इंटरमिटंट फास्टिंग ( IF ) - अनुभव

Submitted by केदार on 25 April, 2017 - 10:05

ओके ! इंटरमिटंट फास्टिंग ! IF

* * * * * फॅ़क्ट * * * * *
१. तुमच्याच भल्याकरता, तुम्हाला त्या अवधीत काही न खाता उपाशी राहावे लागते!
२. IF ही लाईफस्टाईल आहे. वेटलॉस प्रोग्रॅम नाही !
३. IF च्या आधीचे वजन ७३ किलो, सध्याचे वजन - ६९.८ आधीच्या बॉडीफॅट २० / IF नंतर १६%, सध्याच्या रिव्हाईज गोल - १०%

मी एन्डुरंस अ‍ॅथलिट (?!) आहे. IF चे नेट वर कळायच्या आधीच मी उपाशीपोटी मध्येच व्यायाम करायचो. म्हणजे सकाळी ६:३० ला सायकल चालवायला जायचो, तेंव्हा नाश्ता न करताच जायचो आणि जर ३ तासापेक्षा जास्त राईड असेल, ( किंवा १०० किमी पेक्षा जास्त ) तर १ १/२ तासानंतर मध्येच टपरीवर नाश्ता ( हाय कार्ब, उदा पोहे वगैरे) खायचो. पण २ एक तासाची राईड असेल तर काही न खाताच घरी यायचो, थोडक्यात माझ्या शरीराला काही न खाता व्यायाम करायची सवय होती.

मागे इथे सईचा लेख वाचून अन नंतर गुगल रिसर्च करून मी देखील IF ट्राय करायला काय हरकत आहे? हा विचार करून सुरूवात केली. खरे तर व्यायाम आणि उपास ह्यांची जोड कशी घालता येईल ह्यावर मी गुगली टाकला आणि मला लिनगेन्स साईटचा शोध लागला. http://www.leangains.com/ ह्याची लिंक मागच्या वर्षी मी सईच्या लेखावर पण दिली होती. ह्यावर बरीच चांगली माहिती उपलब्ध आहे. अर्थात मी वेटलिफ्टर नाही अन मला ६ पॅक्सही नाहीत, किंवा आणायच्या नाहीत. पण ह्यासाईटमुळे मला १६:८ प्रकाराबद्दल माहिती झाली आणि तीचा अवलंब करायला मी शिकलो.

माझा प्रवास !

मला ब्रेकफास्ट रोज हवा असायचा. अगदी लहानपणापासून वगैरे. त्यावेळी काही खाल्ले नाही की चिडचिड व्हायची. पण एकदा ठरवले की ठरवलेच. मग पहिल्या आठवड्यात हळूहळू एक प्लेट पोह्यांऐवजी अर्धी प्लेट पोहे असे केले आणि एकाच आठवड्यानंतर जमायला लागले. मग दुसर्‍या आठवड्यापासून ब्रेकफास्ट पूर्ण स्किप करून १६:८ सुरू केले. थोडक्यात जर ब्रेकफास्टची सवय असेल तर सुरू करायला अवधी द्या, अन्यथा सोडून द्याल.

संध्याकाळी ८:३० ते दुसरे दिवशी सकाळी १२:३० ते २ ह्या वेळात मी उपाशी राहतो. अर्थात ह्या वेळांमध्ये सकाळचा अन १० चा चहा किंवा कॉफी मात्र घेतो. थोडक्यात जे काही खायचे ते १२:३०-१ ते संध्याकाळी ८:३० पर्यंतच. शिवाय मी साखरेचे काहीही शक्यतो खात नाही. अगदी चहात साखर वगैरे सोडूनही दीड पावने दोन वर्षे झाली आहेत. मध्येच कधीतरी हुक्की आली की गोड खातो, पण ती हुक्की नेहमी येत नाही.

मग भूक लागल्यावर मी काय करतो?

* * * * * फॅ़क्ट * * * * *
हंगर पँग्स येतात. पण ते फक्त १० मिनिटेच टिकत असतात.

ह्याच वेळी मोह टाळायचा. जर निग्रह नसेल तर आपण स्नॅक कडे नक्कीच वळणार. थोडक्यात, आपण हे का सुरू केले? ह्याचा तेंव्हा विचार केला, तर ती १० मिनिटे निभावून जाऊ शकतात. त्यावेळी पाणी प्यायचे. विचार केला तर हे सहज जमण्यासारखे आहे. फक्त आपण तेवढे निग्रही नसतो.

हळू हळू मला १६:८ जमायला अन आवडायला लागले. मग जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मी बॉउंड्रीज पार करायचा विचार केला.

