इंटरमिटंट फास्टिंग ( IF ) - अनुभव

Submitted by केदार on 25 April, 2017 - 10:05

ओके ! इंटरमिटंट फास्टिंग ! IF

* * * * * फॅ़क्ट * * * * *
१. तुमच्याच भल्याकरता, तुम्हाला त्या अवधीत काही न खाता उपाशी राहावे लागते!
२. IF ही लाईफस्टाईल आहे. वेटलॉस प्रोग्रॅम नाही !
३. IF च्या आधीचे वजन ७३ किलो, सध्याचे वजन - ६९.८ आधीच्या बॉडीफॅट २० / IF नंतर १६%, सध्याच्या रिव्हाईज गोल - १०%

मी एन्डुरंस अ‍ॅथलिट (?!) आहे. IF चे नेट वर कळायच्या आधीच मी उपाशीपोटी मध्येच व्यायाम करायचो. म्हणजे सकाळी ६:३० ला सायकल चालवायला जायचो, तेंव्हा नाश्ता न करताच जायचो आणि जर ३ तासापेक्षा जास्त राईड असेल, ( किंवा १०० किमी पेक्षा जास्त ) तर १ १/२ तासानंतर मध्येच टपरीवर नाश्ता ( हाय कार्ब, उदा पोहे वगैरे) खायचो. पण २ एक तासाची राईड असेल तर काही न खाताच घरी यायचो, थोडक्यात माझ्या शरीराला काही न खाता व्यायाम करायची सवय होती.

मागे इथे सईचा लेख वाचून अन नंतर गुगल रिसर्च करून मी देखील IF ट्राय करायला काय हरकत आहे? हा विचार करून सुरूवात केली. खरे तर व्यायाम आणि उपास ह्यांची जोड कशी घालता येईल ह्यावर मी गुगली टाकला आणि मला लिनगेन्स साईटचा शोध लागला. http://www.leangains.com/ ह्याची लिंक मागच्या वर्षी मी सईच्या लेखावर पण दिली होती. ह्यावर बरीच चांगली माहिती उपलब्ध आहे. अर्थात मी वेटलिफ्टर नाही अन मला ६ पॅक्सही नाहीत, किंवा आणायच्या नाहीत. पण ह्यासाईटमुळे मला १६:८ प्रकाराबद्दल माहिती झाली आणि तीचा अवलंब करायला मी शिकलो.

माझा प्रवास !

मला ब्रेकफास्ट रोज हवा असायचा. अगदी लहानपणापासून वगैरे. त्यावेळी काही खाल्ले नाही की चिडचिड व्हायची. पण एकदा ठरवले की ठरवलेच. मग पहिल्या आठवड्यात हळूहळू एक प्लेट पोह्यांऐवजी अर्धी प्लेट पोहे असे केले आणि एकाच आठवड्यानंतर जमायला लागले. मग दुसर्‍या आठवड्यापासून ब्रेकफास्ट पूर्ण स्किप करून १६:८ सुरू केले. थोडक्यात जर ब्रेकफास्टची सवय असेल तर सुरू करायला अवधी द्या, अन्यथा सोडून द्याल.

संध्याकाळी ८:३० ते दुसरे दिवशी सकाळी १२:३० ते २ ह्या वेळात मी उपाशी राहतो. अर्थात ह्या वेळांमध्ये सकाळचा अन १० चा चहा किंवा कॉफी मात्र घेतो. थोडक्यात जे काही खायचे ते १२:३०-१ ते संध्याकाळी ८:३० पर्यंतच. शिवाय मी साखरेचे काहीही शक्यतो खात नाही. अगदी चहात साखर वगैरे सोडूनही दीड पावने दोन वर्षे झाली आहेत. मध्येच कधीतरी हुक्की आली की गोड खातो, पण ती हुक्की नेहमी येत नाही.

मग भूक लागल्यावर मी काय करतो?

* * * * * फॅ़क्ट * * * * *
हंगर पँग्स येतात. पण ते फक्त १० मिनिटेच टिकत असतात.

ह्याच वेळी मोह टाळायचा. जर निग्रह नसेल तर आपण स्नॅक कडे नक्कीच वळणार. थोडक्यात, आपण हे का सुरू केले? ह्याचा तेंव्हा विचार केला, तर ती १० मिनिटे निभावून जाऊ शकतात. त्यावेळी पाणी प्यायचे. विचार केला तर हे सहज जमण्यासारखे आहे. फक्त आपण तेवढे निग्रही नसतो.

