स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे

Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34

स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.

जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.

स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सालड (salad) मास्टर ची भांडी कुणी वापरली आहेत का?

परवा त्यांच्या dinner presentation ला गेलो होतो. अजिबात तेल न वापरता अन्न शिजवता येत. नॉन-व्हेज पण. एक चमचा बटर वापरुन केक केला. पास्ता सुद्धा पाणी न वापरता , नुसत्या भाज्या आणि सॉस मधे शिजवला

खुप पटकन शिजत अन्न. अजिबात बघायला लागत नाही.

सेट ची ( या मधे ३ भांडी - २qt, ३qt, ४qt, २ तवे, एक मोठे 5qt ) मात्र किम्मत खूप जास्त आहे. $३०००.

कुणी वापरल असल्यास तुमचे अनुभव क्रुपया कळवा.

रोजच्या वापरासाठी चपातीसाठी चांगला तवा कोणता? माझ्याकडे नॉनस्टीक तवा आहे पण त्याच मधल्या भागाचच कोटींग गेलय त्यामुळे चपाती चिकटते तो दुरुस्त ( कोटींग ) करता येईल का? नवीन घ्यायचा झाला तर मजबुत नी टिकाऊ तवा कोणत्या कंपनीचा? नॉनस्टीकच चांगला की ईतर लोखंडी वा आणखी कोन्ता?

ईथे सुरवातीला तव्यावर चर्चा दिसतेय पण ती डोसे घावणे इ साठी आहे चपातीसाठी नाही. तरी कृपया मार्गदर्शन करावे.......

लोखन्डी तवा सर्वात बेस्ट! नाहीतर हार्ड आनोडाइज्ड तवा आण त्यामानाने जास्त टिकतो साध्या नॉन्स्टीक पेक्षा.

नाहीतर हार्ड आनोडाइज्ड तवा आण >> सहमत! फ्युच्युराचा चांगला आहे.तेल /तुप सोडुन पराठे भाजले तर लगेच साफ करायचा मात्र.

नॉन स्टिक तव्याच कोटींग निघायला सुरुवात झाली असेल तर अजिबात तो तवा वापरु नये. कोटींगचे कण
हार्मफुल असतात शरिरासाठी.
मागे बहुदा, मिनोती ने आणि लालु न लिहिलेल याविषयी.

रुनी तो पण चांगला आहे अग पोळ्यासाठी आणि त्यांचाच एक फ्लॅट मिळतो तवा तो डोश्यासाठी वगैरे चांगला पडतो.

रुनीने दाखवलेला तवा आहे माझ्याकडे. बहुतेक ८ वर्ष झाली असतिल. पोळ्या, पराठे मस्त होतात. अजूनतरी कोटिंग निघाले नाहीये.
बरं, मला वॉशिंग मशिन बदलायचिये. कमी पाणी लागणारी चांगली अ‍ॅटोमॅटिक वॉशिंग मशिन सुचवू शकाल का? इथे लिहू की नवा धागा उघडू इतर उपकरणांसाठी?

हार्ड आनोडाइज्ड तवा जास्त टिकतो ना? कोटिंग्च काय? नॉनस्टीक सारखे निघनार नाही ना? दर १-१ १/२ वर्षाने बदलायची गरज नाही ना? माझ्याक्डे २ तवे नॉनस्टीक्चे पडुन आहेत (कोटिंग निघाले म्हणुन).
रोज वापरला तरी चालेल ना हा तवा? साधारण अंदाजे काय किंमत असेल या हार्ड आनोडाइज्ड तव्यांची? यांची काही खास काळजी घ्यावी लागते का? cleaning etc बाबतीत (बीडाच्या तव्यांसारखी)?
प्लीज सांगा मला..... मला माहीत नव्हत कोटींग गेल्यावर वापराय्च नसत ते मी तसाच रोज वापरते आहे तरी मला लवकरात लवकर नवीन(टीकाऊ) घ्यायचा आहे....... help me

हार्ड अ‍ॅनोडाईज्ड तवा चांगला दणकट असतो आणि व्यवस्थित टिकतो. थोडा महाग असतो- ४५०-५०० रूपायाला मिळेल. काही काळजी घ्यावी लागत नाही, बाकी भांड्यांसारखा लोखंडी घासणीने घासला तरी चालतो.

