माजं काय चुकलं...?
येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?
मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं
टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं
पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं
उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं
जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!?
असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..
****************
पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत.
तूप कढवण्याचा खास बीबी
तूप कढवण्याचा खास बीबी काढायला हवाय आता !
कधी कधी बाजारी बटरमधे रंग मिसळलेला असतो. त्यामूळे आपल्याला अपेक्षित रंग येत नाही.
तूप नीट कढल्यावर त्यात पाण्याचा अंश राहिलेला नसतो, त्यामूळे कढलेल्या तूपात (एखाद्या लांब चमच्याने) अर्धा थेंब पाणी टाकले तर ते तडतड आवाज करते व लगेच त्याची वाफ होते. कढलेल्या तूपाचे तपमान अर्थातच १००अंश सें. पेक्षा जास्त असते.
असे पाणी उडून गेले कि गॅस बंद केला तरी चालेल. वासाची परिक्षा अर्थात आहेच.
तूप कढवायला जाड भांडे घेणे गरजेचे आहे, तसेच ते गॅस बंद केल्यावर उतरुन ठेवले पाहिजे. नाहीतर त्याला उष्णता मिळतच राहते.
वरच्या केस मधे तसेच झालेले दिसतेय. त्या जळक्या तूपाचे काहिच करता येणार नाही.
हां... आता नवं बनवते झालं.
हां... आता नवं बनवते झालं. चांगला धडा मिळाला...
आता झालं की लगेच निराळ्या भांड्यात काढते.
अजून एक जळकट प्रश्नः गिट्सचे
अजून एक जळकट प्रश्नः
गिट्सचे रबडी पॅक आणून त्याची रबडी बनवत होते. मधे दोन तीन मिनिटे दुर्लक्ष झाले तर खाली पातेल्याला लागली. मी आता वेगळ्या भांड्यात काढून घेतली आहे. पण तो जळका वास जाण्ञासाठी त्यात काय घालू? थंड केल्यावर वास कमी जाणवेल की जास्त?
जळके तूप व दूध हे दोन्ही फार
जळके तूप व दूध हे दोन्ही फार स्ट्रॉन्ग वासेस आहेत.
थंड झाल्यावर थोडा कमी होईल
थंड झाल्यावर थोडा कमी होईल वास. (वासेस येण्यासाठी जरा तपमान लागते, हो ना अश्विनी ?) पण जर चव बिघडली असेल तर न खाणेच योग्य.
चव नाही बिघडली आहे. जळला वासच
चव नाही बिघडली आहे. जळला वासच जळका येतोय. श्या... इतकं सोपं काम बिघडवून ठेवलं की माझाच मला राग येतोय.
मग कमी होईल वास. आणि पदार्थ
मग कमी होईल वास.
आणि पदार्थ सगळ्यांचेच बिघडतात,
जिलबी बिघडली, जिलबी बिघडली...हरीच्या नैवेद्याला केली,, जिलबी बिघडली........................ मग त्याचा मालपुवा केला !!
दोन्ही फार स्ट्रॉन्ग वासेस
दोन्ही फार स्ट्रॉन्ग वासेस आहेत<<< वासेस.... अमा
@नंदिनी, तुला आवडत असेल तर त्यात थोडा रोज इसेन्स किंवा खस इसेन्स घलु शकतेस. आधी वाटीभर रबडीत घालुन बघ. अन्यथा रबडी मधे दुध घालुन चांगली ब्लेंड कर, व्हॅनीला इसेन्स घाल किंवा मँगो पल्प घाल आणि कुल्फी सारखी सेट करयला ठेव. वास खुपच कमी होइल.
दुघाचा जळका वास कशानेही जात
दुघाचा जळका वास कशानेही जात नाही
शूम्पी +१ लिहू का नको असा
शूम्पी +१
लिहू का नको असा बराच वेळ विचार करत होते.
त्यावर आणखी वेळ आणि घटकपदार्थ वाया घालवू नयेत असं माझं वैयक्तिक मत.
दुघाचा जळका वास कशानेही जात
दुघाचा जळका वास कशानेही जात नाही << हो, अगदी बरोबर..... पण रबडी कितपत खाली लागलिये त्यानुसार थोड्या स्ट्राँग वासाच्या इसेन्स ने वास कमी नक्कीच करता येइल असं वाटतं.
काहीही नविन अॅड न करता ती
काहीही नविन अॅड न करता ती रबडी टाकुन द्या. काहीही केल तरी वास जात नाही असा माझा तरी अनुभव आहे.
खाऊन बघ ना आधी, अगदीच असह्य
खाऊन बघ ना आधी, अगदीच असह्य जळका वास असेल तर टाकून दे,
किंवा मग कणिकेत मिक्स करून पोळ्य/पुर्या लाटून बघ जमतंय का... थोडा वास कमी झाला तरिही निदान खाववेल असं वाटतंय. अगदीच नाही तर टाकण्याशिवाय पर्याय नाही. दुध तुपासारखे पदार्थ वाया गेल्यावर जाम त्रास होतो
काल थोडे केशर वेलची सिरप
काल थोडे केशर वेलची सिरप घालून रबडी सारखी केली. वास बर्यापैकी कमी झाला. तरीदेखील मला तो जास्त जाणवत होता. सुनिधीने पण दोन चमचे खाल्ले म्हणजे इतकं जळालं नसावं.