हळू हळू मला १६:८ जमायला अन आवडायला लागले. मग जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मी बॉउंड्रीज पार करायचा विचार केला.

Eat Stop Eat चा प्रवास. : १६ तास जमू लागल्यावर मी एकेदिवशी विचार केला की २४ तास ट्राय करून पाहायला काय हरकत आहे? आणि मग मी त्या दिवशी दुपारी जेवलोच नाही. दुपारी ३ वाजता ( नेहमीची वेळ संपल्यावर ३ तासाने) भूक लागली, पण पाणी प्यायलो. अन घरी चक्क साबुदाण्याची खिचडी केली होती. पण निग्रह ! मग चारला चहा. मग अचानक फ्रेशच वाटलाला लागलंन भौ ! एकदम अ‍ॅक्टिव्ह. अचानक कुठून तरी एनर्जी आल्यासारखे. रात्रीचे ८ वाजले, तरी जेवायला नको वाटले. मग ९:३० ला जेवलो. २५ तास ३० मिनिटे !! याहू !! मग दर आठवड्यात एकदा तरी २४ + तास उपाशी राहावे असे उगाचच वाटू लागले. मग सोमवार किंवा गुरूवार माझ्यासाठी बिझी दिवस असतात, त्या दिवशी मी २४ + तास उपाशी राहू लागलो. अन त्यातच आनंद वाटू लागला. थोडक्यात रोज १६:८ पण आठवड्यातून कधी कधी दोन तर एक दिवस तरी २४ + तास उपास. ब्लेंडेंड IF ! सोमवारी दुपारी कामच्या जागी पोचल्यावर जर जेवायचे ठरलेच तर सॅलड खात आहे. ( ३०० कॅलरीज) जेंव्हा २४ तास उपाशी राहायचे असते, तेंव्हा कामात गुंतवणे वा काही काम असणे आवश्यक आहे. अन्यथा विचारात "अन्नच" असतं.

मग व्यायामाचे काय?
* * * * * फॅ़क्ट * * * * *
खूप सारे बॉडी बिल्डर १६:८ फॉलो करतात !
उपाशी राहण्यापूर्वी व्यवस्थित खाल्ले असेल तर उपाशीपोटी व्यायाम करू शकतो.

दोन स्क्रिन शॉटस. पिक्चर्स स्पीक .... वगैरे वगैरे. ही सायकलिंग मी उपाशीपोटी केली आहे. आणि ह्यात HIIT - हाय इंटेंसिटी ट्रेनिंग केली आहे, त्यामुळे माझा हार्ट रेट पण खूप वाढलेला दिसेल. माझ्या हार्ट रेटच्या लेखांमध्ये तुम्हाला HIIT ची आणखी उदाहरण दिसू शकतील.

IMG_0872.PNG

ह्या वरच्या सायकलिंग मध्ये १००० पेक्षा जास्त कॅलरी ह्या उपाशीपोटी लागल्या आणि माझ्या शरीराने त्या विनासायस पुरवल्या. सायकलिंग झाल्यावरही मी अजिबात थकलेलो नव्हतो. फक्त खूप वार्‍यामुळे इरिटेट झालो होतो, कारण इथे वारे हे २५ ते ३० किमी प्रति तास असते, अन वार्‍यात सायकल चालवणे म्हणजे ..
आणि ह्या खालील चित्रात ८०० कॅलरीज

IMG_0871.PNG

* * * * * फॅ़क्ट * * * * *
उपासामुळे डायबेटिस बरा होण्यास मदत होते. ज्यांनी IF केले त्यांचा अनेक रिव्हर्सल केसेस नेट वर दिसतील ( T2) आणि अनेक मेडिकल पेपर्स देखील ह्या विषयावर उपलब्ध आहेत.
वजन कमी होते. ( ओके ! वजन कमी होते. )

माझे वजन मुळातच "योग्य" आहे. रादर जीवनात मी कधीही जाड नव्हतोच. पण माणसाने नुसते वजन कधीही मोजू नये. बॉडी फॅट फॅक्टर मोजावा. माझ्याबाबतीत बॉडी फॅट हाच फॅक्टर होता. IF च्या आधी बॉडी फॅट साधारण १९% + होते. IF नंतर माझे वजन फक्त ७ पाउंडड्स कमी झाले, पण बॉडी फॅट आत्ता फक्त १६% आहे.

माझ्या मेंटेनन्स कॅलरी, म्हणजे आहे तसेच मेंटेन ठेवायला ( मी करत असणारा व्यायाम धरून ) लागणार्‍या कॅलरीज ह्या २२५० कॅलरी डेली आहेत ! आता हा कॅलरी गोल पाहून वजन कमी करणारे म्हणतील, बापरे, हे तर आमचं दोन दिवसाचं जेवण !