Eat Stop Eat चा प्रवास. : १६ तास जमू लागल्यावर मी एकेदिवशी विचार केला की २४ तास ट्राय करून पाहायला काय हरकत आहे? आणि मग मी त्या दिवशी दुपारी जेवलोच नाही. दुपारी ३ वाजता ( नेहमीची वेळ संपल्यावर ३ तासाने) भूक लागली, पण पाणी प्यायलो. अन घरी चक्क साबुदाण्याची खिचडी केली होती. पण निग्रह ! मग चारला चहा. मग अचानक फ्रेशच वाटलाला लागलंन भौ ! एकदम अ‍ॅक्टिव्ह. अचानक कुठून तरी एनर्जी आल्यासारखे. रात्रीचे ८ वाजले, तरी जेवायला नको वाटले. मग ९:३० ला जेवलो. २५ तास ३० मिनिटे !! याहू !! मग दर आठवड्यात एकदा तरी २४ + तास उपाशी राहावे असे उगाचच वाटू लागले. मग सोमवार किंवा गुरूवार माझ्यासाठी बिझी दिवस असतात, त्या दिवशी मी २४ + तास उपाशी राहू लागलो. अन त्यातच आनंद वाटू लागला. थोडक्यात रोज १६:८ पण आठवड्यातून कधी कधी दोन तर एक दिवस तरी २४ + तास उपास. ब्लेंडेंड IF ! सोमवारी दुपारी कामच्या जागी पोचल्यावर जर जेवायचे ठरलेच तर सॅलड खात आहे. ( ३०० कॅलरीज) जेंव्हा २४ तास उपाशी राहायचे असते, तेंव्हा कामात गुंतवणे वा काही काम असणे आवश्यक आहे. अन्यथा विचारात "अन्नच" असतं.

मग व्यायामाचे काय?
* * * * * फॅ़क्ट * * * * *
खूप सारे बॉडी बिल्डर १६:८ फॉलो करतात !
उपाशी राहण्यापूर्वी व्यवस्थित खाल्ले असेल तर उपाशीपोटी व्यायाम करू शकतो.

दोन स्क्रिन शॉटस. पिक्चर्स स्पीक .... वगैरे वगैरे. ही सायकलिंग मी उपाशीपोटी केली आहे. आणि ह्यात HIIT - हाय इंटेंसिटी ट्रेनिंग केली आहे, त्यामुळे माझा हार्ट रेट पण खूप वाढलेला दिसेल. माझ्या हार्ट रेटच्या लेखांमध्ये तुम्हाला HIIT ची आणखी उदाहरण दिसू शकतील.

IMG_0872.PNG

ह्या वरच्या सायकलिंग मध्ये १००० पेक्षा जास्त कॅलरी ह्या उपाशीपोटी लागल्या आणि माझ्या शरीराने त्या विनासायस पुरवल्या. सायकलिंग झाल्यावरही मी अजिबात थकलेलो नव्हतो. फक्त खूप वार्‍यामुळे इरिटेट झालो होतो, कारण इथे वारे हे २५ ते ३० किमी प्रति तास असते, अन वार्‍यात सायकल चालवणे म्हणजे ..
आणि ह्या खालील चित्रात ८०० कॅलरीज

IMG_0871.PNG

* * * * * फॅ़क्ट * * * * *
उपासामुळे डायबेटिस बरा होण्यास मदत होते. ज्यांनी IF केले त्यांचा अनेक रिव्हर्सल केसेस नेट वर दिसतील ( T2) आणि अनेक मेडिकल पेपर्स देखील ह्या विषयावर उपलब्ध आहेत.
वजन कमी होते. ( ओके ! वजन कमी होते. )

माझे वजन मुळातच "योग्य" आहे. रादर जीवनात मी कधीही जाड नव्हतोच. पण माणसाने नुसते वजन कधीही मोजू नये. बॉडी फॅट फॅक्टर मोजावा. माझ्याबाबतीत बॉडी फॅट हाच फॅक्टर होता. IF च्या आधी बॉडी फॅट साधारण १९% + होते. IF नंतर माझे वजन फक्त ७ पाउंडड्स कमी झाले, पण बॉडी फॅट आत्ता फक्त १६% आहे.

माझ्या मेंटेनन्स कॅलरी, म्हणजे आहे तसेच मेंटेन ठेवायला ( मी करत असणारा व्यायाम धरून ) लागणार्‍या कॅलरीज ह्या २२५० कॅलरी डेली आहेत ! आता हा कॅलरी गोल पाहून वजन कमी करणारे म्हणतील, बापरे, हे तर आमचं दोन दिवसाचं जेवण !

