, किंवा वेळ जात नाही, त्यावेळी थोड्या दुधाचा चहा / ब्लॅक कॉफी हे पर्याय खूप चांगले आहेत.
- अ‍ॅज लाँग अ‍ॅज तुम्ही कॅलरी डेफिसीट ठेवता, तो पर्यंत तुम्ही हवे ते खाऊ शकता. जंक फुड ते हेल्दी फुड. लिबरेशन. अगदी हवे ते खा.
- घरी पाहूने आले किंवा आपण दुसर्‍यांकडे गेलो, तर १६:८ वेळापत्रकातच राहायची गरज नसते, त्या त्या वेळी, ते ते खायलाच पाहिजे ( किंवा नको) असा हा प्रोग्राम नाही. आपण ज्या क्षणी उपास सुरू केला त्या क्षणापासून आपण उपाशी, अश्या छोटे मोठे प्रसंगात उपाशी राहणे योग्य नाही.
- योग्य ते प्रोटिन आणि कार्ब व फॅट, दोन्ही वेळी जेवताना मिळणे आवश्यक आहे, अन्यथा थकायला झाल्यासारखे होऊ शकते.
- कुठल्याही डायट विना, वजन कमी होते. वजन कमी होताना पहिले कंबर आणि पोट ह्यातील फॅट्स कमी होतात. आणि ३ एक आठवड्यात फरक जाणवायला लागतो, तो इतरांना दिसेलच असे नाही, पण तुम्हाला जाणवतो.
- वजन केवळ उपाशी राहण्यामुळे कमी होते, त्यासाठी व्यायामाची अजिबात आवशक्ता नाही. पण व्यायाम केला, तर ज्यांना वजन लवकर कमी करायचे आहे, त्यांना जास्त मदत होते. कॅलरी डेफिसिट इज द की !

वर मी व्यायाम करणार्‍यांना फायदा होतो असे लिहिले आहे. पण व्यायाम करायची गरज नाही, हे ही लिहिले आहे. दोन्ही एकत्र करत असताना नेमके काय होते?

ह्या चित्रात परत एकदा मी फास्टिंग मध्ये सायकल चालवली आहे.
स्पीड - ३१+ आणि हार्ट रेट अगदीच नगण्य - १३६ जो माझ्यासाठी लोअर झोन २ आहे. मागच्या चित्रात HIIT होते, ह्या चित्रात एरोबिक एन्ड्युरंस हा प्रकार आहे.

एवढ्या वेगाने दीड तास सलग अवघड असतं आणि खूप एनर्जी लागते. आणि ही सर्व एनर्जी उपाशीपोटी देखील आरामात मिळाली. हे IF मुळे
पण माझा हार्ट रेट तरीही गप्पा मारत चालवण्याच्या घरात आहे, आणि ते शक्य झाले, मी सतत सायकलिंग करत असल्यामुळे माझ्या मिचो मसल्स, तयार होणारे लॅक्टेट प्रचंड फास्ट प्रोसेस करायला शिकल्या, हा त्याचा गेन. ज्यात IF चा शून्य रोल आहे.

cycle_1.jpg

थोडक्यात काय? तर IF हे फक्त वेट लॉस साठीच नाही, तर ती लाईफस्टाईल आहे. जी मी आनंदाने फॉलो करतो.

http://www.diabetesincontrol.com/intermittent-fasting-and-its-beneficial...
http://jap.physiology.org/content/99/6/2128.long ( Intermittent fasting increases whole-body insulin sensitivity)
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC4257368/
http://journals.plos.org/plosone/article?id=10.1371/journal.pone.0079324 ( black coffee for breakfast and the same total-caloric intake as the other two diets for lunch )
https://intensivedietarymanagement.com/fasting-cures-diabetes-t2d-4/

लोकांचे अनुभव आणि काही डॉक्टर्स मधुमेह व उपास ह्यावर बोलताना ह्या युट्यूब सर्च मध्ये दिसतील.
https://www.youtube.com/results?search_query=intermittent+fasting+and+di...