मी काय शिकलो? किंवा हवे तर टिप्स म्हणू

- भुक सहन होत असते, आपण ती सहन करत नाही.
- पूर्वी दुपारचे जेवण ते संध्याकाळचे जेवण ह्यात मी अनंत वेळा किचन मध्ये जाऊन उगाच काही तरी खायचो, किंवा निदान फ्रिज उघडून पाहायचो. ( मी खूप वेळा घरून काम करतो.) गेले ३-४ महिने असे काही होत नाही.
- सध्या मी जे काही खातो, ते खायच्या आधी आपोआप मनात कॅलरी / फॅट इत्यादी काउंट होतात, हे ओव्हरकिल आहे असे तुम्ही म्हणू शकता, पण IF मुळे माणसाला काय खावे ह्याचा IQ आपोआप निर्माण होतो.
- कधीकधी २० तासानंतर डोके दुखू शकते, किंवा वेळ जात नाही, त्यावेळी थोड्या दुधाचा चहा / ब्लॅक कॉफी हे पर्याय खूप चांगले आहेत.
- अ‍ॅज लाँग अ‍ॅज तुम्ही कॅलरी डेफिसीट ठेवता, तो पर्यंत तुम्ही हवे ते खाऊ शकता. जंक फुड ते हेल्दी फुड. लिबरेशन. अगदी हवे ते खा.
- घरी पाहूने आले किंवा आपण दुसर्‍यांकडे गेलो, तर १६:८ वेळापत्रकातच राहायची गरज नसते, त्या त्या वेळी, ते ते खायलाच पाहिजे ( किंवा नको) असा हा प्रोग्राम नाही. आपण ज्या क्षणी उपास सुरू केला त्या क्षणापासून आपण उपाशी, अश्या छोटे मोठे प्रसंगात उपाशी राहणे योग्य नाही.
- योग्य ते प्रोटिन आणि कार्ब व फॅट, दोन्ही वेळी जेवताना मिळणे आवश्यक आहे, अन्यथा थकायला झाल्यासारखे होऊ शकते.
- कुठल्याही डायट विना, वजन कमी होते. वजन कमी होताना पहिले कंबर आणि पोट ह्यातील फॅट्स कमी होतात. आणि ३ एक आठवड्यात फरक जाणवायला लागतो, तो इतरांना दिसेलच असे नाही, पण तुम्हाला जाणवतो.
- वजन केवळ उपाशी राहण्यामुळे कमी होते, त्यासाठी व्यायामाची अजिबात आवशक्ता नाही. पण व्यायाम केला, तर ज्यांना वजन लवकर कमी करायचे आहे, त्यांना जास्त मदत होते. कॅलरी डेफिसिट इज द की !

वर मी व्यायाम करणार्‍यांना फायदा होतो असे लिहिले आहे. पण व्यायाम करायची गरज नाही, हे ही लिहिले आहे. दोन्ही एकत्र करत असताना नेमके काय होते?

ह्या चित्रात परत एकदा मी फास्टिंग मध्ये सायकल चालवली आहे.
स्पीड - ३१+ आणि हार्ट रेट अगदीच नगण्य - १३६ जो माझ्यासाठी लोअर झोन २ आहे. मागच्या चित्रात HIIT होते, ह्या चित्रात एरोबिक एन्ड्युरंस हा प्रकार आहे.

एवढ्या वेगाने दीड तास सलग अवघड असतं आणि खूप एनर्जी लागते. आणि ही सर्व एनर्जी उपाशीपोटी देखील आरामात मिळाली. हे IF मुळे
पण माझा हार्ट रेट तरीही गप्पा मारत चालवण्याच्या घरात आहे, आणि ते शक्य झाले, मी सतत सायकलिंग करत असल्यामुळे माझ्या मिचो मसल्स, तयार होणारे लॅक्टेट प्रचंड फास्ट प्रोसेस करायला शिकल्या, हा त्याचा गेन. ज्यात IF चा शून्य रोल आहे.

cycle_1.jpg

थोडक्यात काय? तर IF हे फक्त वेट लॉस साठीच नाही, तर ती लाईफस्टाईल आहे. जी मी आनंदाने फॉलो करतो.

http://www.diabetesincontrol.com/intermittent-fasting-and-its-beneficial...
http://jap.physiology.org/content/99/6/2128.long ( Intermittent fasting increases whole-body insulin sensitivity)
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC4257368/
http://journals.plos.org/plosone/article?id=10.1371/journal.pone.0079324 ( black coffee for breakfast and the same total-caloric intake as the other two diets for lunch )
https://intensivedietarymanagement.com/fasting-cures-diabetes-t2d-4/

लोकांचे अनुभव आणि काही डॉक्टर्स मधुमेह व उपास ह्यावर बोलताना ह्या युट्यूब सर्च मध्ये दिसतील.
https://www.youtube.com/results?search_query=intermittent+fasting+and+di...

