स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे

Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34

स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.

जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.

स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

non-stick तवा वापरुन झाल्यावर, लग्गेच, थोडा गरम असतानाच, जाड फडक्याने कडेवरचा तेलाचा थर पुसुन घेतला तर स्वच्छ होतो. तवा गार झाल्यावर तो थर चिकट होतो आणि पाण्याने पुर्णपणे निघत नाही.

माझा फ्रिज जुन २००८ मधे घेतला होता. LG डबल डोअर. तीन- चार दिवसांपासुन कुलींग खुप कमी होतेय. अगदी दुध सुध्दा फ्रिझर मधे ठवावे लागते. तरी फक्त थंड रहाते (बर्फ होत नाही). कुणाला कारण माहीत असेल तर क्रुपया मदत करा. कस्टमर केअरला फोन केला तर नुसते पहायचे पण ३३१ रु सांगितले. Angry

प्रीति, हा मॅजिक बुलेट सध्या बहितेक टीव्ही चॅनल्सवर (इथे भारतात) दाखवतात तोच आहे का?

मला एलेक्ट्रिक ब्लेंडर घ्यायचा आहे, कुठल्या कंपनीचा चांगला आणी टिकाऊ येतो? (चायना मेड दीड वर्षात खराब झालाय)

वर्षा, त्याच्या कॉम्प्रेसरमध्ये प्रोब्लेम असेल. तुला कस्टमर केअरशिवाय पर्याय नाही.

माझा गोदरेजचा डबल डोर आहे. दोन वर्षांपुर्वी, नव्या मुंबईत सकाळसंध्याकाळ चार तास लाईट नसायचे. तेव्हा कधीतरी फ्रिजचा कॉम्प्रेसर उडाला. मी सुदैवाने अ‍ॅन्युअल मेटॅनन्स काँट्रक्ट केलेले. त्यामुळे तो बदलुन मिळाला, पण त्यांच्या माणसाने अचानक पॉवर फ्लक्चुएशन झाले तर फ्रिज्ला त्रास होऊ नये म्हणुन स्टेबिलाइजर बसवायचा सल्ला दिला. तसा लगेच बस्वुन घेतला. भारनियमनापाई मला टीवीवरहीऑ २००० रु. खर्च करावे लागले.

इथेही चेक कर

http://www.applianceaid.com/frig_notcold.html

भारतात व्होल्टेज स्टॅबिलायझरला पर्याय नाही. कधीही जाणारे लाईट, पॉवर फ्लक्चुएशन वगैरेमुळे कोणत्याही अप्लायन्सेस मधे बिघाड होऊ शकतो. आमच्या घरी फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन, म्युझिक सिस्टीम सगळ्याला लावून घेतलेत. प्रत्येकवेळी ४००-५०० रुपये जास्त खर्च केले पण त्याचा फायदा नक्की होतो.

त्याच्या कॉम्प्रेसरमध्ये प्रोब्लेम असेल >> कॉम्प्रेसरमध्ये प्रोब्लेम असेल तर बरे आहे म्हणावे लागेल.. कॉम्प्रेसरची वॉरन्टी आहे अजुन Proud

पण कुलींग पुर्ण बंद नाही झालेले.. खुप कमी होते आहे. म्हणजे व्होल्टेज मुळे नसेल झालेला प्रॉबलेम असे मला वाटते.

नन्दीनी, फीलिप्स चा ह्यन्ड ब्लेन्डर घे. माझी बहीण गेले ५ वर्ष वापर्ते आहे....(ज्युस, पाले भाजी, सूप्स खूप साठी खूप सोइस्कर पड्ते)

नंदिनी, मी बॉसचा ब्लेन्डर गेली ७-८ वर्ष वापरते आहे. एकदाच काहीतरी किरकोळ दुरुस्ती करावी लागली. सध्या बाजारात बॉस, मॅगी, जैपान इ. ब्लेन्डर्स आहेत ते चांगले आहेत. बेसिक ब्लेन्डर साधारण ६०० ते ८००रुपयापर्यंत पडेल. बाकी चटणी वगैरेसाठी जास्तीच्या अ‍ॅटॅचमेंट्स घेतल्या तर किंमत वाढेल.

