स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे

Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34

स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.

जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.

स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते अप्पे पात्र मी विल्यम सनोमा मधे पाहिले पण त्यात अप्पे खुपच मोठे होतील असे वाटतेय. आहे छान आणि कास्ट आयर्न असल्याने छानही असेल. पण मला ते येवढे मोठाले अप्पे पाहून जरा नको वाटले.
देशातून कोणी येणार असेल तर निर्लेपचे मस्त आहे बघ. खाली सगळे स्लॉट्स जोडणारी रिंग आहे त्यामुळे त्यात आच सगळीकडे नीट लागते. अतिशय हलका आहे. घेउन येणार्‍यांना पण जड होणार नाही.

देशातून कोणी येणार असेल तर निर्लेपचे मस्त आहे बघ. खाली सगळे स्लॉट्स जोडणारी रिंग आहे त्यामुळे त्यात आच सगळीकडे नीट लागते. अतिशय हलका आहे.>> माझ्याकडे आहे, मस्त होतात आप्पे!.

ए, देशातून मिक्सर वगैरे आणला तर कन्व्हर्टर पण आणत असाल ना? आम्ही अजुन देशातल्या इलेक्ट्रॉनिक गोष्टी इथे वापरल्या नाहीत. त्यामुळे कल्पना नाही. चालतात का गोष्टी व्यवस्थित?

मी ३ वर्षांपूर्वी बजाज चा फुप्रो आणला होता देशातून. त्यासाठी इकडेच एक कन्व्हर्टर घेतला होता. व्यवस्थित चालतोय फुप्रो.

माझ्याकडे ऱोटीमेकर होता म्हणजे आहे, देशात छान वापरला जात होता. ईकडे आणल्यावर कन्व्हर्टर वापरून पण नीट चालला नाही, आता पडून आहे रोटी मेकर आणि कन्व्हर्टर सुधा Sad

निर्लेपचे पात्र खरेच छान आहे. ढोकळा आपल्या लंगडी नावाच्या भांड्यात चांगला होइल. प्रेशर कूकर मध्ये खाली काहीतरी ठेवायचे व लंगडीत ढोकळा मिश्रण म्हण्जे त्यात पाणी जाणार नाही. खालचे भांडे पण जरा रुंद असावे नाहीतर वरचे भांडे वजनाने कलंड्ते. मग नो ढोकळा.

बस्के
मुंबईत आणि पुण्यात पण काही दुकानात अमेरीकेत नेण्यासाठी वेगळे मिक्सर मिळतात, त्यात त्यांनी आधीच कन्वर्टर टाकलेला असतो. माझ्या नवर्‍याला तो एकटाच भारतात गेलेला असतांना असा मिक्सर आणायला सांगीतला होता पण हजार वेळा सांगूनही त्याने भारतात चालणारा मिक्सर आणला. मग इथे कन्वर्टर घेतला वेगळा, एमॅझॉनवर ६०$ ला.

ही म्हण माझ्या नवर्‍याच्या बाबतीत एकदम पर्फेक्ट!! मिक्सर आणायचा सोडून आधी हजार कारणे दिली असती कि तिकडचा मिक्सर कसा चांगला नाही.. इकडचाच वापर, उगाच भारतातून ओझं आणायच, इकडचे ब्लेंडर्स हे मिक्सरच आहेत, त्यांना हे लोकं फक्त ब्लेंडर म्हणतात etc etc.

इथे रूनी चा कार्यभाग लांबलाय फक्त!! नॉट बॅड Wink

रच्याकने, बस्के मी बारा मधनं प्रिमियर ब्रँडचा घेतला मिक्स २ वर्षापूर्वी. ३ भांडी आहेत त्याला. चांगला चालतोय.

मी नवर्‍याला एकदाच तो एकटा भारतात गेलेला असतान प्रेशर कुकर आणायला सांगितला. त्याने आणलाही. आणि अजूनही मस्त चालतोय. तेव्हा तुमच्या म्हणी सगळीकडेच लागू होत नाहीत ह्याची नोंद घ्यावी. Proud

सायो Happy , बस्के इथे म्हणजे उसगावात चालणारे मिक्सर भारतात बहुतेक ठीकाणी मिळतात्.त्याला रुनी म्हणते तस कन्वर्टरची गरज नाही. 'प्लग ईन' आणी काम चालु.

जो नवर्‍यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला >> Lol
भारतात कन्वर्ट करुनच मिळतात मिक्सर. कन्वर्टर etc काही लागत नाही. वजनाला बर्‍यापैकी कमी असतात. मी आणला तो चार भांड्याचा मिक्सर विथ टुलकिटच वजन साधारण ३-४ किलो होतं. माझ्याकडे हा आहे. सगळं अगदी व्यवस्थित बारिक होतं. मी एकदा साबुदाण्याचं पिठ पण केलं होतं.

जर अगदी कन्वर्टर लागलाच तर ब्रुक्स्टोन मध्ये $ ३५ पर्यंत मिळतो. नाहीतर मिक्सर आणणार्‍याला भारतामधुन कन्वर्टर आणायला सांगायचे रु. ७५/- ला मिळतो.

मी ऑनलाईन घेतला होता कन्व्हर्टर $५० ला. मला बजाजचाच फूप्रो+ मिक्सर आणायचा होता त्यामुळे मी अमेरिकेत आल्यावर कन्व्हर्टर घेतला.

>>जो नवर्‍यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला >><<
अगदी खरे. नवर्‍याला सांगितले की उद्या सकाळी मला अमुक तमुक गोष्टीची आठवण कर, तर त्याला स्वतःला ते लक्षात राहणार नाही. मग आपण ते काम केल्यावर त्याला आठवण करून द्यावी लागते की काल मी तुला असे काही सांगितले होते. Happy
विषयांतराबद्दल क्षमस्व.

देशातून कोणी येणार असेल तर निर्लेपचे मस्त आहे बघ. खाली सगळे स्लॉट्स जोडणारी रिंग आहे त्यामुळे त्यात आच सगळीकडे नीट लागते. अतिशय हलका आहे.>> भारतातुनच आणायचे तर हजारो प्रकार मिळतिल. मला वाटले विचारणार्‍याला इथे अमेरिकेत कुठे मिळते ते हवे आहे.

विचारणारीला इथेच अमेरिकेत हवे आहे Happy पण भारतातुन आण असे सांगणार्‍यांपैकी एक भारतात जातेय तेव्हा मी तिथुनच मागवते कशी Proud

भारतातुनच आणायचे तर हजारो प्रकार मिळतिल. मला वाटले विचारणार्‍याला इथे अमेरिकेत कुठे मिळते ते हवे आहे. >> इथले घेणे का पटत नाही याचे कारण लिहिलेले वाचले नाहीत वाटते!

इथले घेणे का पटत नाही याचे कारण लिहिलेले वाचले नाहीत वाटते! >> Light 1

विचारणारीला इथेच अमेरिकेत हवे आहे पण भारतातुन आण असे सांगणार्‍यांपैकी एक भारतात जातेय तेव्हा मी तिथुनच मागवते कशी >>
Light 1

non-stick तव्याच्या कडेला चिकट थर जमा झाला होता.
एका मैत्रिणीच्या सल्ल्यानुसार-----
तो काढण्यासाठी तव्यात पाणी घालून गरम केला आणि खायच्या सोड्याची चिमूट कडेने सोडली.
कड स्वच्छ झाली पण मधलं coating निघून तवा वाया गेला.
सावधान !

Pages