Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34
स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.
जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.
स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पिन्कु, माझ्याकडे ब्लॅक अँड
पिन्कु, माझ्याकडे ब्लॅक अँड डेकरचा आहे २००९ वर्षाखेरच्या सेलमधे घेतलेला ४ स्लाइसचा. हा लहानसा आहे व टोस्ट करणे, दाणे भाजणे, एखादा पिझ्झा स्लाइस भाजणे यासाठी उपयोगी आहे. मी $२० ला घेतला होता. याच्यापूर्वी माझ्याकडे याच कंपनीचा साधारण तसाच होता, तो १४ वर्षे वापरला तरी त्याला ढिम्मसुद्धा काही झाले नाही. मात्र त्यावेळेस तो $३० ला घेतला होता. खालचे उघडझाप करण्याचे झाकण मात्र हळूहळू काळे पडत गेले. मग त्याच्या ऑन दिव्याचे कव्हर पडले, तेव्हा मी निमित्त साधून हा दुसरा घेतला.
माझी मुले त्यात टोस्ट, पिझ्झा गरम करणे, कधी एकदोन समोसे गरम करणे वगैरेसाठी वापरतात. त्यांना मोठा ओव्हन वापरायची परवानगी अजून दिली नाही.
कुकीज, ब्राउनीजसाठी मी शक्यतो मोठा ओव्हन वापरते, पण छोट्यातही छान होतात, खेळ होत फक्त. मुलांना quesadilla ग्रिल चीज सँडविचसाठी हा छोटा बरा पडतो. त्यात मी रवा, पोहेही भाजले आहेत. थोडेसे असेल तर पटकन होते. माझी आई थिजलेले तेल, तूपसुध्दा त्यात कोमट करायची, कारण वाटी जशीच्या तशी काढघाल करणे तिला सोपे वाटायचे.
तोषवी, फुच्युरा चा कुकर मस्त
तोषवी, फुच्युरा चा कुकर मस्त आहे एकदम, मला साडेसहा लीटर चा २००० ला मिळाला. हॉकिन्स च्या दुकानातुनच घे.
आइसक्रिममध्ये घालायचे
आइसक्रिममध्ये घालायचे स्टबिलायझर कुठल्या दुकानात मिळेल?
केक डेकोरेट करताना वापरतात ते टर्नटेबल मुंबईत कुठे मिळेल? काय किंमत असेल साधारण???
टर्नटेबल साठी एक
टर्नटेबल साठी एक रिव्हॉलव्हिंग डिश मिळते. ती घ्यायची आणि तिच्यावर जाडसर डिश, लाकडाचा तुकडा, असे काही ठेवले की झाले टर्नटेबल तयार..
इथे उसगावात चांगला थर्मास
इथे उसगावात चांगला थर्मास कुठुन घ्यावा?
http://www.amazon.com/b?ie=UT
http://www.amazon.com/b?ie=UTF8&node=13880501
ज्ञाती, अमॅझॉन लिंक वर पहीला
ज्ञाती,
अमॅझॉन लिंक वर पहीला दिसतोय ना त्या प्रकारचा मी वॉलमार्ट मधुन घेतला. जवळपास १० डॉलर्स ना. मला छान वाटतो तो खुप.
मलाही आयकियात १०$ ला फर्मास
मलाही आयकियात १०$ ला फर्मास थर्मास मिळाला.
थॅन्क्स सिण्डी, स्वाती,
थॅन्क्स सिण्डी, स्वाती, बस्के!
http://www.amazon.com/Thermos
http://www.amazon.com/Thermos-34-Ounce-Stainless-Steel-Insulated-Briefca...
हा घेतला मी वॉलमार्ट मधुन. मस्त आहे, सहा-आठ तास गरम राहते पाणी वगैरे. धन्स मुलींनो!
प्रीतिच्या रेकोवरुन
प्रीतिच्या रेकोवरुन http://www1.macys.com/catalog/product/index.ognc?ID=330413&CategoryID=26192 हा घेतला. (अजुनही सेलवर आहे. )
अतिशय उपयुक्त. थॅन्क्स प्रीति!!