काल रात्री संपवली ती रबडी. नशीब अर्ध्याच लिटर दुधाची केली होती.
मी आज र लिटर २% दूधाचे पनीर
मी आज र लिटर २% दूधाचे पनीर घरी केले, नीट मळले (जवळ जवळ ७-८ मिनिटे). मळून मऊ झालेल्या पनीरचे लिंबाएवढे गोळे केले. साखरेचा एकतारी पाक करुन त्या पाकात २५ मिनिटे हे गोळे उकळले. चाखून पाहिले तर पाकाची चव छान जमलीय पण रसगुल्ला खूपच chewy लागतोय.
माझे काय चुकले? मला येत्या वीकांताला ८० ते ९० रसगुल्ले करायचे आहेत (पार्टीसाठी). ह्या घडीला तरी ते अशक्य वाटतेय. जाणकारांनी मदत करावी. धन्यवाद!
शिवाय ह्या न जमलेल्या गुल्ल्यांचे काय करता येइल?
अमी
दूधात प्रथिने जास्त असली तर
दूधात प्रथिने जास्त असली तर असे होते. थोड्या रसगुल्ल्यांचे अर्धे तूकडे करुन पाकात राहू द्या. ५/६ तासानी फरक पडतोय का बघा.
ते रसगुल्ले साध्या पाण्यात खळबळ धुवून, कुस्करून पनीर भुर्जी वगैरे करता येईल. पाकाचा दुसरा काहीतरी उपयोग करावा लागेल.
दिनेशदा, धन्यवाद इतक्या
दिनेशदा, धन्यवाद इतक्या त्वरित उत्तराबद्दल! करुन पाहते, नन्तर पोस्टते काही फरक पडतो का ते.
अमी
रसगुल्ल्यांसाठी एकतारी पाक
रसगुल्ल्यांसाठी एकतारी पाक नाहि लागत ना? त्यामुळे काहि फरक पडु शकतो का?
भान, तुम्ही पाक कसला करता हे
भान, तुम्ही पाक कसला करता हे सांगाल का? मी एकतारी पाक म्हणजे पाण्यात साखर विरघळवून एक उकळी आणली - हा माझा एकतारी पाक. हे चुकले असे वाटते का?
अमी
रसगुल्याला एकतारी पाक नाही
रसगुल्याला एकतारी पाक नाही करत. आणि पनीर मळताना १ चमचा बारीक रवा घालायचा.
स्वाती२, किती तारी पाक करायचा
स्वाती२, किती तारी पाक करायचा मग? रव्याचे मला माहित नव्ह्ते - आता करताना नक्की घालीन. पाकाबद्दल जास्त माहिती असल्यास नक्की share करा. धन्यवाद!
अमी
पिसलिली, हे पहा.
पिसलिली, हे पहा.
मी एकतारी पाक म्हणजे पाण्यात
मी एकतारी पाक म्हणजे पाण्यात साखर विरघळवून एक उकळी आणली - हा माझा एकतारी पाक.>>>>>>>>>> ह्याला एकतारी पाक नाहि म्हणत. आणि मी पण असाच पाक करते
पण साखर आणि पाण्याचं प्रमाण १:१ (साखर थोडी कमी) असं घेतें.
स्वाती२, खूप खूप धन्यवाद!
स्वाती२, खूप खूप धन्यवाद! आता मंजुलाजीने म्हटल्याप्रमाणे तुकडे दूधात उकळवून घेते (रबडी सारखे), वरती थोडे पिस्ते, वेलची पूड, केशर. थोड्क्यात मी केलेली वस्तु फुकट जाणार नाही. अमी
भान, थेन्कस! पाक करायचा
भान, थेन्कस! पाक करायचा म्ह्टलं की जरा नर्वसनेस येतो खरा! मी साखरेचे प्रमाण सहा कप पाणी, जवळ जवळ पावणे तीन कप साखर घेतली होती. आता लक्षात ठेवीन. अमी
पाक करायची माहिती इथे
पाक करायची माहिती इथे मिळेल.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/6445
आभार निवि. ते लेखन
आभार निवि. ते लेखन संदर्भासाठी चांगलेच आहे.
मूळ पोस्टमधला, एकतारी हा शब्द माझ्या नजरेतून सूटला होता.
निवि, दिनेशदाने पूर्वी जे पाक
निवि, दिनेशदाने पूर्वी जे पाक करण्याबद्दल लिहिले होते त्याची लिंक दिल्याबदल धन्यवाद! दिनेशदा, तुमचे पुन्हा थेन्कस इतके विस्तारुन लिहिल्याबद्दल. अमी
दिनेशदा, तुम्ही
दिनेशदा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुकडे पाच तास पाकात राहू दिले. तुकडे आतून ही भिजले पण chewiness आहेच. दूधाची रबडी करुन तुकडे त्यात उकळून घेतले - जरा नरम झाले आहेत. चव छान आहे पण चूक झाली ते मला तरी कळतंच. धन्यवाद! अमी
Pages