- तळटिप - मी स्वतः डॉक्टर नाही, मी फक्त अनुभव लिहितो आहे. ह्या विषयात टेक कंट्रोल ऑफ युवर लाईफ हे शब्दशः खरे आहे, पण मधूमेहाच्या गोळ्या बंद करण्याआधी आपल्या डॉक्टरशी नक्कीच भेटा व बोला.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नानबा, प्रत्येकाचं वजन त्याच्या वय व उंचीनुसार प्रमाणात असायला हवे. माझी उंची 6 फूट आणि वय 40 असेल तर 45 किलो वजन हे घातक आहे.

फोटो द्या, वजन सांगा, वय सांगा टोटली अनवॉरंटेड आहे. पब्लिक फोरम वर अशी चौकशी अप्रशस्त वाटते मग त्यामागचे कारण काहीही असो.

IF मुळे बारीक आणि पित्त प्रक्रुती असणाऱ्या ना फायदा होतो का? मला वजन वाढवायचे आहे , सांधेदुखी कमी करायची आहे आणि अर्थात energy वाढवायची आहे.

ते आयसोलेटेड प्रोटीन शेक सक्काळी जीममधन आल्यावर घेतलं त चालेल का? त्यात कार्ब्स नाहीत.

माझं रात्री 9 ला जेवण अन दुपारी 1 नंतर जेवण व्यवस्थित फिट बसतंय.

सप्लीमेंटम्हणुन सप्लिमेंटसारखे घेतले तर फायदा होतो. बरेचशे लोक्स ते मील रीप्लेसमेंट म्हणुन वापरतात, अन मग सगळच बिघडतं. असो, हा धागा आयेफचा असल्याने ह्या विषयावरच राहिलेलं बर.

लेख वाचला पण प्रतिसदांमधल्या चर्चा अजून वाचल्या नाहीत. माबोवर नेहमीच चर्चांमधून सुद्धा भरपूर माहिती हाती लागते. तोपर्यंत मी IF चालुसुद्धा केलं आहे, म्हणून काही शंका विचारते.

मी वजन कमी करण्यासाठी (अगदीच नॉर्मल आहे, पण झिरो फिगरची खुमखुमी आली आहे), IF चालू केलं. आज पाचवा यशस्वी होता होता हुकलेला दिवस. लंच 12.30 नंतर मी 8.30 वाजता डिनर करते पण आज 5.30 वाजता खाकरा, अंजीर आणि strawberries खाल्ल्या.

उद्यापासून परत प्रयत्न करणार आहे. त्यासंदर्भात काही शंका. 1. दोन जेवणामध्ये लिक्विड्स चालतात, तर अगदी पाणीदार ताक चालेल का? की फक्त ग्रीन टी आणि ब्लॅक कॉफीच चालते? 2. 8 तासांपेक्षा थोडं पाऊण/अर्धा तास कमी असताना दुसरं जेवण घेतलं तर चालतं की उद्देश अगदीच असफल होतो? कधी जर लंचला उशीर झाला तर 8 तासांच्या अंतराने डिनर करायचं म्हटलं तर फार उशिरा होतं, जे मला पटत नाहीए. कारण एवढे वर्ष लवकर म्हणजे 7/7.30ला जेवायची सवय लावून घेतली होती.

१. पाणीदार ताक, नारळपाणी चालेल. चहा कॉफी टाळलेलीच बरी.
२. आयएफचे अनेक स्लॉट्स आहेत. १२-१२, १०-१४, ८-१६, ६-१८, ४-२०. एखाद्या वेळी दोन जेवणातले अंतर कमी झाले तर काही फरक पडत नाही.

हेला, धन्यवाद. ग्रीन टी आणि ब्लॅक कॉफी दोन्हीमुळे मला ऍसिडिटी होते, म्हणून ताकाचा पर्याय विचारला होता. हुश्श झालं.