मी काय शिकलो? किंवा हवे तर टिप्स म्हणू

- भुक सहन होत असते, आपण ती सहन करत नाही.
- पूर्वी दुपारचे जेवण ते संध्याकाळचे जेवण ह्यात मी अनंत वेळा किचन मध्ये जाऊन उगाच काही तरी खायचो, किंवा निदान फ्रिज उघडून पाहायचो. ( मी खूप वेळा घरून काम करतो.) गेले ३-४ महिने असे काही होत नाही.
- सध्या मी जे काही खातो, ते खायच्या आधी आपोआप मनात कॅलरी / फॅट इत्यादी काउंट होतात, हे ओव्हरकिल आहे असे तुम्ही म्हणू शकता, पण IF मुळे माणसाला काय खावे ह्याचा IQ आपोआप निर्माण होतो.
- कधीकधी २० तासानंतर डोके दुखू शकते, किंवा वेळ जात नाही, त्यावेळी थोड्या दुधाचा चहा / ब्लॅक कॉफी हे पर्याय खूप चांगले आहेत.
- अ‍ॅज लाँग अ‍ॅज तुम्ही कॅलरी डेफिसीट ठेवता, तो पर्यंत तुम्ही हवे ते खाऊ शकता. जंक फुड ते हेल्दी फुड. लिबरेशन. अगदी हवे ते खा.
- घरी पाहूने आले किंवा आपण दुसर्‍यांकडे गेलो, तर १६:८ वेळापत्रकातच राहायची गरज नसते, त्या त्या वेळी, ते ते खायलाच पाहिजे ( किंवा नको) असा हा प्रोग्राम नाही. आपण ज्या क्षणी उपास सुरू केला त्या क्षणापासून आपण उपाशी, अश्या छोटे मोठे प्रसंगात उपाशी राहणे योग्य नाही.
- योग्य ते प्रोटिन आणि कार्ब व फॅट, दोन्ही वेळी जेवताना मिळणे आवश्यक आहे, अन्यथा थकायला झाल्यासारखे होऊ शकते.
- कुठल्याही डायट विना, वजन कमी होते. वजन कमी होताना पहिले कंबर आणि पोट ह्यातील फॅट्स कमी होतात. आणि ३ एक आठवड्यात फरक जाणवायला लागतो, तो इतरांना दिसेलच असे नाही, पण तुम्हाला जाणवतो.
- वजन केवळ उपाशी राहण्यामुळे कमी होते, त्यासाठी व्यायामाची अजिबात आवशक्ता नाही. पण व्यायाम केला, तर ज्यांना वजन लवकर कमी करायचे आहे, त्यांना जास्त मदत होते. कॅलरी डेफिसिट इज द की !

वर मी व्यायाम करणार्‍यांना फायदा होतो असे लिहिले आहे. पण व्यायाम करायची गरज नाही, हे ही लिहिले आहे. दोन्ही एकत्र करत असताना नेमके काय होते?

ह्या चित्रात परत एकदा मी फास्टिंग मध्ये सायकल चालवली आहे.
स्पीड - ३१+ आणि हार्ट रेट अगदीच नगण्य - १३६ जो माझ्यासाठी लोअर झोन २ आहे. मागच्या चित्रात HIIT होते, ह्या चित्रात एरोबिक एन्ड्युरंस हा प्रकार आहे.

एवढ्या वेगाने दीड तास सलग अवघड असतं आणि खूप एनर्जी लागते. आणि ही सर्व एनर्जी उपाशीपोटी देखील आरामात मिळाली. हे IF मुळे
पण माझा हार्ट रेट तरीही गप्पा मारत चालवण्याच्या घरात आहे, आणि ते शक्य झाले, मी सतत सायकलिंग करत असल्यामुळे माझ्या मिचो मसल्स, तयार होणारे लॅक्टेट प्रचंड फास्ट प्रोसेस करायला शिकल्या, हा त्याचा गेन. ज्यात IF चा शून्य रोल आहे.

cycle_1.jpg

थोडक्यात काय? तर IF हे फक्त वेट लॉस साठीच नाही, तर ती लाईफस्टाईल आहे. जी मी आनंदाने फॉलो करतो.

http://www.diabetesincontrol.com/intermittent-fasting-and-its-beneficial...
http://jap.physiology.org/content/99/6/2128.long ( Intermittent fasting increases whole-body insulin sensitivity)
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC4257368/
http://journals.plos.org/plosone/article?id=10.1371/journal.pone.0079324 ( black coffee for breakfast and the same total-caloric intake as the other two diets for lunch )
https://intensivedietarymanagement.com/fasting-cures-diabetes-t2d-4/

लोकांचे अनुभव आणि काही डॉक्टर्स मधुमेह व उपास ह्यावर बोलताना ह्या युट्यूब सर्च मध्ये दिसतील.
https://www.youtube.com/results?search_query=intermittent+fasting+and+di...

- तळटिप - मी स्वतः डॉक्टर नाही, मी फक्त अनुभव लिहितो आहे. ह्या विषयात टेक कंट्रोल ऑफ युवर लाईफ हे शब्दशः खरे आहे, पण मधूमेहाच्या गोळ्या बंद करण्याआधी आपल्या डॉक्टरशी नक्कीच भेटा व बोला.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<उपासामुळे डायबेटिस बरा होतो. अनेक रिव्हर्सल केसेस नेट वर दिसतील>>

त्रिकालाबाधित सत्य असल्यासारखं विधान लिहिण्यापेक्षा "काही केसेसमध्ये उपासामुळे डायबेटिस रिव्हर्स होत असल्याचे आढळले आहे" असं लिहाल तर बरं.
हे वाचून कोणी मधुमेही उपास करायचा आणि त्याला हायपोग्लायसेमिया व्हायचा आणि तो कोमात जायचा.