- तळटिप - मी स्वतः डॉक्टर नाही, मी फक्त अनुभव लिहितो आहे. ह्या विषयात टेक कंट्रोल ऑफ युवर लाईफ हे शब्दशः खरे आहे, पण मधूमेहाच्या गोळ्या बंद करण्याआधी आपल्या डॉक्टरशी नक्कीच भेटा व बोला.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२२५० कॅलरी खरे तर मी रोज खात नाही, कारण मला १० % वर यायचे आहे, त्यामुळे कमीच. मोस्टली १६०० ते १८०० भरतात. गेल्या चार महिन्यात मी ग्रीक योगर्ट आणि इडमामी मात्र भरपूर खात आहे. व्हेजी लोकांना प्रोटिन सोर्स Happy

नलिनी, तुम्हीही अहो, जाहो असे नका म्हणू. Happy

केदार, इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद.

ठराविक खाण्यावरच लक्ष ठेवायची किंवा वजन कमी करायची गरज अजून पडली नाही पण एखाद्या भुकेच्या वेळी काही खाल्ले नाही आणि तसेच पुन्हा कामाला जुंपायची वेळ आली तर उगीचच आता आभाळ कोसळणार असल्यासारखे वाटायचे. तुझ्या लेखामुळे बरीच माहिती मिळाली.

केदार खूप महत्वाची माहिती. मला बॉडी फॅट बद्दल जास्त काही माहित नव्हते. तुमचा लेख आणि दिलेली लिंक पहात आहे. माझा एक प्रश्न आहे:
मी समजा रात्री ८ ला जेवले त्यानंतर सकाळी ८ ला चहा (दूध आणि १ चमचा साखर असलेला) आणि दुपारचे जेवण १२.३० ला तर ते १६ तासाचे IF समजले जाईल का? IF म्हणजे पूर्णतः उपवास की चहा किंवा कॉफी हे अपवाद आहेत त्याला? मी चहा सकाळी ८ आणि दुपारी ४ ला घेते. ४ वाजताचा नसला तरी चालतो पण तरीही माहितीसाठी विचारत आहे.

तो व्हेजिटेरियन आहेस ?
आता बॉडी फॅट किती आहे ते बघायला पाहिजे कॅल्क्यूलेट करून.

जिनियस, हो वाचले आहे, पण मी तसाही कुठल्याही "डायट" च्या विरोधी टाईप माणुस आहे. पण तुम्ही करत असाल तर गुड.

गजानन, IF हे लिबरेटर आहे. आपण काहीही खाऊ शकतो, बर्गर ते सॅलड आणि ज्यांना कुकीज, गुलाबजाम वगैरे आवडतात, आणि ते व्यायाम जर करत असतील तर ते जेवनासोबत गोड पदार्थही खाऊ शकतात. गोल्डन रूल एकच. कॅलरी डेफिसीट.

विद्या - खरेतर चहात १ चमचा दुध घातले तरी ते कॅलरीज मध्ये धरले जाईल, म्हणून टेक्निकली दुधाचा चहा हा ब्रेकफास्ट होतो हे खरे, पण क्लिनिकली तुम्ही २ किंवा ३ चमचे दुध घालून चहा केला तरी त्या फारतर १५-२० कॅलरीज होतील. पण साखरेत खूप सारी एनर्जी असते, त्यामुळे जर साखरेचा चहा प्याला तर उपास मोडणे कॅटॅगिरीत जाईल. कारण साखरेपासून मिळणारी एनर्जी ही लगेच वापरता येते, त्यामुळे शरीर फॅटी सेल्स तोडण्याकडे दुर्लक्ष करून साखरेच्या एनर्जीकडे लक्ष देईल, त्यामुळे साखर सोडा. Happy

तुम्ही ब्लॅक कॉफी ( विना साखरेची) घेऊ शकता, जी मी घेतो. २४ तासात तर चार वेळा घेतो. किंवा लिंबू पाणी पण घेऊ शकता.