सध्या मी 8-16 करते आहे. पुढे मागे गरज पडली तर बदलून पाहीन.

(अजून करत नसाल तर हे करा) >> लंच किंव डिनरमध्ये आवर्जून सॅलड घ्या. हिरव्या भाज्या, फळे, गाजर टोमॅटो कांदा काकडी दही चा वापर ठेवा.

हेला, परत एकदा धन्यवाद. कार्ब्ज इंटेक कमी केला की पोट भरत नाही,म्हणून भूक भागवण्यासाठी सलाड्स भरपूर खाते. जेवण झालं की गोड लागतच म्हणून तडजोड म्हणून फळं खाते. पण आता दही आणि हिरव्या भाज्या आवर्जून खाईन.

मीरा, IF मध्ये जी मोठी विंडो (१६ तास) असते ती महत्वाची. आणि ती शक्यतो काटेकोरपणे पाळली गेली पाहिजे. उरलेल्या ८ तासात संतुलीत आहाराची ३ मिल्स चालू शकतात. दिक्षीत डाएटमध्ये फक्त २ वेळा खायचे असते. ते स्पेशलाइज्ड IF आहे. प्रत्येक IF तसेच असले पाहिजे असे नाही.

तुमचे रात्रीचे जेवण जरा लवकर होतय तर आणखीनच उत्तम कारण मग मोठी विंडो आणखीन मोठी होइल.

माधव, धन्यवाद. तुमच्या पोस्टने एवढा रिलीफ मिळाला. सकाळच्या जबाबदाऱ्या पार पाडून, मग work out करून पाहिलं जेवण घ्यायला 12.30 ते 1 वाजतात. त्यामुळे उशिरा होणाऱ्या डिनरमुळे मी काळजीत होते.

साखर बंद केल्याने खूप फरक पड़तो...
वज़न शकयतो सकाळी ६:३० ते ७:३० मध्ये करावे.
ब्लैक कॉफ़ी, ज़ीरा पाणी, ओवा पाणी ,ऍपल सिडेर वींनेगर असं
सगळं घेंऊन १६ :८ IF चालू आहे..रिज़ल्ट पॉज़िटिव आहेत.

केदार, सर्व प्रथम तुम्हाला अनेक धन्यवाद !
तुम्ही अजून ही IF करताय का ? १ वर्षाहून जास्त काळ IF केलेले कोणी आहेत का इथे ?

हो मी आहे. पण ६ महिन्यानी माझ वजन कमी व्हायचे बंद झाले. पण शुगर , कोल्स्ट्रॉल रेशो सगळ आता नॉर्मलला आल. पोट खूपच कमी झाल. शर्टाचा साइझ कमी झाला. Happy

मी ३ वर्षं आयएफ करते आहे.
माझंही वजन पहिल्या वर्षात कमी झालं तसं आता होत नाही. अजूनही ७-८ किलो कमी करायची गरज आहे. पण माझं वजन पूर्वी "डाएट" सोडल्यावर वाढायचं तसं आता वाढत नाही. अधून मधून दुर्लक्ष झाल्यास पुन्हा काटेकोरपणे आयएफ करून लगेच वजन कमी होतं. त्या ७-८ किलो पैकी असे काटेकोरपणे फॉलो करून अधून मधून २-४ किलो मी कमी करते. पण साधारण सध्याचे वजन +/- २-३ किलो अशा रेंजमध्ये मी गेली दोन वर्षं राहू शकले आहे जे मला आधी जमायचे नाही.
पण खाण्यात साखर, भात, ब्रेड (बेकरी पदार्थ), खूप कमी आहेत. त्याची आता सवय झाली आहे. काही कारणांनी ही सवय मोडली की आयएफ चालू असले तरी वजन वाढते.