मराठी जेवणाचे किंवा आपण जे काही खातो त्याचे कॅलरीज कसे मोजायचे कुनी सांगू शकेल काय?

मी एकावेळेस ४ गव्हाच्या पोळ्या, एक वाटी भाजी, एक मूद भात, एक वाटी वरण्+२चमचेतूप असे सर्व खातो. असे दोन वेळा जेवण होते, ब्रेकफास्ट नाही. चहा कधीतरी. हे किती कॅलरी होतात?

माझे कॅलरी इन्टेक २००० आहे, मला ५०० ते ८०० कमी करायच्या आहेत. कसे करता येईल याचे मार्गदर्शन मिळेल काय?

Not interested in personal story just the data. >> ओके चालेल. पण अनेक पर्सनल स्टोरिज मधूनच डेटा निर्माण होत आहे. शिवाय मेडिकेटड फास्ट आणि डायबेटिस ह्यांवर खूप सार्‍या स्टडीज आहेत, ज्यातील काही लिंक मी देतो, त्या वाचा.

त्रिकालाबाधित सत्य असल्यासारखं विधान लिहिण्यापेक्षा "काही केसेसमध्ये उपासामुळे डायबेटिस रिव्हर्स होत असल्याचे आढळले आहे" असं लिहाल तर बरं.
हे वाचून कोणी मधुमेही उपास करायचा आणि त्याला हायपोग्लायसेमिया व्हायचा आणि तो कोमात जायचा. >>

मी मंदारशी झालेल्या चर्चेत, डॉक्टरशी चर्चा करा असे लिहिलेले आपण वाचले नसावे वा वाचून इग्नोर केले असावे.

हे त्रिकालाबाधीत सत्य नाही. खरेतर काहीच त्रिकालाबाधीत सत्य नसते. फक्त सुदैवाने ज्यांनी ज्यांनी IF सुरू केले त्यांचा डायबेटीस रिव्हर्स होण्यास मदत झाली. जर IF केलेच नाही अन नुसताच डेटा द्या, असे म्हणाले तर स्टडीजही नाहीच होणार ना?

पाँईट टेकन. मी वाक्य सुधारतो.

ह्यातील अनेक रिसर्च पेपर्सच आहेत. पर्सनल डेटा नाही.

http://www.diabetesincontrol.com/intermittent-fasting-and-its-beneficial...
http://jap.physiology.org/content/99/6/2128.long ( Intermittent fasting increases whole-body insulin sensitivity)
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC4257368/
http://journals.plos.org/plosone/article?id=10.1371/journal.pone.0079324 ( black coffee for breakfast and the same total-caloric intake as the other two diets for lunch )

https://intensivedietarymanagement.com/fasting-cures-diabetes-t2d-4/

आणि मामी, इथे अनेक लोकांनी त्यांचे पर्सनल अनुभव लिहिले आहेत. आय नो की तुम्हाला पर्सनल डेटा आवडत नाही, पण ह्या सर्च मध्ये अनेक डॉक्टर IF करा, त्याने खूप मदत होते असे सांगत आहेत. आणि शेवटी मला सांगा गोळ्यांमुळे डायबेटीस बरा होतो? कंट्रोल मध्ये राहतो? आणि उद्या २००, दोन वर्षाने ५०० ते मग इन्सुलिन इंजक्शन असा प्रवास होतो, म्हणजे गोळ्यावाढतातच, कमी होत नाहीत. आणि जर तुम्हाला स्वतःअल डायबेटिस असेल, ( आय नो की श्री रविंना होता) तर तुम्ही डॉक्टर कडे जाऊन एकदा IF बद्दल बोला. तो पर्यंत हे पाहा, ह्यातून भरपूर डेटा तुम्हाला मिळेल.

https://www.youtube.com/results?search_query=intermittent+fasting+and+di...

नानाकळा,

गुळ पण चालणार नाही. आय नो की मी नाही लिहितोय, जे तुम्हालाही ठणकावून सांगीतल्यासारखे वाटेल. अन आता मला "नाही" असे लिहिताना भिती वाटतीये. Happy पण वेट लॉस हा गोल असेल तर नाहीच साखर कुठल्याही फोर्म मध्ये शरीरासाठी चांगली नाही.

मराठी जेवणाचे किंवा आपण जे काही खातो त्याचे कॅलरीज कसे मोजायचे कुनी सांगू शकेल काय? >> मायफिटनेसपाल नावाचे अ‍ॅप आहे, त्यावर भारतीय जेवनाच्या कॅलरीज मिळतात, पण त्यात १०% अ‍ॅड करा कारण बरेचदा आपण तेल भरपूर टाकतो, पावभाजीवर जास्तीचे बटर खातो.