अर्थात जर मुळातच वजनाचा प्रॉब्लेम नसेल तर थोडीशी(च) साखर वापरू शकता, पण मी लिहिल्यासारखे क्लिनिकली अन टेक्निकली तो सलग उपास नसेल. पण तरीही वजन खूप कमी करायचे नसल्यामुळे त्याचा फायदा होईलच. पण ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांनी आधी साखर कमी करावी अन मग उपास सुरू करावेत.

शूम्पी, हो मी शाकाहारी आहे. फक्त शाकाहार की मांसाहार टाईप बाफवर जाऊन भांडणे करत नाही, किंवा समोरच्या अगदी स्टेक घेऊन खाल्ली तरी त्याच्या वासाचाही मला त्रास होत नाही. Happy

धन्यवाद केदार.
वजन गेल्या २ वर्षांपासून जिथे अडकले आहे तिथून ५-७पौंड कमी करायचे आहे. कितीही डायट आणि व्यायाम केला तरी ते ५-७ पौंड जात नाहीयेत. आणि आता बॉडी फॅट चेक केले(ऑनलाईन) तर २७% येत आहे. म्हणजे मूळ प्रॉब्लेम तिथेच आहे. आणि दुसरे म्हणजे रात्री ८ नंतरचे खाणे. त्यात दूध घातलेली कॉफी, स्नॅक, कधी वाईन किंवा मिठाई असे काहीतरी खाल्ले जाते. चहा किंवा साखर या दोनीही गोष्टी नसल्या तरी चालते मला. रनिंगचे सर्व इव्हेंट्स काहीही ना खाताच करते शक्यतो.
IF मुळे रात्री ८ नंतरचे खाणे बंद होईल त्याचा सर्वात जास्त फायदा होईल असे वाटते. Happy

माहितीबद्दल धन्यवाद.

रनिंगचे सर्व इव्हेंट्स काहीही ना खाताच करते शक्यतो. >>

माझा मुळ स्पोर्ट सायकलिंग आहे. आणि त्याला लागणारे सर्व व्यायाम मी करतो. उदा क्रॉस ट्रेन, कोअर फिट. पण जेंव्हा ३ एक तासांपेक्षा सायकलिंग असेल तेम्व्हा मी मध्ये मध्ये GU जेलचे पाकिट गिळतो. कारण व्यायाम करताना आपल्याला जास्तीची एनर्जी लागतेच. शरीरातील तीन एनर्जी सिस्टिम्स वर मला असणारे तोडके मोडके ज्ञान मी इथे पाजळले आहे मागे एका बाफवर.

मी मागेही एका रनिंग / व्यायाम आणि IF बद्दल एका ग्रूप वर लिहिले होते ते लिहितो.

थोडक्यात, आज सकाळी जर तुम्ही ५, ७ मैल पळत असताल तर तुम्ही उपाशीपोटी व्यवस्थित पळू शकता. (काल रात्री कार्ब लोडिंग केल्यावर). पण जर तुम्ही अर्ध किंवा पूर्ण मॅरेथॉन पळणार असाल तर तुम्हाला मध्ये काही तरी खावे लागेल.

पहिल्या १० किमी नंतर एक GU gel, दुसर्‍या १० नंतर एक असे किंवा दर ४५ मिनिटांनंतर एक जेल / एनर्जी कार्ब बार खा. प्रोटिन बार तर अश्या इंवेंट मध्ये बीग नो नो, कारण प्रोटिन ब्रेक करायला आणखी जास्त एनर्जी लागते, त्यामुळे मांद्य येऊ शकते.

IF तुम्हाला बॉडी फॅट ( पर्यायाने वजन) कमी करायला मदत करते, पण अश्या इव्हेंट्स मध्ये खात जा, असेही मीच लिहित आहे. Happy

होय केदार १० किमी पेक्षा जास्त असेल तर शक्यतो केळे किन्वा GU gel घेते सकाळी. रेसच्या मधे कहीही खाणे मला जमत नाही.
सायकलिंग नुकतेच सुरु केल आहे. सध्या थंडी कमी होत अस्ल्याने ते एक बरे आहे. Happy

सर्वात महत्वाचे रात्रीचे खाने अहे. ते सुटत नाहीये. जेवण झाल्यावर खाल्ले नाही पाहिजे.
त्यात स्वीट टूथ. Sad जेवतानाच जे काही हवे ते खाऊन घेत्ले पाहीजे. Happy
बाकी प्रोटीन्स, फायबर, कार्ब, कमी साखर हे सर्व व्यवस्थित आहे.

