स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे

Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34

स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.

जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.

स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्ञाती, अजुन एक ऑर्गनायझेशनच्या द्रुष्टीने मला उपयोगी पडणारी गोष्ट वाटली ती म्हणजे चमचे/सुर्‍यांचे सॉर्टर्स मिळतात या टाईपचे ते छान असतात.
सगळ्या मसाल्याच्या बरण्यांमधे ठेवण्यासाठी वेगवेगळ्या आकाराचे चमचे जे देशात छान मिळतात ते देखील खुप उपयोगाची गोष्ट वाटते.

हे मला पण आवडतात. मात्र स्वतःचे कायमचे घर नसलेल्यांनी प्लॅस्टिकचे घ्यावेत. ते वजनाने हलके असतात आणि पॅक/अनपॅक केले की डिशवॉशरच्या वरच्या रॅकमध्ये धुता येतात.

किचन कॅबिनेटमध्येच ताटं उभी करुन ठेवता येइल असे स्टॅंड्स, रॅक्स पण उपयुक्त आहेत, साधारण असे.

दोन्ही गोष्टी मस्त आहेत.

सगळ्या मसाल्याच्या बरण्यांमधे ठेवण्यासाठी वेगवेगळ्या आकाराचे चमचे जे देशात छान मिळतात >> मी परवाच स्पाईस रॅक घेतले ज्यात नेहमीचे चमचे जात नाहियेत Sad आता छोटे चमचे आणावे लागणार.

ज्ञाती हा मी सांगितलेल्या ऑर्गनायझरचा फोटो. खाली आणखी कप्पे आहेत. त्यात स्नॅक्स वगैरे ठेवलेत. आणखी फोटो काढलेत त्याची लिंक पाठवते.
p2.JPG

मी t fal चा नॉनस्टिक सेट घेतला.त्याच्यावर लिहिले आहे की पहिल्यांदा आणि १० डिशवॉशर सायकल झाल्या की सीझनींग करा.ते धुवून झाल्यावर करायचे की आधी?
आणि मी भारतात एक हार्ड अ‍ॅनोडाईज्ड तवा घेतला होता.तिथे त्याच्यावर पोळ्या छान व्हायच्या.इथे आल्यापासून काय झाले आहे माहित नाही, पोळी त्यच्यावर टाकली की चिपकूनच बसते.काय चुकत असेल्?

रुनी म्हणते तेच मे लिहिणार होते. तवा खुप गरम असेल आणि थोडस तेल अगोदर लावल नसेल तर तस होत.(माझ्याकडे तरी)

मुलींनो, तुम्ही किती निगुतीनं संसार करता. खरंच कौतुक आहे.

माझ्याकडे प्लास्टिक, काच अश्या मिळतील त्या आकाराच्या, रंगाच्या आणि मापाच्या बाटल्या, डबे, बरण्या आहेत. त्या ओळीनं वगैरे नीट मांडून ठेवल्या तर मला डोळ्यांसमोरची हवी ती बाटली/डबा पण दिसणार नाही. पँट्रीतल्या कल्लोळात हात घातला की बरोब्बर हवी ती वस्तू हाताला लागते..३-४थ्या अटेंप्ट्मधे. Proud

केक करण्यासाठी काचेचे भांडे वापरणे चांगले की मेटलचे? नेहमी करायला एक भांडे आणायचे आहे, सुचवाल का? एक आणले होते मेटलचे, पण ते एकदा धुतल्यावर गंजुन गेले. खूप जाड असलेले घ्यावे का?

अगदी उत्तम विचार. फार उपयोगी पड्ते. फक्त वापरणार्‍या व्यक्तीचे ध्यान कोण्त्या शेगडीचा स्विच ऑन केला आहे याकडे पाहिजे नाहीतर गॅस लीक होउ शकतो. व अपघातास आमंत्रण. माझ्याकडे आहे ना. अगदी अर्ध्या तासात मोठा स्वयंपाक होउ शकतो याने.