मला इथे अमेरिकेत पॅन केक पफ
मला इथे अमेरिकेत पॅन केक पफ पॅन (आप्पेपात्र :)) घ्यायचय. जरा जास्त म्हणजे १२ वगैरे मोल्ड्स असलेलं. कुठलं चांगलं आहे आणि कुठे मिळेल ह्याची माहिती देणार का कृपया ? सध्या मला हे आवडलय. मी बेड-बाथ, टार्गेट वगैरेच्या २-३ चक्कर केल्या पण कुठल्याच प्रकारच मिळालं नाही
काय सही आहे हे आप्पेपात्र,
काय सही आहे हे आप्पेपात्र, हँडलसकट आणि डिल पण छान आहे..अॅमेझॉनवरून आमच्याकडे (कॅनडात) नाही मिळणार ना..:(
सिंडरेला टार्गेट मधे आहे पॅन
सिंडरेला टार्गेट मधे आहे पॅन केक पफ पॅन इथे बघ. ७ मोल्ड्चे आहे. नाहितर विलियम सोनोमा मधे बघ. मी हे घेतले आहे. नॉनस्टिक कोटिंग आहे आणि वजनाला थोडे हलके आहे त्यामुळे आवडले मला.
प्रेस्टिज कंपनीने इंड्क्शन
प्रेस्टिज कंपनीने इंड्क्शन कुकिन्ग सिस्टिम व त्यासाठी कंपॅटिबल तीन भांडी - प्रे.कूकर, सॉस पॅन व कढई लाँच केले आहे. ग्यास ची सोय नसेल त्या ठिकाणी हे वापरू शकतो नाही का? मी एप्रील मध्ये घेणार आहे ऑफिस साठी. मग रिपोर्ट टाकते.
ह्या इंडक्शन कुकिंगचा
ह्या इंडक्शन कुकिंगचा रिव्ह्यु मिळाला तर खरंच बरं.. आईही विचार करतीय..
सिंडी, मला गेल्याच आठवड्यात
सिंडी, मला गेल्याच आठवड्यात इथे शॉप राईटमध्ये मिळालं आप्पे/पॅन्केक पफ पॅन. १०डॉ. ला. शेवटचं होतं त्यामुळे जराही विचार न करता ताबडतोब उचललं. पण हे फक्त ७ मोल्डस वालं आहे. पण की फरक पैंदा.
वर प्रियाने लिंक दिलेलंच आहे
वर प्रियाने लिंक दिलेलंच आहे माझ्याकडे.
इथे अमेरीकेमधे चांगला मिक्सर
इथे अमेरीकेमधे चांगला मिक्सर कुठे मिळेल ? मी दोन / तिन वापरुन पाहिले पण देशातल्या प्रमाणे बारिक चटणी ई. करता येत नाही.
कुठे आहेस त्यावर अवलंबून आहे.
कुठे आहेस त्यावर अवलंबून आहे. इथे न्यु जर्सीत तुला आपले भारतीत मिक्सी मिळतील. २,३ वर्षापूर्वी मी सुमित घेतला. आता त्याचं प्रॉडक्शन बंद केलंय पण आणखीन दुसर्या ब्रँडचाही मिळतो, मला वाट्तं प्रिमीयर.
मी भारतातुन येतानां प्रीथी
मी भारतातुन येतानां प्रीथी नावाचा मिक्सर आणला. वर सायोने म्हटलं तसं सुमितचा बंद झाला आहे आता. माझा ४ भांड्यांचा आहे. मस्त आहे एकदम. देसी दुकानात मिळेल इंडीयन मिक्सर. किंवा "शो मी द करी" च्या वेबसाईट वरुन पण घेता येईल.
सुमितचा मिक्सर हवा असेल तर या
सुमितचा मिक्सर हवा असेल तर या वेबसाईट वर बघ. Amazon वर सुद्धा आहे. नाहितर काहि मैत्रिणिंकडे प्रीति चा आहे जो लोकल देसी ग्रोसरी दुकानात मिळेल तो सुद्धा चांगला आहे. पुर्वि सनबीम चा मिळायचा इथे ज्यात एकदम बारिक वाटले जायचे. पण आता तो दिसला नाहि स्टोअर मधे.