केदार थँक्स खुप महत्त्व पुर्ण माहिती दिली तुम्ही.

जसे मी आधी लिहीलेय मला अद्याप कुठलाच त्रास नाही पण वाढते वजन अन त्यापसुन भविष्यात होणारे अपाय पाहता मी आधीच वजन कमी करण्याचा प्रयत्न करतीये, अन बर्यापैकी पॉझीटीव्ह सुद्धा वाटतेय.

म्हणजे मग ज्यांना मधुमेह आहे, किंवा होऊ शकेल (हेरेडेटरी असल्यामुळे) त्यांना आयएफचा फायदा जास्त आहे - असं आहे का?

कारण एरवी आपण- ब्रेकफास्ट राजासारखा करा, दुपारचं जेवण मध्यमवर्गीयासारखं आणि रात्रीचं गरीब माणसासारखं- किंवा तत्सम असं ऐकत आलोत ना? Happy आयएफमध्ये तर ब्रेफा स्किप करायकडेच कल दिसतो आहे. तसं का आहे, काही स्पेसिफिक कारण?

सपोज सकाळी ९ ला ब्रेफा, दुपारी १.३० ला जेवण आणि संध्याकाळी ६ ला स्नॅक खाऊन मग दुसरेदिवशीपर्यंत काही खाल्ले नाही, तर तेही आयएफ म्हणून काऊंट होईल ना?

मला वाटतं ब्रेकफास्ट म्हणजे ब्रेक + फास्ट. त्यामुळे रात्रीच्या जेवणानंतर सकाळी काहीही खाल्लं तर तो ब्रेकफास्टच असेल. मग कुणी तो नऊ ला घेईल तर कुणी बाराला.

सकाळी ९ ला ब्रेफा, दुपारी १.३० ला जेवण आणि संध्याकाळी ६ ला स्नॅक खाऊन मग दुसरेदिवशीपर्यंत काही खाल्ले नाही, तर तेही आयएफ म्हणून काऊंट होईल ना))))) हो पुनम, मला वाटते होइल. सई केसकर यांनी साधारण असेच केले होते.?

म्हणजे मग ज्यांना मधुमेह आहे, किंवा होऊ शकेल (हेरेडेटरी असल्यामुळे) त्यांना आयएफचा फायदा जास्त आहे - असं आहे का?>> त्यांना तर फायदा होतोच पण त्याचे आणखीही बरेच फायदे आहेत. निरोगी माणसाने ही हे जमेल तेव्हा, जमेल तसे, जमेल तितके नक्की करावे.

इंटरमिटंट फास्टींगचे फायदे: (http://www.maayboli.com/node/62149 ह्या धाग्यावर त्याबद्दल अधिक लिहिलेले आहे.)

फॅट सेल, मसल्स, आतड्यांचे इन्फ्लमेशन कमी होते.
स्ट्रेस रेजीस्टंस वाढतो.
मेटाबोलिझम वाढून चरबी जाळण्यास सुरवात होते.
७-८ तासांच्या उपवासानंतरच लिव्हरमधले ग्लायकोजन वापरले जाते.
मेंदूची आकलन व स्मरणशक्ती वाढते.
चेतापेशींची डीएनए दुरूस्तीकामाची कार्यक्षमता वाढते.
न्युरॉनसाठी उपयुक्त अशा किटोन बॉडीज तयार होतात त्यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते.
इंटरमिटंट फास्टींगच्या काळात जुन्या झालेल्या, बिघाड झालेल्या , अनावश्यक पेशी काढून टाकल्या जातात. वाचनात आलेले हे उदाहरण मला अगदी लगेच पटले. एखाद्या झाडाला अन्न कमी पडू लागले की ते सर्वात आधी जुने, कुजलेले, खराब झालेले अवयव (पाने, फळे, फुले, फांद्या) गाळून टाकते व नव्याने अन्न मिळाले की शिल्लक असेलेले अवयव तर बहरतातच शिवाय नव्या जोमाने नवी वाढ होते.

सईने पण ह्यापुर्वी ह्या विषयावर एक छान लेख लिहिला आहे. http://www.maayboli.com/node/60322

म्हणजे मग ज्यांना मधुमेह आहे, किंवा होऊ शकेल (हेरेडेटरी असल्यामुळे) त्यांना आयएफचा फायदा जास्त आहे - असं आहे का? >>

नाही असेच काही नाही, IF चा फायदा सर्वांना आहे. मला मधुमेह नाही. Happy वजन कमी होतं हा मुख्य फायदा आहे.