मामी एक सांगा.. सध्या दोन बर्नरच्या शेगडीपुढे मी पोळपाट ठेउन पोळ्या करु शकते. जेमतेम जागा पुरते. ४ बर्नरच्या शेगडीपुढे नाही ना करता येणार Uhoh

अगदी अर्ध्या तासात मोठा स्वयंपाक होउ शकतो याने. >> अगदी अगदी. आमचे ७ जणांचे कुटुंब आहे. दोन बर्नरच्या २ शेगड्या आहेत. पण एक खराब झाली आहे म्हणुन हा विचार Happy

नाय नाय. साइड्लाच करायला लागतील. मी तसेच करते. मी तर ओटा पुसून त्यावरच लाट्ते. ( साबांना आजिबात आवड्त नाही) तू दोन तीन दिवस सराव कर. डीटेल्वारी सांगू का.

वरण भात बटाटे नाहीतर उसळीचे धान्य वगैरे असा कुकर मागे लावायचा. त्याच्या पुढे भाजी/ भाज्या फोड्णी टाकून सर्व घालून मग ती कढई कुकरच्या शेजारी मागे सिम वर ठेवायची ( काही रस्सा वगैरे) सुकी भाजी ७ मिनिटे मायक्रोवेव्ह मध्ये टाकायची. साइड्ला शिरा/ खीर / हलवा नाहीतर चहा/ दूध गरम करणे वगैरे सिम वर करायचे. मग कोशिंबीर वगैरे करायची ( ऑफलाइन जाऊन Happy ) कणिक भिजवायची. तोपरेन्त कुकर होतो मग आमटी फोड्णीस टाकून शेगडी क्र. २( समोरची) वर ठेवायची सिम वर व पोळ्या करण्यास घेणे. तोपरेन्त पंगत बसू शकते मग गरम पोळ्या करायच्या. हाकानाका.

नाय नाय शेगडीचे उपकार. आपण सर्व रिसोर्स मॅक्स करतो नेहमी. मी फेंग शुईत वाचले कि घरातील किचन मधील शेगडी रोज वापरावी थोडीतरी म्हण्जे शुभ असते वगैरे कायकाय. घरात सुबत्ता नांदते व किचन गॉड्स
हॅपी होतात. तू घरी ये मग करून घालते. Happy

एकाचवेळी चारही बर्नर वापरणं होत नाही. मागचं भांडं हाताळताना चटका लागू शकतो.. नाहीतर पुढे मोठी आच देऊन ते भांडं मागे मंद आचेवर ठेवणे वगैरे उद्योग करावे लागतात.. मागच्या बर्नरचा उपयोग कमी आचेवरच्या पदार्थांसाठीच होतो- हे सगळं दुकानदाराने सांगितलंय. मला बव्हंशी पटलं. मामींनीही मध्येच मावेचा आसरा घेतलाय Happy भांड्याचे दुकानदार चांगलं गाईड करतात, त्यांना उपलब्ध जागा, एकूण वापर वगैरे सांगितलं की.

अष्टभूजा मामी !!
पूर्वी मी मोठ्या प्रमाणावर जेवण करायचे असेल तर चक्क कागदावर प्लॅनिंग करायचो.
म्हणजे आज मूग भिजत घालायचे, विरजण लावायचे, उद्या भाजी कापून ठेवायची वगैरे, आता गरज वाटत नाही त्याची.

बरोबर. १ २
३ ४ असे बर्नर असतील तर १ बर्नर अगदी कमी वापरला जातो त्यात माझ्याकडे ती शेगडी अगदी मिक्सरच्या जवळ आहे त्यामुळे वापरताना मिक्सरला भाजेल कि काय असे वाट्त राहते व इले. वायर शेगडी वर पड्त नाही ना ते बघावे लागते. ४ बर्नर मॅक्स यूज मग २ बर्नर मग ३ बर्नर डिपेंड्स ऑन डेलि कुकिन्ग.

मी मावेचाच काय पिझ्झा ह्ट चा पणा आसरा घेते. Proud

चार बर्नरच्या शेगडीची रचना अशी असते;

four burner.JPG

त्यात डाव्या हाताचा वरचा बर्नर आणि उजव्या हाताचा खालचा बर्नर मोठा आणि डाव्या हाताचा खालचा बर्नर आणि उजव्या हाताचा वरचा बर्नर छोटा (किंवा उलट) असतो. एकावेळी चार भांडी गॅसवर ठेवून स्वयंपाक करणं तितकं प्रॅक्टिकल नाही. मागच्या भांड्यातील पदार्थ ढवळताना पुढच्या भांड्याचा चटका लागणं किंवा वाफ हातावर येणं असे छोटे अपघात होण्याची शक्यता असते. तसेच मागच्या बर्नरवरचा पदार्थ आधी झाला तर ते भांडं उतरवण्यासाठी कसरत करावी लागते.