भारतात एक मोबाइल स्टोव मिळतो. ट्रेकिंग वगैरेला जाताना सुट्सुटीत होइल असा. त्याच्यात पॅरालिन बॉल्स वापरले जातात. माझ्याकडे तो स्टोव आहे पण त्याच्या बरोबर ४ च बॉल्स आहेत.
स्टोव मी एका प्रदर्शनामधे घेतला होता. तर ते पॅरालिन बॉल्स पुण्यात कोठे मिळतील माहिती आहे का?

नंदिनी, मॉर्फी रिचर्डस् चा ब्लेंडरही चांगला आहे. त्याच्या बरोबर जी चॉपिंग अ‍ॅटॅचमेंट येते, ती खूप उपयोगी पडते. त्यांची आफ्टरसेल सर्व्हिसही चांगली आहे.

बॉसचा ९०० रूपयेवाला ब्लेंडर घेतला. कसलातरी सेल चालू असल्याने त्यासोबत निरालीचा डोसा तवा फ्री मिळाला. Proud त्याच दुकानदाराने नादुरूस्त असलेला ब्लेंडर दुरूस्त करून दिला.

मला चटनी वगैरे साठी नकोच हवा होता. जास्तकरून ताक, मिल्कशेक, ज्युस आणि पालेभाज्या व सूपसाठीच त्याचा वापर चांगला व मस्त होतो. (आणि जास्त भांड्याची कटकट नाही)

माफ करा, कुठे विचारावे हे समजले नाही म्हणून इथे विचारत आहे. पंचपाळ मध्ये (पूजेचे) कोणकोणत्या पाच वस्तू ठेवल्या जातात?

फूड प्रोसेसर कोणता घ्यावा - मुख्य काम पोळी, पुर्‍या, चपातीसाठी कणिक मळून घेणे. तीन ते चार कप साईजचा असला तर पुरे. मी यू. एस. मधे आहे. अनुभव असल्यास सान्गावे. धन्यवाद!

मी Oster/Osterizer, KitchenAid and CuisinArt ब्रेन्डचे पाहिले आहेत. आणखी माहित आहेत का कोणाला?

अमी

फूड प्रोसेसर (अमेरिकेतले) ची चर्चा इथे वाचली का? ती वाचुन अजुन काही स्पेसिफिक प्रश्न विचारू शकशील.

मी अजुन एका मायबोलीकरणीला दिलेले सल्ले कुठेतरी मेल मधे असतील ते शोधुन पेस्ट करते इथे.

मिनोती, जुन्या मायबोलीवरील चर्चा वाचली आहे. त्यातल्या काही लिन्क्स चालत नाहीएत, पण त्या कणिक मळणार्‍या मशिन्स बद्द्ल नाहीत. माझ्या घरात छोटेसेच उपकरण मावेल, तेव्हा तसे काही माहित असल्यास कळवावे. त्वरित उत्तर दिल्याबद्द्ल थेन्क्स!

लालू, वर म्ह्टल्याप्रमाणे छोट्या स्वयम्पाकघरात मावणारे यन्त्र हवे आहे. तसे काही माहित झाल्यास नक्की सान्गा. तुम्ही सुचवलेले उपकरण मस्त दिसतेय मात्र! त्वरित उत्तर बद्द्ल धन्यवाद!

अमी

माझा किचनएडचा आहे, ११ कप. खूप आवडला मला. माझं रेकमंडेशन त्याला..
महान आहे मी! किचनएड नाही, कुझिनआर्टचा आहे माझ्याकडे. हा..

माझ्याकडे हा cuisinart चा फुड प्रोसेसर आहे .
http://www.amazon.com/Cuisinart-DLC-2009CHB-Processor-Brushed-Stainless/...

अमी तुम्ही जे चिरणे ,कणीक मळणे वगैरे म्हणता ना ते सगळ यात होत. चपात्यांबरोबरच शंकरपाळी,करंज्या इत्यादीची कणीक पण मस्त मळली जाते.
वरती जो स्टँड मिक्सर दिलाय (जो मला घ्यायचा आहे:) ) तो आपली चपातीची कणीक मळण्यासाठी योग्य नाही. याला कारण म्हणजे त्यात कणीक थोडी पातळ मळली जाते. ब्रेड किंवा पिझ्झा बेस बनवायला तो मिक्सर योग्य आहे.

बस्के, सीमा, सुचवल्याबद्द्ल धन्यवाद. आता बघते कोणता घ्यावा ते. माझे स्वैपाकघर अगदी छोटे असल्यामुळे विचार करून काय ते ठरवावे लागेल.

अमी

Pages