स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे

Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34

स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.

जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.

स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आयकिया मधल्या मध्यम आणि छोट्या काचेच्या बरण्या आणि प्लॅस्टिक कंटेनर असे दोन्ही वापरते.
आयकिया आमच्याकडे येण्या अगोदर घेतलेल्या वॉलमार्ट मधल्या गोल प्लॅस्टीकच्या बरण्या पण आहेत माझ्याकडे.
कंटेनर स्टोअर्स मधुन पीठासाठी आणि तांदळासाठी मोठे डबे आणलेत.
रागुच्या पास्ता सॉसच्या बॉटल पण मी ठेवल्या आहेत. एकसारखा आणि पर्फेक्ट आकार म्हणुन.:)
छोटे न फोडलेले पाउचेस, बॉक्सेस इत्यादी बास्केट मध्ये ठेवते. पँट्रीची स्टोरेज कपॅसिटी वाढवायला म्हणुन कटेंनर स्टोअर्स मध्ये मिळणारे दाराला लावता येण्यासारखे सेल्फ बसवलेत.

ज्ञाती, काचेपेक्षा चांगल्या प्रतीचं प्लॅस्टिक बघ. रुनी म्हणते तसं एका वेळेला सगळे रिप्लेस न करता हळू हळू घे. माझ्याकडे भरपूर टप्परवेअर आहे, तसंच स्नॅप वेअरही आहे. एकावर एक स्टॅक करता येणार्‍या कंटेनरने जागाही वाचते.

थॅन्क्स सीमा, सायो!
काचेचे वापरायला सेफ म्हणुन बघत होते. चांगल्या प्रतीचे प्लास्टिकचे इतके पर्याय असतील हे लक्षातच नव्हते आले.
एकावर एक स्टॅक करता येणार्‍या कंटेनरने जागाही वाचते.>>> अशा आयडिआ हव्यात. माझे स्वयपाकाचे निम्मे सामान कीचनच्या बाहेरच ठेवावे लागते. आहे ती जागा अजिबात पुरत नाही.

http://www.ikea.com/us/en/catalog/products/90066708 -- हे मला सोयीचे वाटले म्हणून मी घेतलेत. एक्दम लहान आहेत त्यात मी मसाले, गुळ, आमसुले असे ठेवते. हे एकवर एक नीट बसतात.
मध्यम आहेत त्यात डाळी, कडधान्ये, रवा, शेंगदाणे वगैरे ठेवते.
मोठे आहेत त्यात साबुदाणा, तांदूळ असे ठेवते.

थोडे टार्गेटमधुन वगैरे आणलेले आहेत ते स्नॅपवेअर सारखे आहेत.

कसुरी मेथी, तीळ, फुटाणे डाळ असले काही ठेवायला मी या बरण्या ठेवल्यात - http://www.restaurantwidow.com/images/pom_2.jpg ऑफिसमधे हा टी एकेकाळी मिळायचा त्या साठवून.

माझ्याकडे सॉसची, जॅमची , देशी ग्रोसरीमधल्या लोणच्याची बाटली धुवून वापरायची हे नवर्‍याला अजिबात पटत नाही. चांगल्या पीनट बटरच्या रुंद तोंडाच्या बाटल्या सुद्धा तो फेकत असतो ( को त बो मधे लिहू का Happy )

मी छोट्या आकाराच्या कॅनिंगवाल्या बाटल्या थोडं थोडं लागतं तशा सामानासाठी वापरते. ( दगडफूल, लवंगा वगैरे ).
तांदूळ , कणीक या करता देशि ग्रोसरी मधून मोठे स्टीलचे डबे घेतलेत.
बाकी सगळ्या सामानाकरता एकदा ख्रिसमस ट्री शॉप्स मधून तीन साइझेसच्या ७०-८० बाटल्या घेतल्या होत्या.
बेसन, रवा, भाजणी , बाजरीचे पीठ वगैरे मोठ्या बाटल्यांमधे, डाळी /कडधान्ये मध्यम बाटल्यांमधे अन बाकी लहान बाटल्यांमधे ठेवते.
पॅन्ट्री जरा आवरून मग फोटो काढेन Happy

माझ्याकडे सॉसची, जॅमची , देशी ग्रोसरीमधल्या लोणच्याची बाटली धुवून वापरायची हे नवर्‍याला अजिबात पटत नाही. चांगल्या पीनट बटरच्या रुंद तोंडाच्या बाटल्या सुद्धा तो फेकत असतो ( को त बो मधे लिहू का स्मित ) >> माझ्याकडे पण. मी चोरुन ठेवते गराजमधे Happy कुणाला आमटी/कढी असले काही द्यायचे तर बरे वाटते.

ख्रिसमस ट्री शॉपमध्ये सध्या नाहियेत अशा बाटल्या. मी गेल्या वेळी गेले होते तेव्हा शोधल्या होत्या.
माझ्याकडे सॉसची, जॅमची , देशी ग्रोसरीमधल्या लोणच्याची बाटली धुवून वापरायची हे नवर्‍याला अजिबात पटत नाही. >>> घरोघरी... Happy
टेक्सस/ भागात ख्रिसमस ट्री शॉपसारखे एखादे दुकान आहे का?

कुकरची रिंग वापराने सैल(मोठी) होते व त्यामुळे पुरेसे प्रेशर जमत नाही (वाफ/पाणी निघून जाते). कुकर वापरून झाल्यावर रिंग डीप फ्रीझर मधे ठेवावी. पुन्हा वापरण्यापूर्वी तासभर आधी बाहेर काढावी. वाचलेला हा उपाय मी आजमावला आणि लागू पडला.

