स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे

Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34

स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.

जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.

स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद सर्वांना,
actually वर सांगितलेले दोन्ही कुकर मला लग्नात भेट मिळालेले होते आणि त्या आधी कधी घेतलेल्याचा अनुभव नव्हता त्यामुळे नक्की कीती लिटरचे आहेत ते माहीत नव्हते म्हणुन डब्यांच्या मोजणीत लिहीले. मोठ्या कुकरचा एक डबा छोट्या कुकरम्ध्ये बसत होता नी वर एखादा छोटा चपटा डबा/वाटी राहायची.
१०-१५ मि. मस्त शिजुन पण यायच. असो. खुप जीवावर उदार होउन काल तो exchange केला (माहेरच माझ नाव असलेले ते एकच भांड होते त्यामूळे आणखीनच वाईट वाट्ल, बाकी ही आहेत पण त्यावर माझ नाव नाहीय.) तर तो ५ लि. चा होता. त्याबदली मार्लेक्सचा ५ लि. घेतला. खुप दीवसांपासुन मनात चाललेला गोंधळ संपला.
माबो वरच बर्‍याच ठीकाणी दिनेशदांनी सांगितलेले आढळले की कुकर घेताना कुकींग बुक मागुन घ्या पण नाही मिळाले. असो.

सांगायच राहील, माझा कुकर मी चेक केला तेव्हा कळल की त्याचा तळ थोडा बेन्ट झाला होता म्हण्जे थोडा गोलाकार बाहेरुन कढईसारखा आणी वरची कडा पण झाकण लावतो तिथली वाकडी म्हण्जे ते छोटे छोटे चपटे लॉक असतात ते पण बेन्ट झालेले होते (वर-खाली) त्यामुळे त्याची वाफ निघुन जायची in short त्याची जायचीच वेळ आलेलि होती.:(

फक्त माहितीसाठी म्हणून सांगते..... माहिमला हॉकिन्सचे सर्विस सेंटर आहे.आम्ही तिथुन बर्‍याचदा कुकरचा वेडावाकडा आकार नीट करणे आणि इतर सर्विसिंग करून घेतले आहे. आई कडचा कुकर तर मी अगदी लहान असल्यापासून पाहतेय. आकार बिघड्ला की आम्ही तो त्या सेंटर वर घेऊन जाऊन ठिक करून आणायचो.

नवीन कुकर लावताना शिल्पा, वाफ जाणारा व्हाल्व नीट काम करतो आहे ना ते लक्ष ठेवत जावे. तो कधीकधी
वितळतो व कुकर मध्ये स्फोट झाल्या सारखा होउन सारा भात वगैए छपरापरेन्त उड्तो. भाजु शकते. बाळ स्वयंपाक घरात ठेवून स्वयंपाक करूच नये शक्यतो पण दुसर्या खोलीत आपल्या नजरेच्या ट्प्प्यात असु द्यावा. आता तो काही महिन्यात रान्गायला लागेल तेन्वा सुरी विळी जमीनीवर ठेवणॅ चालणार नाही. बाळ झोपाय्च्या आधी शिट्ट्या करुन घेतल्या कुकर च्या की मग ते दचकुन उठ्त नाहीत. व आपला हक्काचा आरामाचा वेळ कमी होत नाही. तुला माहीत असेलच पण एकटी असतेस म्हणून परत सान्गितले. त्या कुकर मधील साइज ची रबर गास्केट पण अजुन एक आत्ताच आणुन ठेव. ही गास्केट नेहमी आयत्या वेळी तुट्ते( रात्री/ पाहुणे आले असताना) व आपल्या कामाचा खोळंबा होउ शकतो.