सकाळी ९ ला ब्रेफा, दुपारी १.३० ला जेवण आणि संध्याकाळी ६ ला स्नॅक खाऊन मग दुसरेदिवशीपर्यंत काही खाल्ले नाही, तर तेही आयएफ म्हणून काऊंट होईल ना))))) हो पुनम, मला वाटते होइल. सई केसकर यांनी साधारण असेच केले होते.? >>

संध्याकाळी ६ ते सकाळी ९ म्हणजे १५ तास. त्याचाही फायदा होईलच पण जास्त फायदा हा सलग १६ / १८ तास उपाशी राहिल्यावर होईल. ते तास कसेही असू शकतात, संध्याकाळी ८ ते दुपारी १२/ १ किंवा ब्रेकफास्ट अन लंच पण डिनर स्किप.

मग कुणी तो नऊ ला घेईल तर कुणी बाराला. >> हो , पण जर तुम्ही लगेच १२ अन परत संध्याकाळी ८ ला जेवनार असाल तर सकाळी ९ ला ब्रेकफास्ट घेणे IF मध्ये अपेक्षित नाही.

ब्रेकफास्टच स्कीप करा असे काही नाही. सलग १६ तास उपाशी राहा. मग आवडयला लागतं अन तुम्ही २४ तास उपाशी राहाता. Happy )

एक टीप - मी असे केले, किंवा सईने किंवा आणखी कुणी केले म्हणून तसेच तुम्ही नका करू. तुम्हाला जी वेळ सुट होते आहे, त्याप्रमाणे करा. मुख्य मुद्दा हा निदान १६ तास सलग उपाशी राहने. मग ते १६ तास तुम्ही कधीही मॅनेज करू शकता.

हा लेख पण वाचा.

http://beastsbynature.com/if-hunger-performance/ अनेक उपयुक्त रिसर्च लिंक्स आपोआप मिळतील. आणि अगदी सोपे करून मांडले आहे.

मी विपश्शना शिबिर केले होते तेव्हा. सकाळी ७ वाजता भरपेट ब्रेकफास्ट, नंतर ११ वाजता जेवण, ५ वाजता एक कप चहा किंवा आलं घातलेलं गरम पाणी + कुरमुरे+एखादं फळ असा बेत असायचा. त्या दहा दिवसात माझ्या त्वचेवर खुप ग्लो आला होता, अर्थात मेडिटेशनचाही परिणाम होताच.

नानाकळा,
म्हणजे संध्याकाळी ५ ते सकाळी ७ काही नसायचे का? मग ते पण फास्टिंगच झाले. अर्थात कमी वेळाचे, पण उपासच. जर ते तुम्हाला आवडले असेल तर तुम्ही १६ तासांचा प्रयत्न करून पाहा.

केदार, नलिनी, सई, तुम्हा सगळ्यांकडून खूप छान माहिती मिळतेय. धन्यवाद. >>

याबाबतीतली माझ्या कडून मिळणारी सर्व माहिती ही खरे तर, बाय द पावर्स ऑफ इंटरनेट गॉड आहे. Happy

>> बाय द पावर्स ऑफ इंटरनेट गॉड आहे. >> तरीही इथे ती माहिती आणि तुमचे स्वतःचे अनुभव येतात. त्यामुळे ही फास्टिंगची जीवनशैली स्वतःच्या आयुष्यात कशी आणता येइल याचा विचार केला जातोय. सकाळी ब्रेकफास्ट हे लहानपणापासून डोक्यात इतके घट्ट बसलेले की अगदी काही नाही तर मोठा पेला भरुन दूध तरी माईंडलेसली प्यायले जायचे. मायबोलीवर वाचून , ओटमिल ते नुसते दूध मग दुधाऐवजी अर्धे सफरचंद्/संत्र आणि ४-६ बदाम असे करत माझी गाडी आता साडेदहापर्यंत काही न खाता रहाणे इतपर्यंत आलेय.

धन्यवाद. Happy

साडेदहापर्यंत काही न खाता रहाणे इतपर्यंत आलेय. >> वा. आता पुढची पायरी आणखी दिड ते दोन तास झाले की तुम्ही पण IFing करू लागाल.

तुमचा गोल डायाबिटिस कंट्रोल्/एलिमिनेट करायचा असेल तर आयएफिंग हा एक्मेव पर्याय नाहि, जो सूर मला इथे जाणवतोय. Wink केवळ डाएट, मेडिकेशन आणि रेग्युलर व्यायामाने डायाबिटेस मॅनेज करता येतो. आता तर बरीच उपकरणं उपलब्ध आहेत (कार्ब इन्टेक, इटिंग फ्रिक्वेंसी, वर्क आउट, शुगर लेवल) मेझर, ट्रॅक, मॅनेज करायला. प्रत्येक दिवसासाठी या घटकांचा गोल ठरवुन तो रिलिजस्ली अंमलात आणला तर मुद्धाम उपास वगैरे करण्याची गरज नाहि. तसंहि संध्याकाळी ७ ला डिनर, सकाळी ७ ला ब्रेकफास्ट केल्याने १२ तास उपास घडतोच. मी स्वतः खवय्या (क्वालीटी, क्वांटिटि नहि) असल्याने एक्स्ट्रीम मेथड्स अवलंबुन शरीराला पीडा देणं मला पटत नाहि... Proud

ओआर (ट्रांस्पोर्टेशन प्रॉब्लेम्स) मध्ये एल्पीपी मेथड आहे, ऑप्टिमाय्ज्ड सोलुशन काढण्याकरता - तशाच प्रकारचं ऑप्टिमाय्ज सोलुशन या समस्येकरता प्रत्येकाने काढलं पाहिजे - स्वतःच्या बॉडि, मेटबॉलिझ्म, लाइफस्टाइला सुट होइल असं...