तीन बर्नरच्या शेगडीची रचना अशी असते;

three burner.JPG

मला तरी ही शेगडी मल्टीटास्किंग स्वयंपाकासाठी अतिशय योग्य वाटते. मधला बर्नर शक्यतो छोटा असतो पण आंच मोठी होऊ शकते. एकावेळी तिन्ही बर्नरवर भांडी ठेवून स्वयंपाक करता येतो, तसेच गॅसची बटणांची रचना बर्नरप्रमाणे असल्याने गोंधळ कमी उडतो (हे सुरुवातीला फक्त, सवय झाल्यावर बटणांचा चार बर्नरच्या शेगडीतही शक्यतो गोंधळ होत नाही.) अन्नपदार्थ तयार झाल्यावर भांडी उतरवणे/चढवणे तुलनेने सोपे पडते.

मन्जू ऐकत नाही Happy
माझ्याकडे आहे तीन बर्नरचीच. तू लिहिलेल्या एकूण एक शब्दास अनुमोदन. सकाळी घाईच्या वेळात तिन्ही बर्नर चालू असतात. डावीकडे भाजी, मध्ये दूध आणि उजवीकडे सर्व सरंजाम घेऊन पोळ्या. मॅक्स वापर होतो आणि अजिबात अडचण होत नाही.

पूनम. सेम हिअर!! माझं लिहून झाल्यावर तुझी पोस्ट पाहिली. Happy

मागे प्राचीनेही शेगडीविषयी प्रश्न विचारला होता.

ग्लास टॉपच्या शेगड्या आता इथे पण आल्यात. दिसायला मस्त आहेत पण आपली लायकी नाही वापरायची असं वाटत राहतं... Sad

माझ्या मोठ्या जावेच्या नविन घरी आहे ग्लास टॉप्ची चार बर्नर्सवाली शेगडी. नेहेमीच्या चार बर्नरवाल्या शेगडीपेक्षा दोन बर्नर्समध्ये जास्त जागा आहे. भांड्याला भांड लागत नाही, एकावेळी चारही शेगड्या पेटवल्या तरी.
पण ती तशीच चकचकीत ठेवणं म्हणजे..... Happy मी ती मस्त लख्ख पुसायची म्हणून लिक्विड क्लिनर, पाणी वैगरे वापरून छान कपड्यानी चकचकित केली. .... आणि त्याचे दोन बर्नर एक दिवसभर बंद झाले होते. Sad

माझ्याकडे चार बर्नरवाली शेगडी आहे, एकावेळी तिचे तिनच बर्नर वापरता येतात, क्वचित कधीतरी चारी बर्नर चालू असतात. पण माझ्याकडे शेगडी ठेवण्यासाठी एल आकाराच्या ओट्याचा जो मधला कोपरा असतो तीच जागा आहे. तिथे तिन बर्नरवाली शेगडी नीट मावत नाही. ही अगदी फिट बसते, म्हणून बदलता पण येत नाही.

त्या साफ करायची एक प्रोसीजर आहे. सर्व बर्नरचे वरील भाग जिथे भोके अस्तात ते बाजूला काढायचे, काळ्या रिंगा व आतील छोट्या ताट्ल्या पण. पदार्थ सांडू नये म्हणून असतात त्या. मग इजी ऑफ बँग नाहीतर मिस्टर मसल कपड्यावर घेऊन डायरेक्ट पुसून घ्यायचे. मग परत सेटिन्ग करायची. पाणी फार वापरायचे नाही. पूर्वी बर्नर मध्ये सेफ्टी पिन घालून त्यातील कचरा काढत असू त्याची आठवण आली. ऑन - ऑफ बट्णापाशी कचरा साठतो व त्याची मुवमेन्ट खराब होउ शकते. ते पण पुसून घ्यायचे. छ्या मला सून आली तर मी तिला किती कट्कट करेन. Proud

Pages