अस पण असत का मला खरच माहीत नव्हत पण आता पुढे नक्की लक्षात ठेवेन, तस माहीम खुपच लांब पडेल पण ईथे जवळ्पास चोकशी करेन, अस माहीतगार नाही ग कोणी सांगणार अमिता, आणी नवरेबुवा माहीतय ना कसे असतात ते बायकांबरोबर जास्त फीरायला (भांड्यांच्या दुकानात) आवडत नाही त्यामुळे एकाच दुकानात गेलो थोड surfing केल नी मग घेतला. तेही घ्याय्ला तयार नव्ह्ते मी जबरद्स्तीनेच गेले होते.

may be 7 or 8 ltr cha asel. मी त्यात १ डबा रहायचा म्हणुन छोटा म्हणायची पण त्याहुनही छोटे बघितल्यावर कळल की तो medium category मध्ये बसतो. असे माझे ज्ञान :दिवा:.....:P

मला पण.. माझ्या आईने मला बेबी कूकर दिलाय. अडीच लिटरचा आणि अजून एक आहे तो दीड लिटरचा. भाजे वगैरे करायला एकदम बरा पडतो.

हो ग, मला पण घ्यावेसेच वाट्त होते ते छोटे कुकर, दिसतात पण किती छान्, पण म्हट्ल आता वाढता व्याप आहे प्राचीच्या सांगण्यानुसार..
धन्यवाद अश्विनीमामी, तुमची पोस्ट आता वाचली, खुप छान सांगितलात, सगळ्या सुचना नीट लक्षात ठेवेन, अस कुणी आपल म्हणुन मार्गदर्शन केले की आमच्या सार्ख्या स्वतंत्र संसार करणार्या मुलींना आधार वाटतो. तस फारस मी बाळाला किचन मध्ये घेतच नाही, फक्त चपात्या करताना घेते कधी कधी... अगदीच रहात नसेल तर...

मागे एका वैज्ञानिक वस्तुंच्या प्रदर्शनात एका स्टॉलवर स्टिलची भांडी पाहिलीत. एकही थेंब तेल न वापरता, नेहमी लागतो त्याच्या जवळजवळ ५०% ते ६०% कमी वेळात अतीशय आरोग्यदायक सैपाक त्यात होतो अशी जाहिरातही केली होती. मी भांडी पाहिली ती दिसत तर होती चांगली आणि बरीच जाडजुडही होती, पण खुपच महाग होती. मध्यम आकाराच्या टोपासारख्या भांड्याला १००० रु. Sad
विक्रेता म्हणाला ही औषधे ज्यात बनवतात त्याच स्टिलपासुन बनवलीत..

कोणी वापरलीत का ही भांडी? कसा अनुभव आहे? मला घ्याविशी वाटली, पण किंमत खुप अव्वाच्यासव्वा वाटली.

साधना मलाही याच प्रश्नाच उत्तर हवं होतं आणि मी हेच लिहिणार होते तेवढ्यात पाहीलं टु लिहिलेलं. खरच कोणी ही भांडी वापरुन पाहिल्येत का? प्रदर्शनांतुन अशी भाम्डी दिसतात. घ्यावीत की न घ्यावीत हा प्रश्न पडतो.

साधना माझ्याकडे ही ओळखीने एक जण आली होती ही भांडी विकायला.... पण ती तर काहिच्या कही किम्मत सांगत होती... ९००० ला २ भांडी आणि तेही discount आहे म्हणे :)... ती भांडी सर्जीकल स्टिल ची असतात आणि नॉन पोरस् त्याने किति फरक पडतो ते कहि माहित नाही....अता तिने पण तो बिझनेस बंद केला... कोणि फारशी घेत नहित म्हणुन...:) Happy

मला वाटतं माझ्या आईकडे आहे तसलं भांडं. कोल्हापूर का असच कुठून तरी प्रदर्शनात आलं होतं ते भांडं.
तिला तरी चांगला अनुभव आला. अजिबात तेल न घालता ती त्यात भाज्या करत असल्याचं मी मागच्या ट्रिपला पाहिलय. इतक्यात काही बोलणं नाही झालय तिच्याशी त्याबाबत.