मनोनिग्रहाची गरज: म्हटलं तर आहे, म्हटलं तर तेवढी नाही सुद्धा.

असं फास्टिंग करणं म्हटलं तर सहज शक्य आहे.
एकतर आपण जे करणार आहोत ते चुकीचे तर नाही ना? अशी द्विधा अवस्था नको . (त्यासाठी आपल्या प्रकृतीनुसार आणि सवयींनुसार काय ते शंका निरसन करुन घ्यावे) .

"बाप रे! कसं होणार माझं? इतके तास काहीच खायचं नाहीय मला आज पासनं" अशा मनस्थितीतून सुरवात करण्यात अर्थ नाही.

आणि सुरवात केल्यावर आपण कशापासून तरी वंचित रहात आहोत ही भावना उत्पन्न व्हायला नको.

ही भावना उत्पन्न झाली आणि ती मारुन आपण नियंत्रण सुरु ठेवले तर मनात कुठेतरी ते कोरल्या जाते की आपण मोठा त्याग केला आहे.
त्यामुळे चिडचिड होते, उदासीनता येते आणि एक दिवस आपण हे सगळे झुगारुन परत मूळपदावर येतो. काहीजण तरीही संघर्ष सुरुच ठेवतात. त्यांना मनोविग्रह लागतोच, तो ही प्रचंड.

पण
द्विधा अवस्था नीट विचार करुन टाळली आणि मग ठरवले, तसेच आपण कशाही पासुन वंचित रहात नाहीये, उलट आपले शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्य सुधारते आहे, हे लक्षात आले तर पुढे मनोनिग्रहाची गरज उरत नाही.

सही!!
खरंच आहे. नुसतं वजन हे मोजमाप असूच नये. ते या लेखाने स्पष्ट झालं.
आणि फास्टिंग नंतर जो फ्रेशनेस येतो तो पण इथे जाणवतोय.

मी बॉडी फॅट कॅलिपरने माझे फॅट मोजते. अतिशय सोपी आणि स्वस्त पद्धत आहे. कारण माझा फॅट मोजणारा काटा काहींच्या काही उत्तर देतो.
फास्टेड व्यायाम नुसताच करता येतो असे नसून माझ्या मते फास्टेड व्यायाम जास्त आनंददायी असतो. आणि फास्टिंग च्या शेवटच्या एका तासात व्यायाम करून नंतर मस्त ब्रेकफास्ट करणे आणखीन आनंददायी. Happy

मस्त लेख.
तू कुठे राहतोस? मला उगीच वाटायचं की पुण्यात आहेस. पण पुण्यात एवढं वारं नसतं.

माझा फॅट मोनिटर फॅट % बरेच दाखवतो पण visceral फॅट कमी दाखवतो. उलट माझ्या सासऱ्यांचे एकूण फॅट कमी पण Visceral fat जास्त दाखवतो.
हे असू शकतं का?

Ho asu shakte. Women tend to have more subcuteneous fat which comes in the form of rolls. Visceral fat is around vital organs such as liver. Subcuteneous fat has lower cardiovascular risk.

And women carry more fat than men. Because women in fertile ages need stored fat in case of pregnancy.

फॅट कसं मोजता तुम्ही? चटकन सर्च केला तर टिपिकल पुरुष आणि स्त्रीयांमध्ये फॅट जिथे साठवलं जातं त्या चार पाच ठिकाणचे परीघ (:D सर्कमफरन्स) मोजुन एक % नंबर दिसला.

सई,
मी, यत्र, तत्र सर्वत्र राहतो. पण सरकारी कामांसाठी पुणे आणि डॅलस पोस्टल अ‍ॅड्रेस आहेत. Proud डॅलस मध्ये भयंकर वारे असते. साधारण १० -१२ माईल्स नॉर्थ विंडस हा नेहमीचा फॅक्टर, सध्या स्प्रिंग मुळे नॉर्मल १५ मैल प्रति तास आणि कधी कधी २० मैल.

पुण्यात अगदी इतक्या वेगात वारे वाहत नसले तरी, पुण्याच्या नॉर्मलच्या मानाने,

१. लोणावळा ते कामशेत प्रचंड क्रॉस विंड असतात.
२. कर्जत उतरल्यावर १० किमी नंतर ते पार सातार्‍याच्या पहिल्या खिंडीपर्यंत क्रॉस विंडस असतात.

visceral फॅट ह्या जास्त डेंजरस असतात.

अमितव, हो तसेही मोजतात, बर्‍यापैकी जवळ जाणारे उत्तर मिळू शकते.