पोळ्याच करायच्या असतील रोजच्या आणि देशात असशील तर अ‍ॅल्युमिनियमचा नेहेमीचा तवा का नाही घेत?

अवांतर- वापरून झालेले नॉनस्टीक तवे भांड्यांच्या दुकानात घेऊन जा. एक्सचेंज ऑफरमध्ये जुना तवा देऊन नवीन अ‍ॅनोडाईज्ड तवा मिळेल. घरातली अडचण कमी, पैसेही थोडे कमी पडतील. भांड्यांच्या दुकानात १२ महिने असल्या ऑफरी चालू असतात.

thanks punam for immidiate reply,
अ‍ॅल्युमिनियमच्या तव्यावर चपात्या चिकटतात ना (भाजताना तेल नाही लावले तर नी मी रोज्च्या चपात्याना तेल नाही लावत) ? तो खुप जड नी जाड असतो तापायला पण वेळ लागतो, माझ्या माहेरी होता असा आधी.....
म्हणुन नॉनस्टीक ट्राय केला तर त्याचा ही अनुभव चांगला नाही आला, म्हणुन मग आता हार्ड अ‍ॅनोडाईज्ड तवा Happy बाकी सविस्तर माहीती दिल्याबद्द्ल आभारी आहे.......

मला kitchen chimney (kitchen hood) बद्दल माहिती हवी आहे.

डक्ट नसलेल्या चिमनी बद्दल कुणी सांगेल का?

इथे कोणीच किचन चिमनी वापरत नाही का?
इतके ब्रँड आहेत आणि इतक्या प्रकारच्या चिमनी उपलब्ध आहेत की कन्फ्युज व्हायला झालय.
त्यात परत वेगवेगळ्या प्रकारचे फिल्टर्स असतात उदा. बॅफल, कॅसेट इ.
दुकानात गेल्यावर सेल्स पर्सन्सही योग्य माहिती देऊ शकत नाहीत.
कृपया कोणी माहिती देऊ शकेल का?

किचन हूड हा प्रकार खुप लोक इतक्या सहजी बदलत नाहीत त्यामुळे माहिती देणे इतके सोपे असेल असे नाही. भारतीय कुकिंगसाठी कोणतीही जास्त सकिंग पॉवर असलेली चिमनी पहावी लागेल. माझ्या गरी डक्ट आहे त्यामुळे मला माहिती नाही.

धन्यवाद मिनोति.
मला जास्त सकिंग पॉवरचीच चिमनी हवीय. कंपनीकडून कोणाला घरी कन्सल्टेशन साठी पाठवतात का ते विचारते.

माझ्याकडे aluminium ची कढइ आहे. त्यात तळण काढुन त्यावर कडेने ब्राऊन रंगाचा थर्र जमलाय. तो कशाने निघेल ? धन्यवाद.

युक्ती सुचवा मध्य टाकणार होते , पण भांड्याशी संबंधित आहे म्हणून इथे विचारतेय.

भारतात हॉकीन्स फुच्युरा चा भान्ड्यान्चा सेट मिळतो का?(लहान मोठे तवे ,कढई, आणखी काही भान्डी किवा कुकर असा) मिळत असेल तर सधारण किम्मत किती असते?किवा याची वेगवेगळी किमत साधारण काय असते? ह्या बद्दल बरच चान्गल ऐकलय.
इथे चन्गल्या दुकानातून हार्ड आनोडाइज्ड च्या नावाखाली घेतलेला महागडा ८ पीस चा सेट बन्डल निघाला
कोटीन्ग नीघू लागल महीन्यातच .बर झाल इथे वस्तू अवडली नाही म्हणून परत करता येते.....

हॉकीन्स फुच्युरा ची भांडी थोडी महाग आहेत. पण मस्त असतात.

४ली. चा कुकर २०००+ ना पड्ला मला.

मध्यम आकाराचा कढई ८००+ आहे.

दादरहून ब्राईट नावाच्या कंपनीची हार्ड आनोडाइज्ड कढई आणि तवा घेतलाय. तीन वर्ष सतत वापरतोय पण चांगल्या स्थितीत आहे.साधारण ६००-७०० किंमत होती एका वस्तूची.

Pages