माझ्या मामे सा. बां. नी त्यातलं एक भांडं घेतलंय ज्यात सा.खि. कमी तुपात नेहमीच मोकळी होते. 3 लिटरची कढई 890 रुपयांना... त्यांना वापरण्याचा अनुभव विचारला पाहिजे.

माझ्या सासूबाईंनी दिलयं मला हे भांडं. मी अगदी मोहरी,हिंग घालण्यापुरतं थेंबभर तेल घालुन भाज्या करते त्यात. माझा अनुभव चांगला आहे. वेळेचं काही मला जाणवलं नाही. कदाचित माझ्याकडे ईलेक्ट्रिक स्टोव असल्याने पण असेल पण वेळ तेवढाच लागतो.

---

मला भाजीसाठी छोटा कुकर आणि डोसे करन्यासाठी पॅन घ्यायचा आहे
कुकर चांगला असावा त्यामध्ये भात,हलवा, भाज्या असे सगळे प्रकार करता येतिल आनि काहि पॅनच
धुतल्यास खराब होतात आणि नंतर डोसे करताना चिकटतात मला चांगल्या कंपनीचे घ्यायचे आहेत
कोणि वापरले असल्यास लवकर सांगा

डोसे करण्यासाठी नॉनस्टीक पॅन अजिबात घेऊ नकोस. कारण तो लवकर खराब होतो.
बिडाचा किंवा लोखंडाचा जाड तवा घे..डोसे छान होतात. पहील्यांदा डोसे करतांना भरपूर तेल लावायचं (कांद्याच्या फोडीने) आणि पहीले २ डोसे खायचे नाहीत..एकदा का त्याचं वरवरचं लोखंड निघुन गेलं की डोसे छान होतात.
त्याला वारंवार नं धुता....तेलानेच साफ करायचं मात्र लक्षात ठेवायचं...

एक महत्त्वाची सूचना:
दिल्ली मध्ये एक महिला प्रेशर कूकर चा स्फोट होउन झालेल्या जखमांमुळे मेली. तर टीवी वर सेफ्टी सुचना सांगत होते.

१) चना/ राजमा अश्या गोष्टी प्रे. कूकर मध्ये कायम शिजविल्यास त्यांची टरफले/साले/ वरचे आवरण कूकरच्या प्रेशर पाइप मध्ये जमा होउन तो ब्लॉक होतो ( जिथून शिट्टी वाजते तो भाग.) मग कूकर हा एक बॉम्बसारखे काम करतो. तरी प्रेशर पाइप नेहमी मोकळा ठेवावा.

२) कूकर नेहमी आय एस आय मार्क वालाच घ्यावा
३) कूकरची जाडी ३.५एम एम असावी कमीत कमी.
४) सेफ्टी व्हाल्व व गासकेट ची तपासणी सहा महिन्यातून एकदा करावी.

5) नुसत्या कुकरमधे जर डायरेक्ट काहिही शिजवणार असाल तर मग कुकर १/३ च भरलेला असावा त्यापेक्षा जास्त नाही.

स्नेहा, हो पोळ्या होतात. कमी प्रमाणात केल्या तर मेथी, चार्डच्या भाज्या देखिल छान होतात.

मामी, अजुन एक त्यात वाढवा - नुसत्या कुकरमधे जर डायरेक्ट काहिही शिजवणार असाल तर मग कुकर १/३ च भरलेला असावा त्यापेक्षा जास्त नाही.

तो तवा सीझन करुन घेतला होतास का? रोज २-३ टेबलस्पून तेल असे ३-४ दिवस कमित कमी लावुन ठेवायचे. ते मुरते त्यात मग वापरायचा. त्याने नाही चिकटत.

किंवा ही पद्धत वापर - http://whatscookingamerica.net/Information/CastIronPans.htm

Pages