माझ्याकडे सॉसची, जॅमची , देशी ग्रोसरीमधल्या लोणच्याची बाटली धुवून वापरायची हे नवर्‍याला अजिबात पटत नाही. >>> घरोघरी... >>>>>>>>>>

अरे देवा, बरं झाल अगोदर सांगितल ते. मी फोटो टाकत नाही मग.

सीमा तु टाक फोटो, मी त्याला पटत नाही म्हटलं, मी त्यानुसार फेकते असं कुठं म्हटलं Wink

मुलींनो, वर दिलेले प्लास्टिकमधले पर्याय बीपीए फ्री आहेत का? स्नॅपवेअर आहे बहुतेक. आयकिआ च्या साईटवर मला उल्लेख नाही दिसला म्हणुन विचारतेय.

हे प्लॅस्टिकचे डबे किती वर्षं वापरावेत ? माझे आता बदलावेत असे मला वाटतेय. बघून बघून कंटाळा आलाय. सगळे एकदम आणले नसल्याने साधारण चार ते पाच वर्ष झाली.

सायो, वा वा सपोर्टबद्दल धन्यवाद. आयकिया अगदी येण्या-जाण्याच्या वाटेवर आहे. एखाद्या वीक डे ला हापिसातुन लवकर निघून जातेच कशी Proud

मिनोतीने दाखवलेले आयकियाचे डबे खूप दिवस माझ्या शॉपिंग लिस्ट वर आहेत. दिसायला पण स्टायलो आहेत एकदम. पूरे घरके बदल डालूंगी करायला हवं लवकरच.
http://www.amazon.com/OXO-Good-Grips-10-Piece-Container/dp/B0029096ZO
हा पण अजून एक आवडलेला प्रकार. पण कै च्या कै महाग वाटले.

मनिषा, आमच्याकडे आहे रोटीमेकर. मस्त चालतोय. पण तूला मातोसरींशी बोलायला लागेल.

टप्परवेअरचे डबे (इकडे भारतातले)चांगले असतात का? मी लंचला वगैरे वापरले आहेत. पण किराणा ठेवायला अजून वापरले नाहीत.

सायोने दिलेल्या लिंकमधले डबे घ्यायचा माझा विचार चालू आहे. मला स्टीलच्या डब्यात कशात काय ठेवलय ते आठवत नाही आणि मग गोंधळ उडतो.

असे प्लास्टीकचे डबे किती दिवस वापरणे सेफ असते??? साधारण किती वर्षानी ते बदलावे लागतील?

नंदिनी, टप्परवेअरची क्वालिटी खूप चांगली आहे.मी ही बरेच भारतातून आणि काही इथून घेतलेले आहेत.माझ्याकडे गेली ६,७ वर्ष आहेतच. दिसायलाही चांगले दिसतात आणि टिकाऊ ही आहेत.

मायक्रोवेव मधे चपाति गरम करन्यासाथि काय वापरावे

मायक्रोवेव्ह मधे एकदा भाजऊन गार झालेल्या चपात्या गरम करता येतात.
चपात्या एखाद्या (कापडी)रुमालात ठेवून ५-६ चपात्यांना २० सेकंद हाय पॉवर वर मायक्रोवेव्ह करावे. जास्त वेळ केल्यास चिवट होतील. कमी चपात्यांना १० सेकंद पुरावेत, पण अगदी आयत्या वेळी गरम कराव्यात.

नंदिनी, माझी मुंबईतली नणंद टप्परवेअर मध्येच किराणा ठेवते, कारण बाकीच्या डब्यात दमट हवा जाऊन खराब होतात गोष्टी. अतिशय कमी जागा लागते अन त्यांना. २०-२० किलोचे डबे एव्हढेसे दिसतात पण असतात २० किलोचे. Happy महाग आहेत पण जरूर घ्यावेत.

ओके, मग मी अता या डब्याची ऑर्डर देते. Happy
असल्या डब्याना जागा कमी लागते हे मात्र खरं. आणि मुंबईच्या हवामानाला चांगले पडत अस्तील तर उत्तम.

सायो आणि बस्के धन्यवाद.

अरे कुणीतरी ते कूकरच्या वाल्व बद्दल लिहा ना.
कंटेनर स्टोअर मधून मोठे डबे आणलेत. पीठ, तांदुळ यांना पोत्याबाहेरचे जग पाहुन बरे वाटले असणार Happy

सायो Happy एवढी वर्ष ते पोत्यातच कुढत होते आधी को त बो मग डोह Proud

ते ऑक्सो ग्रिपचे सेट मस्त आहेत एकदम, पण महागही आहेत.
कंटेनर स्टोअर मध्ये खूप छान अन उपयोगी वस्तू आहेत. आवडले ते दुकान.

या भांड्याव्यतिरिक्त तुम्ही कीचन ऑर्गनाएझ्ड ठेवण्याकरिता काय करता (काही वेगळे वापरत असाल जसे सीमाने पँट्रीच्या दारावर लावायचे शेल्फ सांगितले तसे) तेही लिहा, उपयोगी पडेल.

न्यु यॉर्क सिटीत आणि व्हाइट प्लेन्समध्ये आहे गं. तुला काही हवं असेल तर सांग. गटगला येताना घेऊन येइन.

Pages