शूम्पी - मी आयडीएमची लिंक दिली होती. काही सायंटिफिक डेटा आणि एका अनुभवाची लिंक.

https://www.sciencedaily.com/releases/2014/06/140614150142.htm
https://intensivedietarymanagement.com/fasting-lowers-cholesterol-fastin...
http://www.precisionnutrition.com/intermittent-fasting/chapter-7

तुमचा गोल डायाबिटिस कंट्रोल्/एलिमिनेट करायचा असेल तर आयएफिंग हा एक्मेव पर्याय नाहि, जो सूर मला इथे जाणवतोय. >>

मला नाही वाटत की कोणी इथे ( माझ्यासहित) हाच एकमेव पर्याय आहे असे म्हणले आहे. T2 रिव्हर्स होण्यास मदत होते असे मात्र मी जरूर म्हणतो आहे. अनेक लोक T1/T2 साठी LCHF डायट घेतात, त्यांनाही फायदा झालेला आहे.
पण, when you are at it, why not reap the benefit? ( अ‍ॅट इट म्हणजे IF )

मि रात्रीचे जेवण ८.३० ला, दुसऱ्या दिवशी सकाळी ८ला १कप चहा ,आणि दुपारचे जेवण १२ ला घेते. तर हे if असु शकतं का?

नै बोलते ना वो.... अइसा नै चल्ता... १६ म्हणजे कमीत कमी १६ तास उपास पाहिजेच म्हणत आहेत. रात्रीचे जेवण व सकाळचा चहा यात ११ तासाचं अंतर आहे. सकाळचा चहा सोडून बघा..

नानाकळा,
म्हणजे संध्याकाळी ५ ते सकाळी ७ काही नसायचे का? मग ते पण फास्टिंगच झाले. अर्थात कमी वेळाचे, पण उपासच. जर ते तुम्हाला आवडले असेल तर तुम्ही १६ तासांचा प्रयत्न करून पाहा.
>> हो ५-७ काही नसायचे. भूक लागायची रात्री १०-११ च्या सुमारास. पण पाणी पिऊन झोपायचे. झोपले की काही नाही वाटत. पहिले दोन-तीन दिवस त्रास होत, बॉडी अ‍ॅडजस्ट करते नंतर बरोबर.

विपशना चे शेड्युल आणि माझे श्येड्युल अगदी उलट होते. मी रात्री ३-४ पर्यंत जागणारा, तिकडे १० ला झोपून ४ ला उठावे लागे. नाश्ता करत नाही ते ७ ला नाश्ता असायचा. रात्रीचे जेवण टमी-फुल असायचे ते इकडे झिरो... तरी बॉडी क्लॉक बदललं म्हणून मला त्रास नाही झाला. तिकडून आल्यावर दोनेक महीने तसेच होते श्येड्युल, नंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या झाले.

असो. आता तुमच्या सगळ्यांच्या प्रतिसादांतुन परत एकदा हुरूप आला आहे. आयएफ सुरु केले आहे. विपश्शना, व्यायाम जरा टाइम-टेबल बदलून होइल. केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे... Happy

८.३० ला, दुसऱ्या दिवशी सकाळी ८ला १कप चहा ,आणि दुपारचे जेवण १२ ला घेते. तर हे if असु शकतं का? >>

हो होईल पण एका अटिवर Happy जर तुम्ही साखरेचा चहा प्यालात तर टेक्निकल फास्ट नाही होणार. पण थोड्याश्याच दुधाचा अन विनासाखरेचा चहा प्यालात तर होईल. सुरूवारीला साखर अर्धा चमचा, पाव करत करत कमी करा.

नानाकळा, बेस्ट लक !

भारी माहिती मिळत्ये आहे चर्चेतुन... Happy

(मला ते सगळेच जमेल असे नाही, कारण मी वेट + मसल गेन करण्याच्या मागे आहे, अन जिम इन्स्ट्रक्टर आधीच ओरडतो आहे की तुमचे खाणे पुरेसे नाहीये. Sad )

{इंटरमिटंट फास्टींगच्या काळात जुन्या झालेल्या, बिघाड झालेल्या , अनावश्यक पेशी काढून टाकल्या जातात. वाचनात आलेले हे उदाहरण मला अगदी लगेच पटले. एखाद्या झाडाला अन्न कमी पडू लागले की ते सर्वात आधी जुने, कुजलेले, खराब झालेले अवयव (पाने, फळे, फुले, फांद्या) गाळून टाकते व नव्याने अन्न मिळाले की शिल्लक असेलेले अवयव तर बहरतातच शिवाय नव्या जोमाने नवी वाढ होते. }