मी आयेफ्/दिक्षित पद्धती वापरतो. याला एक अपवाद. बिनसाखरेचा पण दूध घातलेला चहा तीन कप दुपारी जेवणा पर्यंत होतो. यामुळे वजन कमी होण्याचे थांबले आहे का?.
जेवणाव्यतिरिक्त इतर वेळेस काहिही न खाण्याची आता सवय झाली आहे. पण जेवणात गोड असले तर खातो.

दुसर म्हणजे वीकेंडला अल्कोहोल. - याचाही परिणाम होत असेल का जर कॅलरी काउंट त्या दिवसाच्या लिमिटच्या आत असतील तर?.

दुसर म्हणजे वीकेंडला अल्कोहोल. - याचाही परिणाम होत असेल का जर कॅलरी काउंट त्या दिवसाच्या लिमिटच्या आत असतील तर?.

अल्कोहोलची बायोकेमिस्ट्री तुम्ही नक्की किती पिता त्यावर अवलंबून आहे. एखादा पेग अगदी रोज घेणारे असतात.
जर बिन्ज ड्रिंकिंगसारखे होत असेल तर नक्कीच त्याचा वजनावर परिणाम होणार. आणि त्यातही तुम्ही स्पिरिट्स घेता की बिअर/वाईन त्यानेसुद्धा.
बिअरमध्ये बरेच कार्ब्स असतात आणि वाईनमध्ये साखर असते. पण काहीही असले तरी शरीर कुठल्याही अल्कोहोलला टॉक्सिनसारखे बघते त्यामुळे तेवढ्या काळापुरती लिव्हरची क्रिया बदलते.
तसेच त्याबरोबर खाणेही जास्त होत असेल तर आठवड्यातील पुढचे २-३ दिवस तुमचा वीकएंड प्रोसेस करण्यातच जाणार.

धन्यवाद विक्रमसिंह !
सई, तुम्ही IF ( व इतर पद्धती) वर जबरदस्त लेखन केले आहे. हा विषय, त्यामागील विज्ञान सर्वांना समजेल अशा भाषेत पोचवल्याबद्दल आपले अनेक धन्यवाद ..
मी नुकतेच IF चालू केले आहे. फिटनेस सुधारणे हे मुख्य उद्दीष्ट.

मी गेले दोन महिने आयएफ करत आहे. दोन महिन्यात साधारण ७ किलो वजन कमी झाले आहे. कपड्यांचा एक साइज ही पूर्ण खाली गेला आहे. आता अजून २-३ किलो कमी झाले की Bmi ~२१ होईल.

वजन कमी होण्याचा वेग बहुदा जास्तीच्या व्यायामामुळे वाढला असावा असं वाटतंय. या परिस्थितीत मसल लॉस होत नाहीये हे कसे ensure करावे ? मी सध्या फक्त बॉडी फॅट कॅल्क्युलेटर नी फॅट्स ट्रॅक करतोय ..

एक प्रश्न आहे, फास्टिंग सायकल मध्ये मला प्लेन / मिठात बुडावलेला आवळा खायचा आहे तर तो चालेल का?

का याने माझी सायकले ब्रेक होईल. मी 16:8 ची सायकल छान मेंटेन करते आहे. पण आता अनेशया पोटी आवळा खायचा आहे, नसेल चालणार तर मग इटिंग सायकल मध्ये खावा लागेल

कृपया मार्गदर्शन करावे

धागा वर आलाच आहे तर माझी पण एक शंका विचारायची आहे.

गेली काही वर्षे माझी शुगर १०० ते ११० येत असे. घरी आजीला, वडिलांना, काका, आत्या सर्वांना शुगर आहे. आनुवंशिक आहे.

मागच्या एप्रिल- मे मधे मी IF (१६:८) सुरु केले.

गेले काही महिने शुगर सातत्याने कमी होत आहे, सुरुवातीला आनंद झाला, पण आता ती एक सो एक निचांक करत आहे. मागच्या आठवड्यात ६९ आली तर आज ६७!