आयडीयल बॉडी फॅट %

Body_fat.jpg

thank u सई!
अमित माझ्याकडे tanita ची scale ahe त्यात वजनाबरोबर मसल मास - body fat - visceral fat - resting bmr वगैरे दिसते.
स्केल ने बाबा आणि सासरे ह्यांचे visceral fat बरेच जास्त दाखवले. माझे एकूण फॅट फार जास्त आहे. पण visceral 9 आहे.
बहिण बहिणीचा नवरा आणि माझा नवरा ह्यांचे दोन्ही ह्या पेक्षा बरेच कमी दाखवले. माझा नवरा पळतो बराच. बहिण पण स्ट्रिक्ट डायेट आणि व्यायाम करतें.
मी ५ महिने IF केले आणि सध्या इंटर्मिटट IF चालू आहे. व्यायाम महिन्यातला एखादा आठवडा बुडतो. एरवी ४-५ दिवस चालू असतो आठवड्यातला. पण माझं वजन जास्त आहे एकूणच.
IF ने मला फार फायदा झाला आता परत रेग्युलर व्हायला हवे.

खूपच चांगला धागा व चर्चा. अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद केदार!

प्राजक्तानी लिहिलंय तसं विल पॉवर मेन फॅक्टर आहे असं वाटतंय. कॅलरी डेफिसिटसाठी तेच महत्वाचं!

माझ्या धाग्यावर आणि इथेही "चिकाटी" हा शब्दप्रोयोग जास्त होतो. आणि ती असावी असं मत व्यक्त केलं जातंय.
पण मला असं वाटतं की चिकाटी पेक्षा "कंपॅशन" जास्त महत्वाची आहे.

मी बरीच वर्ष डाएट आणि व्यायाम दोन्ही करते आहे. आधी मला व्यायाम करायला आत्ता आहे त्याच्या दसपट जास्त वेळ असायचा. आणि तो मी वापरायचे देखील. पण खाण्याच्या बाबतीत तसे व्हायचे नाही.
बऱ्याच मानसिक कारणांनी खाल्ले जाते. परवा मी माझ्या आई ला तू रात्री का खातेस असे विचारले असता, "घरी गेल्यावर आपल्या घरी आलो म्हणून खावंसं वाटतं" असं कारण तिनी मला दिलं! ज्यावर काहीच वाद घालणे शक्य नव्हते.

जेव्हा माझा आतला संवाद एखादा दिवस नीट खाणं जमलं नाही तर रागावणारा असायचा तेव्हा हे जमणं जास्त अवघड होत.
तो जेव्हा "बघूया काय होतंय" असा झाला आणि एखाद्या वेळी जमलं नाही तर उद्या पासून पुन्हा नव्याने छान सुरुवात करायची, स्वतःला दोष द्यायचा नाही, असा झाला तेव्हा मला जमायला लागलं.

मला तरी असे वाटते की ज्या लोकांना कंसिस्टंटली व्यायाम आणि डाएट जमत नाही त्यांनी हे तपासून पाहावे. चिकाटी सकारात्मक वातावरणात जास्त टिकते!

@ नानबा

अमितव म्हणतो त्या पद्धतीने सुद्धा एकदा फॅट मोजून बघावे. माझा फॅट वाल्या वजनकाट्यांवर एवढा विश्वास नाहीये.
http://www.calculator.net/body-fat-calculator.html
हा आर्मी स्टाईल कॅल्क्युलेटर आहे. यासाठी तुम्ही कुणाला तरी तुमची मापं घ्यायला सांगा. आपण घेतलेली मापे चुकतात. आणि त्या मेजरमेंट्स इथे टाका. त्यावरून अंदाज येईल.

खरंतर प्रगतीचे सगळ्यात उत्तम मोजमाप हे मापातच आहे. वजन बऱ्याच इतर गोष्टींवर अवलंबून असते, जसे की पाणी, मसल. बायकांच्या बाबतीत ते खूप वर खाली होते. म्हणून कपडे कसे बसतायत यावरून ठरवणे उत्तम.