हे उदाहरण काही पटले नाही. झाडाची फांदी कापली तर तिथे नवीन धुमारे फुटतात. माणसांमध्ये असं काही होत नाही. उगाचच ग्लोरिफिकेशन केलं जातंय असं वाटतंय

व्यत्यय, वरच्या उदाहरणात मी झाडाच्या आणि मानवीय पेशींच्या नवनिर्मीतीबाबत(रिजनरेशन) साम्यता दर्शवीली आहे.
माणसाच्या शरीरातील सर्व पेशी आणि त्या अनुषंगाने सर्व अवयवांची एका ठराविक कालावधीने नवनिर्मीती होत राहते. वाढत्या वयाने तसेच इतर काही कारणाने ह्या नवनिर्मितीत अडथळा येतो.वाढत्या वयामुळे किंवा इतर काही कारणाने नवनिर्मीतीच्या प्रक्रीयेत काही पेशी सदोष तयार होतात तर इंटरमिटंट फास्टिंगच्या काळात बिघाड झालेल्या तसेच सदोष पेशींच्या दुरूस्तीचे काम प्राधान्याने केले जाते. ह्याबद्दल अधिक माहिती द्यायची झाल्यास ह्या वर्षी नोबेल पुरस्कार मिळालेल्या ऑटोफॅजी ( autophagy ) ह्या विषयात अधिक माहिती वाचावी लागेल. https://www.nobelprize.org/nobel_prizes/medicine/laureates/2016/advanced...
झाडांमध्ये फांद्यांना धुमारे फुटलेले आपल्याला दिसतात तसे मानवीय पेशींमध्ये नव्याने अवयव निर्मीती न होता अंतर्गत पेशींची नवनिर्मीती होत असते. आपला यकृत हा एक असा अवयव आहे की जो ७५ टक्क्यांपर्यंत भाग काही कारणाने डॅमेज झाला किंवा शस्त्रक्रियेने काढून टाकला तर त्याची संपुर्णपणे नवनिर्मीती होते.

chameleons मध्ये तर सर्व अवयवांची पुर्णंतः नवनिर्मीती होते. https://www.scientificamerican.com/article/how-do-chameleons-regener/

त्यांची उपमा थोडीफार योग्यच आहे.. पाने झडून नवी पाने येतात, तशा जुन्या पेशी जाऊन नव्या येतात .. याला अ‍ॅपॉप्टोसिस म्हणतात .. ही एक अतिशय कंट्रोल्ड क्रिया असते. आपले लहानपणचेच शरीर म्हातारपणीही नसते. रोजच्या रोज कितीतरी जुन्या पेशी काढून टाकल्या जातात व नव्या पेशी त्यांची जागा घेत असतात.
https://en.wikipedia.org/wiki/Apoptosis

जुन्या पेशी न झडता तशाच राहिल्या तर त्यातून अ‍ॅब्नॉर्मल सेल्स तयार होतात व क्यान्सरची निर्मिती होऊ शकते.
Excessive apoptosis causes atrophy, whereas an insufficient amount results in uncontrolled cell proliferation, such as cancer

हा एक रिसर्च पेपर मिळाला. https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3946160/

we conclude that there is great potential for lifestyles that incorporate periodic fasting during adult life to promote optimal health and reduce the risk of many chronic diseases, particularly for those who are overweight and sedentary. Animal studies have documented robust and replicable effects of fasting on health indicators including greater insulin sensitivity, and reduced levels of blood pressure, body fat, IGF-I, insulin, glucose, atherogenic lipids and inflammation.

शरीर व मन ताणरहित असेल तर या क्रिया सुलभतेने होतात .. समजा अग्निशामक सिलिंडर वापरुन संपलेले आहेत.. आता ते पुन्हा फंक्शनक कसे होतील ? तर आपण कंपनीच्या एजंटला फोन करुन सांगतो की हे वापरुन संपलेत किंवा एक्स्पायर झालेत, आता बदलून द्या. तो येऊन ते रिप्लेस करतो. पण त्यासाठी सगळी सिस्टिम सुरळीत असावी लागेल. एजंट जाग्यावर हवा, आपला फोन सुरु हवा, इ इ इ

तसेच आहे हे. वापरलेले सिलिंडर बदलण्याची प्रक्रिया .

फास्टिंगमुळे या क्रियेला मदत होते.

@ shoompi

I don't know for sure how if affects cholesterol. I used to know but i have forgotten. But it does help. Just like any other healthy diet. But the big breakthrough is that dietary choleaterol is not reaponsible for high cholesterol in our systems. It is all food. And overeating any food. Some people do not put on weight even after years of over eating. So the relationship betweem weight diet and cholesterol is not that straightforward.

Pages