मी भारतातुन 'बॉस'कंपनिचा
मी भारतातुन 'बॉस'कंपनिचा मिक्सि आणला आहे. २५०० ला मिळाला, ४ भांडी आहेत,चांगला आहे.
फक्त चटणी साठी हवा असेल तर 'रेव्हेल' सारखा सुंदर ग्रांईडर नाही.अगदी २ मिरच्या, एखादी लसणाची पाकळी सुद्धा निट बारिक होते. 'इंगो 'मधे मिळेल.
कोरड्या चटण्या, मसाले
कोरड्या चटण्या, मसाले करण्यासाठी मी Cuisinart चा कॉफी ग्राइंडर वापरते. धुवायला सोपा आहे. एक सट भरुन चटणी एका वेळी होते. अगदी वस्त्रगाळ पावडर सुद्धा होते. त्यातच दाण्याचा, तिळाचा कूट पण करते. लहान आकारामुळे अमेरिकेत येऊन-जाऊन असणार्यांना सुद्धा सोयीचा पडतो.
प्रिया, सायो धन्यवाद. हे पात्र ग्लास टॉप स्टोव्हवर चालेल का ? म्हणजे आच नीट लागेल ना ? ऑनलाइन सगळे मिळते पण दुकानात मिळत नाही
सिंडरेला हो ग्लास टॉप
सिंडरेला हो ग्लास टॉप स्टोव्हवर पण चांगले चालते. Bed, Bath and Beyond मधे जर ऑनलाइन तुला पॅन केक पफ पॅन दिसत असेल आणि स्टोअर मधे नसेल तर तु स्टोअर मधे त्यांना ऑर्डर करायला सांगु शकते. मी केले आहे असे १-२ दा. शिपिंग वेव्ह केलि होति त्यांनि कारण स्टोअर मधे नव्हते म्हणुन.
ऑस्टरच्या ब्लेंडरवर चालणारी
ऑस्टरच्या ब्लेंडरवर चालणारी छोटी भांडी मिळतात सांताकृझ, पार्ले , दादर या भागात. मी तसलीच तीन आणलीयेत. एक ओल्या चटण्या / खोबर्याचे / कांदा खोबर्याचे वाटण या साठी, एक कॉफी पावडर करण्यासाठी अन एक इतर काही कोरडे प्रकार वाटण्यासाठी - दाण्याचं कूट / कोरडी चटणी / सांबार मसाला वगैरे साठी ठेवली आहेत .
इडलीसाठी जसे साचे आणि स्टीमर
इडलीसाठी जसे साचे आणि स्टीमर मिळतो तसा ढोकळ्यासाठी काही संच मिळतो का ? असल्यास कुठे ?
ढोकळ्यासाठी ३ प्लेटस चा स्टँड
ढोकळ्यासाठी ३ प्लेटस चा स्टँड मिळतो. कुकरमध्ये बसतो. मी भारतातून आणला पण इथे इंडियन ग्रोसरीस्टोअर्मध्ये बघितला आहे. ढोकळा स्टँड म्हणतात.
नवर्याचा वाढदिवस आला आहे का जवळ? ह्या सगळ्या गिफ्ट शोधते आहेस म्हणून विचारते.
छे उन्हाळा आला, आता आंबवलेले
छे उन्हाळा आला, आता आंबवलेले पदार्थ छान होतील म्हणून
त्याचा वाढदिवस उन्हाळ्यात असतो हा निव्वळ योगायोग बर्का 
ते अप्पे पात्र मी विल्यम
ते अप्पे पात्र मी विल्यम सनोमा मधे पाहिले पण त्यात अप्पे खुपच मोठे होतील असे वाटतेय. आहे छान आणि कास्ट आयर्न असल्याने छानही असेल. पण मला ते येवढे मोठाले अप्पे पाहून जरा नको वाटले.
देशातून कोणी येणार असेल तर निर्लेपचे मस्त आहे बघ. खाली सगळे स्लॉट्स जोडणारी रिंग आहे त्यामुळे त्यात आच सगळीकडे नीट लागते. अतिशय हलका आहे. घेउन येणार्यांना पण जड होणार नाही.
Pages