जेव्हा माझा आतला संवाद एखादा दिवस नीट खाणं जमलं नाही तर रागावणारा असायचा तेव्हा हे जमणं जास्त अवघड होत.
तो जेव्हा "बघूया काय होतंय" असा झाला आणि एखाद्या वेळी जमलं नाही तर उद्या पासून पुन्हा नव्याने छान सुरुवात करायची, स्वतःला दोष द्यायचा नाही, असा झाला तेव्हा मला जमायला लागलं. >> +१.
अनेक्दा लोक डाअ‍ॅट एक शिक्षा म्हणूनही बघतात. त्यात मग 'मला नाही जम्णार घासफूस खायल किवा उपाशी राहायला ' असे आधीच्च्च
म्हणतात. नक्की काय केल पाहीजे याचा विचार करुन बारिक सारीक बदल केले पाहिजेत. Its a way of life असा विचार केला पाहिजे.

पण ज्या लोकांना सकाळी डायबेटीसची मेडिसिन (जसे इन्सुलीन, गोळ्या) घ्यायच्या असतात त्यांनी हे फास्टिंग कसे करावे. काहीही न खाता औषधे घेवु नका असे डॉक्टर सांगतात. १६/८ च्या जागी जर १४/१० केले तर फायदा होइल का?

छान लेख व माहिती.

>>>> मग दुसर्‍या आठवड्यापासून ब्रेकफास्ट पूर्ण स्किप करून १६:८ सुरू केले. <<<< यातिल १६:८ काय आहे?

ऑर्किड, धन्यवाद. Happy
मला तपासुन बघितले पाहिजे माझा खाण्याचा क्रम कसा काय आहे ते. Happy
मी सकाळी कँटिनला क्वचितच नाष्टा करतो. दुध किम्वा चहा घेतो ८:१५ ला
नंतर दुपारी कँटिनचेच जेवण, एक मुद भात, एक चपाती, थोडी भाजी, थोडी आमटी, एक पापड, दहीवाटी व तिमधे तिन चमचे साखर, दीड वाजता.
दुपारचा एक चहा.
दिवसभरात केवळ ऑफिसमधेच जेवणावेळचे सोडून अधेमधे थोडे थोडे घेत दोन लिटर पाणी रिचवतो. घरी पितो ते वेगळे (मोजले नाही कधी).
रात्रीचे जेवण ९ ते १० दरम्यान, थोडा भात, किंवा एक चपाती, जे काही तोंडी लावणे असेल त्याबरोबर.
आता हे सगळे १६:८ मध्ये कसे काय बसते की नाही? काय बदल करायला हवा? रात्रीच्या जेवणानंतर एकदम दुपारी दीड वाजताच जेवण होते म्हणजे साधारणतः १५ तास जाताहेत. पुरेसे आहेत ना?

ज्यादिवशी वास्तुशांत/जननशांत असेल, त्यादिवशी तर पहाटे उठुन आवरुन यजमानाकडे जाऊन सर्व पार पडेस्तोवर दुपारचे ३ ते ४ वाजतात, त्यानंतर घरी येऊन मगच थोडेसे खाणे होते , तोवर केवळ एखाद चहा अथवा दुध यावर रहातो. असे करणे योग्य की अयोग्य? अजुनतरी मला शुगरचा प्रॉब्लेम जाणवलेला नाहीये.

>>>> भुक सहन होत असते, आपण ती सहन करत नाही. <<<< हे बाकी खरे हं, कामात असलो की तहानभुकेची जाणिवही नसते, एरवी मात्र मी भुकेला खुप हळवा आहे... ठरलेल्या वेळेस काहीतरी खायला हवे असते, मग एखादे बिस्किटही पुरते...

अरे वाह.... मलाही कुणाशी तरी शेअर करायचे होते अन अनायसे हा धागा पाहीला.

माझे वजन खुप जास्त आहे.... तेव्हा असेच एकदा माझ्या फॅमिली डॉक ने सांगीतल होते या बद्दल (IF) ते आठविले.

मी सुरुवातीला फार आळस केला कारण ईझीली पुर्ण लाईफस्टाईल बदलने सोपे नव्ह्ते पण मग जेव्हा अचानक परत सगळे ड्रेस होईनासे वाटायला लागले तेव्हा ठरविले अब बस्स... यापुढे पिझ्झा - बर्गर - वडापाव - समोसा या कडे बिल्कुल बघायचे पण नाही अन माझे डायटींग प्रकरण चालु झाले. तो दिवस होता २६/०२/२०१७.

आज बरोबर दोन महिन्यांनी मला हे सांगताना खुप छान वाटतेय की मी माझे वजन १० किलो ६०० ग्रॅमने कमी केलेय ( या सोबत खुप सारे पैसेही वाचले जे मी जंक फुड वर खर्च करायची).

पर मंजील अभी बहोत दुर है...... आता परत लिहीन जेव्हा मी ठरविलेले टार्गेट अचिव्ह करेन

Pages