मी गेले एक दिड वर्षे फॉलो केलेले डाएट खालील प्रमाणे...

दुपारी १ वाजता जेवणः- दोन चपात्पा/ दिड भाकरी, भाजी, एक वाटी वरण/ आमटी, २५० ml कोल्ड कॉफी.

संध्याकाळी ५ वाजता:- २ फळे / वाटीभर सुकामेवा, उपलब्ध असल्यास थोडे फार सटर फटर.

रात्री ८ -९ वाजता:- सॅलड बाऊल. ( एक/ दोन फळ भाज्या + एक ते दिड वाटी वाफवलेली कडधान्ये + वरुन ब्रोकोली/ ऑलिव्हज/ पनीर/ मिक्स सीड्स वगैरे) + एक ग्लास ताक/ लस्सी + घरात असेल तर एखाद दुसरे स्वीट

शुगर फार (६० च्या) खाली गेली तर मला परवडणार नाही. कंपनीच्या मेडिकल मधे क्वेरी येऊ शकते. त्यामुळे मी सकाळी ९ ला फळे खाणे सुरु केले आहे.

मी आता डॉक्टरांना कन्सल्ट करायचा विचार करत आहे.

कोणाला असा काही अनुभव?

तुमच्या पहिल्या जेवणाच्या वेळी तो सुरुवातीला खाल्ला तरी त्याला 'अनशया' पोटी म्हणता येईल ना? आधी काही खाल्ले नसल्यामुळे ते अनशनच झाले ना? बाकी इतर वेळी खाल्ल्यास इन्शुलिन वगैरे गोष्टी - ह्याचा माझा काही अभ्यास नाही. जाणकारांनी सांगावे.

मीठा त बुडवलेला आवळा किती calorie होईल.
Zero calorie असेल तर fasting विंडो मधे खाऊ शकतो..
नाहितर eating विंडो मध्ये खावा लागेल.
हवे तर eating विंडो च्या सुरुवातीला खावा आणी अर्धा तासाने जेवा.
किंवा fasting विंडो कमी करा 15 तास .. आणी म आवळा खा आणी 1 तासाने जेवा.

१५० ग्रॅम आवळे ६६ कॅलरीज इति गुगल. (हे बियांशिवाय) एक मध्यम आकाराचा आवळा (साधारण १ इंच व्यास आणि बी शिवाय) 1५ ग्रॅमचा म्हणजे ६.६ कॅलरीज.
कुणी म्हणतं ५ कॅलरीज पर्यन्त चालते, कुणी म्हणते १०.
तेव्हा तुम्हालाच आवळा खाण्या आधी फास्टिंग इन्सुलिन आणि आवळा खाल्ल्यावर रँडम इन्सुलिन चेक करून बघावं लागेल उपास मोडतोय का ते.

अतरंगी, माझी फास्टिंग शुगर 78-90 असते (१८ -२०तास फास्टिंग विंडो). या रेंज मध्ये तेव्हाच केलेले फास्टिंग इन्सुलिन ४.८ mU/L होते (नॉर्मल).
जर सकाळी उठून भरपूर पाणी पिऊन काही वेळाने शुगर चेक केली तर रीडिंग कमी येते असा अनुभव आहे.

तुमची फास्टिंग शुगर सातत्याने खाली जात आहे, तेव्हा असे काही कारण नसेल आणि तुम्ही लॅब मध्ये चेक करून शहनिशा केला असेलच असे गृहीत धरतो. डॉकचा सल्ला घ्या. फास्टिंग इन्सुलिनही चेक करून बघा.

तुम्ही लॅब मध्ये चेक करून शहनिशा केला असेलच असे गृहीत धरतो. डॉकचा सल्ला घ्या. फास्टिंग इन्सुलिनही चेक करून बघा.>

हो करुन पाहतो.

फास्टिंग इन्सुलिन मी चेक करत नाही. तेही करुन पाहतो.

Pages