स्टँड मिक्सर

स्टॅन्ड मिक्सर म्हणजे भारतात ज्याला "मिक्सर" म्हणतात तो नव्हे. नावाप्रमाणे याचे काम फक्त 'मिक्स' करणे असते. कणीक मळणे, केक -कुकीज करत असाल तर त्याची मिश्रणे, फ्रॉस्टिन्ग, ताक घुसळणे इ. कामे यात छान होतात. या यंत्राच्या कणीक मळण्यातल्या कौशल्यामुळे याला 'गृहिणीमित्र' ही पदवी द्यावी वाटते पण बदलत्या काळानुसार आपण याला 'स्वयंपाकघरातील सहकारी' किंवा 'किचन-मित्र' म्हणूया.

फूड प्रोसेसरमध्येही कणीक मळता येते, पण साफ करायला कटकटीचे आहे.

यात बरीच मॉडेल्स आहेत पण Kitchen Aid 'Artisan' चे ३२५ वॅटचे ५ क्वार्टचे मॉडेल पुरेसे होते.
http://www1.macys.com/catalog/product/index.ognc?ID=77589&CategoryID=31665
सेलमध्ये २५०-२३० पर्यंत मिळते कधीकधी.

बर्‍याच दुसर्‍या अ‍ॅटॅचमेन्टसही मिळतात, पण त्या गरजेनुसार घ्याव्यात. सोबत येणार्‍या तीन पुरेश्या आहेत.

यात बाकी कंपन्याही असतील पण फूड प्रोसेसर किंवा मिक्सर यासारख्या उपकरणांसाठी Kitchen Aid हा डोळे झाकून घेण्याचा ब्रॅन्ड आहे.

mixer.jpg

Submit to kanokani.com

अमेरिकेत आल्यादिवसापासून हा माझ्या विश लिस्टवर आहे अ ओ, आता काय करायचं आज काल भारतात पण मिळतो.

माझ्यापण विशलिस्ट वर आहे हा, दर वेळी दुकानात गेले की मी हा बघून न घेता परत येते, अपार्टमेंट्मध्ये एवढे मोठे किचनच नसते हे सगळे ठेवायला. अरेरे

सेम हिअर स्मित

माझं किचन मोठं आहे पण ह्या सगळ्या वस्तूंनी इतकी जागा अडते की नको वाटतं घ्यायला.

शिवाय घेतलं की त्याचा वापर करावा लागतो... नाहीतर गिल्टी वाटतं फिदीफिदी

कणीक मळायला हे असलं मशीन बरं पडतं की फुड प्रोसेसर मधे नीडिंग ब्लेड लावून केलेलं बरं पडतं ? साफ सफाईच्या दृष्टीने कुठलं मशीन चांगलं ?

भाकरीचं पीठ पण यातून मळता येते का ?

हे नायजेला च्या शोमध्ये नेहमी अस्ते. जबरी मिक्स करते. अगदी गृहिणी मित्र ! मला बेकिंगचे गोड पदार्थ ब्रेड्स जाम आवडतात पण वजन आणखी वाढेल म्हणून जास्त करत नाही. एग व्हाइट/ क्रीम पण मस्त बीट होते ह्यात.

भाकरी चे पीठ बहुतेक नाही मळणार कारण कणीक, मैदा मध्ये ग्लुटेन असते जे कण जास्त पकडून ठेवते
ते भाकरीच्या पिठात नसते. मशीनचे डिझाइन भाकरी साठी इंटेंडेड नाही.

बेकिंगसाठी मेनली जे फेटणे लागते ते यात मस्त होत अस्णार.
आम्ही सरफेस टेक्निकच्या वर्गात हा मिक्सर पिगमेंटस आणि मिडीयम मिक्स करायला वापरायचो.. स्मित

देशी, मी हे वर लिहिलं आहे.
>>फूड प्रोसेसरमध्येही कणीक मळता येते, पण साफ करायला कटकटीचे आहे.

भाकरीचे पीठ 'मळले' जाणार नाही, मिक्स होईल. ते हाताने पुन्हा मळावे लागेल. आणि भाकरीचे पीठ कणकेसारखे एकदम मळून ठेवायचे नसते. १-२ भाकर्‍यांपुरते मळून घेत जायचे असते.

मोदकाची उकड चांगली मळली जाते.

अ‍ॅमझॉन वर किचन एड चे मिक्सर आहेत आज गोल्ड बॉक्स डील. लवकर पहा तिथे जाउन.